द सायको किलर (भाग-७)

Criminal Can Used The Technology Which Can Not Lonch.


द सायको किलर..... भाग 7.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************

(मागील भागात आपण पाहिलं,अविनाश त्या घरातून काही पुरावे घेऊन ब्युरोचा यायला निघाला......तर सुहासने तो फोन सुरू करण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवायला घेतलं.....हर्ष आणि अवनी सायलीच्या कंपनीत गेले...... आता पुढे.....)


"आम्हाला ह्या कंपनी च्या मालकांचा नंबर द्या.....आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे...."अवनी म्हणाली.....

"पण तुम्ही कोण?..." सेक्युरिटी गार्ड ने विचारलं.....

"आम्ही सी.आय.डी ऑफिसर आहोत...! द्या आता नंबर..." हर्ष वैतागून म्हणाला.....

"अहो साहेब, मग त्यासाठी फोन नंबरची काय गरज?.." सेक्युरिटी गार्ड म्हणाला.....

"म्हणजे?.." अवनीने विचारलं.....

"साहेब आतमध्ये आहेत...! तुम्ही आत जावा..." सेक्युरिटी गार्ड म्हणाला.....

"काय? तुम्ही इतका वेळ आम्हाला इथे थांबवलं आणि आता म्हणताय साहेब आत आहेत... व्हॉट नॉन-सेन्स...!" आता मात्र हर्ष चिडला होता.....

"सॉरी साहेब...! मला साहेबांनी कोणालाही कस्टमरला आत सोडू नको असं सांगितलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही....."सेक्युरिटी गार्ड म्हणाला.....

"ओके...!" असं म्हणून हर्ष आणि अवनी ऑफिसमध्ये गेले.....

"तुम्ही असे आत कसे आलात? तुम्हाला माहिती नाही का ऑफिस बंद आहे....सेक्युरिटीss..." एक व्यक्ती म्हणाली.....

"आम्हाला सेक्युरिटी गार्ड ने आत पाठवलं...! आम्ही दोघं सी.आय.डी ऑफिसर आहोत.....मी इन्स्पेक्टर हर्ष, आणि ह्या इन्स्पेक्टर अवनी...!" हर्षने ओळख करून दिली.....

"हॅलो सर...!आय अम सॉरी, मी ओळखलं नाही.....
मी मिस्टर शेखर मोहिते आणि माझे पार्टनर मिस्टर जयेश चौधरी..... आम्ही दोघं या कंपनीचे मालक आहोत...." मिस्टर शेखर नी ओळख करून दिली.....

"आम्हाला सायली जोशी बद्दल माहिती हवी होती...!" अवनी म्हणाली......

"सायली बद्दल? का? काही प्रॉब्लेम आहे का?..."मिस्टर शेखर नी विचारलं.....

"त्यांचा खून झालाय...!" हर्ष म्हणाला.....

"काय?... मिस्टर शेखर आणि मिस्टर जयेश दोघेही आश्चर्याने म्हणाले.....

"हो...! पण तुम्ही तुमचं ऑफिस बंद का ठेवलं आहे?.." हर्ष ने विचारलं......

"सर ते...! actually, गेल्या दोन-चार महिन्यापासून आमच्या कंपनीवर कोर्टात एक केस सुरू होती.....

म्हणजे \"एम.एल. कन्स्ट्रक्शन\" ह्या आमच्या कॉम्पिटीटर कंपनी ने आमच्यावर त्यांच्या कंपनी चं structure चोरल्याची केस टाकली......

दोन दिवसांपूर्वी आमच्या कंपनीच्या बाजूने पुरावे नसल्याने त्या केसचा निकाल त्यांच्या कंपनीच्या बाजूने लागला......

रादर आमच्या केसचा शेवटचा पुरावा होती, ती म्हणजे सायली....! पण ती आलीच नाही... अचानक तिचा फोन आला की माझी तब्येत बरी नाहीये... खरं तर तिच्याचमुळे आम्ही ही केस हरलो....!" हे सगळं सांगताना मिस्टर शेखर च्या डोळ्यांत एक वेगळीच तीव्र आग जाणवत होती......

"ओके..! पण मग सायली चं कोणाशी भांडण वगैरे होतं का?....."अवनीने विचारलं.....

"नाही सर...! ती स्वभावाने खूप चांगली होती..... कधी कधी चिडली तर समोरचा व्यक्ती दुखावला जाईल असं बोलायची..... पण असं क्वचितच घडायचं......" मिस्टर शेखर म्हणाले.....

"मग असं कधी कोणाबरोबर घडलं आहे का?.." हर्ष ने विचारलं.....

"हो, पण एकदाच आणि शेवटचं...!

ते सुद्धा मिस्टर शेखर आणि मी काहीतरी कामाचं बोलत असताना ती मध्ये आली आणि तिने ते बोलणं ऐकलं रादर ऐकलं ही नसेल, कारण तेव्हा तिच्या कानात हेडफोन्स होते......

तेव्हा मिस्टर शेखर तिला म्हणाले, \" तू ह्या कंपनीची CEO जरी असलीस तरी मालक आम्हीच आहोत...... आमचं बोलणं ऐकण्याचा तुला अधिकार नाही.....\"

ते तिला पटलं नाही..... तेव्हा तिने मिस्टर शेखर ना तिची काहीच चूक नव्हती आणि \" मी तुमचं बोलणं कधी ऐकलं ही नाही आणि ऐकणारही नाही..... आणि जरी मी तुमचं बोलणं ऐकलं तरी कुणाला सांगणार नाही\" असं सगळ्या स्टाफसमोर म्हणाली......" मिस्टर जयेश नी सांगितलं.....

"ओह...! म्हणजे मिस्टर शेखर तुम्ही?..." हर्ष म्हणाला.....

"नाही ओ सर...! मी कशाला असं काही करू..... मी ते विसरून सुद्धा गेलो होतो...." मिस्टर शेखर म्हणाले......

"आम्हाला सायलीच्या केबिनमध्ये जाऊन पहायचंय...!" अवनी म्हणाली.....

"या ना, या...!" मिस्टर शेखर आणि मिस्टर जयेश दोघांनी सायलीची केबिन दाखवली......

हर्ष आणि अवनी ने संपूर्ण केबिन नीट चेक केली.....
अवनीला फाईल चेक करत असताना एक फाईल सापडली.....

"हर्षss...! ह्या फाईलमध्ये काही लोकांची नावं,फोटो आणि फोन नंबर आहेत..... त्यातील काही नावं खोडली आहेत....!" अवनी हर्षला दाखवत म्हणाली.....

"ही फाईल एव्हीडेन्स म्हणून ब्युरोमध्ये घेऊन चल...!" हर्ष अवनीला म्हणाला....

बरीच शोधाशोध करूनही अजून काही सापडलं नाही..... म्हणून ते दोघेही बाहेर आले.....

"सायलीचा लॅपटॉप नाहीये केबिन मध्ये?..." हर्षने विचारलं.....

"हो सर, ती कामासाठी लॅपटॉप घरी घेऊन जायची...!" मिस्टर शेखर म्हणाले.....

"ओके..! काही गरज वाटली तर आम्ही परत येऊ...!" अवनी म्हणाली.....

हर्ष आणि अवनी दोघेही ब्युरोमध्ये जायला निघाले.....

रुपेश, मनस्वी, हर्ष आणि अवनी सगळे एकत्रच ब्युरोमध्ये आले......

"बोला, काही माहिती मिळाली?..."ए.सी.पी सरांनी सगळ्यांना विचारलं......

"सर, रागिणीच्या ऑफिसमध्ये ही फाईल, रागिणीचा फोन आणि लॅपटॉप मिळाला आहे....."रुपेश म्हणाला......

"सर, कस्तुरीच्या ऑफिस मधून जास्त काहीच मिळालं नाही फक्त ही फाईल मिळाली आहे...." मनस्वी म्हणाली......

"सर, आम्हाला सुद्धा सायलीच्या ऑफिसमधून एक फाईल मिळाली आहे....
पण सायलीचं ऑफिस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.....

एका \"एम.एल. कन्स्ट्रक्शन\" कंपनीने त्यांच्या कंपनीवर structure चोरल्याची केस केली होती आणि त्या केसची शेवटची साक्ष सायली देणार होती, पण त्या आधीच तिचा खून झाला......

मिस्टर शेखर चा सायलीवर वेगळाच राग आहे असं जाणवलं.....मला वाटतं सायलीच्या खुनामध्ये त्यांचा काहीतरी हात असेल...." हर्ष म्हणाला......

"पण सर, जर सायलीने कोर्टात साक्ष दिल्यावर मिस्टर शेखर यांचा फायदाच होणार होता, मग ते असं का करतील?..." रुपेश म्हणाला.....

"बघू आपण...! तुला सापडलेल्या फोन आणि लॅपटॉप मध्ये काही सापडलं का?...."ए.सी.पी सरांनी रुपेशला विचारलं.....

"सर, फोन आणि लॅपटॉप लॉक आहे....! तर ह्या फाईल मध्ये काहीजणांचे फोटो आणि फोन नंबर आहेत, काही फोटो आणि नंबर खोडले आहेत....!"रुपेश म्हणाला.....

"हो सर...! ह्या फाईल मध्ये सुद्धा तसंच काहीसं आहे....!" मनस्वी आणि अवनी एकत्र म्हणाल्या......

"तिन्ही फाईल मधील फोटो सेम आहेत का ते चेक करा....!"ए.सी.पी सर म्हणाले.....

हर्ष आणि रुपेशने तिन्ही फाईल पाहिल्या..... त्यातील तीन फोटो त्यांना तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे पण तिन्ही फाईल्स मध्ये दिसले......

"सर, हे तीन फोटो तिन्ही फाईल्स मध्ये आहेत..... आणि विशेष म्हणजे ह्या तिन्ही फाईल्स मध्ये ह्या तीन व्यक्तींच्या फोटोला बारीक अशी बरोबरची खूण केली आहे....." रुपेश म्हणाला......

"पण प्रत्येकाचा फोन नंबर आणि पत्ता तिन्ही फाईल्स वर वेगवेगळा आहे....!" अवनी म्हणाली......

"ओहs, म्हणजे हा पत्ता नक्कीच खोटा असणार...!" हर्ष म्हणाला.....

"तुम्ही एक काम करा, त्या-त्या पत्त्यावर जाऊन चौकशी करा, कदाचित एखादा पत्ता खरा असेल....!"ए.सी.पी सर म्हणाले......

"हर्ष तू जाऊन त्या \"एम.एल. कन्स्ट्रक्शन\" कंपनी मध्ये चौकशी कर.... म्हणजे नक्की काय ते कळेल...."ए.सी.पी सर म्हणाले......

हर्षने \"एम.एल.कन्स्ट्रक्शन\" कंपनीचा पत्ता ऑनलाईन शोधला आणि त्या कंपनीत जायला निघाला......

अवनी, मनस्वी आणि रुपेश हे तिघे त्या फाईल्स मधील तिघांच्या वेगवेगळ्या पत्त्यावर चौकशी करायला निघाले......

"एकाच पद्धतीने तीन महिलांचा खून, तेही तिन्ही महिला वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपनी च्या सर्वेसर्वा....! त्यांचा नक्कीच एकमेकींशी काहीतरी संबंध असावा.....पण काय?..."जाता जाता मनस्वी सगळ्यांना म्हणाली.....

"तेच आपल्याला शोधून काढायचं आहे...!" रुपेश म्हणाला....... आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेले.........

_______________________________________


इकडे ब्युरोमध्ये ए.सी.पी सर आणि सुहास दोघेच होते..... कारण अजूनही अविनाश ब्युरोमध्ये पोहोचला नव्हता.......

"सर...! सॉफ्टवेअर काही मिनिटांत तयार होईल, प्रोसेसिंग मध्ये आहे...... मग आपल्याला त्या फोन मधील माहिती मिळेल....!"सुहास ए.सी.पी सरांना म्हणाला.....

"तोवर मग ह्या फोन आणि लॅपटॉप चा पासवर्ड क्रॅक करता येतो का ते बघ...!" ए.सी.पी सर सुहास ला म्हणाले.....

"येस सर, बघतो...!" असं म्हणून सुहास ने लॅपटॉप आणि फोन चेक करायला सुरुवात केली.....

पंधरा मिनिटांच्या आत सुहासने फोन आणि लॅपटॉप चेक केला.....

"सर...! ह्यात सुद्धा तीच न्यू टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे....." सुहास ए.सी.पी सरांना म्हणाला......

"म्हणजे आता जोपर्यंत मिस्टर उमेश येत नाहीत तोवर आपण काहीच करू शकत नाही....!" ए.सी.पी सर म्हणाले......

"ते सॉफ्टवेअर तयार झालं का बघ...!"ए.सी.पी सर सुहासला म्हणाले.....

"हो सर, झालं...!" सुहास आनंदाने म्हणाला......

"गुड...! लवकर बघ त्या फोन मध्ये काही मिळतंय का?..."ए.सी.पी सर म्हणाले.....

सुहासने त्याच्या परीने सगळे प्रयत्न केले.....पण ते सॉफ्टवेअर तयार करूनसुद्धा त्या फोनमधील माहिती मिळत नव्हती......

"काय झालं सुहास?..."ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"सर, हे सॉफ्टवेअर सुद्धा ह्या फोनला सपोर्ट करत नाहीये...!" सुहास म्हणाला.....

"कसं शक्य आहे? तू तर म्हणाला होतास की, त्या सॉफ्टवेअरमुळे आपण ह्या फोनमधील काही माहिती पाहू शकतो...."ए.सी.पी सर म्हणाले.....

"हो सर...! पण बहुतेक ह्या फोन मध्ये देखील न्यू टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असेल, आणि त्या टेक्नॉलॉजी चे फीचर्स आपल्याला माहिती नाहीत....!म्हणून कदाचित असं होत असेल..." सुहास म्हणाला.....

"हॅलो सर...! सॉरी मला यायला थोडा उशीर झाला...! मी मिस्टर उमेश टिळक....! \"न्यू फॉर फ्यु\" कंपनीचा मालक...." मिस्टर उमेश म्हणाले.....

"या, या...! आम्ही तुमचीच वाट बघत होतो....!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"माझी? का?" मिस्टर उमेश म्हणाले.....

"तुम्ही जी सध्या न्यू टेक्नॉलॉजी लॉन्च करताय, त्या टेक्नॉलॉजी विषयी थोडी माहिती आम्हाला हवी आहे...!" ए.सी.पी सर म्हणाले.....

"सॉरी सर...! पण टेक्नॉलॉजी लॉन्च होण्यापूर्वी मी तुम्हाला त्याविषयीची कॉन्फिडेनशीअल माहिती नाही देऊ शकत...." मिस्टर उमेश म्हणाले.....

"हे बघा...! तुमची टेक्नॉलॉजी लॉन्च होण्यापूर्वीच फोन आणि लॅपटॉप मध्ये वापरली गेली आहे...!"ए.सी.पी सर म्हणाले......

"व्हॉट?... कसं शक्य आहे?... अजून ह्या टेक्नॉलॉजी चं लॉंचिंग झालंच नाहीये...!" मिस्टर उमेश म्हणाले.....

"हो ते आम्हाला माहिती आहे...! तुमची टेक्नॉलॉजी लॉंचिंग आधी कशी वापरली गेली हे आम्ही नक्की शोधून काढू.... पण त्यासाठी आम्हाला तुमच्या ह्या टेक्नॉलॉजी विषयी सगळी माहिती लागेल...." ए.सी.पी सर म्हणाले......

"ओके सर, मी ह्या टेक्नॉलॉजी ची सगळी माहिती तुम्हाला द्यायला तयार आहे....."


*******************************************

सायलीच्या खुनामध्ये शेखरचा तर हात नसेल?.....

त्या फाईल्समधील तीन व्यक्ती नक्की कोण असतील?.....

न्यू टेक्नॉलॉजी लॉन्च होण्यापूर्वी बाहेर येण्यामागे नक्की कोणाचा हात असेल?......

पाहूया पुढच्या भागात......

क्रमशः

🎭 Series Post

View all