Mar 01, 2024
वैचारिक

रोपटं

Read Later
रोपटं

 वीणा अभिनंदन गं.. आवडला एकदाचा मुलगा तुला असं तिची ताई वीणाला चिडवत होती. किती मुलांना नकार दिलास शेवटी राहुलला पसंद केलास. छान आहे मुलगा तुला सुखात ठेवेल. दोघी बहिणींचा विषय सुरू होता.

वीणा: ताई सगळं ठीक आहे पण भीती वाटते गं.. नाही म्हटलं तरी आपल्यात आणि त्यांच्यात खूप तफावत आहे. राहुल जरी परदेशात असला तरी घर त्याचं गावाकडे आहे. चाली रीती वगैरे खूप फरक पडेल गं, आणि आपण मुंबई मध्ये राहिलेलो जमेल का मला adjust करायला? काही दिवस आनंदाने करतो आपण, पण बंधन आल तर त्याच गोष्टींचं ओझं नको वाटायला...

कीर्ती: बरोबर आहे तुझं, पण होईल अगं सगळं manage, राहुल घेईल समजून.

वीणा खुश होती पण टेन्शन पण होतं. शेवटी राहुल आणि विणाच लग्नं झालं.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राहुलला बोलताना तिने एकले, तो त्याच्या घरच्यांना सांगत होता. तुम्ही लगेच सगळ्या अपेक्षा करू नका, ती ज्या वातावरणात वाढलेली आहे ते आणि आपलं वातावरण खूप फरक आहे, आपण कसं एखाद रोपटं एका ठिकाण हून दुसऱ्या ठिकाणी लावतो तेव्हा त्या रोपट्याला खत पाणी देऊन रुजू द्यावं लागत तेव्हा ते नवीन जागेत वाढतं. तसच लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीच असतं.

विणाला हे ऐकून खूप बरं वाटलं. मनोमन खात्री पटली की आपली निवड चुकली नाही.

लग्ना नंतर काही दिवसातच वीणा राहुल सोबत परदेशात गेली. त्याच्या प्रेमळ आणि मोकळ्या स्वभावामुळे तिला परदेशात adjust करायला सोपे गेले.

सुट्टीत दोघे ही घरी येत, हसून खेळून राहत, घरचे पण चांगले वागायचे. काही वर्षांनी त्यांना जुळी मुलं झालीत. आता राहुल आणि विणाचा वेळ मुलानं मध्ये जात होता. बघता बघता मुलं 7 वर्षांची झालीत. सगळं कसं छान चालू होतं.

इतर जोडप्यां सारखे अधून मधून दोघे भांडायचे सुद्धा, पण प्रेम मात्र खूप होत त्यांच एक-मेकांवर.

पण म्हणतातना काही लोकांना सुखं बघवत नाही. तसच काहीस झालं वीणा आणि राहुलचं.

राहुलला भारतातच चांगली नोकरी मिळाली आणि ते दोघे पुण्यात राहायला आलेत. आणि तिथूनच त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली.

राहुलच्या वहिनीला त्यांचा सुखी संसार बघवला नाही, आणि तिने वीणा आणि राहुल मध्ये भांडणं लावायला सुरुवात केली, राहुलच्या मनात वीणा बद्दल विष पेरायला तिला वेळ लागला नाही कारण राहुल त्याच्या वहिनीला खूप मनात होता, कारण त्याच्या बाबांची तिने खूप सेवा केली होती, म्हणून वहिनी सांगेल ती पूर्व दिशा असा तो वागायचा. आणि ह्याच गोष्टीचा फायदा राहुलच्या वहिनीने म्हणजे सुधाने घेतला.

वीणाला सगळं समजत होतं, तिने राहुलला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. उलट वीणाच चुकीची आहे असं राहुलला वाटू लागलं.

शेवटी गोष्टी खूप टोकाला गेल्या, राहुल आणि वीणा ने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

तरी वीणाला वाटत होतं की जे होतंय ते चुकीचं आहे. तिला राहुलचे लग्ना नंतर चे शब्द आठवत होते, वीणा ने एकदा शेवटचं राहुलशी बोलायचं निर्णय घेतला, तिने त्याला त्याच्या शब्दांची आठवण करून दिली ... “ आपण कस एखाद रोपट एका ठिकाण हून दुसऱ्या ठिकाणी लावतो तेव्हा त्या रोपट्याला खत पाणी देऊन रुजू द्यावं लागत तेव्हा ते नवीन जागेत वाढतं. तसाच लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीच असतं.”

राहुलला पण त्याचे हे शब्द आठवत होते. वीणा मात्र बोलत होती, त्याला सांगत होती की, राहील तू इतका समजदार मुलगा आहेत तरी कोणाच्या बोलण्यात कसा काय फसू शकतोस? इतकच का ओळखलस तू मला लग्ना पासून. तुला माहित आहे की मी कशी आहे, मला मान्य आहे की मी कामात जरा slow आहे, पण मी कधी कोणत्या कामाला नकार दिला का?

राहुल रोपट रुजवलं की झालं असं नसतं, त्याचा मोठं झाड बनवायचं असेल तर त्याची काळजी घ्यावी लागते आयुष्यभर तेव्हा ते जगत नाहीतर डेरेदार हिरवा झाड पण जाळून जातं. हे माहीत नाही का तुला? नात्यांच पण असच असत, त्यांला आयुष्यभर जपावं लागतं, प्रेम द्यावं लागतं, विश्वास ठेवावा लागतो तेव्हा ते टिकतं, नाहीतर आपल्या नात्यासारख तुटून जातं.

आता तू विचार कर की खरंच तुला माझ्या बद्दल जे काही सांगितले गेले आहे , तशीच आहे का मी? की नाही?

आपल्या नात्याच्या रोपट्याला वृक्ष बनवायचं की ते रोपट जळू द्यायच ?

वीणाच्या बोलण्याचा राहुलवर काही परिणाम झाला नाही. वीणा मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. त्यानंतर काही महिने असेच गेले, कोर्टात अर्ज , कौन्सिलींग, सुनावणी सगळ्या प्रोसेस मध्ये जवळपास २ वर्ष गेलीत. त्या २ वर्षात राहुलच्या जीवनात बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याच्या वहिनीच्या वागण्यातून तिचं खरं रूप समोर येत होतं, त्याला विणानी सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या, पण तरी त्याचं मन ते मान्य करायला तयार होत नव्हतं.

पण ईश्वराला वीणा आणि राहुलचा संसार मोडण मान्य नव्हते. कोर्टाच्या शेवटच्या तारखेच्या १ आठवडा आधी वीणा आणि मुलांचा accident झाला, मुलं सुखरूप होती थोडा मार लागला होता इतकचं, पण वीणा मात्र ICU मध्ये होती, राहुलला, समजताच तो त्यांना बघायला हॉस्पीटलला गेला. मुलांना बघून खूप रडला, वीणाला पण बघितलं, तिला अशा अवस्थेत बघून त्याला रडू आवरत नव्हते, नाही म्हटलं तरी अजून पण त्याचं तिच्यावर प्रेम होतं . तसाच तो घरी परत आला, दादा -वहिनीला इतवृत्तंता दिला आणि त्याच्या रूम मध्ये निघून गेला.

रात्री उशिरा त्याची वहिनी कोणाशितरी बोलत होती, राहुल पाणी प्यायाला म्हणून उठला होता, वहिनीला माहीत नव्हते की राहुल जागा झाला आहे. राहूल किचन मध्ये जाताना त्याच्या कानावर वहिनीच्या आवाज आला ती हॉलच्या गॅलरी मध्ये उभिराहून बोलत होती. राहुल तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि आता तिचे बोलणें त्याला स्पष्ट एकुयेत होते. तिचा तो संवाद एकूण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती बोलत होती...

माझा नशीबच खराब, वीणाचा आणि मुलांचा accident झाला हे एकूण मला आनंद झाला होता, वाटलं होतं बर होईल सगळे मरतील तर, पण तस काही झालं नाही, मुलं तर सुखरूप आहेत, फक्त तिलाच जास्त लागलं. सगळेच संपले असते तर, divorce च्या वेळी राहुलला काहीच द्यायची गरज पडली नसती, देणार कोणाला कोणी जिवंत नसतं तर.. आणि मग त्याचा सगळं पैसा माझ्या मुलांना मिळाला असता आयुष्यभर. ज्यासाठी मी हे सगळं केलं ते साध्य झालं असत. असो पण तरी पैसा मिळेल माझ्या मुलांना फक्त जरा कमी मिळेल.

तिचे हे शब्द राहुलच्या कानात घुमत होते, त्याला च्याची चूक लक्षात आली होती. सकाळीच राहुल हॉस्पिटलला गेला, वीणा शुध्दीवर आली होती, तिचा हात पकडुन त्यांनी तिची माफी मागितली.. डोळ्यातून अश्रू धरा वाहत होत्या, मनातलं मळभ दूर झालं होत.

वाहिनीशी सगळे नाते तोडून त्यांनी परत नव्यानी सुरुवात केली, संसारा च्या रोट्याला परत खत पाणी मिळत होतं, प्रेमाच्या सावलीत ते बहरत होत.

घडलेल्या प्रकारातून राहुलला मोठा धडा मिळाला होता, त्यांनी वीणाला ती आहे तशी स्वीकारलं होतं, कोणावरही आंधळा विश्वास ठेवणार नाही असं ठरवलं.

 

मित्रांनो, राहुल नशीबवान होता त्याला दुसरा चान्स मिळाला, सगळ्यांना असा मिळेलच असं नाही. म्हणून कोणताही निर्णय घेताना परत परत विचार करून घेतला पाहिजे. कोणावरहि डोळे झाकून विश्वास न ठेवता, गोष्टीची शहानिशा केली पाहिजे.

 

 

धन्यवाद...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//