Feb 23, 2024
अलक

उत्सव नात्यांचा

Read Later
उत्सव नात्यांचा

१. गरीब शेतकऱ्याचा तो \"हुशार\" मुलगा पण खूप मेहनत घेऊनही त्याचा एमबीबीएसला नंबर लागला नाही. त्यावेळी वडिलांनी त्याला खूप सुनावलं आणि म्हटलं "आता तू काय करणार?  माझ्यासारखाच शेतकरी होणार!"त्यावेळी त्यांनं निर्धारानं पशुवैद्यक शास्त्राला प्रवेश घेतला आणि गोल्ड मेडल सह पदवी मिळवली. आता संपूर्ण पंचक्रोशीत तो "गोपाल -पशू रक्षक" म्हणून ओळखल्या जातो, कारण त्याच्या गुरांच्या दवाखान्यातुन, कितीही आजारी पशु अगदी ठणठणीत बरा होऊन आपल्या घरी जातो. त्यावेळी त्याच्या वडिलांचा ऊर अभिमानानं भरून येतो. २. एका सर्वसामान्य माणसाची ती गृहलक्ष्मी, निगुतीनं संसार करणारी, घरात मुलीच बाळंतपण झालेलं असतानाच नवर्‍यानं दाराशी दोन भाकड गाई आणल्यावर, वसु बार्शीला तीनं त्यांना निरांजनाने ओवाळून पुरणाचा नैवेद्य दाखवला, आणि आपल्या बाळंत मुलीच्या प्रमाणेच त्यांचीही देखभाल केली. ३. तो आणि ती दोघेही उच्चपदस्थ नोकरदार आणि सामाजिक बांधिलकी जपणारे. दिवाळीचा बोनस मिळाल्यावर दोघांनीही शहरातल्या गोरक्षण संस्थेस देणगी तर दिलीच , शिवाय शहरातल्या प्राणिसंग्रहालयासही काही रक्कम -तिथल्या प्राण्यांच्या देखभालीसाठी दिली.    (सदर लिखाण हे मोबाईल मधून केले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व) (वाचक हो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असल्यास मला फॉलो करा आणि आपले अभिप्राय नक्की कळवा)ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//