ओल्या सांजवेळी अंतीम

Sometimes Love Cannot Reach To Marriage But Real Lovers Can't Be Departed


अवनी -"अवि, अतुल मला त्याच्या गावी घेऊन गेला. माझ अवघडले पण पाहून त्याची आई म्हणजे माझ्या सासूने मला सांभाळून घेतलं. तिने अतुलला काहीतरी समजून सांगितलं." अतुल मग मला म्हणाला -

अतुल -" अवनी पाहताच क्षणी कोणीही तुझ्यावर भाळावे अशी तू, मला तु पहिल्या नजरेतच आवडली होतीस. पण तरीही तुझ्या मनाची तयारी होईपर्यंत मी आपले वैवाहिक जीवन सुरु करणार नाही. तू तुला हवा तेवढा वेळ घे, मी दर शनिवार-रविवार तुला भेटायला येईल ".

. आणि अतुल त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेला.

अवनी - "सहा महिने झाले तरी माझ्या मनाची तयारी होत नव्हती मग एकदा आई-बाबा मला भेटायला आले, तु बी.ऍड. करायला अमरावतीला गेला ते त्यानी सांगितलं. मला वाटलं तू तुझ आयुष्य पुन्हा सुरू केल. आता मी पण माझं नव आयुष्य सुरू करावं, पण त्याच शनिवारी गावी परतत असताना अतुल च्या गाडीला अपघात झाला, आणि महिनाभर तो आय. सी. यु. त होता.नंतर महिनाभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला ठेवावं लागलं. मी त्याची मनापासून सेवा केली. घरी जायची सुट्टी देताना मला डॉक्टरांनी खाजगीत सांगितलं की , \"मी अजून सहा महिने अतुल अशी वैवाहिक संबंध ठेवू नये, आणि आता अतुल कधीही बाप होऊ शकणार नाही.\"

. मी डॉक्टरांचे म्हणणे शांतपणे ऐकले, आणि घरी अतुलची सेवा करू लागले त्यातच बाबांची तब्येत परत बिघडली आणि मी इथे आले.

. अवनी - "अवि तू सुखी हो! नवीन आयुष्य सुरु कर!!लग्न कर!!!".

अविनाश -" लग्न करून काय करू? अजूनही तू माझ्या आयुष्यात असताना! तू तुझ्या वाटेनं पुढे निघून गेली आहेस. पण मी इथे अजूनही तुझी वाट पाहतो आहे. तुझ्याशिवाय माझ आयुष्य वैराण वाळवंट झाल आहे. केवळ श्वास घेण्याला जगणं म्हणत असतील, तर मी जगतो आहे. केवळ तू परत येशील आणि आपण नव्यानं नवी सुरुवात करू या आशेवर.

अवनी -" हो मी माझा मार्ग निवडला. मला तसं करावं लागलं. पण मी आता परतून येऊ शकत नाही. माझ्या प्रवासात परतीचा मार्ग नाही पण तुझा सहवास, तुझा प्रेम, नक्कीच माझ्यासोबत आहे. मला जाऊ दे अवी! मला मोकळं कर! तुझ आयुष्य तू नव्याने सुरू कर. मी नेहमी तुझी होती आणि तुझीच राहीन.

. तेवढ्यात अवि ला कुणीतरी जोरात हलवलं ते दुर्गा देवीच्या मंदिराचे पुजारी होते आणि विचारत होते -

पुजारी -" अविनाश एवढ्या पावसाचं या घाटावर काय करत आहेस? आणि तुझ्या हातात या हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र,जोडवी कोणाची?

. अविनाश जवळ मंदिरातील पुजाराच्या या प्रश्नाचं कुठलं उत्तर नव्हतं.


. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातमी होती-

. "तलावा काठीच्या घाटावर स्थानिक शाळेतील शिक्षकाचा मृतदेह आढळून आला, आणि गावाकडे येणाऱ्या बस वर दरड कोसळून सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले."

*********************************************


वाचकहो कथा कशी वाटली ते नक्की कळवा तुमचे अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.


©® राखी भावसार भांडेकर.


जय हिंद.

🎭 Series Post

View all