जगणं जमायला हवं !!

The Pursuit Of Happiness

न जाणो,कित्येक वर्षांपासून कित्येक वाहनांचा भार सांभाळत झिजलेला अरूंद रस्ता आणि त्याची कथा. स्वतःवरचा भार कमी करत मुक्त झालेलं एक पानविरहीत जूनं झाड.गडगडून टाकणारं भलं-मोठ्ठं आभाळ त्याची गोंधळ उडवणारी कविता.गाढ झोपलेलं शहर. पुन्हा कितीतरी प्रश्न सोबत घेऊन ,कानात हेडफोन टाकून B Praak चं कुठलंतरी दर्दी गाणं एेकतं .एक-एक गोष्ट टिपत एकटी चालणारी मी.त्याच्या आवाजातली ती Depth समजून घेता घेता मग्न झालेली मी.बर्याचदा दिवसाची सुरूवात हि अशीच होती.पण अस्वस्थतेचा हा ऊन-साऊलीसारखा खेळही सुंदर वाटतो कधी-कधी.मग हळूहळू शहर जागं होवू लागतं. सुरकुतलेला पण तरीही तेजस्वी वाटणारा पेपरवाल्या आजोबांचा हसरा चेहरा पाहून.माझा एक वेगळाच चेहरा प्रतिबिंबित होतो.सादगी बोलावं असा.का?? ते मलाही नाही समजत.त्यांच्या थरथरणार्या हातांकडे बघून माझ्यात जरा-जरा हिम्मत येऊ लागते.मग मात्र कशालाही सामोरं जाण्याची भीती वाटत नाही.म्हणजे ना अशी काही माणसं आहेत ज्यांच्याशी बोलणं होतं ते फक्त एका स्मित हास्याने पण तरीही ते खूप काही सांगून जाता.हे आजोबा त्यातलेच एक. मग शहराची गर्दी वाढते.कामं सुरू होता.पूर्ण दिवस व्यस्त व्यस्त. संध्याकाळी आॅफिसवरनं परततांना मित्रासोबत चहा प्यायलां गेलं कि समोरच्या टेबलावर बसणारा ,रोजचाच तो मुलगा black coffe without sugar चे घोट घटाघट गिळत गिळत लॅपटाॅवर वैतागत - जोरजोरात खटखट करत काम करणार्या त्याच्याकडे बघून खरं तर दया येते मला त्याची.मग विचारांच्या तंद्रीत कितीवेळ न थांबता मी बडूबडू लागते.शांतपणे बघत सारं काही एेकणार्या मित्राला मग मी विचारते, “ am i making sense ?? ” आणि तो हसत हसत बोलतो स्वतःवर शंका घेणं थांबव , सुटतील खूप सारे प्रश्न.तूझ्यासारखं दिवसाच्या शेवटाला उदासीनतेला दूर सारतं एक स्मित आणि समाधान नसतं सर्वांच्या चेहर्यावर.....!!
          © एकज वर्णिक ( शिवानी )



© एकज वर्णिक (