द परफ्युम फॅक्टरी (भाग 3)

प्रसाद सुधाला तिच्या आईवडिलांची बाजू नीट समजावून सांगतो. सुधाला पण पटते सर्व. निघता निघता सुध??

द परफ्युम फॅक्टरी  (भाग 3)

प्रसाद सुधाला तिच्या आईवडिलांची बाजू नीट समजावून सांगतो. सुधाला पण पटते सर्व. निघता  निघता सुधा  प्रदसला तिथे असलेल्या विशिष्ठ वासा विषयी विचारते. पण प्रसाद पुढे निघून आलेला असतो.

तिथून पुढे………

सकाळपासून शेतात काम केल्यामुळे प्रसाद ला थोडा घाम आला होता या कपडेही खराब झाले होते.  डोक्यात खूप सारे विचार चालू असतात त्याच्या. जणू वादळच. त्यामुळे आता तिचे बोलणे तो काही नीटसे ऐकत नाही. त्यामुळे तो पुढे झटपट चालू लागतो. " आजपण अशी अचानक आली, काय माझा अवतार!  नेहमी ठरवतो असे कि सुधा येईल तेव्हा कसे फ्रेश आणि स्मार्ट दिसले पाहिजे. पण नेहमी मी शेतात काम करत असतानाच येते हि मुलगी. मी नेमका मातीत माखलेला आणि घामात डबडबलेला!"

"तिला स्मार्ट आणि नीटनेटके राहणीमान आवडते. जशी शहरातली मुलं राहतात. तिला इथे गावात नाही आवडत. तिला शहरात जायचे आहे. तिथेच स्थायिक व्हायचे आहे. चांगल्या कंपनीमध्ये काम करायचे आहे. खूप स्वप्न आहेत तिची. आणि तिच्यात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, हुशारी आहेच की!"

मी काय हा असा शेतकरी. मी नाही तिच्या स्वप्नामध्ये बसत! मी नाही देऊ शकत तिला हवे तसे आयुष्य."

खरतर आबांना सांगितले तर घालतील मागणी तिला अन तिचे बाबाही नाही म्हणायचे नाहीत.मलाही मानतात ते खूप. पण सुधा? तिच्या स्वप्नांचे काय? खुश राहील ती माझ्यासोबत? नाही नक्कीच नाही. त्यापेक्षा नकोच तो विषय" अशा अनेक विचारांनी काहूर माजले होते त्याच्या मनात. 

इकडे आबासाहेब फोनाफोनी करून कंपनी विषयी माहिती काढतात. " कंपनी तर चांगलीच आहे, देशमुख सर. दरवर्षी कॅम्पस रिक्रुटमेंट साठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाते. आणि युवा इंजिनिर्स ना संधी उपलब्ध करून देते. आपल्या बॅंकेशे मॅनेजर नाही का केशवराव त्यांचा मुलगाही आहे त्याच कंपनीमध्ये. काही प्रोजेक्ट साठी परदेशी गेलाय म्हणे."

"तुमची सुधा तर खूप हुशार निघाली देशमुख सर! खूप प्रगती करेल असे दिसते! जाऊ दे तिला बघुदे ह्या गावाबाहेरचे जग! "

सुधाच्या बाबाना अभिमानच वाटलं सुधाचा. " आहे पोर हुषार हो. पण जरा भोळी पण आहे. विशेष ठेवते पटकन कशावरही. आणि आजच्या जमान्यात भुरळ पाडणाऱ्या  कितीतरी गोष्टी आहेत हो. त्यात कॉलेज मध्ये जाऊन अभ्यासासोबत अजूनही बरंच काही शिकते हो. त्यामुळे थोडी भीती वाटते, इतकेच."

आबासाहेब: " अहो देशमुख सर, शाळेतल्या मुलांना एव्हडे चांगले संस्कार देता आहेत तुम्ही. तर सुधाला पण दिलेच असतील ना? विश्वास ठेवा तुमच्या संस्कारांवर! आपल्याला वाटतं अजून लहान आहेत पोरं. पण बऱ्या वाईट गोष्टी समजतात हो त्यांना. नका काळजी करू. जाऊदे बिनधास्त. काही अडचण अली आपण आहोतच ना सांगायला."

आता सुधाच्या बाबांना थोडे निर्धास्त वाटू लागले होते. " खरंय आबासाहेब!" असे म्हणत  असतानाच प्रसाद घरी आला. पाठोपाठ शुद्धही अली. प्रसादही जुजबी बोलून  निरोप घेऊन सुधाचे बाबा व सुधा घरी परतले.  

" अरे प्रसाद!" आत्याबाईंनी आवाज दिला. "फ्रेश होऊन येतो गं " असे म्हणत प्रसाद पटकन आपल्या खोलीत शिरला. मनतील वादळ चेहऱ्यावर दिसू नये म्हणून.

काय करावे विचार करत सहजच लॅपटॉप उघडून बसला. पण लक्षच न्हवते कशातही त्याचे. त्याच्यासमोर होती ती फक्त सुधा.

चारच वर्षांपूर्वीची गोष्टं. इंजिनीरिंगला ऍडमिशन मिळाली म्हणून किती खुश होती! खरंतर तेव्हाच तिने ठरविले होते, तिला खूप छान करिअर करायचे आहे. शहरात, मोठ्या कंपनीमध्ये छानशी नोकरी करायची आहे. किती भरभरून बोलत होती ती तिच्या स्वप्नांबद्दल.

कॉलेज तासाभराच्या अंतरावर होते गावापासून म्हणून हॉस्टेल ला राहायचे ठरविले होते. खूप उत्साहात होती! हॉस्टेल ला गेल्यापासून  सुरवातीला दर आठवड्याला गावाला यायची. आणि नंतर मात्र पंधरा दिवस महिन्याने येवू लागली. त्यामुळे प्रसाद नि तिची भेट फार होत नसे महिन्यादोन महिन्यातून एकदा. 

पण यायची तेव्हा मात्र खूप भरभरून बोलायची. कॉलेज मधील वातावरण, मित्र, मैत्रिणी, स्पर्धा, कार्यक्रम, शिक्षक, अभयसाचे विषय, एक ना अनेक. प्रसादला सर्व काही सांगत होती.ती यायची तेव्हा प्रसाद शेतातच असायचा. प्रसादपण तिला त्याचे शेतातील वेगवेगळे प्रयोग, नवीन काही केले कि सांगायचं. सुधाला खूप आश्चर्य वाटत असे कि एवढा हुशार असूनही प्रसादला शेती मध्ये जास्त इंटरेस्ट आहे.

" तू अजबच आहेस बघ! तुला इथे मातीमध्ये, शेतात काम करायला आवडतं ना रे? बघावं तेव्हा काम चालू असते तूझे. एवढा हुशार आहेस, पण तुला शेती करायची आहे! तुला नाही का वाटलं कधी कि डॉक्टर, वकील किंवा इंजिनीअर व्हावं असे?”

"का हुशार माणसांनी शेती करू नये असं कोणी सांगितलंय? आणि जसं डॉक्टर  इंजिनीअर वकील हे जसे प्रोफेशन आहेत तसं शेतीपण एक प्रोफेशनच आहे. उलत हेच प्रोफेशन असे आहे जे समाजाच्या मूलभूत गरज पूर्ण करते. आणि कोणीच शेती नाही केली तर तुझे  डॉक्टर  इंजिनीअर वकील काय खाणार? आणि शेती करणं म्हणजे काही येरागबाळ्याचे काम नाही बरं. हुशारी इथे पण लागते. कधी काय पेरायचे, पाणी कधी आणि किती द्यायचे? कोणती खतं  अजून बरच काही."

"हो हो... मि.  शेतकरी बरोबर आहे तुमचे. चुकलं माझं. आणि चेष्टा नाही करत आहे हा मी. खरंच तुझे शेतीतले प्रयोग छानच असतात. किती प्रगती केली आहेस तू! तुझी पण आणि तूझ्यासोबत इतरांची पण!सम्पू र्ण गावाला अभिमान आहे तुझा.”

“" पण शेतीमध्ये फक्त डोक्याचे काम नसते शारीरिक कष्टाची जोड द्यावी लागते."  चेहऱ्यावरील घामाचे थेम्ब हाताने पुसत प्रसाद म्हणाला. बोलत बोलत काम चालूच होते त्याचे.

" खरंय बघ तुझे. आणि इथे तुझ्या शेतात ना मस्त असा वास येत असतो नेहमी. मला वाटतं ह्या फुलं पानांचा आणि मातीचा असेल. मन एकदम ताजे तवाने होऊन जाते. त्यामुळेच तू थकत नसशील कदाचित."

जवळच एक चॅन मोगऱ्याचे झाड होते. त्याची फुले ओंजळीत घेऊन ती म्हणाली," काय कमल आहे ना! किती सुंदर सुगंध आहे ह्या फुलांचा! तू तर  लकी आहेस, अशा छान वातावरण मध्ये काम करतोस तू. अशी फुलं आसपास असली कि मन किती प्रसन्न राहते. "

तेथीलच एक छोटे मोगऱ्याचे रोप खुडून त्याने सुधाच्या हातात दिले आणि म्हणाला," लाव तुझ्या रूम वर म्हणजे तुला कायम छान वाणी फ्रेश वाटेल."

ह्या आठवणींमध्ये  प्रसाद एकदम हरवला  होता. "खरंच लावले असेल का तिने ते रोप? जपले असेल कि विसरून गेली ते? तिच्यासाठी लावलेली फुलांची बाग बहरली आहे मस्त. पण सांगता येईल का तिला कधी कि तुझ्यासाठीच फुलविली आहे ही  फुलांची बाग ?”

क्रमशः

🎭 Series Post

View all