जाळं आंतरजालाचं (भाग-६)

This story is related to need of cyber security.

      दुसऱ्या दिवशी विनीत आणि वरुण सेमिनार साठी नचिकेत च्या सोसायटीत येतात. 
विनीत:- नमस्कार! एव्हाना तुम्हाला सगळ्यांना प्रसन्न आणि सुमित च्या बाबतीत काय घडलं हे कळलं असेलच! म्हणूनच आज आम्ही इथे तुम्हाला काही टिप्स द्यायला आलो आहोत. 
वरुण:- हो! आणि या मुळे कदाचित प्रसन्न आणि सुमित सारखी परिस्थिती तुमच्या मुलांवर येणार नाही. सुरुवात करायच्या आधी माझी एक कळकळीची विनंती आहे... जर खरंच फार गरज असेल तरच मुलांना त्यांचा स्वतंत्र मोबाईल घेऊन द्या! नाही तर तुमच्या देखरेखी खाली तुमचा मोबाईल वापरायला देणे उचित ठरेल. आपण आता सुरुवात बेसिक गोष्टींपासून करूया.... 
विनीत:- आपण आधी पॅरेंटल कंट्रोल बद्दल बोलू. मुलांना मोबाईल वापरायला देताना पॅरेंटल कंट्रोल म्हणून option असतो तो ऑन करायचा. अगदी प्ले स्टोर ला सुद्धा हा option आहे....  बघा हा option एकदा ऑन केला की ब्राउजिंग करताना काही साईट्स आपोआप ब्लॉक होतात... ज्या लहान मुलांसाठी योग्य नाहीयेत! उदाहरण द्यायचं झालं तर adult साईट्स! या मुळे होतं काय, मुलं ती साईट पाहू शकत नाहीत. शिवाय यात तुम्ही आपलं मुल कितीवेळ ब्राउजिंग करू शकतं याचं टाइम लिमिट सुद्धा सेट करू शकता! प्ले स्टोर वर हे ऑन केल्यामुळे तुम्ही गेम्स, मूवी, म्युसिक, अँप्स या सगळ्याला काही प्रमाणात restrictions घालू शकता.... म्हणजे जे गेम्स किंवा अँप्स हायली रेटेड आहेत तेच तुमची मुलं डाउनलोड करू शकतात.... या मुळे चुकीचा कन्टेन्ट मुलांपर्यंत येण्या पासून आपण वाचवू शकतो. 
प्रशांत:- सर म्हणजे आम्ही जो फिल्टर लावला असेल त्या व्यतिरिक्त बाकी गेम्स आणि अँप्स मुलांना दिसणार नाहीत का? 
विनीत:- नाही! हे तसं नाही! यात सगळे अँप्स आणि गेम्स दिसणार पण मुलं डाउनलोड नाही करू शकणार! कारण प्ले स्टोर वर पॅरेंटल कंट्रोल ऑन करताना तुम्हाला एक पिन टाकावा लागेल आणि तो पिन टाकल्या शिवाय तुम्ही apply केलेल्या फिल्टर बाहेरील काहीही डाउनलोड होणार नाही. 
         वरुण:- या मुळे बरचसं काम सोपं होतं! कारण आपण ठरवून दिलेल्या मर्यादेत मुलं नेट सफरिंग करत असतात! मुलांना रोज विश्वासात घेऊन त्यांनी दिवसभर काय काय केलं हे विचारणं सुद्धा महत्वाचं आहे. प्रसन्न च्या बाबतीत जेव्हा त्याला जोकरा सारखं तोंड रंगवून माकडा सारख्या उड्या मारून व्हिडिओ पाठवायला सांगितला होता याला सायबर बुलिंग म्हणतात! या मुळे मानसिक खच्चीकरण होतं! कुठेतरी नैराश्येची भावना निर्माण होते... बरेच वाईट परिणाम घडू शकतात यातून...  या सगळ्यातून वाचण्यासाठी मुलांशी साधलेला संवाद च काम करू शकतो! त्यांना विश्वास वाटला पाहिजे आपण आपल्या आई - बाबांशी मनमोकळे पणाने बोलू शकतो अगदी मित्रा सारखे! दुसरा मुद्दा; मुलं आपलंच अनुकरण करत असतात... आपण मोबाईल वर काय बघतो, वाचतो हे ते पाहत असतात... त्यामुळे आपणच त्यांना मोबाईल चा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करायचा हे शिकवू शकतो! 
विनीत:- या ऑप्शन मुळे मुलांना तर आपण सुरक्षित केलं! आता आपण आपली सुरक्षा कशी करायची हे पाहू. कधी कधी आपण सुद्धा हॅकर च्या जाळ्यात अडकले जाऊ शकतो... म्हणून आपल्याला आपल्या सगळ्या अकाउंट्स ची; मग ते सोशल मीडिया अकाउंट असो की ऑनलाइन बँक अकाउंट, आपल्या डिव्हाईस मधला डेटा हे सगळं secure करता आलं पाहिजे! म्हणूनच आता आपण आधी सोशल मीडिया सिक्युरिटी पाहूया.... 
        बरं मला सांगा इथे असलेल्या जवळ जवळ सगळ्यांचीच सोशल मीडिया वर अकाउंट्स असतील ना.... whatsapp, instagram, facebook सगळेच वापरत असाल... 
सगळे एकदम:- हो! 
विनीत:- मग त्या अँप मध्ये जे security चे options आहेत ते कोणा कोणाला माहित आहेत?? 
फार कमी जण हात वर करतात... विनीत पुढे बोलू लागतो; बघा! सगळेजण इथे छान ऍक्टिव्ह असतात पण, सुरक्षेची काळजी कोणी घेत नाही. असो! पण आता इथून पुढे असं नाही करायचं! सुरुवात आपण व्हाट्सअप पासून करू.... मोस्टली डी. पी. आणि स्टेटस च्या सेटिंग सगळ्यांना माहित असतात पण त्यात अजून एक security option आहे; two step verification म्हणून... तो सगळ्यांनी ऑन करायचा... 
नचिकेत:- सर! या मुळे काय होईल? आणि कसं ऑन करायचं? 
विनीत:- हो सांगतो! या मुळे जेव्हा तुम्ही दुसरा मोबाईल घ्याल तेव्हा व्हाट्सअप सुरु केल्यावर तुम्हाला जो OTP येतो त्या नंतर अजून एक पासवर्ड विचारेल जो तुम्ही या सेटिंग मध्ये ठेवला असेल. याचा उपयोग हा कि, जर कोणी तुमचं व्हाट्सअप हॅक करायचा प्रयत्न केला तर verification चा पासवर्ड टाकल्याशिवाय त्याला व्हाट्सअप सुरु करता येणार नाही. हा पर्याय ऑन करायला मी सांगतो त्या स्टेप्स follow करा... 
Whatsapp settings > Account या मध्ये तिसऱ्या नंबर चा option म्हणजे two step verification.... तिथे क्लिक करून ते Enable करायचे.... तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड किंवा पिन तिथे टाका....  दर काही दिवसांनी तुम्हाला पासवर्ड लक्षात राहावा म्हणून सिस्टिम तुम्हाला पासवर्ड विचारत राहीलच. 
         वरुण:- आता मी इन्स्टाग्राम आणि फेसबुक च सांगतो! विनितने जसं व्हाट्सअप च सांगितलं तसंच इन्स्टाग्राम च सुद्धा... फक्त यात काही रिकव्हरी codes तुम्हाला मिळतात... याचा screenshot काढून ठेवायचा किंवा प्रिंट काढून सुरक्षित जागी ठेवायची. नवीन डिव्हाईस मध्ये लॉगिन करताना हे लागतात. फेसबुक मध्ये सुद्धा privacy shortcut मध्ये two factor authentication हा option मिळेल... या मुळे तुमचे सगळ्या social media अकाउंट्स ना डबल प्रोटेक्शन मिळेल... 
सगळे विनीत आणि वरुण ने सांगितल्या प्रमाणे सेटिंग बदलतात.... 
विनीत:- आज आपण सोशल मीडिया ची security पाहिली.... आम्ही दोघं पुन्हा उद्या येऊ.... उद्या आपण गुगल अकाउंट कसं secure करायचं, स्पॅम मेल्स कसे ओळखायचे हे पाहू.... 

काय मग कसा वाटला आजचा भाग? कदाचित जास्त इंटरेस्टिंग नसेल ना वाटला... पण, आज ही काळाची गरज आहे... या डिजिटल दुनियेत आपल्या परीने आपल्याला जेवढं secure राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे. पुढच्या भागात आपण अश्याच काही security टिप्स बघणार आहोत... सगळ्या स्टेप बाय स्टेप आणि डिटेल मध्ये.... कंमेन्ट करून नक्की सांगा कसा चाललाय या कथामालिकेचा प्रवास... 

🎭 Series Post

View all