जाळं आंतरजालाचं (भाग-५)

This story is related to need of cyber security.

     सगळे जण थोडं माघारी येतात. विनीत आसपास कुठे बाग आहे हे पाहत असतो... तिथून अगदी थोड्याच अंतरावर जेमतेम अर्ध्या कि.मी. वर एक बाग असते! Satellite view मधून तिथेच एका भेळ वाल्याचा ठेला आहे हे सुद्धा स्पष्ट होतं! आता त्यांना अंदाज आलेला असतो आपल्याला नक्की जायचंय कुठे.... आता प्रवास सुरु होतो मागच्या दिशेने.... थोड्याच वेळात ते अगदी व्हिडिओ मध्ये जसं दिसत होतं अगदी तश्याच ठिकाणी येऊन पोहोचतात.... फार कमी वस्ती असल्यामुळे त्या घराच्या बाजूनी एक कच्चा रस्ता जात असतो! तोच त्यांना घराच्या मेन डोअर वर घेऊन येणार...
वरुण:- मी आणि नचिकेत पुढच्या दाराने जातो. विनीत तू प्रशांत जीं बरोबर इथेच थांब... जर त्या हॅकर ने पळायचा प्रयत्न केला तरी पकडता येईल आपल्याला... आपण कनेक्टेड राहू... मी तुला कॉल करतोय....
विनीत:- हो! चालेल... तुझा इशारा मिळाला की आम्ही येतो तिथे...
        सगळं प्लॅनिंग करून वरुण आणि नचिकेत मेन डोअर वर येतात... दार वाजवतात... आधी नचिकेत लपून बसतो.. कारण त्या हॅकर ने टास्क च्या नावाखाली प्रसन्न च्या घरची सगळी माहिती मिळवलेली असते... हॅकर दार उघडतो... वरुण काहीबाही कारणं देत घरात शिरतो आणि मागून नचिकेत! नचिकेतला बघून त्या हॅकर ची बोलतीच बंद होते... तो पळायच्या प्रयत्नात असतो पण वरुण त्याला धरतो! विनीत ला सुद्धा बोलावून घेतो. नचिकेतचा पारा चढलेला असतो....
नचिकेत:- काय रे! लहान मुलांना फसवतोस... दहा लाख रुपये पाहिजेत का तुला? थांब बघतोच तुझ्याकडे....
असं म्हणून त्याला मारायला जातो पण विनीत त्याला सावरतो...
विनीत:- बोल! नाव काय तुझं? का केलंस हे सगळं? दिसताना तर जेमतेम २५ - २६ वर्षाचा दिसतोयस... आता बोलतोस का देऊ दोन...
असं म्हणून हात उचलतो....
हॅकर:- नाही! मारू नका... सांगतो! मी सिद्धेश.. मला लहानपणापासून मोबाईल, कॉम्पुटर सगळ्याची आवड! शिक्षण सुद्धा याच शाखेतून पूर्ण केलं! अँप सुद्धा बनवले... पण दरवेळी मी फसला गेलो... कधी नीट मोबादलाच नाही मिळाला.... नोकरी पण मिळत नव्हती... म्हणून ठरवलं बास झालं आता.... पडद्याआड राहून जास्त काही मेहनत न करता पैसा कमवायचा....
वरुण:- अरे गाढवा! याचा तुझ्या कुटुंबावर काय परिमाण होईल... आई, बाबांना काय वाटेल याचा जराही विचार केला नाहीस का?
सिद्धेश (हॅकर):- मला कोणी नाही! अनाथ आहे मी! फार हलाखीत जीवन जगलो... कोणी दूरचे काका होते त्यांनी सांभाळलं... शाळेत प्रॅक्टिस च्या नावाखाली जास्त कॉम्पुटर वापरायचो तेव्हा पासून थोडं थोडं शिकत होतो... कॉलेज ला गेल्यावर पार्ट टाइम जॉब करायचो.... तिथे काही अशिक्षित लोक होते त्यांना मोबाईल मधलं कळायचं नाही... त्यांचा मोबाईल वापरून बघायचो.... स्कॉलरशिप वर शिक्षण पूर्ण केलं... थोड्याच काळात ते काका पण वारले... त्यांच्या नंतर कोणीच नव्हतं मला....
         प्रशांत:- म्हणून तू आमच्या मुलांना वेठीस धरलंस?
सिद्धेश:- मला राग यायचा.... इतक्या लहान वयात मुलांना मोबाईल मिळतायत... ते सुद्धा मस्त गेम खेळत वेळ वाया घालवतायत.... माझ्या सारखे अजून बरेच असतील हो ज्यांनी खेळायच्या वयात खूप काही सोसलं आहे. हेच मला आवडायचं नाही! दुसरं कारण म्हणजे नोकरी! एवढं मी शिकलो ते हि स्व बळावर पण अजूनही मला नोकरी नाही मिळाली.... माणूस हवा खाऊन तर पोट भरू शकत नाही ना...
विनीत:- अजून किती जणांना फसवलं आहेस तू? आणि लहान मुलांनाच का टार्गेट केलंस?
सिद्धेश:- प्रसन्न माझी दहावी शिकार होता! लहान मुलांना यात अडकवण सोप्प होतं! गेम च्या निमित्ताने ते अडकत होते! मी त्यात टास्क च्या रूपाने सगळी माहिती गोळा करून घ्यायचो.... त्या नुसार मग त्या मुलांच्या पालकांना किती रुपये मला देणं जमेल हे बघयचो आणि प्रत्येकाकडून वेगवेगळी खंडणी ची रक्कम मागायचो... हातावर जखम करून घेण्याचा टास्क मी या करता ठेवला होता जेणेकरून भीतीपोटी मुलांनी काही सांगू नये... मग त्यांचे पालक कामाला गेले की फेक व्हिडिओ एडिट करून पैसे मागायचो..... पालक सुद्धा लगेच पैसे ट्रासन्फर करायचे.... आणि संध्याकाळी घरी गेले की मुलांच्या हातावर जखम दिसायची तर त्यांना खरं वाटायचं कि, त्यांचं मूल किडनॅप झालेलं....  पण मग घरात सुरक्षित पाहून कधी कोणी पोलीस तक्रार सुद्धा नाही करायचं! कारण मी भीतीच तशी बसवली होती.... त्यांना वाटायचं जर आपण पोलिसांची मदत घेतली तर पुन्हा आपल्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो.
वरुण:- हेच डोकं जर चांगल्या कामात लावलं असतं तर आज कुठच्या कुठे पोहोचला असतास... तुला तर आधी physiatrist ची गरज आहे.... स्वार्थी पणाचा कळस आहे हा!
सिद्धेश:- नाही मला स्वार्थी नका म्हणू... जी खंडणी मी घेत होतो त्यातून मी अनाथ आणि ज्यांना फार कमी वयात कष्ट करायला लागतायत त्यांना यातून मदत करत होतो!
वरुण:- गप! मदत करत होतो म्हणे! हा कुठला प्रकार आहे मदत करायचा? मान्य तू काहीतरी चांगलं करत होतास पण हे असं चुकीच्या पद्धतीने!
विनीत:- चल आता तुझा निर्णय न्यायालय च करेल! चल!....
  असं म्हणून विनीत प्रशांतला घेऊन जातो.
          नचिकेत:- थँक्यू वरुण सर! तुमच्यामुळे आज खूप मोठं संकट टळलं!
प्रशांत:- हो ना! आमचा सुमित सुद्धा यात अडकण्याआधी वाचला!
वरुण:- माझे आभार नका मानू! प्रसन्न ने सगळं न घाबरता सांगितलं म्हणून झालं हे सगळं! सई मॅडम ने त्याला बोलतं केलं आणि शिवाय विनीत सुद्धा होताच! त्याला होईल आता शिक्षा... तुम्ही आता निश्चिन्त मनाने जा घरी...
नचिकेत:- पण सर ते सेमिनार???
वरुण:- हो आहे माझ्या लक्षात मी आणि विनीत उद्या येतो तुमच्या सोसायटीत....

काय कसा वाटला आत्ता पर्यंत चा प्रवास? पुढच्या भागात आपण वरुण आणि विनीत च सेमिनार पाहू.... ज्यात पूर्ण डिटेल मध्ये काही गोष्टी सांगितल्या जातील....

🎭 Series Post

View all