Login

अमरत्वाचा शोध भाग -२

Aayush, a young scientist joins NASA but suddenly makes a discovery that changes his life

कथेचे नाव - अमरत्वाचा शोध

विषय - रहस्यकथा 

फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नाव - हृषीकेश चांदेकर

जिल्हा - पुणे , महाराष्ट्र

काही तासांनी मध्यरात्र झाली आणि आयुषला जागे करण्यात आले. 

"आयुष हा फक्त तुझ्या आयुष्यातीलच नाही तर पूर्ण नासासाठी महत्वपूर्ण क्षण आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तुझें जीवन बदलेलच पण तुला अशा शक्ती भेटतील ज्यांची कल्पना पण नाही करता येणार... पण एक लक्षात ठेव या शक्तीचा उपयोग फक्त अमेरिका देशाच्या भल्यासाठी तुला करायचा आहे आणि तु हे ऐकले नाही तर तुला मृत्यूला सामोरे जावे लागेल जेकब म्हणाला."

ठीक आहे! तसंही मला तुमच्या कडून भरपूर पैसा, ज्या तुमच्या \"प्रेसिडेंट\" ला सुविधा मिळतात त्या मला भेटल्या तर तु सांगितलेल्या अटी मान्य आहेत नाहीतर हा प्रयोग मी माझ्यावर करुन घेणार नाही... आणि तुम्ही मला मारलत तर तुम्हाला परत दुसरा माणूस भेटेल वाटत नाही आयुष हसत म्हणाला.

तुझ्या इच्छा आम्ही पूर्ण करू असे वाटते आणि तसंही तु जो लेखीनामा लिहून दिला आहे त्यात अशा कोणत्याही अटी नाहीत हे तु विसरला वाटत मागून जोन्स येत म्हणाला.

"अटी भलेही नसल्या तरी आता त्या माझ्या आहेत कारण एवढा धोका पत्करून माझ्या आयुष्याचा मला मिळणार काय? फक्त काही पैसे ते माझ्या करता तरी पुरेसे नाही आयुष कडवटपणे हसत म्हणाला."

ठीक आहे! तुझ्या इच्छा या प्रयोगानंतर \"प्रेसिडेंट मि.व्हाईट\" यांना कळविल्या जातील. आत्ता तु तय्यार हो आणि समोर दिसणाऱ्या त्या ट्युबमध्ये तुला जायचे आहे, त्याकरता एक सूट तय्यार केला गेला आहे तुझ्यासाठी तो पण घालून घे जेकब म्हणाला.

बरं! असे बोलून आयुष त्या ट्यूबपाशी निघाला.

"तुम्ही कशाला त्यांच्या अटी मान्य करु असे सांगितले आणि \"मि.प्रेसिडेंट\" होकार देणार नाहीत, ते ही एका या परदेशातील मुलांसाठी मग हा खटाटोप कशाकरता...? जोन्स वैतागून म्हणाला."

हे बघ जोन्स, "मी आयुषला कळवू बोललो पण त्यांच्या अटी पूर्ण होतीलच असे नाही कारण आयुष जीवंतच राहणार नाही प्रयोग यशस्वी झाला तरी आणि नाहीतरी पण... या मुलांजवळ अशा शक्ती बाळगू दयायला नासाला वेड नाही लागलें, आपण त्यांच्या या शक्ती काढून घ्याव्यात ही सूचना स्वतः प्रेसिडेंट नी दिली आहे. या शक्तीचा वापर एक अमेरिकन नागरिकच किंवा सैनिक करेल जेकब म्हणाला."

हे ऐकून जोन्सचे डोळे आश्चर्य आणि आनंदाने चमकायला लागले. तेवढ्यात... एका वैज्ञानिकांने आवाज दिला आणि जेकब ने त्याच्याकडे वळून पाहिले. 

सर, मशीन रेडी आहेत आणि आयुष पण, त्यांच्या शरीराच्या तपासण्या पण केल्या गेल्या आहेत आणि तो एकदम उत्साहित आणि तंदुरुस्त आहे, कोणतीही कमजोरी नाही मेयर्स म्हणाला.

ओके, चला आजच यश मिळवले तर अमेरिकाला एक नवीन शक्ती मिळेल मग अमेरिकाच्या शत्रूंना या शक्तींची चुणूक दाखवली जाईल जेकब हसून म्हणाला पण त्यांचे भाव चेहऱ्यावरील क्रूरतेचे होते. 

जोन्स आणि मेयर्स ने त्याच्या या बोलण्याला सहमती दर्शवली.

प्रत्येक जण आपापले काम करत होते. आयुषच्या शरीर त्या ट्यूबमध्ये एका मशीनवर बांधण्यात आले, त्यांच्या कपाळावर शक्तीवर नियंत्रण ठेवणारी एक वस्तू बांधण्यात आली. जोन्सने कॉम्प्युटरवरून दाब वाढवणारी वारंवारता सेट केली. आयुषचे शरीर त्या स्क्रीनवर दिसून येत होते. त्यांच्या मेंदूतील आता ती पेनीअल ग्रंथी शोधण्यात आली बस आत्ता त्यावर दबाव आणून तिच्या शक्ती जागृत करायच्या होत्या.जोन्सने ने बटण दाबताच त्या ट्यूबमधील मशीन सक्रिय झाली. ती मशीन त्यांच्या मेंदूच्या पेशींपर्यंत नेली. त्यातून चुंबकीय ध्वनी तरंग निर्माण होऊ लागले ज्यातून ओमसारखा आवाज ऐकू येवू लागला‌. हळूहळू जोन्स ने त्या ध्वनी तरंगाची गती वाढवली. 

आयुषच्या मेंदूवर त्यामुळे ताण निर्माण होऊ लागला आणि सोबत वेदनाही. त्याचा चेहरा वेदनेने आक्रसून गेला.हळूहळू त्यांचा मेंदू त्या ध्वनी तरंगचा आवाज सहन न करण्याच्या पलीकडे गेला. मेंदू त्या आवाजाने फुटून जाईल असे आयुषला वाटू लागले. त्याला ओरडता पण येत नव्हते. त्यांच्या शरीराची तडफड होत होती. हळुहळू त्यांच्या भुवयांच्या मध्यभागी एक लालसर डाग निर्माण होऊ लागला. ते बघून जेकब आणि इतर वैज्ञानिक यांना आनंद होऊ लागला. जोन्सने ध्वनी तरंगची तीव्रता वाढवली आणि होत्याचं नव्हतं झालं, त्यांची पेनीअल ग्रंथी सक्रीय झाली आणि त्यांच्या भुवयांच्या मध्यभागी एक डोळ्यासारखा अवयव निर्माण झाला.

जोन्स ने हळूहळू ध्वनी तरंगची तीव्रता कमी केली. जेकब ने जोन्स ला खुणावले. जोन्सने तिथे असलेल्या काही लेझर गन्स सोबत घेतल्या व तो काही वैज्ञानिकासोबत पुढे जाऊ लागला.

त्याला पुढे जाऊन त्या ट्यूबचे बटण ओपन केले आणि मग त्याने आयुषकडे पाहिले तर आयुष शांत होता. मघाशी वेदनेने आक्रसून गेलला त्यांचा चेहरा आता शांत होता एकदम.जोन्सने आयुषला आवाज दिला, "आयुष.‌.. आयुष तु ठीक आहेस? "

हो गंभीर आवाजात आयुषने होकार दिला.

प्रयोग यशस्वी झाला आयुष. थोडं थांबून मग जोन्स पुन्हा म्हणाला,"तु आता एक या शक्तींचा स्वामी, आणि या विश्वातील पहिला अमर मनुष्य आहेस बघ जोन्स आनंदाने म्हणाला.

"हो... हो... मी आहे पण मला काहीतरी विचित्र वाटतंय, माझा मेंदू अस्थिर वाटतोय... एक प्रचंड आग जाणवत आहे धगधगती आयुष म्हणाला. "

या प्रयोगामुळे तुला तसं जाणवतं असेल आयुष तु जाऊन आराम कर तोवर आम्ही मि.प्रेसिडेंट यांना या यशस्वी झालेल्या यशस्वी प्रयोगाची बातमी कळवतो आणि तुझे अभिनंदन जेकब पुढे येत म्हणाला.

हो ठीक आहे मी जाऊन आराम करतो असे बोलून आयुष जेकब काय म्हणाला याकडे लक्ष न देताच निघून गेला.

"जेकब आयुष जे म्हणाला त्यावरून पुढे समस्या उद्भवली तर त्याला जो त्रास होत आहे त्यावरून तो अनियंत्रित झाला तर जोन्स काळजीच्या स्वरात म्हणाला."

काळजीची गरज नाही आपले त्यावर नियंत्रण असेल आपण त्यांच्या मेंदूच्या पेशीत एका अशी चिप बसवली आहे प्रयोगाच्या वेळी की तो अनियंत्रित झालाच.... तर या कॉम्प्युटरमध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे एक सॉफ्टवेअर आहे आणि ते ही पूर्णपणे सुरक्षित तर आता मी मि. प्रेसिडेंट यांना भेटायला जात आहे व शक्यतो ते इथे येतील तोवर ही प्रयोगशाळा तुझ्या नियंत्रणाखाली असू दे आणि काही संकट जाणवलंच तर मला कॉल कर येतो मी जेकब एवढं बोलून प्रयोगशाळेच्या बाहेर पडला. 

जेकबने जरी विश्वास दिला तरी जोन्सला एक हुरहूर जाणवत होती पण नेमकी काय हे त्याला माहीत नव्हते. हळूहळू सुर्य उगवतीला आला. सगळे दमलेले वैज्ञानिक आराम करायला निघून गेले. जोन्सने तिथे असलेल्या मशीन मधून ज्यूस घेऊन ते पिले आणि मग तो ही झोपायला गेला. 

अचानक आयुषच्या रुममधून एक आवाज आला, एक किंकाळी... आणि सगळे खडबडून जागे झाले.

क्रमशः