द सिक्रेट मिशन भाग -15

रंजक रोमांचक रहस्यकथा - द सिक्रेट मिॆशन

द सिक्रेट मिशन भाग -15

©®राधिका कुलकर्णी.

(कल्पनिक)

[मागील भागात - धनेश मंदिराची चावी बनवतो.गूपचूपपणे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून पिंडीवर व्हीडीओत दिसल्याप्रमाणे दूधाचा अभिषेक करतो.परंतु व्हिडीओत त्यानंतर जो आवाज येतो तसे काहीच घडत नाही ज्यामूळे धनेश निराश होतो.मंदिराची माहिती मिळवण्याहेतूनेच तो लायब्ररीत जातो जिकडे त्याला निंबाळकर गुरूजींबद्दल कळते.तो गुरूजींची भेट घेतो.गुरूजी त्याला एक मौलिक माहिती देणारी डायरी देतात.]

आता पूढे……

निबांळकर गुरूजींनी दिलेली डायरी घेऊन धनेश तडक घरी आला.कधी एकदा घरी जातो आणि ती डायरी वाचतो असे त्याला झाले होते.डायरीमधे असे काय लिहीले असेल ज्यामूळे गुरूजी इतके भयभीत झाले ह्याचे उत्तर शोधण्यासाठी धनेश अतिशय आतूर झाला होता.

दाराशी गाडी साईड हँडलवर लावत घाईनेच तो आपल्या रूमवर पोहोचला.

खोलीत शिरताच दरवाजा बंद करून धनेश वही उघडून वाचणार इतक्यात दारावर टकटक झाली.

आत्ता ह्यावेळी कोण आलं? मनाशी विचार करतच त्याने दार उघडले तर दारात दूर्वा...त्याही परिस्थितीत आश्चर्य दाटून आले त्याच्या चेहऱ्यावर.

प्रश्नांकीत नजरेनेच त्याने विचारले, " आत्ता ह्यावेळी तू इकडे कशी ? सासूबाई कूठेत? " दूर्वाला त्याचा रोख लगेच समजला.

" आई मावशीकडे गेली दूपारच्या गाडीने.मी तूला तसा मेसेजही केला होता दूपारी.पण तू माझा मेसेज अजूनही पाहीला नाहीस. "

रडवेला चेहरा करूनच दूर्वाने तक्रार केली.

त्यावर जरा लाईट मूडमधे येत दूर्वाला आपल्या मिठीत खेचतच म्हणाला, " मला काय माहित देव माझ्यावर असा प्रसन्न होऊन लगेच माझ्या झोळीत इतका गोऽऽऽड प्रसाद देणार आहे,नाहीतर मी फोन सायलेंट मोडवर कशाला ठेवला असता ना डिअर…? "

" धत्ऽऽ !! तूला मस्करी सुचतेय आणि तिकडे बिचारी माझी मावशी…"

त्यावर लगेच बाजू सावरत धनेश म्हणाला, " अग् काळजी करू नकोस ..मावशी लवकरच टकाटक होऊन आपल्या लग्नाला चालत येतील की नाही बघच तू.. "

मग लगेच लाडात येत धनेश दूर्वाच्या डोळ्यात बघत म्हणाला, " मग आता ह्या देवाला प्रसाद कधी मिळणार? "

" चल चावट!! काही मनात मांडे रचू नकोस.फक्त आईच गेलीय,बाबा इकडेच आहेत.आणि मी एकटी असताना ते बाहेरच्या बैठकीत झोपतात मला सोबत म्हणून.कळऽऽल्ले का? तेव्हा मला रात्री भेटायला येता येणार नाही म्हणून आत्ता आले. "

धनेशने लगेच तोंड बारीक केले.त्याच्या उदास पडलेल्या चेहऱ्यात तो जाम क्यूट दिसत होता. ती त्याच्या चेहऱ्याला आपल्या ओंजळीत पकडत म्हणाली, " रात्री नाही पण आत्ता आहे ना तुझ्या सोबत.मग तो आनंद घ्यायचा सोडून असा रूसतोस काय लहान मूलासारखा. "

त्यावर धनेश तोंड फुगवून म्हणाला," आता आहे म्हणायला असा किती वेळ मिळणार आहे? आता सासरेबूवा येतीलच घरी. "

त्याचा रूसलेला चेहरा बघून दूर्वाला फार काळ त्याला ताणणे जमेना.

त्याच्या पाठीमागून ती हळूच कानात कुजबूजली, " बाबा लगेच नाही येणारेत काहीऽऽऽ...." 

ते ऐकताच डोळे विस्फारूनच दूर्वाकडे बघत त्याने विचारले, " म्हणजे ? "

" म्हणजे म्हणजे वाघाचे पंजेऽ ! "

त्याचे नाक चिमटीत पकडून ती म्हणाली," अरे बाबा आईला सोडायला गेलेत मावशीकडे.तूला फोन केले पण तू उचलला नाहीस म्हणे..म्हणून मेसेज सोडून गेलेत.आता रात्रीच्या गाडीने येतील परत.."

ते ऐकताच धनेशचा पडलेला चेहरा लगेच खूलला.इतक्यावेळची दूर्वाने आपली फिरकी घेतलेली ध्यानात येताच त्याने तिला तशीच स्वत:कडे खेचत विचारले," मग हे कधी सांगणार? आता मूद्दाम उशीरा सांगण्याची शिक्षा भोगावी लागेल…"

तसे म्हणतच त्याने आपले ओठ तिच्या ओठांत मिसळले.बराच वेळ दोघेही त्या रसपानाचा आनंद घेत एकमेकांच्या बाहूपाशात स्थिरावले.

बऱ्याच वेळाने भानावर येत जेवण बनवण्यासाठी दूर्वा जायला निघाली तसे धनेशने तिला पून्हा आपल्या जवळ बसवत एक गच्च मिठी मारली...दूर्वाला त्याच्या ह्या वागण्यातला अर्थ समजला नाही.

मग जरासा भावूक होऊन धनेश म्हणाला,

 " दूर्वाऽऽ I can't live without you dear."

" मला खूप भीती वाटतेय.जर काही कारणांनी माझी इकडून बदली झाली तर…?? तरऽऽ तू मला विसरून जाशील का गऽऽ ? "

 " कसे शक्यय हे डिअर?? असा विचार तुझ्या डोक्यात आला तरी कसा रेऽऽ…? " दूर्वा उद्गारली.

"  I don't wanna leave you alone without me..I want to settle with you. तू मला साथ देशील ना गऽऽ? "

अचानक धनेशचे असे सगळे भावूक बोलणे ऐकून दूर्वाही संभ्रमात पडली..

" पण तूला अशी भीती का वाटतेय की तूझी बदली होईल…? "

" असेच गऽ." 

" आमच्या डिपार्टमेंटमधे बदल्यांचे काहीच नक्की नसते.जितका अचानक इकडे आलो तितकेच अचानक जावेही लागू शकते.पण ह्यावेळी मनाने गुंतलोय तुझ्यात.नाही जायचेय मला तूला सोडून. "

" अरे तुझे इथले काम अजून व्हायचेय नाऽऽऽऽ, त्या आधीच कशी बदली करतील? "

दूर्वा उत्तरली.

" आता कसं सांगू तूला... काही गोष्टी मी नाही रिव्हील करू शकत ,पण इतके दिवसा पासून मी ज्याचा शोध घेत होतो ती केस हातातून निसटून जातेय की काय असे वाटू लागलेय गंऽऽ मला, म्हणून तुझ्याशी हे सगळे बोलून मन हलके करायचेच होते.बरे झाले आज संधी मिळाली.जर भविष्यात असे काहीही घडले तरीही मी प्रॉमिस करतो की जाण्याआधी जगदाळेंशी आपल्या नात्याबद्दल सगळे बोलूनच मी जाईन.तू काळजी करू नकोस.फक्त मला तूझी साथ हवीय,देशील नाऽऽ ? "

बोलताना त्याचे डोळे नुसत्या दूर्वाच्या विरहाच्या विचारानेच पाणावले होते.

त्याचे डबडबलेले डोळे पूसत दूर्वा म्हणाली, 

" मी तूला सोडून कुणाशीही विवाह करणार नाही.बाबांनी परवानगी दिली तर ठिक, नाही दिली तर मी तशीच राहीन पण ह्या देहाला पून्हा दुसऱ्या कुठल्याही पुरूषाचा स्पर्श होणार नाही हे वचन आहे माझे तूला आणि मूळातच असे काहीही होणार नाही माझे मन सांगतेय मला. "

" कदाचित ही देवाचीच काहीतरी योजना असेल म्हणून तू ह्या इतक्या लहानश्या गावात आलास.

नेमके तू आमच्याच घरी काय रहायला यावास, आणि तूझी माझी भेट काय घडावी, हा सगळा दैवी संकेतच नाही का !!! "

" त्यामूळे जर देवानेच तूला इकडे बोलावून घेतलेय तर मार्गही तोच दाखवेल आणि बिना अडथळ्यांशिवाय मिळालेले यश ते कसले सांग मला??? "

" म्हणून सांगतेय तू धीर सोडू नकोस.बघ सगळे छान होईल आणि बाबा तर तुझ्यावर मूलासारखे प्रेम करतात.ते तुझ्या प्रस्तावाला नाही म्हणणार नाहीत.मला खात्रीय सगळे नीट होईल. "

त्यावर थोडा चिंतीत होऊन धनेश म्हणाला,

"असे तूला वाटते गं, पण आपल्या वयातील अंतर विसरून चालणार नाही.. तूला जरी हे नाते मान्य असले तरी कोणता पिता जाणूनबुजून इतके वयात अंतर असलेल्या मूलाशी आपल्या एकूलत्या एक मूलीचे लग्न लावून देईल..विचार कर ना?? जर ते नाही म्हणले तर गऽऽऽ…? "

" हे बघ धनूऽऽ तू इतका विचार करू नकोस.जर तशीच वेळ आली तर मी सांगेन काय सांगायचे ते.तू नको चिंता करूस. "

त्यावर जोराने तिला पून्हा घट्ट मिठी मारत धनेश म्हणाला, " OH darling…! I really love you soooooo muchhhh…! please stay with me..I need you forever in my life… "

" बरंऽऽ आता सोड नाऽऽ,मला स्वैपाक करायचाय अजून.. "

" नको करूस स्वैपाक.माझे पोट तुझ्या सोबतीनेच भरून जाते.." तिला आपल्याकडे खेचतच धनेश बोलला.

त्यावर लाजतच दूर्वा म्हणाली, " तूला नसेल भूक लागत पण बाबा येणारेत ना रात्री.त्यांच्या करता तरी बनवावे लागेल ना.सोड मला.."

"नाऽऽ….नाही जायचेस तू कुठेही.मला आत्ता फक्त तूझी भूक लागलीय.मला तू हवीएस…"

तसे म्हणतच त्याने दूर्वाला आपल्या मिठीत ओढले.त्याच्या पाशात तीही नकळत विरघळत गेली.बराच वेळाने धनेशची आपल्या भोवतीची पकड सैल करत आपली चुरगळलेली ओढणी सावरतच दूर्वा म्हणाली , " आता तरी जाऊ का..??? तुझी भूक तर भागलीय नाऽऽऽ…...."

त्यावर मिश्कीलपणे तिच्या हाताला हिसका देऊन स्वत:कडे ओढत तो म्हणाला, " मेरा बस चले तो जिंदगीभर मै तुम्हे युही मेरे पहलू मे बिठा के रखू...जाने ही ना दू। पण काय करणार नाईलाज आहे ना….जाऽऽ…!! आत्ता सोडतोय पण एकदा लग्न होवू दे ,मग बघ मी काय करतो…"

त्याच्या ह्या वाक्याने लाजून गोरीमोरी होत दूर्वा खाली पळाली.

दूर्वा बरोबर मनातली सगळी खदखद व्यक्त केल्यावर धनेशलाही खूप हलके हलके वाटत होते.आता परीणाम काहीही होवो त्याला कशाचीही चिंता नव्हती.प्रयत्न मात्र 100% करायचे हे त्याने ठरवून टाकले.

     ~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तप्त तापलेल्या धरणीवर अचानक पावसाचा  शिडकावा व्हावा तशी दूर्वाची अवचित भेट,मनातली चिंता दूर्वाजवळ बोलून मोकळे होणे आणि त्यात निंबाळकर गुरूंजींची मिळालेली डायरी ह्या सगळ्या घटनांनी धनेशचा उत्साह प्रचंड वाढला होता.सगळी मरगळ झटकून नव्या उत्साहातच त्याने निंबाळकरांची डायरी हलक्या हाताने उघडली.डायरीची पाने बरीच जूनं आणि जीर्ण झालेली होती.त्याने एक एक पान वाचायला सूरवात केली.

डायरीत अनेक महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी होत्या.त्यांच्या अत्यंत खासगी बाबीही त्यात नमूद केलेल्या होत्या.त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून धनेश आपल्या महत्त्वाची माहिती कूठे मिळतेय ती पाने शोधत पूढे जात राहीला.

चाळता चाळता एका पानावर त्याची नजर थबकली.वरती तारीख नमूद केलेली होती.

1जानेवारी 99.

त्या पानावर काही विशेष प्रसंग निंबाळकरांनी नोंद केलेला दिसत होता.धनेशने बारकाईने वाचायला सूरवात केली.पानावरचा मजकूर निंबाळकरांच्या भाषेत खालील प्रमाणे होता.

1जानेवारी 1999.

3:15 Am. 

आजकाल वसूचे पाय कंबर जरा जास्तच दूखतात.आजही दुखत होते.नेहमीच्या सवयीने मी औषध बनवायला घेतले पण माझ्या औषधी साठ्यात एक औषधी घरात शिल्लक नव्हती.रात्र बरीच झालेली पण वसूसाठी औषध बनवणेही गरजेचे होते म्हणून मी तेवढ्या रात्री सायकलवर टांग टाकत नदी किनारी मला हवी ती वनस्पती घेण्यास निघालो.

सायकल एका बाजूला लावून मी पाण्यातील ती विशिष्ट वनस्पती तोडायला वाकलो.मला हवी तितकी पाने तोडून मी उभा राहणार इतक्यात काही भिल्ल लोक पाठीवर कसलातरी भार वाहून मंदिराकडे जाताना दिसली.तो दिवस नेमका मंदिर बंद असणारा दिवस होता.माझे कुतूहल जागृत झाले.इतक्या रात्री ही माणसे बंद मंदिराच्या प्रांगणात काय बरं करत असतील??

मनातल्या शंकेचे निरसन करण्याहेतू मी दबकत दबकत त्यांचा पाठलाग करत मंदिराच्या जवळ पोहोचलो.मागल्या बाजूच्या भिंतीला पडलेल्या मोठ्या खिंडारातून मी गूपचूप कुठलीही चाहूल न लागू देता मंदिराच्या आवारात पोहोचलो.तसेच  हळूच कानोसा घेत मी सभामंडप पार केला.ती सर्व मंडळी गाभाऱ्यात प्रवेशली असावीत कारण सभामंडपात मला कोणीच दिसले नाही.तरीही सावधगिरी बाळगतच मी पूढे गेलो.आता मी अगदी गाभाऱ्याजवळच्या जाळीच्या दरवाजा जवळ पोहोचलो.ती सर्व माणसे माझ्या गृहितकाप्रमाणे गाभाऱ्यातच होती.मी किलकिल्या डोळ्यांनी जाळीतून आतले दृष्य पाहू लागलो.त्या सगळ्यांनी तोंडाला काळे बुरखे बांधले होते त्यामूळे काेणाचाही चेहरा ओळखू येत नव्हता.मी तिथे घडणारी प्रत्येक हालचाल बारकाईने डोळ्यात साठवत होतो.गाभाऱ्याच्या पिंडीभोवती चारही लोक चार दिशेने उभे राहीले होते.

त्यातल्या एकाच्या हातात दूधाने भरलेली चरवी दिसत होती.ह्या मंदिरातल्या देवावर कुठलाही अभिषेक वर्ज्य होता,तसे असताना हे लोक दूध घेऊन आत का गेले हा प्रश्न मला सतावू लागला.पूढे काय घडतेय हे बघण्यासाठी मी जास्त उत्सूक होतो.त्या अंधाऱ्या गाभाऱ्यात कोणीतरी एक मेणबत्ती लावली होती.त्या मीणमीण प्रकाशात मी पाहीले त्यातला एकजण कसलीशी स्फटीकासारखी पांढरी रवाळ पूड त्या दूधात मिसळत होता.ती पावडर मिसळून दूध ढवळले गेले इतक्यात त्या चारपैकी एकजण पून्हा बाहेर येताना बघून मी हादरलो.पकडल्या जाण्याच्या भितीने हलकेच सरकत मी गाभाऱ्याच्या मागील बाजूस लपलो.

आता मला पूढील घटना काय आणि कशा घडतात हे पाहता येत नव्हते तरी मागच्या भिंतीला कान लावून मी कानोसा घेऊ लागलो.काही वेळातच एखादी पेटी उघडावी तसा काहीसा जोरदार आवाज झाला.

तो आवाज कसला असेल ह्याचा मी बूद्धीला ताण देवून तर्क लढवत राहीलो पण मला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

जरावेळाने सगळे आवाज शांत झाले तसे धीर एकवटून मी रांगत रांगत जाळीच्या दरवाजाशी आलो आणि काय आश्चर्य!! मंदीराचे दार आतून बंद होते परंतु त्या चारही व्यक्ती गाभाऱ्यातून कुठेतरी गायब झाल्या होत्या.

आता त्या नेमक्या कुठे आणि कशा गायब झाल्या हा उलगडा मला काही केल्या होईना.

हे सगळेच खूप चक्रावून टाकणारे होते.मी तर पाहूनच सून्न झालो.आता जास्त काळ त्या परीसरात थांबणे धोकादायक होते हे जाणून आणखीन कुठल्या संकटाला आमंत्रित करण्यापेक्षा कोणी नाहीये बघून तिकडून पोबारा करण्यातच शहाणपणा आहे हे समजून मी आल्या पावलीच तिकडून पळ काढत घर गाठले.मी प्रचंड घाबरलो होतो.जे बघितले ते काय होते हे समजण्याची शक्ती संपली होती.डोके बधीर झाले होते.हे काय गौडबंगाल आहे ? कळत नव्हते.

परंतु एक मात्र पक्की खात्री झाली…. वाटते तितके हे प्रकरण सोप्पे नाही.मंदिरात नक्कीच काहीतरी गूढ लपलेय.

माझा तर दाट संशय आहे की तिकडे नक्कीच काहीतरी गैरप्रकार होत असावेत म्हणूनच महिन्यातून एक दिवस मंदीर बंद असूनही रात्री मात्र ते आपोआप उघडले ,ते कसे काय?? 

 मी खरच दूर्दैवी की संधी मिळूनही मला त्यातले सगळे रहस्य जाणून घेता आले नाही.

ह्याबाबत कुणाजवळ काहीही बोललो तर माझाच मूडदा पडायचा त्यापेक्षा 

 "शांतम् पापम् । " हे धोरण स्वीकारणेच उत्तम.

मला काही माहित नाही, मी काही पाहिले नाही.

' सर सलामत तो पगडी पचास..' 

जीव वाचला हेच मोठेय …

पण आज जे काही बघितले ते खरच खूप चित्तथरारक होते.एक अविस्मरणीय घटना.

कोणीतरी कधीतरी येवून हा भेद उकलू शकेल का??

देव जाणे…..!!

                    --------×----------

धनेशने डायरीचे ते पान पून्हा पून्हा वाचले. आत्ता त्याला उलगडा झाला की दूधात कसलीतरी पावडर मिसळली गेल्यामूळे आपल्या दूधाने तो परीणाम साधला नाही.पण मग ती कोणती पावडर असेल ज्यामूळे तो गूप्त दरवाजा उघडला जातो??? धनेशच्या मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले.

म्हणजे आता तर गूंता अजूनच वाढला नेमकी अशी कोणती पूड टाकली गेली असेल? हे उत्तर शोधणे गरजेचे होते.

विचार करता करता त्याला अचानक आपल्या कॉलेजच्या जीवनातील एका जिवश्च कंठश्च मित्र आर रंगनाथनची आठवण झाली. सगळ्यात स्टूडीयस मूलगा वर्गातला.आता सध्या तो बेंगलोरला रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात कार्यरत होता." Relativity of viscosity & conductivity of fluids & its Analytical differences. " 

हा विषय घेऊन त्याने नुकतीच त्याची पी.एचडी. पूर्ण केली होती.

राममित्रशी चर्चा करावी का??

तो आपल्याला ह्यात काही मदत करू शकेल ??

धनेशच्या डोक्यात विचारांची गिरणी सूरू झाली.अखेर राममित्रशी बोलायचा निर्णय पक्का करून त्याने लगेच रंगाचा फोन डायल केला.(त्याचे पूर्ण नाव जरी आर.रंगनाथन, अर्थात राममित्र रंगनाथन असे असले तरी सगळे मित्र त्याला रंगाच म्हणायचे.)

जवळपास सात-आठ वर्षांनी तो आज पहिल्यांदा कॉल करत होता रंगाला.कॉलेज सुटले आणि जो तो आपापल्या व्यापात गुंतून गेला.त्यात दोघांचेही व्यस्त स्केड्यूल,सततच्या बदल्या,कामाचे ताणतणाव ह्यातून फोन करायची आठवणही होत नसे.पण आज कामानिमित्त का होत नाही इतक्या वर्षांनी बोलण्याच्या आलेल्या योगामूळे धनेश खूपच एक्सायटेड झालेला रंगाशी बोलायला.

पलिकडे रींग जात होती.बराच वेळाने फोन उचलला गेला.

" हॅलोऽऽऽ….! "

" इज इट मि.आर. रंगनाथन? "

" या..स्पिकींग..हू इज धिस? "

" अबे साले रंगेऽऽऽ..मेरा नंबर भी सेव्ह नही क्या तेरे पास? "

रंगा - " अबे कौन? !!!साल्या तू धन्याऽऽ..!! "

" व्हॉट अ सरप्राईज यार !!! "

"आज इतने सालों बाद इस गरीब की कैसे याद आयी बे तूझे ? "

धनेश - " कम से कम मूझे याँद तो आयी। तू तो साले सारे दोस्तों को भूल गया। पिछले साल गोवा मे गेट टूगेदर हुवाँ तब भी नही आया तू। "

रंगा - " अरेऽऽ नही रेऽऽ बहोत मन था लेकीन मेरे थिसीस का सबमिशन था। उपर से बच्ची के अॅडमिशन की प्रोसिजर्स चल रही थी..आजकाल बच्चे की अॅडमिशन के लिए पेरेंट्स के ही इंटरव्ह्यूज लिये जाते है।क्या जमाना आ गया देख, इसलिए नही आ पाया। "

" पर साले तुझे कैसे पता होगा…., ना बिवी ना बच्चे...अबे लेटेस्ट स्टेटस क्या है बे तेरा ?" 

" शादी करने का इरादा भी है या ऐसेही बॅचलर्स लाईफ जीनी है? "

धनेश - " अबेऽऽ मूझे बोलने भी दोगे या खूद ही सारे सवालों के जवाब ढुंढ लोगे। "

रंगा - " सॉरी सॉरीऽऽऽ….. तो चल बोल..आजकल कहाँ है,क्या कर रहे हो बॉस? तुम्हारे चर्चे तो आये दिन सुनने में आते है। रिअली फिलिंग व्हेरी प्राऊड यार..। "

धनेश - " फिरसे तूम ही शूरू हो गये। मूझे याद है कॉलेज मे तूम बहोत शांत सहमे सहमे से रहते थे। देख रहा हुँ की शादी के बाद लोगों का बोलना बंद हो जाता है और तूम हो की बोले जा रहे हो बोले जा रहे हो। आखिर माजरा क्या है भाई ? कही भाभी के सामने बोलती बंद तो नही हो जाती नाऽ ? "

रंगा -" हाहाहाऽऽऽ….! शादी का लड्डू खाये बगैर ही शादी के साईड इफेक्ट्स बहोत अच्छे से पता लगा लिये तुमने। कही छूप छुप के शादी तो नही कर ली बे? "

धनेश - " कि तो नही लेकीन बहोत जल्द करनेवाला हुँ। "

रंगा - " वॉव्ह! दॅट्स ग्रेट न्यूज यार !! कौन है लडकी,क्या करती है ? प्रेम का चक्कर है की पेरेंट्सने फिक्स की है ? "

धनेश - " अबे मूझे कुछ बोलने तो दे,जबसे तूही सवाल पे सवाल किये जा रहा है। अब थोडी देर बिलकूल चूप…. और मेरी बात सून।

तो फिलहाल मै स्पेशल इन्व्हेस्टीगेटींग सेल से एक इम्पॉर्टंट केस के लिए नासिक जिले के एक छोटेसे गाँव भालेवाडी मे पोस्टेड हूँ। एक मिसिंग केस की इनव्हेस्टीगेशन के लिए मुझे यहाँ भेजा गया है। 

वहाँ एक सिनियर कॉन्स्टेबल है जगदाळे , उनकी बेटी है दूर्वा……!! अॅऽऽम इन... लव्ह…. विथ.. हर….लव्ह अॅट फर्स्ट साईट कह सकते हो अँड फॉरच्युनेटली शी अॉल्सो ईज ईन लव्ह विथ मी.

रंगा -" मतलब आग दोनो तरफ बराबर लगी हुई है। "

धनेश - " हाँऽऽ…. कुछ ऐसा ही समझ लो। लेकीन उसमे एक दिक्कत है।

रंगा- " कौनसी? "

धनेश - " वो उम्र मे छोटी है बहोत।"

रंगा - " मतलब क्या अंडर एज है क्या बच्ची ? अबे पूलीस होकर खूद ही रूल तोड रहा है क्या बे ? "

धनेश -" अरे नही रे,वैसी कोई बात नही है। सिर्फ हम दोनो के उम्र मे डिफरन्स ज्यादा है। "

रंगा - " कितना है डिफरन्स? "

धनेश -" होगा कोई आठ नऊ साल…."

रंगा - " हम्मऽऽऽ..लेकीन वो तो जानती है ना सब ? "

धनेश - " हाँऽऽऽ...वो तो जानती है पर अभी उसके पेरेंट्स को इस बारे में कुछ भी पता नही है। मैने सोचा था जैसे ही ये केस सॉल्व्ह होगा सब बता दूंगा पर ये केस बहोत ही उलझी हुई है। उसी सिलसिले में तुम्हे फोन किया। शायद तूम मेरी कुछ मदत कर सको ।

रंगा - " अबे धन्याऽऽ मै ठहरा रिसर्चवाला आदमी और तेरा काम बाल की खाल निकालना.क्या तुझे सचमूच लगता है की मै तेरी कोई मदत कर पाऊंगा? "

धनेश - " शायद कुछ क्लू मिल सकता है । मैने सूना है की हाल ही में तुमने तुम्हारी पी.एचडी. किसी लिक्विड्स की व्हीस्कॉसिटी अँड समथिंग समथिंग लाईक धीस,सब्जेक्ट मे कम्प्लिट की है,अॅम आय राईटऽऽ ? "

रंगा - " ब्राव्हो...क्या मेमरी है रे तुम्हारी। 

यस यू आर राईट… " रिलेटीव्हीटी आॅफ व्हिस्कॉसिटी अँड कंडक्टिव्हीटी आॅफ फ्लूईड्स अँड इट्स अॅनॅलिटीकल डिफरन्सेस …. " यही विषय था। 

लेकीन मेरी पीएचडी का तुम्हारे इन्व्हेस्टीगेशन से क्या संबंध? "

धनेश - " नॉट एक्झॅक्टली..बट एक डाऊट है जो शायद तूम ही एक्सप्लेन कर सकते हो। "

रंगा - " कैसा डाऊट? "

धनेश - " अॅक्च्युअली पूरा डिटेलींग मै कर नही पाऊंगा लेकीन क्या मूझे तूम इतनी जानकारी दे सकते हो की ऐसे भी कोई लॉक्स अँव्हेलेबल है जो किसी लिक्विड को पोअर करने से खूलते है?  और अगर है तो उसका फंक्शनिंग कैसे होता है इस बारे मे कुछ जानकारी दे सकते हो ? "

रंगाने एक पॉझ घेतला आणि मग बोलायला सूरवात केली.

रंगा - " देख धन्या आजकल सिक्युरीटी के लिए बहोत से फायनांशियल फर्म्स,इन्स्टीट्युट्स ऐसे लॉक्स बनवाते है जहाँ कोई विशिष्ट घनता का द्रव अगर डाला जाए तो ही वो लॉक्स खूलते है अन्य किसी चिज से वो नही खूलते। उसका एक प्रॉपर फॉर्मूला होता है। उस द्रव की घनता कम या जादा हो गयी तो वो कभी भी नही खूलता। लेकीन ये सब तूम क्यू पुछ रहे हो ? "

धनेश विचारात पडला.रंगाला काहीतरी सांगितल्या खेरीज त्याला त्याचे योग्य उत्तर मिळणार नव्हते.

शेवटी मनाचा हिय्या करून त्याने रंगाला सगळे सांगायचे ठरवले.

धनेश - " देख रंगा अभी मै तुम्हे मेरा बहोत बडा सिक्रेट बता रहा हुँ। प्रोटोकॉल के अनूसार मै मेरे इन्व्हेस्टीगेशन की डिटेल्स किसी से शेअर नही कर सकता। लेकीन अॅझ आय ट्रस्ट यू मोर दॅन मायसेल्फ अॅम सेंडींग वन व्हिडीओ क्लिप टू यू.वो तू देख आैर वापीस मूझे कॉल कर.., लेकीन अंर्जंटली कर।

धनेशने त्याला ती व्हीडीओ क्लिप वॉट्सअॅप केली.

दहा एक मिनिटांनी धनेशने त्याला पून्हा कॉल केला.

रंगानेही लगेच फोन उचलला.

रंगा -" OMG.. its really shocking yar.. What's this ?? " 

धनेश - " अब आगे सून। मैने उसमे जैसा दिख रहा था वैसा ही सब किया।लेकीन रिझल्ट वो नही मिला जो मिलना चाहिये था। उसके बाद मेरी मूलाकात यही के एक सिनियर हेडमास्टर से हूई। उन्होने एक डायरी मूझे दी जिसमे उनके कुछ अनूभव लिखे हुए है । मैने वो डायरी पढी और बात मेरे समझ मे आयी की मै कहाँ गलत था। मै तूम्हे उस पेज का फोटो भेजता हुँ। तू उसे पढकर बाद में मुझे कॉल कर। फिर हम आगे की बात करेंगे।"

धनेशने मार्करने त्या पेजच्या त्या ओळी अंडरलाईन केल्या जिकडे त्या स्फटीकासारख्या पावडरचा उल्लेख झाला होता आणि लगेच तो फोटो रंगाला सेंड केला.

रंगाने ते पान पूर्ण वाचून लगेच धनेशला कॉल केला.

रंगा - " मैने पेज पढा।जो मै कह रहा था वही टेक्निक यहाँ यूज की गयी है। मतलब अगर किसी द्रव को एक विशिष्ट घनता पर अंकीत कीया गया हो तो उसमे जरा भी फर्क हुवा तो लॉक खूलता नही।तुमने जो मिल्क डाला था उसमे वो व्हाईट केमिकल अॅडेड ना होने से द्रवीय घनता मॅच नही हुई और इसलिए लॉक नही खूला।

धनेश - " अबे वो तो मै भी जानता हुँ लेकीन अब तूम ये बताओ की वो व्हाईट केमिकल क्या हो सकता है जिसके मिलाने से द्रवीय घनता मॅच होगी ? "

रंगा -" देखो मूझे थोडा समय चाहिए। उसके बहोत से ऑप्शन्स हो सकते है। इतनी जल्दी किसी भी नतिजे पे पहुचना मुश्कील होगा। "

धनेश - " देख ये मंदिर बहोत प्राचीन है। आर्किऑलॉजिकल सर्व्हे के अनूसार ये शीवकालीन मंदिर है। बाद मे शिवाजी महाराज ने इस मंदिर का जिर्णोद्धार कीया । तो उस जमाने मे अगर ये टेक्निक बनवायी गयी होगी तो सोच उसमे ऐसी कौनसी वस्तू मिलायी जा सकती है जो उस जमाने से लेके आज तक ईझीली अॅव्हेलेबल हो सके। तू इस विषय का जानकार है इसलिए ये सब तुम्हे बता रहा हुँ। अब इस अँगल से सोचो। 

रंगा - " अच्छा किया ये जानकारी देके। मै अब इसी दिशा मे कुछ पूराने रिसर्च पेपर्स होंगे तो उसका अभ्यास करूंगा। जरा रिसर्च करके तुम्हे इन्फर्मेशन निकाल के दूंगा। लेकिन इस के लिए थोडा वक्त चाहिये । "

धनेश - " वक्त ? मतलब कितना वक्त चाहिये 

तुम्हे ? मै जादा देर रूक नही सकता यार,मुझे अर्जंटली चाहिए ये इन्फो...। "

रंगा -" बस मूझे आजका एक दिन दो। मै कुछ ना कुछ फांईड आऊट कर ही लूंगा। चिंता मत कर।तेरा काम हो जाएगा। "

धनेश -" थँक्स यार..मुझे पक्का यकीन था ये चशमिश मेरा काम जरूर करेगा। "

रंगा -" क्यों बे साले तेरा काम करू उपर से तेरे ताने सूनू..जा नही करता तेरी हेल्प। "

धनेश -" अरे सॉरी भाई..प्लिज कर दे मेरा काम वरना मेरी शादी लटक जायेगी। और उसका पाप तेरे मथ्थे लगेगा..। "

रंगा - " हा..जादा नौटंकी मत कर।करता हुँ कल तक। "

धनेश (डोळा मारत) -" थँक्स अ टन डिअर। अगली बार तुम्हे स्पेशल पार्टी सितारा में विथ युवर लाईकींग स्पिरीट। "

रंगा - "अबे काम तो होने दे। काम करने से पहले ही रिश्वत दे रहा है क्या? "

धनेश - " इसे रिश्वत नही प्यार का तोफा कहते हेै मेरे दोस्त। "

रंगा -" अब पार्टी मै तेरी शादी मे ही लूंगा। जमकर काटूंगा तुझे। "

धनेश - " ओके! डन डना डनऽऽ डन! 

वेटींग फॉर युवर नेक्स्ट कॉल... सी यू..बाऽऽय! "

     ~~~~~~~~~~~~~~~~~~

फोन संपला तसे धनेशला खूप रिलॅक्स फिल झाले.एकतर खूप वर्षांनी कॉलेजच्या मित्राशी 'अबे-तूबे' करत अघळपघळ गप्पा झाल्या आणि त्यात रंगाने प्रॉमिस केले की उद्यापर्यंत नक्की काहीतरी इन्फो त्याच्या हाती देईल.त्यामूळे आज रात्री धनेश खूप समाधानाची झोप घेणार होता…………..!

~~~~~~~~~~~~(क्रमश:-15)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.

रंगा धनेशची मदत करू शकेल का?

काय असेल ते केमिकल?

जाणून घ्यायला वाचत रहा द सिक्रेट मिशन…

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन

माझ्या नावासहीत कथा कुठेही शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.






 

🎭 Series Post

View all