शेंगदाणा चोर

The Peanut Thief
शेंगदाणा चोर

आवाज येणार नाही या चालीत, ती चिमुकली पावलं स्वयंपाक घरात घुसायची..!

हळूच स्टीलचा डब्बा, टाचा वर करून काढत अन पोटाजवळ धरुन दोन्ही हाताने ओठाला दाबत तो डब्बा उघडत. हळूच ते झाकण बाजूला ठेऊन, चिमुकला डावा हात डब्यामध्ये घुसायचा. अन येताना ती मूठ भरून शेंगादाणे खिशाची तिजोरी भरत असायचे. नंतर त्याच सावधगिरीने पुन्हा झाकण लावून, टाचा वर करून तो डब्बा आवाज न करता ठेवत शेंगादाणा चोर स्वयंपाक घरातून काढता चिमुकला पाय घ्यायचा.!

बालपणातील एखादी घटना नजरेसमोर समोर आली की मन कसं हसायला उठतं ना.?

सुशांत भालेराव (मोठा झालेला शेंगदाणा चोर)