द सायको किलर (भाग-४)

Harsh And Avni Can Find The Address Of Ragini's Husband. But One More Murder Case Come.


द सायको किलर..... भाग 4.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, सी.आय.डी टीम रागिणीच्या खुनाशी संबंधित लोकांचा पत्ता शोधत असतानाच कस्तुरीची केस आली.....त्या चौकशीदरम्यान विमलचा पत्ता मिळाला..... तर हर्ष आणि मनस्वी ला अशोक चा पत्ता मिळाला, ते दोघे अशोकच्या पत्त्यावर गेले...... आता पुढे....)


"तू तुझ्या documents वरचा पत्ता बदलून घे...!तुझ्यामुळे एक दिवस मी अडकणार हे नक्की....!"एक व्यक्ती अशोकला सांगत होती....

"अरे रागिणी ने जेव्हा मला documents वरचा पत्ता बदल सांगितलं, तेव्हा तूच तर म्हणालास ना माझ्या घराचा पत्ता दे म्हणून मग आता काय झालंय?..."अशोक कोणाशीतरी चिडून बोलत होता....

"अरे हो रे बाबा...! पण आता माझ्या घरावर जप्ती यायची वेळ आली आहे..... घराचा हफ्ता बँकेकडे जमा केला नाही तर नक्कीच घर हातातून जाणार....त्यात तुझी कसली ना कसली कुरिअर येत असतात.....तू मला पैसे द्यायला सुद्धा तयार नाहीस मग मी काय करू?..." समोरची व्यक्ती देखी अशोकवर फारच चिडली होती.....

"कसलं कुरिअर? काय रे? तुला काय माहीत नाही का? माझी कुरिअर ची कंपनी मी नवीनच सुरू केली आहे ते....! बरेच कुरिअर येतात ते ठेवण्यासाठी जागा नाहीये म्हणून ते इथे ठेवतो मी...." अशोक आता समोरच्या व्यक्तीवर चिडला होता.....

"कसली कंपनी रे...! तू बऱ्याच कंपन्यांशी टाय-अप केलं आहेस पण ते लोकं तुला कमी मोबदला देतात आणि इथे जे काही कुरिअर ठेवतात तेव्हा तुझ्या सह्या घेतात, हाच का तुमच्यातील विश्वास....! तुला एखाद्या दिवशी कुरिअर पोहोचवायला उशीर झाला तरी कंपनीची लोकं दारात येतात..... एक दिवस तू सुद्धा मार खाशील आणि मला पण मार खायला लावशील....."असं म्हणून ती व्यक्ती तावातावाने बाहेर निघून गेली......

"मिस्टर अशोक घोरपडे तुम्हीच का?"हर्ष दार वाजवून म्हणाला.....

"हो मीच...! सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही.... आपण कोण?..."अशोक म्हणाला......

"मी सी.आय.डी ऑफिसर हर्ष आणि ह्या मनस्वी...."हर्ष म्हणाला.....

"काय झालं सर?... एनी प्रॉब्लेम?...."अशोकने विचारलं.....

"तुमच्या मिसेस रागिणी यांचा खून झालाय...!" हर्ष म्हणाला....

"काय? कधी? हे तर होणारच होतं....!" अशोक म्हणाला.....

"हे होणारच होतं म्हणजे?..." हर्ष ने विचारलं.....

"सर, अहो ती बाई एक नंबर ची चलाख आणि स्वार्थी होती....माझ्याशीच काय तिचं तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा कोणाशी पटत नसेल याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो.....!"अशोक म्हणाला.....

"हे तुम्ही इथून कसं काय सांगू शकता?... तुम्ही सगळं काय ते नीट सांगा...!"हर्षने विचारलं.....

"सर, माझ्यापेक्षा रागिणीला चांगल्या पद्धतीने ओळखणारा माणूस अजून ह्या जगात कोणी असूच शकत नाही. आमच्या लग्नाला पाच-सहा वर्षे झाली. आमच्या दोघांच्याही पसंतीने आमचं लग्न करण्यात आलं. लग्न झाल्या दिवसापासून तिने मला माझ्या घरच्यांना सोडायला लावलं.....

तेव्हा कारण हेच होतं की, आपल्याला प्रायव्हसी मिळेल......माझं रागिणीवर जीवापाड प्रेम होतं.....त्या प्रेमापोटी मी माझं घरदार सोडून इथे मुंबईत आलो......

त्यांनतर आम्हाला एकुलता एक मुलगा झाला विनय, तोही चार वर्षांचा झाला तोवर रागिणीने त्याला माझ्या आई-बाबांकडे सोडलं....त्यांनी पण आधीचं सगळं विसरून विनय ला स्वतःकडे ठेवून घेतलं......

विनय ला माझ्या आई-बाबांकडे सोडण्याचं निमित्त होतं ते म्हणजे, मी आधी नोकरी करायचो, पण नंतर आमची कंपनी बंद पडली आणि माझा जॉब गेला.....आधी सगळं नीट होतं...... पण लग्नानंतर जेव्हा आम्हाला विनय झाला तेव्हा मला रागिणीचा स्वार्थी आणि भांडखोर स्वभाव कळू लागला.....

प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडण उकरून काढायची तिला सवयच झाली होती......जसजसा विनय मोठा होत होता, तसतसे त्याचे हट्ट वाढू लागले पण ते हट्ट मी पुरवू शकत नव्हतो......

त्यामुळे आमच्यातील भांडणं वाढत होती.....आधीच मला दुसरीकडे जॉब मिळत नव्हता, एक जॉब कसाबसा मिळाला पण पगार कमी होता म्हणून रागिणीने तो जॉब मला सोडायला लावला.....

तिचं म्हणणं होतं की मला शोभेल असा जॉब तू करायला हवास...! कारण तिचं प्रमोशन झालं होतं.....मी जास्त कमावते त्यामुळे मी सांगेन तेच ऐकायचं.....

हे असंच कर, ते करू नकोस....
हे केलंस तर माझ्या स्टेटस ला शोभणार नाही..... ते केलंस तर माझं नाव खराब होईल.....

नंतर-नंतर ह्या अश्या सततच्या टॉर्चरिंगमुळे मीच स्वतः घर सोडलं....आणि माझ्या मनातील रागिणी विषयीचं प्रेम कमी होत गेलं.....आता मला तिच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही.....

रागिणी आणि मी आमचं एका गोष्टी बाबतीत एकमत झालं होतं, ते म्हणजे जोपर्यंत विनय मोठा होत नाही तोपर्यंत divorce घ्यायचा नाही.....

मग काय दोन वर्षांपूर्वी मॅडम \"देव कन्स्ट्रक्शन\" च्या सर्वेसर्वा झाल्या......मग रागिणी ने गुलाब सोसायटीत घर घेतलं..... आम्ही दोघेही तिथेच राहायचो.....

पण मी माझ्या मित्राच्या कुरिअर कंपनीत आलेले कुरिअर्स माझ्याकडे घेतो आणि ते सगळे कुरिअर्स मी वेळेत लोकांपर्यंत पोहोचवतो.....त्याचे तो मला पैसे देतो.....हे काम देखील रागिणीला कमी दर्जाचं वाटू लागलं, म्हणून मीच ते घर सोडलं....

मग माझ्या documents वर रागिणीच्या घराचा पत्ता असल्याने पार्सल तिथे जाऊ लागली..... हे सुद्धा तिला खटकलं म्हणून तिने मला माझ्या documents वरचा पत्ता बदलायला लावला....."अशोक ने सर्वकाही सांगितलं.....

"ओके, आम्हांला रागिणीच्या ऑफिसचा पत्ता द्या....आणि हो, जोपर्यंत ही केस solve होत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेच जाऊ शकत नाही...!" हर्ष अशोकला म्हणाला.....

"ओके सर...! हा घ्या रागिणीच्या ऑफिसचा पत्ता...!" अशोकने रागिणीच्या ऑफिसचा पत्ता दिला.....

हर्ष आणि मनस्वी ब्युरोमध्ये आले.....

"सर...! आम्ही अशोकला भेटलो.... त्याच्याकडून असं कळलं की रागिणीच्या ऑफिसमध्ये तिचे बरेच दुष्मन असू शकतात...." हर्ष ए.सी.पी सरांना म्हणाला......

"तिच्या ऑफिसचा पत्ता मिळाला का?"ए.सी.पी सरांनी हर्षला विचारलं.....

"हो, सर...! रागिणी \"देव कन्स्ट्रक्शन\" या कंपनी ची सर्वेसर्वा होती...हा त्या कंपनी चा पत्ता...."मनस्वी ए.सी.पी सरांकडे पत्ता देत म्हणाली.....

"दिग्विजयss, मी आणि तेजसने कस्तुरीची बॉडी व्यवस्थित चेक केली.....कस्तुरीच्या बॉडीमध्ये पण तेच रसायन सापडलं जे रागिणीच्या बॉडी मध्ये होतं....कोणत्या चाकूने वार केला गेला, कशा पद्धतीने केला गेला हे आम्ही लवकरच शोधून काढू......" डॉक्टर निशाद ए.सी.पी सरांना म्हणाले.....

"सुहासss, त्या फोन मध्ये काही मिळालं का?" अविनाशने मागून येणाऱ्या सुहासला विचारलं....

"अजून तरी नाही...! पण माझे प्रयत्न सुरू आहेत...." सुहास म्हणाला.....

"थँक्स निशाद...! आणखी काही सापडलं तर लगेच आम्हाला कळव...!" ए.सी.पी सर डॉक्टर निशाद ना म्हणाले.....

"सुहास तू तुझे प्रयत्न सुरूच ठेव....!लवकरात लवकर आपल्याला गुन्हेगाराला गाठायचं आहे..." ए.सी.पी सर सुहासला म्हणाले.....

तेवढ्यात पुन्हा ब्युरोमधील फोन वाजला....

"हॅलो, सी.आय.डी ब्युरो इन्स्पेक्टर हर्ष हिअर...!" हर्षने फोन उचलला.....

"नमस्कार सर...!, मी शहापूर एरियातून \"मनोहर\" सोसायटीतून सेक्रेटरी केशव काळे बोलतोय....
आमच्या सोसायटीत एक खून झालाय...." समोरील व्यक्ती म्हणाली.....

"आम्ही लगेच तिथे पोहोचतो....!"हर्ष ने पत्ता लिहिला आणि फोन कट केला.....

"सरss, शहापूर एरियात आणखी एक खून झालाय...!"हर्ष ए.सी.पी सरांना म्हणाला.....

"काय? आणखी एक खून?" सतत एकाच एरियातून खून झाल्याचे फोन येऊ लागल्याने सगळेच गोंधळून गेले.....

"रुपेश तू रागिणीच्या ऑफिसला जाऊन चौकशी कर...!
मनस्वी तू कस्तुरीच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी कर...!
अविनाश तू आणि हर्ष \"मनोहर\" सोसायटीत जा...!" ए.सी.पी सर सगळ्यांना म्हणाले....

"ओके सर...!"असं म्हणून दोघेही चौकशीसाठी निघून गेले.......

अविनाश आणि हर्ष, अवनी \"मनोहर\" सोसायटीत आले.....

"या सर..! मीच तुम्हाला फोन केला होता.... मी मिस्टर केशव काळे या सोसायटीचा सेक्रेटरी...!" मिस्टर केशव म्हणाले.....

"खून कुठे झालाय?.." अविनाशने विचारलं.....

"पहिल्या माळ्यावर सर...!" मिस्टर केशव म्हणाले.....

"सरss, हा खून सुद्धा अगदी आधीच्या दोन खुनांसारखाच आहे...." अवनी बॉडी चेक करून म्हणाली.....

"आजूबाजूला काही सापडतंय का ते बघ...!"अविनाश अवनीला म्हणाला.....

"ह्यांचं नाव काय? ह्या इथे एकट्याच राहतात का?.." हर्ष ने मिस्टर केशव ना विचारलं......

"सायली जोशी नाव आहे साहेब ह्या पोरीचं....!
ती तिच्या आई-वडिलांबरोबर इथे राहत होती.... काही दिवसांपूर्वीच तिच्या आई-बाबांचा अपघात झाला आणि ते जागीच दगावले.....

त्यांनतर आता ही एकटीच राहत होती, त्या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, आणि अचानक हे सगळं झालं....."मिस्टर केशव म्हणाले.....

"ह्यांचं कोणाशी भांडण?.." हर्षने विचारलं.....

"नाही सर...! सोसायटीत तरी नाही....
हो साहेब, पण सायलीचा स्वभाव तसा चांगला होता, पण एकदा का ती चिडली की मग काहीही बोलायची..... पण तिच्या मनात कधी कोणाबद्दल राग नव्हता......"मिस्टर केशव म्हणाले.....

"ह्या कुठे नोकरी करायच्या की घरातच असायच्या?.." अविनाशने विचारलं.....

"सर, अहो ती नोकरी करायची.....ती कंपनीची सर्वेसर्वा होती......

ती खूप खुश होती, फक्त हे सगळं तिचं यश बघायला तिचे आई-बाबा नव्हते ह्याचं तिला वाईट वाटत होतं...." मिस्टर केशव म्हणाले......

"कुठे कामाला जायच्या सायली? तुम्हाला काही माहिती आहे का?..." अविनाशनी मिस्टर केशव ना विचारलं......

" तिच्या कंपनी चं नाव.....\"एम अँड सी कन्स्ट्रक्शन\" हा हेच आहे तिच्या कंपनी चं नाव...!" मिस्टर केशव म्हणाले.....

"ओके, थँक्स तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल...! तुम्ही या आता, परत गरज पडली तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ...." अविनाश मिस्टर केशव ना म्हणाला.....

"सर...! आतमध्ये आणखी काहीच पुरावा नाहीये...." अवनी अविनाशला म्हणाली......

"ओके, आपण आता निघुयात...!
हर्ष तू आणि अवनी जाऊन सायलीच्या ऑफिसमध्ये चौकशी करा...!" अविनाश ने हर्ष आणि अवनीला चौकशीसाठी पाठवलं......

"सरss, सायलीचा देखील खून अगदी त्याच पद्धतीने झाला आहे, ज्या प्रकारे रागिणी आणि कस्तुरीचा झाला आहे....!" अविनाशने ब्युरोमध्ये येऊन सगळी माहिती ए.सी.पी सरांना दिली.....

तोवर रुपेश रागिणीच्या ऑफिस मध्ये आला....

*******************************************

सुहासला त्या तुटक्या फोन मधून काही सापडेल?...

रागिणी, कस्तुरी आणि सायली ह्या तिघींचा खुनी एकच असेल की तीन वेगवेगळे असतील?....

रुपेशला रागिणीच्या ऑफिसमध्ये काही माहिती मिळेल?...

पाहुयात पुढच्या भागात.....

क्रमशः

🎭 Series Post

View all