द सायको किलर (भाग-६)

Avinash Can Find The Address Of Vimal.


द सायको किलर..... भाग 6.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************

(मागील भागात आपण पाहिलं, रुपेशला रागिणीच्या केबिनमध्ये फाईल, लॅपटॉप आणि फोन सापडला.....
तर मनस्वीला कस्तुरीच्या ऑफिसमधून कस्तुरीला कोणाचातरी फोन यायचा एवढं समजलं.....डॉक्टर निशाद ना खुन्याची अंदाजे शरीररचना कळाली......अविनाश हा त्या पत्त्याच्या ठिकाणी येऊन पोहोचला...... आता पुढे.....)


"काका...! ह्या तुमच्या गावात राहतात का ?" अविनाशने गावातील एका गृहस्थांना विमलचं स्केच दाखवून विचारलं.....

"नाही....!" ते गृहस्थ म्हणाले.....

"मग हा पत्ता सांगू शकता का?..."अविनाशने त्या गृहस्थांना विचारलं.....

"हो....! ते समोर नारळाचं मोठं झाड दिसतंय का?" त्या गृहस्थांनी अविनाशला विचारलं......

"हो....!" समोर दूरवर दिसत असलेल्या नारळाच्या झाडाकडे पाहत म्हणाला......

"त्या झाडाजवळ एक मोठी नदी आहे त्याच्या पलीकडचा हा पत्ता आहे....!" असं म्हणून ते गृहस्थ तिथून निघून गेले.....

अविनाश बराच वेळ चालत चालत पुढे गेला.....जवळजवळ वीस मिनिटं चालल्यानंतर त्या झाडाजवळ येऊन तो पोहोचला......

तिथे त्याला गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे एक मोठी नदी दिसली...... नदीपलीकडे एक घर होतं......अविनाश आता नदी कशी पार करायची ह्याचा विचार करत होता, कारण आजूबाजूला कोणतीच बोट दिसत नव्हती.....

अविनाश नदी कशी पार करायची? हा विचार करत असतानाच, अचानक एक नावकरी अविनाशच्या समोर आला......

"पाव्हन, गावात नवीन दिसतासा...!" नावकरी नाव अविनाशजवळ आणत म्हणाला.....

"हो...!मला त्या समोरच्या घराजवळ जायचं आहे..... तुमची काही हरकत नसेल तर मला तिथे सोडता का?...." अविनाशने नावकऱ्याला विचारलं.....

"व्हय, सोडतो की....! पर तिथं कोणी राहत नाही....ती जागा इकायची हाय, तुम्ही जागा बघायला म्हणून आलात का?"नावकऱ्याने अविनाशला विचारलं.....

"नाही, पण आयडिया काही वाईट नाहीये...! पण कोणाची आहे ही जागा?..." अविनाशने नावकऱ्याला विचारलं......

"कोणतरी मोठे साहेब हायत, लय पैसेवाले...! त्यांच्या कामवालीला राहण्यासाठी त्यांनी एवढी छान सुंदर जागा घेऊन दिली..... म्हणजे तुम्हीच इचार करा ते किती पैसेवाले असतील....." नावकरी म्हणाला......

"ओss, मला त्यांना भेटायचंय...! तुम्ही ओळखता का त्यांना?" अविनाशने नावकऱ्याला विचारलं......

"काय साहेब...! गरिबाची चेष्टा करायलाय....! आम्ही कोणी त्यांना पाहिलं न्हाय.... ते गावात कधी आलेलं पर पाहिलं न्हाय, त्यांची ती मोलकरीण कधीतरी सांगायची म्हणून आम्हाला माहिती...." नावकरी म्हणाला......

दोघेही बोलत बोलत नदीच्या पलीकडे पोहोचले.....

"साहेब, मला काम शेतावर काम हाय...! तुमचं काम झालं की ह्या समोरच्या वाटेनं बाहेर पडा, त्यो रस्ता तुम्हाला हायवेपर्यंत नेऊन सोडेल..... आमच्या गावातून हायवेला जाण्याचा शॉर्टकट आहे तो....!" नावकरी म्हणाला.....

"ओके, धन्यवाद...!" अविनाश म्हणाला.....

तो नावकरी स्वतःची नाव घेऊन तिथून निघून गेला....नावकरी गेला आहे याची खात्री करून अविनाशने त्या बंद घराचं दार मास्टर-की ने उघडलं......

आतमध्ये पूर्णपणे अंधार होता.....अविनाशने घरातील स्विच शोधून लाईट लावली..... घर अतिशय स्वच्छ, नीटनेटकं ठेवलेलं होतं..... घराच्या भिंतींवर जुन्या काळातील काही राजे-महाराजांचे फोटो होते.....फर्निचर झाकून ठेवलेलं होतं, जणू तिथे बरेच दिवस कोणी राहिलं नसेल......

अविनाशने संपूर्ण घर शोधलं, पण त्याला तिथे काहीच मिळालं नाही..... अविनाश तिथून निघणार तोच त्याला एका कोपऱ्यात एक छोटंसं दार दिसलं.....

अविनाशने पुढे जाऊन ते दार उघडून पाहिलं तर काय, त्या छोट्या दारापलीकडे एवढी मोठी खोली असेल असं कोणाला वाटलंच नसतं.....

ती खोली अविनाशने व्यवस्थित चेक केली..... त्या खोलीत त्याला जुने कामवालीचे कपडे आणि त्याच्याच बाजूला मॉडर्न मुलीचे कपडे दिसले.....

म्हणून अविनाशने आणखी शोधाशोध सुरू केली.....
आरशाजवळ त्याला काही महागडे मेकअप किट्स दिसले.....

कपाटात एक अलबम सापडला... त्या अलबम मध्ये विमलचा फोटो होता.... फोटो जुना असल्याने विमलबरोबर असलेली फॅमिली ही कस्तुरीची असावी असा अंदाज अविनाशने जुन्या फोटोतील कस्तुरी आणि तिच्या मिस्टरांना पाहून लावला......

कपाटातील काही वस्तू अविनाशने ब्युरोमध्ये घेऊन जाण्यासाठी निघाला.....त्याने घर पुन्हा एकदा व्यवस्थित चेक केलं..... आणखी दोन-तीन पुरावे त्याला सापडले.....

ते सगळे पुरावे घेऊन नावकऱ्याने सांगितल्याप्रमाणे अविनाश हायवेच्या रस्त्याला आला.....हायवेवरून ब्युरोपर्यंत जाण्यासाठी एखादी कॅब किंवा कोणाची लिफ्ट मिळते का? हे अविनाश पाहत होता....

बराच वेळ वाट बघून झाल्यावर तो हायवेवरून थोडा चालत पुढे गेला..... कारण मेन हायवेला कोणतीच गाडी थांबणं शक्य नव्हतं......

हायवेवरून जवळजवळ अर्धा तास चालल्यानंतर तो एका बस स्टॉप पर्यंत आला, पण बस नुकतीच गेली आता दोन-तीन तास तरी येणार नाही असं एका वाटसरूंनी त्याला सांगितलं......त्याने त्याच बस स्टॉपवरून एक कॅब बुक केली आणि कॅब यायची वाट बघू लागला.....

_______________________________________


ए.सी.पी सर ब्युरोमध्ये आले, त्यांनी सुहासला विचारलं," सुहासss, काही सापडलं का कस्तुरीच्या घरी सापडलेल्या फोन मध्ये?..."

"नाही सर...! अजून तरी नाही....
ह्या फोन मधील सिमकार्ड काढून नष्ट केलं आहे आणि फोन चा ip address सुद्धा नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.....

आपण हा फोन पुन्हा चालू केला, तर आपलं काम सोप्प होईल.....कारण ह्या फोन मधील मेमरी कार्ड काढायला खुनी विसरला आहे....." सुहास म्हणाला......

"मग माझ्या किंवा तुझ्या फोन मध्ये घालून आपण पाहूच शकतो त्यात काही माहिती मिळते का?...."ए.सी.पी सर म्हणाले......

"सर, मी सगळं ट्राय केलं.... ह्या मेमरी कार्डला पासवर्ड सेट करून ठेवला आहे, म्हणजे हे मेमरी कार्ड दुसऱ्या फोन मध्ये घातलं तर ते पासवर्ड मागतंय.....

त्यात ह्या मेमरी कार्ड ला न्यू टेक्नॉलॉजीची अशी सेटिंग लावण्यात आली आहे की, दुसऱ्या फोन हे मेमरी कार्ड टाकलं आणि त्या फोन मध्ये मेमरी कार्ड पासवर्ड मागेल......

हो पण दुसऱ्या फोन मध्ये एकदा जरी पासवर्ड चुकला तरी त्यातली सगळी माहिती आणि डेटा उडू शकतो......"सुहास म्हणाला.....

"पण ह्या टेक्नॉलॉजीचं अजून लॉंचिंग सुद्धा झालं नाहीये.....

पण सुहास, हा फोन तू चालू करू शकशील?..."ए.सी.पी सरांनी विचारलं......

"हो सर...! मी प्रयत्न करतोय...! पण ह्या मेमरी कार्डला ती टेक्नॉलॉजी लावण्यात आली आहे हे नक्की....!" सुहास म्हणाला.....

"हो सर, हा फोन सुरू करण्यासाठी मी एक सॉफ्टवेअर बनवतो...... त्या सॉफ्टवेअरमुळे फोन जरी व्यवस्थित सुरू झाला नाही तरी आपल्याला त्या फोन मधील थोडीफार माहिती मिळेल....हो पण ते सॉफ्टवेअर बनवायला मला थोडा वेळ लागेल...." सुहास म्हणाला.......

"गुड...! पण प्लिज लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न कर...! तोवर मी ह्या टेक्नॉलॉजीच्या लॉंचिंग विषयी माहिती काढतो...." ए.सी.पी सर सुहासला म्हणाले.....

"पण सर, ही टेक्नॉलॉजी कोणत्या कंपनीची आहे?" सुहासने ए.सी.पी सरांना विचारलं.....

"मी ऑनलाईन सर्च केलं.... \"न्यू फॉर फ्यु\" ह्या कंपनीचे मालक मिस्टर उमेश टिळक त्यांनी ह्या टेक्नोलॉजी चं लॉन्चिंग करण्याचा निर्णय घेतला आहे..." ए.सी.पी सर म्हणाले.....

ए.सी.पी साहेबांनी लगेगच ह्या टेक्नॉलॉजीचं लॉंचिंग करणाऱ्या \"न्यू फॉर फ्यु\" कंपनी च्या मालकांना म्हणजेच मिस्टर उमेश टिळक यांना फोन लावला......

_______________________________________

"अरे, टॅग लाईन तरी नीट बोल....!
\"सेक्युरिटी इज अवर प्रायोरिटी\" अशी टॅग लाईन आहे......
आणि टेक्नॉलॉजी चं नाव आहे \"सायब्योरीटी\"....
चला, चला, रिटेक....!

सायलेन्स अँड अँक्शन....!" मिस्टर उमेश एका व्यक्तीला समजावून सांगत होते.....

"\"सेक्युरिटी इज अवर प्रायोरिटी\" अशी टॅग लाईन आहे......
आणि टेक्नॉलॉजी चं नाव आहे \"सायब्योरीटी\"....

ह्या टेक्नोलॉजी ला एकदा तरी वापरून पहा.... तुमची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही ह्यात सेफ ठेऊ शकता....." सर झालं ना बरोबर?...त्या व्यक्तीने विचारलं.....

"सुपर्ब...! ह्या advertise मुळे आता आपल्या ह्या टेक्नोलॉजी ला चांगलाच प्रतिसाद मिळेल....." मिस्टर उमेश म्हणाले.....

तेवढ्यात मिस्टर उमेश चा फोन वाजला......

"हॅलो...!" मिस्टर उमेश नी फोन उचलला......

"हॅलो, मिस्टर उमेश?..." ए.सी.पी सरांनी विचारलं.....

"हो बोलतोय..! आपण कोण?..."मिस्टर उमेश नी विचारलं.....

"मी ए.सी.पी दिग्विजय देशपांडे बोलतोय, सी.आय.डी मधून...! तुम्ही जरा ब्युरो मध्ये या तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे..." ए.सी.पी सर मिस्टर उमेश ना म्हणाले.....

"ओके सर, पण काही प्रॉब्लेम झालाय का?.." मिस्टर उमेश नी विचारलं......

"हो, तुम्ही ब्युरोमध्ये या मग आपण बोलू...!"ए.सी.पी सर म्हणाले....

"हो सर, मी लगेच पोहोचतो..." असं म्हणून मिस्टर उमेश नी फोन ठेवला.....

_______________________________________


तोपर्यंत इकडे हर्ष आणि अवनी सायलीच्या ऑफिसजवळ आले.....मोठा असा \"एम अँड सी कन्स्ट्रक्शन\" नाव असलेला बोर्ड खाली पडला होता......

दोघेही आत जाणार तोच सेक्युरिटी गार्ड ने त्या दोघांना अडवलं.....
"ओss साहेब, थांबा...! आत कुठं निघालात? ऑफिस तर बंद आहे...!"

"काय? तुमचं ऑफिस चालू दिवशी सुद्धा बंद असतं का?..." हर्षने विचारलं.....

"नाही साहेब, तसं नाही....!दोन-तीन दिवसांपासून ऑफिस बंद आहे.... का ते मला माहिती नाही....!" सेक्युरिटी गार्ड म्हणाला.....


*******************************************

नक्की ही न्यू टेक्नॉलॉजी कोणती असेल?....

सुहास तयार करत असलेल्या सॉफ्टवेअर ने नक्की काही माहिती मिळेल?.....

सायलीची कंपनी का बंद ठेवण्यात आली असेल?....

पाहूया पुढच्या भागात......

क्रमशः

🎭 Series Post

View all