द रिऍलिटी शो

ही एक लघुकथा कथामालिका आहे
द रिऍलिटी शो

या मुंबई शहरात हजारो लोक आपल स्वप्न पूर्ण करायला येत असतात. म्हणूनच या शहराला
स्वप्नांची नगरी अस म्हणतात. आणि याच नगरीत ऑडिशन पास करून आपलं स्वप्न पूर्ण
करायला तसेच आपली प्रेरणा असलेल्या ऍक्टर जतीनला भेटायला ती मुंबईमध्ये आली होती.
\"ती\" म्हणजेच प्रग्या. ही कथा आहे जतीन आणि प्रग्याच्या एका अनोख्या नात्याची. जतीन
आणि प्रग्या कसे एकमेकांना भेटतात? कस त्यांच ते गोड नात बहरत जात. आणि कशी प्रग्या
जतीनला शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करते आणि आपलं हे नात जपते त्याचीच ही एक
हृदयस्पर्शी कथा. \"द रिऍलिटी शो\". 

प्रग्याला लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. तीने तूच माझी प्रिया, घे भरारी, प्रेम
हे असे, अश्या बऱ्याच नाटकांमधून आपल्या कलेचा ठसा ही उमटवला होता. तीला नेहमी
वाटायचं आपल्याला आपलं काय चूक काय बरोबर हे सांगणारा कुणीतरी चांगला गुरू असावा.
जो आपल्याला या क्षेत्रातले बारीक सारीक बारकावे नीट सांगू शकेल एखादी गोष्ट खटकलीच
तर कान पकडून माझ्याकडून नीट करून घेईन. असा एखादा आपल्याला गुरू भेटावा ज्याच्या
बरोबर काम करून समाधान मिळेल. अस तीला नेहमी वाटायच. आणि म्हणून ती कायम कलाकारांची
माहिती घेत असे. तसा तीला एक छंदच होता. कुठलाही नवीन कलाकार असो किंवा महितीतले
कलाकार असो ती प्रत्येकाला फॉलो करत असे. नेहमी नेटवर काही न काही सर्च करत असे.

आणि असच सर्च करता करता तीला एका लोकांच्या आठवणीतून दूर गेलेल्या कलाकाराची माहिती
मिळाली तो कलाकार म्हणजे जतीन.

जतीन एक हरहुन्नरी कलाकार होता. तसेच मेहनती सुद्धा होता त्याने खूप कमी वायत
आपल्या करिअरला सुरवात केली होती. लेखन असो किंवा डान्स तो प्रत्येक क्षेत्रात पुढे
असायचा. पण त्याच महत्वाच क्षेत्र होत अभिनय. जतीन अभिनय करताना इतका हरवून जायचा
की तो अभिनय करतोय की जे समोर सुरू आहे ते खरच सुरू आहे असा लोकांना प्रश्न पडायचा.

आणि एक दिवस हाच चमकता तारा असा काही लोप पावला ते परत कधी ही  पडद्यावर न 
दिसण्यासाठीच आणि जवळजवळ दहा वर्षानंतर प्रग्याच्या नजरेत जतीनची माहिती आली.
प्रग्या अगदी लक्षपूर्वक ती माहिती वाचू लागते. आणि त्याच्या मध्ये पूर्ण हरवून
जाते.

खर तर तीला विश्वासच बसत नाही या इंडस्ट्रीत असे ही लोक आहेत जे आधी दुसऱ्यांचा
विचार करतात मग स्वतःचा.

ती जतीनची आणखीन माहिती काढू लागते. जस जस ती माहिती काढत जाते तस तस ती त्याच्या
कामामुळे प्रभावीत होत जाते आणि तीची जतीनला भेटण्याची उत्सुकता ही वाढत जाते. व
तसा ती आपला प्रयत्न सुरू करते. तीला आता तो एक विश्वासच बसलेला असतो की आपल्याला
या क्षेत्रातले बारकावे कुणी सांगू शकेल तर हाच आपण याला भेटायचच असा ती एक निश्चयच
करते. आणि जतीनला सोशल मीडिया वर शोधून प्रत्येक क्षणी सपोर्ट करू लागते. जतीनसाठी
पोस्ट करण ट्विट करण त्याला आपण त्याच्या आयुष्यात आहोत याची सतत जाणीव करून देण हा
तीचा आणखी एक छंदच बनलेला असतो. आणि ती आपलं रुटीन सांभाळून नियमीत पणे त्याला साथ
देऊ लागते.

प्रग्याने जतीनसाठी इन्स्टाग्रामवर एक खूप सुंदर पेज बनवलेलं असत आणि त्यात ती
जतीनसाठी सुंदर सुंदर पोस्ट अपलोड करू लागते. ती जतीनला इन्स्टाग्रामवर फॉलो करते
आणि दररोज वेळात वेळ काढून पोस्ट करू लागते त्याचे चांगले चांगले फोटोज त्याला
मिळालेल्या अवॉर्डचे फोटोज ती शोधून शोधून शेअर करू लागते. त्यामुळे आता या
क्षेत्रात जतीन विश्वास या नावाचा कुणीतरी ऍक्टर होता हे लोकांच्या लक्षात येऊ
लागलं. त्यामुळे लोक प्रग्याच्या पेजमुळे जतीनला परत ओळखू लागले.

खर तर जतीनची ही एक बाजू होती. पण वास्तव याहून खूप वेगळ होत. प्रग्याने लोकांसमोर
तो कसा आहे त्याने काय काय केलं आहे एवढच दाखवलं होत. पण त्याने काय काय सहन केल
होत हे प्रग्याला देखील माहीत नव्हत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहा वर्ष तो
कुठे होता अस दहा वर्षांपूर्वी काय घडल होत ज्यामुळे जतीनच करिअर त्याची ओळख
पूर्णपणे पुसून गेली होती. हा आता सर्वांसमोरच एक प्रश्न उभा होता.

नोट:- खरच काय घडल होत त्याच्या आयुष्यात आणि प्रग्याची व जतीनची भेट होते का?
बघुयात पुढील भागात

🎭 Series Post

View all