द सायको किलर (भाग-२)

Avinash Can Try To Solve The Case Of Ragini's Murder.


द सायको किलर..... भाग 2.


©साक्षी माजगांवकर.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, अविनाश आणि त्याच्या टीम ला त्या घरात एक गन, रक्ताचं सॅम्पल, आणि एक काळ्या रंगाची बॅग सापडली......ती बॅग पाहून सावंत काकू अचंबित झाल्या..... आता पुढे....)


"तुम्हाला माहिती आहे, ही बॅग कोणाची आहे ते?" अविनाशने सावंत काकूंना विचारलं.....

"होss..! म्हणजे ही बॅग विमलची आहे....शांताबाईंनी दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे ठेवली होती.....
पण मी तर दोन दिवस घरीच नव्हते मग ही बॅग इथे कशी आली ते मलाही नाही माहिती...!"सावंत काकू म्हणाल्या......

"ह्या बॅगेत काय आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती होतं का?"हर्ष ने सावंत काकूंना विचारलं.....

"साहेब अहो, एका कामवालीच्या बॅगेत काय असणार? काही कपडे आहेत असं मला शांताबाईंनी सांगितलं मी ठेवले.... आपण कशाला लोकाच्या बॅगेला हात लावायचा....!" सावंत काकू म्हणाल्या.....

"ओके...!पण मग ही बॅग इथे कशी आली?..."अविनाशने सावंत काकूंना विचारलं.....

"मलाच आश्चर्य वाटतंय...!" सावंत काकू म्हणाल्या.....

"ते आम्ही शोधून काढू...!
रुपेश तू हे सगळे एव्हीडेन्स घेऊन फॉरेन्सिक लॅब मध्ये जा...!" अविनाश ने रुपेशला सांगितलं....

"ह्या सी.सी.टी.व्ही. च्या फुटेज वरून कळेलच ही बॅग इथे कशी आली ते...!
मिस्टर विराज या सी.सी.टी.व्ही चं फुटेज मागवून घ्या..." अविनाश नी मिस्टर विराज ना सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचं फुटेज मागवायला सांगितलं.....

"सर ते..." मिस्टर विराज ना त त प प होऊ लागलं होतं.....

"काय ते? मागवताय ना?" अविनाश नी विचारलं.....

"सर ते.... ह्या विंगचे सगळे सी.सी.टी.व्ही गेल्या आठवड्यापासून बंद आहेत...." मिस्टर विराज पटकन बोलले.....

"काय?...मग तुम्ही अजून दुरुस्त का नाही केलेत?..."अविनाश थोडा चिडून म्हणाला....

"सर, आम्ही ज्याच्याकडून हे सगळं काम करून घेतो त्याचे वडील वारले म्हणून तो गावाला गेला आहे...!उद्या येणारच आहे तो...!"मिस्टर विराज म्हणाले....

"अहो हे काय कारण झालं का? दुसऱ्या कोणालातरी बोलावून करून घ्यायचं ना...!"अविनाश आता फारच चिडला होता......

"सरss..! actually आमच्या सोसायटीत दर वर्षी सी.सी.टी.व्ही च्या कामासाठी एका इंजिनिअर चं सिलेक्शन होतं..... आणि पूर्ण वर्षभर सी.सी.टी.व्ही चं काम तोच इंजिनिअर पाहतो..... तसं आम्ही contract साइन करतो...." मिस्टर रामचंद्र म्हणाले....

"अरे पण तुम्ही हे सगळे कॅमेरे सेक्युरिटी च्या दृष्टीने लावले आहेत ना? मग? अश्या परिस्थितीत दुसऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्यायचं...!" अविनाश ला एवढ्या नावाजलेल्या सोसायटीतील शिक्षित लोकांचं हे वागणं बघून हसावं की रडावं हेच कळत नव्हतं.....

"सरss खरं सांगायचं झालं तर आमच्या इथे जिन्यावरून कोणीही चढ-उतर करत नाही, त्यासाठी सगळेच लिफ्ट वापरतात, म्हणून आम्ही विचार केला अजून एक दिवस कॅमेऱ्याचं काम राहीलं तर काही बिघडणार नाही.....

पण आज नेमकी सोसायटीची लिफ्ट बंद पडली....!"मिस्टर विराज म्हणाले.....

"ती तरी आज दुरुस्त होईल का?" अविनाश ने मिस्टर विराज ना विचारलं.....

"हो सर...! काम सुरू झालं आहे...!"मिस्टर विराज म्हणाले.....

"गुड...! ह्या शांताबाईंचा पत्ता तुम्ही आम्हाला द्या आम्ही बघतो काय करायचं ते.... पण जोपर्यंत ही केस पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या परवानगी शिवाय कोणीही शहर सोडून जाणार नाही....या तुम्ही आता..." अविनाश म्हणाला.....

"ओके सर...!" असं म्हणून सगळे निघून गेले....

"मयूर ह्या शांताबाईंचा आम्हाला पत्ता दे...!" अविनाशने मयूर ला पत्ता द्यायला सांगितला....

"मला त्यांचं घर माहिती आहे, मी येतो तुमच्याबरोबर...! म्हणजे चालेल ना?" मयूरने अविनाशला विचारलं....

"हो चालेल...!" अविनाश म्हणाला....

"सर, सोसायटीतील एकाच विंगचे कॅमेरे असे बंद पडणं मला काही पटलं नाही....!" हर्ष अविनाशला म्हणाला.....

"हो मला पण...! आपण त्याचा देखील शोध घेऊ, पण आधी शांताबाईंना भेटुयात...."अविनाश म्हणाला......

"सर,पण मला एक कळत नाही, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा खराब झाला हे कळून सुद्धा सोसायटीतील लोक contract sign केलं म्हणून थांबून कशे राहू शकतात?...." हर्षने अविनाशला विचारलं.....

तेवढ्यात अविनाशचा फोन वाजला....फॉरेन्सिक लॅब मधून डॉक्टर निशाद यांचा फोन होता.....

डॉक्टर निशाद देशमुख आणि डॉक्टर तेजस पटवर्धन हे सी.आय.डी टीम चे फॉरेन्सिक डॉक्टर होते...... अत्यंत हुशार आणि कर्तबगार असे दोघे प्रत्येक केस सोडवतांना सगळ्या टीमचं काम सोपं करायचे....

"हॅलो अविनाश, तू पाठवलेले एव्हीडेन्स आणि बॉडी मी व्यवस्थित चेक केली..... तू लवकरात लवकर फॉरेन्सिक लॅब मध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचंय....!" एवढं बोलून डॉक्टर निशाद नी फोन कट केला.....

"हर्षss, तू मयूरबरोबर जाऊन शांताबाईंना भेट....
अवनी तुला लागलं आहे तू सुद्धा माझ्याबरोबर फॉरेन्सिक लॅब मध्ये चल, डॉक्टर निशाद ना काहीतरी सांगायचंय.....!"अविनाश म्हणाला.....

"ओके सर...!" असं म्हणून हर्ष मयूरबरोबर निघाला.....

अविनाश आणि अवनी फॉरेन्सिक लॅब मध्ये पोहोचले..... ए.सी.पी दिग्विजय देशपांडे सुद्धा तिथेच होते.....

सगळ्यांपेक्षा सिनिअर असूनही सगळ्यांबरोबर मित्राप्रमाणे वागणारे.....सर्व टीम मेंबर्स हे आपले कुटुंब आहे असे मानणारे.....

डॉक्टर निशाद आणि डॉक्टर तेजस ह्या दोघांचे जिगरी दोस्त....कुटुंबातील व्यक्तींची जशी काळजी करावी तशीच सगळ्यांची काळजी करणारे.....

आणि महत्वाचं म्हणजे फक्त कामाला प्रयोरिटी देणारे..... ब्युरोमध्ये सगळ्यांचा जीव असणारे असे ए.सी.पी दिग्विजय देशपांडे.....

"अवनी तुझ्या हाताला काय लागलं?" अवनीच्या हाताला केलेलं बँडेज पाहून ए.सी.पी सरांनी काळजीने विचारलं......

" जास्त काही नाही सर....!फक्त गोळी हाताला स्पर्श करून गेली...."अवनी म्हणाली.....

"काय? अशी कशी लागली गोळी?......"ए.सी.पी सरांनी विचारलं.......

अविनाशने सगळा घडलेला प्रकार ए.सी.पी सरांना सांगितला.....त्यावर ए.सी.पी सरांना एवढं नक्कीच कळून चुकलं की काहीही होऊदेत आपली टीम गुन्हेगाराला शिक्षा केल्याशिवाय गप्प बसणार नाही.....

"आय अम सॉरी...! आम्हाला यायला जरा उशीर झाला..."डॉक्टर निशाद आणि डॉक्टर तेजस एकत्र येत असताना डॉक्टर निशाद म्हणाले....

"इट्स ओके...! बोला आम्हाला एवढ्या तातडीने का बोलावलं?" ए.सी.पी सर म्हणाले.....

"या सांगतो...!"डॉक्टर निशाद म्हणाले.....

सगळेजण डॉक्टर निशाद बरोबर रागिणीच्या बॉडीजवळ आले......

"रागिणीचा मृत्यू हा दोन ते तीन दिवस आधी झाला आहे.... फॉरेन्सिक रिपोर्ट्स नुसार रागिणीच्या शरीरावर असलेले घाव हे तिच्या मृत्यू नंतर करण्यात आले आहेत....."डॉक्टर निशाद म्हणाले.....

"व्हॉट? मग रागिणीचा मृत्यू कसा झाला? निशाद नीट काय ते सांग...!" ए.सी.पी सरांनी सांगितलं.....

"सांगतो...!
रागिणीच्या शरीरात आम्हाला एक रसायन सापडलं आहे.....ते रसायन शरीरात गेल्यावर खूप स्लो इफेक्ट करतं.....साधारणतः तीन-चार दिवसांनी.....

त्या रसायनाचा जेव्हा प्रभाव सुरू होतो, तेव्हा पोटात आग पडल्यासारखं वाटतं......अशावेळी माणूस पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी पाणी, ताक किंवा थंड दूध पितो......

कारण नॉर्मली माणसाला जर accidty झाली तर पोटात आग पडते..... पण एखाद्याच्या पोटात जर हे रसायन गेलं असेल तर त्यावर पाणी, दूध किंवा ताक पिलं तर मात्र त्याचा प्रभाव अतिशय वेगाने होऊ लागतो.....

शरीरातील उष्णता अचानक वाढते, पोटातील आतड्यांतून रक्तस्त्राव होतो, आणि अखेर माणसाचा मृत्यू होतो..... परंतु हे सगळं इतकं वेगाने घडतं की माणसाला स्वतःला वाचवण्यासाठी काही सेकंदाचाही अवधी मिळत नाही.....

हे बघा रागिणीच्या पोटातील जवळजवळ सर्व पेशी आणि आतडी जळून काळी पडली आहेत...."डॉक्टर निशाद नी एक छोटा कॅमेरा रागिणीच्या बॉडी मध्ये सोडला आणि सगळ्यांना आतून पोटाची झालेली स्तिथी दाखवली.....

"बापरे...! सर, बाहेरून तर वाटतंच नाहीये की आतमध्ये एवढं काही झालं असेल....!"अवनी म्हणाली.......

"तीच तर या रसायनाची खासियत आहे...!"डॉक्टर तेजस म्हणाले.....

"हे ज्या कोणत्या व्यक्तीने केलंय त्याला नक्कीच रागिणीबद्दल ची सगळी माहिती असणार.....!"अविनाश म्हणाला.....

"निशाद त्या गन आणि ब्लड सॅम्पल चं काय झालं?" ए.सी.पी सरांनी डॉक्टर निशाद ला विचारलं......

"त्या गन मधून एकूण दोन गोळ्या चालल्या आहेत....एक अवनीला लागली आणि दुसरी एका दुसऱ्याच व्यक्तीला.....! कारण तुम्हाला जे ब्लड सॅम्पल तिथे मिळालं आहे त्याचा DNA आणि रागिणीचा DNA वेगळा आहे....!

आणि ह्या काळ्या बॅगेवर कोणाचेही फिंगरप्रिंट्स नाहीयेत....." डॉक्टर निशाद म्हणाले......

"ठीक आहे, त्याचा शोध आम्ही घेऊ...! थँक्स निशाद..! थँक्स तेजस...!"ए.सी.पी सरांनी डॉक्टर निशाद आणि तेजसला धन्यवाद दिले आणि सगळेच ब्युरोमध्ये आले......

"सर, ते ब्लड सॅम्पल नक्कीच खुनी चं असेल...!" अवनी ब्युरोमध्ये आल्यावर म्हणाली.....

"नाही अवनी...! हा खुनी एवढा वेंधळा नक्कीच नाहीये.....! तो हे सगळं पडद्यामागे राहून करतोय...." ए.सी.पी सर म्हणाले.....

"हो सर...! हा जो कोणी आहे तो नक्कीच खूप शातीर आहे....त्याची प्रत्येक चाल विचार करून करण्यात आली आहे..... म्हणजे मला वाटतं विमल सुद्धा यात सामील असावी....."रुपेश म्हणाला.....

"हो...! सध्या तरी सगळा संशय हा विमलवरच आहे..... पण जोपर्यंत विमल सापडत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही...." ए.सी.पी सर म्हणाले......

"सरss...! हर्ष ने मला फोन करून शहापूर एरियातील आसपासच्या कोणत्या दवाखान्यात शरीरातील गोळी काढण्यासाठी कोणी व्यक्ती गेली आहे का? ते शोधण्यास सांगितलं होतं, पण शहापूर एरियातील कुठल्याच दवाखान्यात अशी व्यक्ती गेली नाहीये....!" मनस्वी ए.सी.पी सरांना म्हणाली.....

"मला वाटलंच होतं....!सर, आपल्याला ह्या खुनी ला शोधून काढण्यासाठी फार मेहेनत घ्यावी लागणार आहे....!"अविनाश म्हणाला......

_______________________________________

हर्ष आणि मयूर शांताबाईंच्या \"नवयोगिनी\" चाळीत आले.....ते दोघेही शांताबाईंच्या खोलीजवळ गेले, तर घराला कुलूप होतं......

"शांता मावशी तर ह्यावेळी घरीच असतात....!"मयूर दारावरचं कुलूप बघून म्हणाला......

"गेल्या असतील इथेच कुठेतरी, येतील आपण थोडावेळ वाट बघुयात....!"हर्ष मयूर ला म्हणाला.....

बराच वेळ वाट बघून झाल्यावर हर्ष ने मयूर ला विचारलं,"आपण आजूबाजूला विचारुयात का?"

"हो....शांता मावशी एवढा वेळ कधीच बाहेर जात नाहीत....!" मयूर म्हणाला.....

"सुमन मावशी...! शांता मावशीला पाहिलंत का कुठे? म्हणजे आम्ही बराच वेळ इथे वाट बघत आहोत म्हणून विचारलं..." मयूर ने शांता मावशींच्या शेजारी विचारलं.....

"नाही रे, मी नाही बघितलं....!
ती बघ आली तुझी शांता मावशी...!" समोरून येणाऱ्या शांता मावशीकडे बोट दाखवत सुमन म्हणाली आणि आत निघून गेली.....

तसा हर्ष पुढे आला....
मयूरबरोबर अनोळखी माणसाला पाहून शांता मावशी सैरभैर झाल्या आणि विरुद्ध दिशेने पळू लागल्या.....
"शांता मावशीss...!" मयूर ने शांता मावशींना हाक मारली.....

"ह्या आपल्याला बघून अश्या लांब का पळतायत? ह्यांना गाठायला हवं...!" हर्ष म्हणाला......


*******************************************


रागिणीच्या घरात सापडलेलं ब्लड सॅम्पल नक्की कोणाचं असेल?

मयूर आणि हर्ष ला बघून शांताबाई का पळाल्या असतील?

रागिणीच्या खुनात शांताबाईंचा तर हात नसेल?

पाहुयात पुढच्या भागात......

क्रमशः

🎭 Series Post

View all