द सिक्रेट मिशन भाग -12

रहस्यकथा - द सिक्रेट मिशन.

द सिक्रेट मिशन भाग -12

©®राधिका कुलकर्णी.

(काल्पनिक)

[मागील भागात - धनेश सईदाची रातोरात सुखरूप स्थळी रवानगी करतो.खबरीकडून त्याला बरीच ठोस माहिती आणि फोटो मिळतात ज्यातली एक गोष्ट बघून तो चकीत होतो.इकडे बुरखाधाऱ्यालाही धनेश पून्हा येवून भेटतो आणि प्रश्न विचारतो.]

आता पूढे……

धनेशच्या प्रश्नावर बुरखेधारी लगेच उत्तर देतो, " ते कामच आहे आपले.."

दुसऱ्याच क्षणी तो आपली जीभ चावतो आणि वाक्य सावरत म्हणतो, " म्हणजे कोणाची माणूसकीच्या नात्याने मदत करता आली तर करणे कामच आहे ना आपले. "

धनेश त्यावर फार काही रीअॅक्ट झाला नाही.वानखेडेंनी आणलेल्या गरमागरम राईसप्लेटवर त्याने येथेच्छ ताव मारला.तिरप्या डोळ्यांनी तो बुरखेधाऱ्याचेही बारकाईने निरीक्षण करत होता.त्याने वानखेडेला जे सांगीतले होते त्याने बरोबर तसेच केले होते.

धनेश त्याचे बारकाईने निरीक्षण करत मनातल्या मनात हसत होता.

अजून काही दिवस..आणि एक महत्त्वाचा खूलासा होणार होता.पण अजूनही काहीतरी होते जे मिसिंग होते.

सांगितल्या प्रमाणे वानखेडेने जेवणात गूंगीचे औषध मिसळले.त्याचा परीणाम काही वेळातच दिसू लागला.बुरखेधारी अर्ध्या तासातच गाढ झोपी गेला.

आता धनेशने त्याची पूर्ण कसून तपासणी केली.त्याच्या वास मारणाऱ्या कपड्याआड असे काय दडले होते ज्याचा धनेश शोध घेत होता.

अखेरीस त्याला हवी ती गोष्ट मिळाल्यावर धनेशचा चेहरा प्रफुल्लीत झाला.

झटपट कोठडीला लॉक लावून तो घरी आला.घरी पोहोचे पर्यंत बरीच रात्र झाली होती.त्याने हलक्या हाताने दार वाजवले.

जगदाळेंच्या घरी नऊ/दहालाच सामसूम होत असे त्यामूळे दार दूर्वानेच उघडले.

दारात धनेशला पाहून ती एकदम चक्रावली.तो तिच्याकडे न बघताच वर जायला निघाला.तिने त्याला ऐकू जाईल इतक्या धिम्या आवाजातच विचारले, " जेवायला वाढू का? "

" नको.गरज नाही.मी जेवूनच आलोय. "

त्याने मागे वळूनही न पाहता तिला उत्तर दिले आणि वर गेला.

दूर्वाला त्याच्या तुटक वागण्याचा प्रचंड त्रास होत होता.खरे तर तिने स्वत:हूनच हा दूरावा ओढवून घेतला होता मग आपल्याला तो बोलत नसल्याचा त्रास का व्हावा हे कोडं काही सुटत नव्हते.

तिने घाईने त्याच्यासाठी लेप बनवला आणि वर गेली.नेहमी सताड उघडे असणारे त्याच्या खोलीचे दार आज बंद होते.तिला काय करावे समजेना. कडी वाजवावी की नको?

ती संभ्रमात पडली.

क्षणभर विचार करून तिने लेपाची वाटी दाराशी ठेवून एक चिठ्ठी फटीतून आत सरकवली.

" दाराजवळ घावावरती लावायच्या लेपाची वाटी ठेवलीय.अजून तीन दिवस लेप लावणे गरजेचे आहे. "

ती खाली जाऊन आपल्या खोलीतून निरीक्षण करू लागली की तो दार उघडतोय का पण त्याने दारही उघडले नाही आणि लेपही लावला नाही.

आता मात्र दूर्वाला रडूच कोसळले.

तिला तिच्या अंतरंगात त्यांच्या नात्याविषयी उठणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती पण जोपर्यंत तो बोलत नाही तिच्या भावना ती कशा व्यक्त करणार होती…..? 

मनावर दगड ठेवून ती तशीच पडून राहीली.

रात्रभर डोळ्यातून कढं दाटून येत होते.

इकडे दूर्वाची चिठ्ठी वाचूनही त्याने निग्रहच केला होता जोपर्यंत ती त्याला नावाने हाक मारत नाही असेच ताणून धरायचे.

त्यालाही काही कमी त्रास होत नव्हता तिच्याशी तूटक वागताना परंतु कधी कधी योग्य परीणाम साधायचा असेल तर कडू औषध द्यावेच लागते तसा हा कडू डोस देणे चालू होते आणि त्याचे जराजरा परीणामही दिसून येत होते.लवकरच आपल्या मनासारखी गोष्ट घडणार ह्या विचारानेच त्याने अंथरूणावर अंग टाकले.पडताच त्याला झोप लागली.

   ~~~~~~~~~~~~~~~~

पहाटे साडेतीनच्या बझरने तो जागा झाला.गेले तिन चार दिवस तो मंदिरात गेलाच नव्हता. त्यामूळे आज जायचेच ह्या निश्चयानेच तो उठला.जगदाळेही जागे झालेलेच होते परंतु धनेश आलेला माहीत नसल्याने तो आलाय का हे पहायलाच ते बाहेर आले तर समोर धनेश आवरून जायच्या तयारीत खाली उतरलेला.

जगदाळे त्याला पाहून लगेच म्हणाले, " कधी आलात साहेब..?मी तेच बघायला आलो होतो."

" काल रात्रीच आलो.तूम्ही झोपले होतात म्हणून डिस्टर्ब नाही केले काल." धनेश उत्तरला.

" बरं सर, मी आलोच पाच मिनिटात."

म्हणतच जगदाळे आवरायला गेले.

तोंड धुवून नेहमीची काठी आणि विजेरी हातात घेऊन दोघेही बाहेर पडले.

काही वेळातच ते मंदिरात पोहोचले.साधारण चार वाजले असतील.ते सभामंडपात पोहोचले तेव्हा पूजारी पूजा करत होता.ते दोघेही दाराशी उभे राहीले.पूजाऱ्याने त्यांना पाहून ओळखीचे स्माईल दिले.

त्याची पूजा उरकताच हे दोघेही गाभाऱ्यात प्रवेशले.आज धनेशची नजर काहीतरी शोधत होती.जगदाळेंनी ते हेरले आणि विचारले, " काय झाले साहेब,काय शोधताय? "

त्यावर जरा चिंतीत स्वरातच तो उत्तरला, " अहो गेले चार दिवस मी माझा पेन शोधतोय पण कुठेच सापडत नाहीये.इकडेही चार दिवसांपासून

फिरकलो नाहीये.इकडे तर नसेल पडला म्हणून जरा शोध घेत होतो."

त्यांचे संवाद बाहेर उभ्या असलेल्या पूजाऱ्याने ऐकले आणि म्हणाला, " हाच तर तो नाही?  मला चार दिवसापूर्वी गाभाऱ्याची सफाई करताना मिळाला तेव्हाच वाटले तुमच्यापैकीच कुणाचा तरी असेल म्हणून रोज घेऊन येत होतो पण तूम्ही दोघेही आलाच नाहीत मागले चार पाच दिवस."

पूजाऱ्याच्या वाक्याने धनेश एकदम हर्षोल्हासीत होऊन म्हणाला, " हो..हो माझाच आहे तो.बरे झाले सापडला.माझा खूप लकी पेन आहे हा.धन्यवाद गुरूजी.बरे झाले तूम्ही संभाळून ठेवलात. "

" अहोऽऽ तुमचीच वस्तू तूम्हाला परत केली त्यात कसले धन्यवाद.तसेही ही वस्तू आमच्या काय कामाची.? "

" म्हणजे कामाची असती तर दिली नसती का परत ? "  धनेशने मूद्दाम फिरकी घेत विचारले.

त्यावर जरा विनोदाने हसतच पूजारी म्हणाला,

" म्हणजे कामाची असती तर विचारून ठेवूनही घेतली असती एखादवेळी.तूम्ही नाही थोडीच म्हणाला असतात,कायऽऽ ? " 

पूजारी आपल्याच विनोदावर मिश्कील हसला.

" तुमच्या नाही पण माझ्या फार कामाची वस्तू आहे ही.

पण तरीही तुम्हाला हवीय म्हणल्यावर मी देऊ शकतो बरका अजूनही.हवे तर अाजमावून पहा आमच्या मैत्रीला. "

असेच संवाद घडत ते मंदिरातून बाहेर आले.पूजारी आपल्या दिशेने तर हे दोघे आपल्या मार्गाने परत आले.

घरी येवून स्नानादी सर्व उरकून धनेशला आज पून्हा तालूक्याला जायचे होते.त्याने नाष्टा उरकता उरकताच तसे जगदाळेंच्या कानावर घातले.त्यावर जगदाळे जरासे चाचरतच म्हणाले," सर तूम्ही परत कधी येणार,मला उद्याचा एक दिवस रजा हवी होती. "

" रजाऽऽ? ती कशाला हवी आता ? "

" काही नाही साहेब मेव्हणीच्या मूलीचा साखरपूडा आहे गावात. " 

" मग सगळेच जाणार का ? "

" हो साहेब.आता घरचंच कार्य आहे आणि ती पोरगी दूर्वाची लईच लाडाची दोस्त मग जायला तर हवेच ना.आमच्याकडे अशा समारंभातच पोरींसाठी स्थळं पण भेटतात.आता दूर्वाचेही आहेच की काही वर्षात त्यामूळे तिलाही घेऊन जातो.त्यानिमित्त चार जणांच्या नजरेत पडली तर घर चालत स्थळ येतील."

धनेशला जोरदार ठसका लागला ते ऐकून.पण सध्या तरी त्याला नाही म्हणायला काहीच कारण नव्हते.स्वत:ला सावरतच त्याने रजेला परवानगी दिली आणि तो तालूक्याला आणि जगदाळे पो.स्टेशनला रवाना झाले.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

तालूक्याहून तो नाशिकला गेला.काही सॅम्पल्स टेस्टींगसाठी लॅबला द्यायचे होते.ते काम हातावेगळे करून तो सायबर कॅफेत गेला.

पेनमधील छूप्या कॅमेरात काही सापडतेय का हे पाहण्यासाठीच तो खरेतर इकडे आला होता.परंतु आज सर्व्हर डाऊन मूळे कॅफे बंद होते.त्याचा चेहरा हिरमूसला.तिकडून बाहेर पडून तो पून्हा भालेवाडी करता रवाना झाला.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

इकडे दूर्वाही कालपासून बेचैन होती.आज पहिल्यांदाच तिला साखरपूड्याला जायला नकोसे वाटत होते.आज तिसरा दिवस होता धनेश तिच्याशी एक अक्षरही बोललेला नव्हता.हा दूरावा तिला असह्य होत होता.आता जर आपण गावाला गेलो तर पून्हा चौथ्या दिवशीही धनेशशी बोलणे होणार नाही.काय करावे ?

काय कारण सांगावे ? ती सतत विचार करत होती पण न येण्याचे कुठलेही ठोस कारण तिला सापडत नव्हते. 

बघता बघता दिवस संपून रात्र झाली.

नेहेमीप्रमाणेच काम संपवून धनेश घरी आला.जेवणे करून तो ही आज लवकरच झोपी गेला.

सकाळी पहाटे पहाटे सगळ्यांच्या आवरा आवरीच्या गडबडीने त्याला जाग आली.

जगदाळेंनी सांगितल्याप्रमाणे सगळेच निघायच्या तयारीत होते.त्यालाही इतके दिवसांत सगळ्यां सोबत रहायची सवय जडलेली.आज पहिल्यांदाच घरात तो एकटा राहणार ह्या कल्पनेने त्यालाही कसेतरीच होत होते पण आपल्या भावना मनातच दाबत त्याने हसून सगळ्यांना बाय केले.

आपला नेहमीचा वॉक उरकून तो घरी आला तर फोनवर मेसेज ब्लिंक होत होता.

" बाय.विल मिस यू सर.टेक केअर..गूड डे. "

त्याने ह्या वेळीही रिप्लाय न देताच मेसेज डिलिट केला.

खूप वेळ जाऊनही धनेशचा कुठलाच रिप्लाय न आल्याने दूर्वाला अस्वस्थ वाटायला लागले.रडू आवरत नव्हते पण आई वडीलांसमोर तिला रडताही येत नव्हते.आतल्याआत काहीतरी तुटल्यासारखे वाटत होते.हे सगळे काय होतेय आपल्यासोबत? हे तिला समजत नव्हते पण आता तिला धनेशच्या भेटीची ओढ लागली होती.

       ~~~~~~~~~~~~~~~~

साखरपूड्यासाठी मन नसतानाही ती तयार झाली.कुंकू कलरची रेशमी साडी, चॉकलेटी काठ आणि भरजरी पदर असलेल्या साडीत मूळचीच दिसायला सूंदर दूर्वा अधिकच सुंदर दिसत होती.तिच्या गोऱ्या वर्णाला तो कलर खूपच शोभून दिसत होता.त्यात त्याला साजेशी मॅचिंग ज्वेलरी, लोंबते झूबे, हलकासा मेकअप आणि साडीच्या रंगाला मॅचिंग लिपस्टीकची शेड तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होते.सगळे आवरून तिने स्वत:ला आरशात निरखले.

सगळे असुनही तिला काहीतरी कमी जाणवत होती.

काहीतरी सुचले तसे अजून एक प्रयत्न म्हणून बाहेर जाऊन तिने स्वत:चा एक छानसा सेल्फी काढला आणि धनेशला सेंड केला.

कॅप्शनसहीत  ' रेडी फॉर द फंक्शन '

काम करता करताच त्याची नजर ब्लिकींग लाईटवर पडली.त्याने फोनवरचा मेसेज आेपन केला आणि दूर्वाचा फोटो बघून तर त्याची दांडीच उडाली,सिट्टीबीट्टी गूल झाली.नेहमी घरातल्या साधारण पोषाखात पहायची सवय असलेली दूर्वा आज साडीत जाऽऽळ दिसत होती.फोटो बघून हिच ती नेहमीची दूर्वा हेच पटेना त्याला.

आत्ता अशीच जर ती समोर असती तर मी हिला नक्की कीस केला असता..धनेशच्या मनात नकळत विचार तरळून गेला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने जीभ चावली.हा कसला विचार करत होतो आपण ह्या कल्पनेने तो भानावर आला.दूर्वाच्या आगलावू फोटोने खरेतर धनेशचे चित्त विचलीत केले होते पण आपले इप्सित साध्य होईपर्यंत निग्रह कायम ठेवत त्याने पून्हा रिप्लाय देणे टाळले.फोटो मात्र सेव्ह करून दर पाच मिनिटांनी झूम करून न्याहाळू लागला.

इकडे दूर्वाने त्याचा रिप्लाय येईल म्हणून  कमीतकमी शंभरवेळा तरी वॉट्सअॅप चेक करून पाहिले पण तिची निराशाच झाली.तिचे चित्तच थाऱ्यावर नव्हते.कधी एकदा कार्यक्रम संपतोय आणि आपण घरी जातोय असे तिला झालेले.

अखेरीस कार्यक्रम पार पडला.सगळ्यांनी निघायची तयारी केली आणि अचानक दूर्वाची मावशी चक्कर येऊन पडली.तिची शूद्ध हरपली.तिला हॉस्पीटलला हलवणे ह्या सगळ्या धावपळीत जगदाळे बिझी झाले आणि ह्यांचे जाणे कँसल झाले.दूर्वा मनातून फारच उदास झाली.तिला धनेशचा दूरावा सहनच होत नव्हता.ती रात्र तशीच चिंतेत गेली.

मावशीला माईल्ड अॅटॅक येऊन गेला होता.अजून दोन तीन दिवस हॉस्पीटलमधेच अंडर ऑब्झर्व्हेशन ठेवावे लागणार असे दिसत होते.

इकडे दूर्वा कॉलेज / अभ्यास बुडतोय ह्या सबबीखाली सारखा घरी जायचा हट्ट करू लागली.पण जगदाळेंना अशा परिस्थितीत सोडून निघणेही योग्य वाटत नव्हते.

अखेरीस दोन दिवसांनी डॉक्टरांनी मावशी आऊट ऑफ डेंजर असल्याचे सांगून आय.सी.यू तून नॉर्मल रूममधे शिफ्ट करू असे सांगितल्यावर मग जगदाळेंसहीत सगळेच परतीच्या वाटेला लागले.तासभरातच ते सगळे भालेवाडीत पोहोचले.

आज तिला पहिल्यांदाच घरी येऊन खूप आनंद होत होता.त्याचे कारण अर्थातच धनेश होता.बोलत नसला तरी निदान तो समोर दिसेल तरी ह्यातच तिला आनंद होता.

घरी येताच तिने पटापट आईला मदत करत दोन दिवस बंद असलेल्या सर्व घराची साफ-सफाई केली.जगदाळे मात्र तिकडून तिकडेच पोलिस ठाण्यात गेले.

जगदाळेंना आलेले पाहून धनेशचा मूड एकदम बदलला.एक दिवस सांगून तब्बल दोन दिवसांनी आल्यामूळे त्याचा तसाही मूड ऑफ झाला होता.परंतु आता जगदाळेंना बघून त्याची कळी खूलली.

संध्याकाळ झाली तसे दोघेही घराकडे निघाले.

रात्री तो आणि जगदाळे जेवतच होते की जगदाळेंना एक फोन आला.फोन त्यांच्या साडूचा होता.त्यांनी घाईनेच फोन उचलला.

त्यांच्या मेव्हणीची तब्येत पून्हा बिघडली होती.जगदाळेंनी पटपट जेवण उरकले.धनेशला यातले काहीच माहीत नव्हते.जेवण उरकून तो आपल्या खोलीत गेला.इकडे जगदाळेंनी आपल्या बायकोशी चर्चा करून लगेच निघायची तयारी केली.धनेशला जाऊन त्यांनी सर्व घटना सांगून ते ताबडतोब निघाले.तब्येतीचे

कारण रास्त असल्याने धनेशनेही लगेच परवानगी दिली.दोघेही घाईनेच गावी जायला निघाले.

धनेश मात्र लगेच आपल्या खोलीत गेला.

तो पेनच्या कॅमेरात काही कॅच झालेय का हे  मोबाईलवर कनेक्ट करून पाहायचा प्रयत्न करत होता.कारण ते ज्या दिवशी शेवटचे मंदिरात गेले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच मंदिर बंद राहिल असे पूजारी बोलला होता आणि त्यासाठीच तो रात्री बाहेर पडला पण मग पूढे दूर्वाचे अपहरण, त्याचे आजारी पडणे अशी एका मागोमाग घटनांची मालिकाच सूरू झाली.

तो पेन चुकूनच गाभाऱ्यात पडल्याने कदाचित त्या रात्रीची काही चित्रे कॅमेरात कैद होण्याची शक्यता अगदीच नाकारता येण्यासारखी नव्हती.

त्यामुळेच त्याला उत्सुकता होती की कॅमेरात काही कॅच झालेय का? 

तो आपल्याच धूनमधे काम करत होता.

इकडे बाहेर अचानक वातावरण बदलले.जोराचे वादळ सुटून मग हलक्या पावसाच्या सरी बरसू लागल्या.हळूहळू पावसाने रौद्र रूप धारण केले.वीजा कचकचू लागल्या.त्यातच लाईटही गेली.खाली दूर्वा एकटीच होती.तिला खूप भीती वाटायला लागली.मागच्या अंगणाचे दार उघडेच राहीले होते,पण ते बंद करायला जायची तिची हिंम्मत होईना मागल्या प्रसंगामूळे.

अखेर नाईलाजाने भीतभीतच तिने धनेशला मेसेज केला.

" सरऽऽ प्लिज खाली या ना. "

त्याने सवयीनेच मेसेज इग्नोअर केला.

काय करावे तिला काही समजेना.धनेश का इग्नोअर करतोय, त्याला काय हवेय ? हे तिला उमगले होते.आता जास्त ताणण्यात अर्थ नाही हे जाणून आपला हट्ट सोडून तिने त्याला मेसेज केला.

" अॅम सॉरी धनेश.प्लिज खाली ये नाऽऽ. "

'धनेश' असा एकेरी उल्लेख वाचल्याबरोबर धनेशचा चेहरा खूलला.

त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेच रिप्लाय केला.

" वर ये. "

तिने पून्हा मेसेज केला.

" नाही तू खाली ये.मागचे दार उघडे आहे.अॅम सो स्केअर्ड.प्लिज खाली ये नाऽऽ. "

" तूऽऽ  वरऽऽ  ये. " धनेशचा पून्हा तोच मेसेज.जणू हट्टालाच पेटला होता तो.तिच्याकडे त्याचे ऐकण्याखेरीज आता दूसरा पर्यायही शिल्लक नव्हता.

नाईलाजाने ती भीतभीतच वर गेली.अंधारात फक्त पाठिमागच्या खिडकीतून चांदण्याचा पडेल तेवढाच प्रकाश डोकावत होता.बाकी सगळा परीसर अंधारमय झाला होता.दूर्वा वर येऊन सोप्यातच थांबली.त्याचवेळी एक जोरदार वीज कडाडली तशी ती धावत जाऊन धनेशवर जवळ जवळ आदळलीच.

धनेशने लगेच तिला आपल्या मिठीत घेतले.त्या अवचित स्पर्शाने दूर्वाचे अंगांग शहारले.ऊर धपापू लागला.तिच्या श्वासांची वर खाली होणारी स्पंदने धनेशला साफ साफ ऐकू येत होती.

धनेशचीही स्थिती काही वेगळी नव्हती.त्याचेही श्वास गरम झाले होते तिच्या अवचित स्पर्शाने.

ही भेट घडावी म्हणून सगळे प्रसंग जणू नियतीनेच जूळवून आणल्यागत सारे काही घडत होते आणि अचानक कल्पना नसतानाही दूर्वा त्याच्या मिठीत सामावली होती.

कितीतरी वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत बद्ध राहीले.त्यांना आसपासच्या जगाचेही भान उरले नाही.तिच्या डोळ्यातून फक्त टपटप आश्रु ओघळत होते.सारे क्षण भावूक झालेले.

धनेशला छातीवर आेला स्पर्श जाणवला तसे त्याने दूर्वाकडे बघितले.तिचे डोळे रडून रडून सूजले होते.

त्याने अलगद आपल्या हातांनी तिचे डोळे टिपले आणि कान धरून तिला म्हणाला, 

" अॅम सॉरीऽऽ !!  खूप त्रास दिला ना मी तूला. "

त्याबरोबर नकारार्थी मान डोलवत ती पून्हा त्याच्या छातीवर डोके टेकून रडायला लागली.

हलकेच तिला स्वत:पासून दूर करत धनेशने आपली नजर तिच्यावर रोखली.दोघांची नजरानजर झाली आणि काही समजायच्या आत धनेशने दूर्वाच्या ओठांचा ताबा घेतला.दूर्वाने डोळे मिटून त्याला स्वीकृती दिल्याबरोबर धनेश अनावर होत वेड्यासारखे तिचे चूंबन घेत सूटला.दोघांच्याही विरह भावना दाटून आल्या होत्या.त्यांना एकमेकांपासून दूर जावेच वाटत नव्हते.बराच वेळाने दोघेही भानावर आले.

दूर्वाला पून्हा मागच्या उघड्या राहिलेल्या दाराची आठवण झाली तसे ती म्हणाली, " धनेश मागचे दार उघडेच राहीलेय.मला खूप भीती वाटतीय मागच्या अंगणात जायची. तू येतोस का 

सोबत ? "

त्यावर मिश्कीलपणे डोळे मिचकावत तिच्या गालावर हलकेच टिचकी मारत धनेश म्हणाला,

" तू म्हणशील तर आयुष्यभर तूझी सोबत करायला तयार आहे मी , मागच्या दाराचे काय घेऊन बसलीस. "

त्यावर दूर्वा लाजून गोरामोरी झाली.अंगावर नुसत्या कल्पनेनेच रोमांच उभे राहीले.

तिने लाजून चेहरा झुकवला ते पाहून धनेश पून्हा विचारला," सांग नाऽऽ आवडेल तूला, माझी सोबत करायला, आयुष्यभराकरता ? "

दूर्वाने लाजूनच होकार भरला तसा धनेश अत्यानंदात तिच्या डोळ्यात बघत चित्कारला,

" ओह् दूर्वा अॅम सो हॅप्पी डिअर..! लव्हऽऽ यूऽऽ दूर्वा ! विल….. यूऽऽ….. मॅरी….. मीऽऽ... ? "

दूर्वाला काय बोलावे तेच सूचत नव्हते.सगळे इतके अचानक घडत होते की तिची मतीच गूंग झाली होती.त्याच्या अनपेक्षित प्रस्तावाने ती लाजून चूरचूर झाली होती.ओठ थरथरत होते.

काय बोलावे न सूचून ती फक्त एवढेच बोलली , 

" आधी ते मागचे दार बंद करून ये मग सांगते. "

धनेशच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

" आलोच…" म्हणत तो घाईने खाली गेला.

मागच्या पूढच्या सर्व दारे खिडक्या चेक करून तो पून्हा वर आला.

दूर्वा भिंतीच्या एका कोपऱ्याला टेकून उभी होती.धनेश पून्हा तिच्या जवळ गेला.तिच्या भोवती आपल्या हाताचे कंकण घालून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला ,

" बरं आता तरी सांग नाऽऽ... "

" कायऽऽ ? "  दूर्वाने लाजतच खोडसाळपणे विचारले.

तसे त्याने तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला , " हेच की माझ्या छोट्या छोट्या डँबीस मूलांची आई व्हायला आवडेल का तूला? "

" इश्यऽऽ..!! काहीतरीच!! " 

लाजतच दूर्वा त्याच्या हातांच्या पंजातून सुटून खाली जाऊ लागली.

त्यावर धनेश लगेच म्हणाला, " आजची रात्र माझ्यासोबत थांबशील  ?…… ,प्लिऽऽज..!! "

तिची जाणारी पावले त्या वाक्याने दारातच थबकली.अंगावर सरसरून काटा आला. 

' फक्त मी आणि तो…. , घरात दुसरे कोणीच नाही.जर काही भले बूरे घडले तर मग जगाला कसे तोंड दाखवणार…? '

 तिच्या मनात विचारांची वावटळ उठली.

तिला आज तिच्या स्वत:वरच विश्वास वाटत नव्हता.

जराशी चाचरतच ती म्हणाली, " धनेश हे बरोबर नाहीये.घरात कोणी नसताना आपण….दोघेच...

असे….एकत्र...??  काही झाले तरऽऽऽ ?, जगाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही…"

त्यावर धनेश तिला जवळ घेत तिच्या केसांची डोळ्यावर आलेली बट बाजूला सारत म्हणाला,  " तूझा माझ्यावर विश्वास आहे नाऽऽ…? " 

दूर्वाने धडधडत्या ह्रदयानेच उत्तर दिले , " आज नाऽऽ तुझ्यापेक्षा मला माझ्यावरच विश्वास नाहीये. "

" माझा माझ्यावर कंट्रोल राहील की नाही ?

हीच भीती वाटतेय मला.काही झाल्यावर कुणाला दोष देण्यापेक्षा एक मोहाचा क्षण जिंकावा म्हणते…! " दूर्वा उद्गारली.

" बरोबरच बोलतीएस तू…, पण आज मला खरच हे अमूल्य क्षण तूझ्या सहवासात सेलिब्रेट करावेसे वाटताएत, प्लिऽऽऽज नाही म्हणू नकोस…..It's request darling.!! "

" आपल्या प्रेमाला साक्ष द्यायला पावसानेही कशी रोमँटीक हजेरी लावलीय बघ नाऽऽ.मग जर निसर्गच ह्या मिलनाला संम्मती देतोय तर तू का नाही म्हणत इतक्या सूंदर क्षणांना दूर लोटते आहेस ? " 

" प्लिज थांब ना...आय नीड यू डार्लिंग..प्लिज डोन्ट लिव्ह मी अलोन ..प्लिजऽऽऽ….!! "

धनेश कळवळून विनंती करताना पाहून दूर्वाही नकळत त्याच्यात विरघळत गेली.

" रोज रोज आँखो तले

एक ही सपना चले।

रातभर काजल जले

आँख मे जिस तरह

ख्वाब का दिया जलें। "

दूर कुठेतरी गाण्याची धून बॅकग्राऊंडला वाजत होती आणि इकडे संयमाची सारी वस्त्रे दूर भिरकावून धनेश/दूर्वा एकमेकांच्या मिठीत बद्ध झाली होती, कधीही विलग न होण्यासाठी…...

रात्रभर बाहेर पाऊस आणि आत प्रेमाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.

दोघेही बेधूंदपणे रात्रभर त्या प्रेमसरींत

न्हाऊन निघत होते……...

~~~~~~~~~~~~~(क्रमश:12)~~~~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.

धनेशला सावंतांच्या घरी काय मिळाले?

बुरखाधाऱ्याच्या झडतीमधे धनेशला असे काय सापडले ?

ह्या सगळ्याचा शोध धनेशला कोणत्या सत्यापर्यंत पोहोचवेल.ह्या सगळ्या कड्या जोडण्यात धनेश यशस्वी होईल की एखाद्या नव्याच संकटात तो सापडेल ? 

हे सगळे जाणून घ्यायला वाचत रहा  ' द सिक्रेट मिशन '

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.नावासहीत माझी कथा नक्कीच शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.






 

🎭 Series Post

View all