कथेचे नाव - अमरत्वाचा शोध
विषय - रहस्यकथा
फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका
नाव - हृषीकेश चांदेकर
जिल्हा - पुणे, महाराष्ट्र.
सन लुईस व्हॅली,कोलोराडो.
एक गुप्त प्रयोगशाळा.
"काय"?? तो माणूस तयार झाला आहे?" जोन्स
"हो झाला आहे तयार, जास्त पैसे मोजले आहे. एवढे पैसे भेटले तर कोणीही तयार होणारच " ली हसत म्हणाला.
तेवढ्यात तिथे दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि काहीसे वृद्ध सायंटिस्ट आत आले. त्यांच्या सोबत एक नवयुवक होता.
"आयुष वय वर्षे २५. मध्यम उंचीचा, डोळे घारे, मूळचा भारतीय पण विज्ञान शाखेतून मधून पदवी घेत विज्ञानातील आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसा त्याने नासा मध्ये नोकरी साठी अर्ज केला आणि एक महिन्यांनी त्याला नासाकडून कामावर रुजू होण्याचे पत्र आले. दोन महिन्यांनी त्याला नासामध्ये जॉइन व्हायला सांगितले. दोन महिने जसे संपत आले तसे त्याने सगळ्या गोष्टींची पूर्तता करून दोन आठवड्यापूर्वीच भारत सोडला. त्याचा मित्र ओजसने त्याला अमेरिकत जायला मदत केली. एक ओजस सोडला तर त्याचा कोणी मित्र नव्हता. नासा मध्ये काम करून त्याला एक वर्ष झाले होते.
आणि एक दिवस अचानक त्याला उच्च अधिकाऱ्यांनी एका महत्वपूर्ण शोधाचा प्रयोग त्याच्यावर करण्याच्या बदल्यात ऐशोआराम आयुष्याचे प्रलोभन दाखविले, तसेच या प्रयोगामुळे तो यशस्वी झाला तर त्याला मृत्यूचे भय नसेल तसेच त्याचे स्वतःच्या शरीरावर नियंत्रण असेल व अनेक अज्ञात शक्ती त्याला प्राप्त होतील असे सांगितले आणि याचमुळे त्याने स्वतःच्या शरीरावर प्रयोग करायला परवानगी दिली व तसे त्याने एक लेखीनामा लिहून दिला आणि लिहून घेतला.
खरंतर.....
"नासातल्या एका शास्त्रज्ञाला , डेव्हिसला एक हा शोध लागला तो पण अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या भारतातील एका दुर्मिळ ग्रंथावर अभ्यास चालू होता.हा ग्रंथ एका ऋषीने लिहिला होता पण नेमकं त्यांचे नाव अज्ञात ठेवले गेले कारण जर या ग्रंथाच्या रचयता चे नावच कळाले नाही तर हा ग्रंथ भेटणारच नाही आणि जरी भेटला तरी यात वापरलेली संस्कृत भाषा ही अतिप्राचीन अक्षरात लिहिली ज्यांचा अर्थ समजणे कठीण गेले असते. पूर्ण गुप्तता बाळगली होती त्या ऋषीने या शोधाबाबत पण ब्रिटिशांनी हा ग्रंथ बळजबरीने मिळविला."
"ब्रिटिशांच्या लिपी तत्वज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांनी या ग्रंथावर खूप अभ्यास केला पण त्यांना काहीच कळाले नाही मग शेवटी त्यांनी तो लिलावात विकायला काढला. तिथे उपस्थित असलेल्या एका अमेरिकन माणसाने तो विकत घेतला. तो ही एक वैज्ञानिकच होता. पण त्याने त्याचा एका भारतीय मित्राकडून ज्याला त्याच्या पूर्वजांकडून मनुष्याचा तिसरा डोळा आणि अमरत्व यांची कडी जोडणारा एक ग्रंथ जो एका भारतीय ऋषीने लिहिला होता पण त्यांचे नाव अज्ञात ठेवले गेले ग्रंथाच्या सुरक्षिततेसाठी."
आणि हा ग्रंथ लंडनमध्ये लिलावात विकाला जाणार याची त्याला बातमी कळाली. त्याने सगळ्यात मोठी किंमत देऊन हा ग्रंथ विकत घेतला. त्याने त्याच मित्राच्या सहाय्याने एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्यातली महत्वाची माहिती काढून घेण्यात ते शेवटी यशस्वी झाले.
नंतर डेव्हिसने ही बातमी अमेरिकाचे तक्तालीन राष्ट्राध्यक्ष मि.व्हाईट यांना दाखवली. सुरूवातीला त्यांना यावर तर विश्वासच बसला नाही पण जेव्हा त्या वैज्ञानिकाने तो ग्रंथ आणि त्या ग्रंथावर अभ्यास करून त्याचे इंग्रजीत केलेले भाषांतर दाखवले. तेव्हा कुठे त्यांना विश्वास बसला आणि त्यांनी या प्रयोगाला परवानगी दिली पण हे शोधाचे रहस्य कधीच मिडीया अथवा बाहेरच्या लोकांना समजणार नाही याबद्दल त्याला सक्त ताकीद दिली. डेव्हिसने त्यांना आश्वस्त केले ही गोष्ट कुठेही बाहेर पडणार नाही याबद्दल.
"राष्ट्राध्यक्ष ची परवानगी मिळताच त्यांनी अमेरिकेपासून लांब अशा सन लुईस व्हॅली, कोलोराडो येथे गुप्त प्रयोगशाळा येथे प्रयोगशाळा बनवण्यात आली. तसाही या भागात यूएअफो उतरत असल्याने येऊन हा भाग बंद करण्यात आला होता सुरक्षाकारणास्तव पण या भागात काही वैज्ञानिक चाचण्या करण्यासाठीच यूएअफोच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. तसेच या शोधात नासातील अनेक शास्त्रज्ञांना ही सहभागी करण्यात आले नाही. यात कोण लोभी निघेल आणि हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा गैरफायदा घेण्याची पण शक्यता आहे...."
\"जेकब\" नावाचा एक वैज्ञानिक आयुषला म्हणाला, "आयुष तु तयार आहे ना? हे बघ यात काहीही होऊ शकत तु डगमगला तरी उपयोग नाही आणि तु ऐनवेळी नकार दिला तर बाहेर असलेले सैनिक गोळ्यांनी तुझ्या शरीराची चाळण करतील."
आयुष हे ऐकून थोडा डगमगला
मनातच स्वतःला म्हणाला, आपण नकार दिला तरी वाचू शकणार आणि तसंही ही माझी स्वतःची इच्छा आहे ही व जगलो तर यांना आपण नंतर पाहून घेऊ)
तो म्हणाला, "मी तयार आहे नकार देण्याचा प्रश्नच येत नाही."
जॉर्ज म्हणाला, ठीक आहे तू आज रात्री पर्यंत आराम कर. तुला मध्यरात्री प्रयोगासाठी तयार रहावे लागेल. मि डेव्हिस आणि मि. प्रेसिडेंट आज मध्यरात्री येतील. अजून काही मशीन पण यायच्या बाकी आहेत तर हा प्रयोग उशीराच सुरू होईल.
\"ठीक आहे मी तोवर आराम करतो.\" आयुष म्हणाला.
जेकब ने एका शास्त्रज्ञाला आयुषला त्याच्या रूममध्ये न्यायला सांगितले. तो त्या शास्त्रज्ञासमेवत त्यांच्या रूममध्ये जायला निघाला. तो गेल्यावर जोन्स जेकब जवळ गेला.
सर जेकब, "तुम्हाला या आयुषवर एवढा विश्वास कसा काय? याला दिलेल्या पैशाचा उपयोग काहीच होणार नाही तरी हा तयार झाला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो या शक्तीचा उपयोग त्याने स्वत:साठी केला तर? तसही त्याच्या मनात काय चालू असावे माहित नाही जोन्स म्हणाला."
"घाबरण्याची गरज नाही जोन्स भलेही हा प्रयोग यशस्वी झालाच... तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे एक डिव्हाईस आपण त्यांच्या शरीराच्या आत प्रयोगाच्या दरम्यान फिट करणार आहोत. त्याच्या शक्ती त्याने कितीही अनियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला करता येणार नाही. त्या ऋषीला यांची कल्पना आधीच आली असावी म्हणून त्याने यावर नियंत्रण आणणारी शक्ती बाबतीत ही लिहिले आहे त्यामुळे आपल्याला घाबरण्याची तरी गरज नाही." जेकब म्हणाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा