अमरत्वाचा शोध. भाग -३.

Aayush, a young scientist joins NASA but suddenly makes a discovery that changes his life

कथेचे नाव - अमरत्वाचा शोध

विषय - रहस्यकथा

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नाव - हृषीकेश चांदेकर

जिल्हा - पुणे, महाराष्ट्र


सगळे आयुषच्या खोलीत धावले. आयुष तिथे असह्य वेदनांनी किंचाळत होता. त्यांच्या कपाळावरील‌ ती जखम ज्यातून तो‌ डोळा उगवला होता त्यांची जागा विस्तारली होती.‌ आयुषच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ पसरले होते आणि चेहरा त्यांचा विकृत झाला होता, चेहऱ्यावर अनेक रेषांचे जाळे पसरले होते.

सगळे आयुषला अशा अवस्थेत पाहून खरंतर घाबरले... 
आयुष अजूनही वेदनेने किंचाळत होता. त्या खोलीतील प्रत्येकाला तो त्यांचा आक्रोश सहन होत नव्हता. 
"आयुष तु... तु ठीक आहेस? जोन्सने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला."
आयुष काहीच बोलला नाही त्यांच्या वेदना आणि किंचाळणे सुरूच होते. 
"जोन्स आपल्याला काही करायला हवं. जर आयुषच्या या वेदना अशाच वाढल्या तर तो हिंसक होईल त्याला आपल्याला लवकर ट्यूबमध्ये परत टाकायला हवे त्यातील एक वैज्ञानिक म्हणाला."
बाकी वैज्ञानिकांनी पण त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
ठीक आहे, मलाही वाटत की त्याला ट्यूबमध्ये टाकावे आणि त्यांच्या त्या भागापाशी होत असलेल्या वेदना यांच्यावर ही काय उपाय करता येईल का? पाहू जोन्स म्हणाला. 
मग ते त्याला उचलायला निघाले तर आयुष ने नकार दिला. त्यांने त्यांना विरोध केला. त्यांचे डोळे आग ओकू लागले. 
"आयुष हे बघ आपण तुझ्या वेदना कमी करू शकू तुला मिळालेली ही शक्ती तुझ्या सहनशक्तीच्या पुढे गेली तर खूप समस्या होईल त्यासाठी तुला परत त्या ट्युबमध्ये जाणे गरजेचे आहे जोन्स म्हणाला."
मला तुमची गरज नाही, मला ही शक्ती अमर्याद हवी आहे तुम्ही ही प्रयोगशाळा सोडून जा नाहीतर विनाकारण माझ्या हातून तुम्हाला शारीरिक हानी पोहोचेल आयुष जोरात ओरडला.
त्याचे ते रूप आणि तो आवाज ऐकून पाहून सगळेच घाबरले.‌ काही वैज्ञानिकांनी ठरवले की इथे आता थांबण्यात काही अर्थ उरला नाही. जर काही वेळ थांबलो तर त्यांच्याच जीवाला धोका होऊ शकतो आयुषकडून. 
जोन्स तु हवं तर आयुष सोबत थांब पण आम्ही इथे नाही थांबू शकत. आयुष आता आपल्या नियंत्रणात नाही जर त्यांने काही केले तर आपण आपला जीव नक्कीच गमावून बसू मगाचच तो वैज्ञानिक म्हणाला.
ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता पण यात तुम्ही तुमची नोकरी गमावली तरी मी किंवा जेकब जबाबदार नाही जोन्स त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला. 
पण त्या सर्व वैज्ञानिकांनी ऐकून न ऐकल्या सारखे केले. ते निघून जाताच आता फक्त जोन्स आणि आयुषच होते. आयुषने पाहिले तर जोन्स अजूनही तिथेच होता.
जो...न्स... जा... तू इथून मला कोणीही नकोय इथे आणि या जागेवर परत कोणीही आलेले मला चालणार नाही जाऊन सांग जेकब आणि नासाच्या उच्च अधिकाऱ्यांना आयुष त्याच आवाजात म्हणाला.
"तुला ही शक्ती दिली आहे ती अमेरिकेची ताकद वाढवण्यासाठी आणि इथे आम्ही तुझ्यापेक्षा उच्च अधिकारी आहोत मी आणि जेकब. तु आमच्या नियंत्रणात पाहिजे, तुझी मनमानी चालणार नाही आयुष नाहीतर तुला वेदनेने मृत्यू दयावा लागेल जोन्स त्याला धमकवत म्हणाला."
मृत्यू... हं विसरलास जोन्स ही शक्ती जिचा प्रयोग तुम्ही माझ्यावर केला. त्या प्रयोगानेच मला अमरत्वची शक्ती दिली आहे हे मला जाणवतंय, कोणतही मानवी हत्यार मला शारिरीक इजा करू शकत नाही पण तुम्ही मात्र माझ्यामुळे दर्दनाक मृत्यूला सामोरे जाल आयुष सावधगिरीचा इशारा देत म्हणाला. 
जोन्सने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि तो आयुषच्या खोलीतून बाहेर पडला. जेकब कधी येतो यांची अस्वस्थपणे वाट बघत होता.
तेवढ्यात जेकब आला. त्याचा चेहरा उत्साहाने भरलेला होता. 
जोन्स मि. प्रेसिडेंट यांना प्रयोग यशस्वी झाल्याच सांगितले, ते खूप आनंदी झाले हे ऐकून ते काही तासांनी येथे पोहोचतील.लवकरच आयुषला ते अमेरिकन जनतेसमोर आणणार आहेत आणि अमेरिकाची ताकद वाढली आहे आयुषमुळे हे पण सांगणार आहेत तसेच यात आपल्याला खूप फायदा होईल आपण नासाचे हेड बनू जोन्स जेकब म्हणाला.
हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. 
"जेकब आयुष बाबतीत गडबड झाली आहे त्यांच्या वेदना खूप वाढल्या आणि तो आपल्या नियंत्रणाच्या बाहेर पडत आहे. यामुळे सर्व वैज्ञानिक जीवाच्या भितीने ही जागा सोडून निघून गेले जोन्स म्हणाला."
हे होईल माहित होतंच तरीही या वैज्ञानिकांनी तुला एकट्याला इथं सोडून पळून जायचे..? यामुळे त्यांना लवकरच... स्वतःची नोकरी गमावण्याची वेळ येईल असो मला घेऊन चल तिथे असे बोलून जेकब ने त्यांच्या खिशातून एक डिव्हाईस बाहेर काढले. 
तो‌ आणि जोन्स मग आयुषच्या खोलीत आले. आयुष अजूनही मान खाली घालून बसला होता.
आयुष उठ जेकब जरब बसवण्याऱ्या आवाजात म्हणाला.
यावर आयुषने वर पाहिले तर त्याला स्पष्टपणे दिसत नव्हते आता. त्यांच्या डोळ्यांचा रंग बदलला होता. जेकब आणि जोन्सने ते पाहिले. काही वेळ त्याने आपल्या हाताच्या बोटांनी डोळ्यावर फिरवले.‌त्याच्या डोळ्यांचा रंग पूर्ववत झाला. त्याने समोर पाहिले तर जेकब आणि जोन्स त्यांच्याकडे पाहत होते.
तु गेला नाही जोन्स.‌ मी तुला सांगितले होते इथून निघून जा आणि या जेकब लाही जर तुम्हाला तुमचा जीव महत्वाचा असेल तरच... मी जास्त वेळ स्वतःला रोखू.... 
तेवढ्यात जेकबने त्या डिव्हाईस मधील बटण दाबले आणि क्षणार्धात आयुष खाली कोसळला आणि वेदनेने तडफडू लागला‌.‌ हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरील त्या भेगा पडलेल्या रेषा कमी होऊ लागल्या, त्यांच्या कपाळावरील तो डोळा आकुंचन पावू लागला. आयुषचे कपाळ पूर्ववत झाला.
क्रमशः