Feb 26, 2024
प्रेम

द परफ्युम फॅक्टरी (भाग ४)

Read Later
द परफ्युम फॅक्टरी (भाग ४)

द परफ्युम फॅक्टरी  (भाग ४)

सुधाच्या पुण्याला जाऊन नोकरी करण्याच्या निर्णयामुळे प्रसाद थोडा गडबडून गेला होता. त्याला कल्पना होतीच सुधा च्या स्वप्नांची. पण तिच्यावरच्या प्रेमामुळे त्याला वाटत होते तिने जाऊ नये. पण इथे गावात राहून तिची स्वप्न नाही पूर्ण होऊ शकत हे हि माहित होते त्याला. ण मळा दाखवायचा राहिला होता आणि  मनातील भावनाही सांगायच्या राहिल्या होत्या. असा विचार करत प्रसाद सुधाच्या आठवणींमध्ये हरवून गेला होता. मागची चार वर्षं त्याच्या डोळ्यासमोरून जात होती.

तिथून पुढे....                                            

मागच्या वर्षापासून  सुधाचे राहणीमान बरेच बदलले होते. आणि तिचं येणंही कमी झालं होतं. सुधा आता शहरातील मुलींप्रमाणे मॉडर्न राहू लागली होती. तिच्या बोलण्यात पण आता नवनवीन फॅशन्स इ  येत असे. सुधाला आधुनिक राहणीमान आवडते, स्मार्ट राहिलेले आवडते असे पाहून प्रसादही आता छान राहू लागला होता. तो नेहमी ठरवत असे कि यावेळी सुधा येईल तेव्हा असंच छान कपडे तयार व्हायचे. तिला थोडे इम्प्रेस करायचे. तसा दिसायलाही स्मार्टच होता तो. उंचापुरा, पिळदार शरीर. अंगमेहनतीची कामं केल्यामुळे एकदम फिट होता. उन्हात कामं केल्यामुळे रंग थोडा रोपाला होता. यावेळी सुधा येईल तेंव्हा मस्त फ्रेश दिसायचे असं ठरवायचं. पण सुधा तर नेहमी हा शेतात काम करत असताना यायची अन गडबडीत निघूनही जायची. आली कि मात्र नेहमी म्हणायची " तुइया शेतात आलं कि खूप फ्रेश वाटत! काहीतरी जादूच आहे इथे. हा मातीच्या  वासाने का रे?"

" असेल अगं." घामेजलेला  चेहरा धुवत प्रसाद म्हणाला.

"अरे पुढच्या वर्षी फायनल इयर. कॅम्पस रिक्रुटमेन्ट साठी कंपन्या येणार. माझे सिलेक्टिव होईल का रे? काय निकष असतात त्यांचे? फर्स्ट क्लास तर आहे मला, पण इंग्लिश स्पिकिंग मध्ये थोडा मार खाते. काय करू?"

"टेन्शन कशाला? सिम्पल आहे. बघ आपण रोज बोलत नाही म्हणून आपण फ्लुएंटली बोलू शकत नाही इतकंच. पण अभ्यास तर इंग्लिश मधेच असतो ना? पेपर पण इंग्लिश मधेच लिहिते ना? मग?"

"अरे पण टेकनिकल इंग्लिश वेगळे आणि बोलायचे वेगळे!"

" मग एक काम कर आता. आजपासून रोज इंग्लिश मध्ये बोलत जा. आपोआपच प्रॅक्टिस होईल तुझी. आणि रोज इंग्लिश पेपर वाचायचा. त्यातले शब्द नाही कळले कि डिक्शनरीबघायची"

"ग्रेट! असेच कारेन मी आता. थँक यू सो मच प्रसाद. तू नेहमीच मला अमेझिंग आयडिया देतोस. निघते मी आता. उद्या सकाळी लवकर निघायचे आहे."

याहीवेळी प्रसादने ठरवले तसे काहीच झाले नाही. ती आली तेंव्हा तो घामाने ओलाचिंब झालेला, त्यामुळे स्मार्ट कपडे घालून तिला इंप्रेस करायचे राहूनच गेले. आणि बहरलेला फुलांचा मळा पण दाखवायचा राहिला. ह्यावेळी तर सहा महिन्यांनी आली होती. तशी गावाकडे यरुन गेली होती दोन वेळा पण प्रसादशी भेट नाही झाली. चुकामुक झाली दोघांची. आणि तिच्या ओरल एक्साम्स असल्यामुळे लवकर गेली होती ती.

" अरे खूप छान फरक पडला माझ्या इंग्लिश मध्ये. युअर ट्रिक्स ऑल्वे वर्क्स! सर्व टीचर्स पण म्हणत होते. ह्यावेळी कॉलेज च्या  कार्यक्रमाचे अँकरिंग हि मीच केले! खूप भारी झाले."

"छान" एवढेच बोलला प्रसाद. खरंतर त्याचे लक्ष तिच्या बोलण्याकडे न्हवतेच. तो स्वतःचे कपडे नीट करण्यात आणि मळलेले हात पाय आणि चेहरा साफ करण्यात गुंतला होता.

"पुढच्या महिन्यात एक मोठी कंपनी येतेय. ऍपटीटुड टेस्ट, टेकनिकल राऊंड, आणि पर्सनल इंटरव्ह्यू असे राऊंड्स आहेत.

"ऍपटीटुड साठी इंटरनेट वर खूप  सारे प्रॅक्टिस साठी प्रश्न मिळतील तुला. सर्च करून बघ. आणि पर्सनल इंटरव्यूव तर तुझ्यातला आत्मविशास बघतील. बाकी टेक्निकल राऊंड ची मात्र नीट तयारी कर." असं प्रसाद म्हणाला खरा. पण त्याला तरअजून बरेच बोलायचे होते तिच्याशी. आणि मळा पण दाखवायचा होता.

"ऑल राईट माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. युअर टिप्स ऑलवेज वर्क्स गुड फॉर मी! पण चल आता निघते मी उशीर झाला आहे." असे म्हणून ती निघाली पण.

यावेळीही नाही बोलला तो." सांगू शकेन मी तिला माझ्या मनातले ?" असे मनाशीच बोलत प्रसाद विचार करू लागला.  आणि  त्याने पक्के ठरवले कि तिची फायनल एक्साम झाली कि बोलून टाकायचे.

पण आज मात्र त्याला काहीच सुचत न्हवते. परीक्षेच्या आधीच तिचे सिलेक्टिव झाले होते. आणि ती त्याच्यापासून लांब चालली होती.

"अरे प्रसाद येतोस ना जेवायला, किती वेळ हाक मारत आहे? लक्ष कुठंय तुझं ?" आत्याच्या आवाजाने प्रसाद भानावर आला. लॅपटॉपवरील सुधाचा फोटो दिसू नये म्हणून पटकन बंद करत म्हणाला, " आलो गं, येतो लगेच." तोपर्यंत आत्या टेबल पाशी यऊन उभी राहिलीच होती.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//