जाळं आंतरजालाचं (भाग-३)

This story is related to need of cyber security.

      विनीत:- नचिकेत सर, सुमितच्या घरी फोन करायला हवा... त्याच्या वडिलांना फोन लावा... आणि फोन स्पीकर वर टाका.
नचिकेत:- बरं!... (फोन लागल्यावर), हॅलो.. प्रशांत भाऊ मी नचिकेत... प्रसन्न चा बाबा... 
प्रशांत:- हा बोला ना नचिकेत... 
विनीत:- तुम्ही आता काहीही न बोलता फक्त ऐकून घ्या... मी विनीत! सायबर क्राईम डिपार्टमेंट मध्ये काम करतो.... तुम्ही सुमित आणि तुमच्या मिसेस ना घेऊन नचिकेत ज्या कॅफे चा ऍड्रेस पाठवेल तिथे या... पण, येताना सुमित चा मोबाईल नका आणू... तो घरातच राहूदे... घरातून निघताना या बद्दल काही बोलू नका... फिरायला जाऊया असं सांगून दोघांना बाहेर घेऊन या... 
प्रशांत:- बरं बरं!
असं म्हणून फोन ठेवतो. नचिकेत एका कॅफे चा ऍड्रेस प्रशांत ला पाठवतो.... प्रशांत, सुमित आणि सुमितची आई, जान्हवी ला आपण फिरायला जाऊया आणि जमलंच तर एखादी फिल्म पण बघून येऊ असं सांगून ठरलेल्या ठिकाणी त्यांना घेऊन येतो. 
      नचिकेत:- या प्रशांत भाऊ... बसा! 
जान्हवी:- अरुंधती अगं काय झालंय? तुम्ही सगळे इथे? आणि तुझा चेहरा का असा उतरलाय? 
अरुंधती:- फार मोठा घोळ झालाय... हे विनीत सर सांगतील सगळं! 
विनीत:- सुमितचा मोबाईल आणला नाहीये ना? 
सुमित:- नाही... आपण फिल्म बघायला जातोय असं बाबांनी सांगितलं म्हणून मी घरातच ठेवला फोन!
विनीत:- बरं! आता मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या... 
असं म्हणून तो झालेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. सुमितच्या घरच्यांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते.... आता पुढे काय करायचं कसं सगळं निभावलं जाणार याची काळजी सगळ्यांना असते!एव्हाना रात्रीचे ८.३० वाजून गेलेले असतात.... विनीत पुढे म्हणतो; आत्ता खूप उशीर झालाय.... तुम्ही सगळे घरी जा.... घरात एकदम नॉर्मल रहा... तुमच्या मुलांना काही बोलू नका... उद्या सकाळी दहा वाजता इथेच भेटू आपण...  शिवाय उद्या वरुण सुद्धा असेल... मी त्याला सांगितलंय सगळं! आणि हो बाळांनो तुम्ही दोघं सुद्धा उद्या वरुण काका जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं न घाबरता द्यायची हा! दोघांनी पण मोबाईल घेऊन येऊ नका! 
        प्रसन्न आणि सुमित चा जराही मूड नसतो... त्यांना आपण किती मोठी चूक करून बसलोय हे कळत असतं! पण आता सध्या त्याचा काय उपयोग... सगळे घरी जातात आणि झोपतात.... बाहेरच थोडं फार खाणं झालेलं असत आणि त्यात कोणाचं मन सुद्धा स्थिर नसतं.... भूक तर पार मेलेली असते! दुसऱ्या दिवशी अरुंधती आणि नचिकेत कामाच्या निमित्ताने आणि प्रसन्न क्लास च्या निमित्ताने बाहेर पडतात.... तसंच सुमितच्या घरचे सुद्धा! ठरलेल्या ठिकाणी दहा वाजता सगळे पोहोचतात..... थोड्याच वेळात विनीत आणि वरुण सुद्धा येतात.... 
वरुण:- मला विनितने कल्पना दिली आहे काय झालंय ते.... पण मला अजून काही माहिती लागेल... काहीही न लपवता आणि न घाबरता सगळं सांगा... आधी अरुंधती मॅडम आणि नचिकेत सर तुम्ही बोला.... तुमचा मुलगा प्रसन्न! जेमतेम ११ वर्षाचा असेल ना... 
अरुंधती आणि नचिकेत (एकत्र) :- हो!
वरुण:- मग एवढ्या लहान वयात याला मोबाईल का दिला तुम्ही? ठीक आहे मुलांनी technology शिकली पाहिजे पण म्हणून तुम्ही याला तुमचा मोबाईल सुद्धा थोडा वेळ वापरायला देऊ शकला असता ना! म्हणजे मी जाब नाही विचारत पण ठोस कारण कळलं की पुढे आपल्याला मदत होईल....
अरुंधती:- Actually सर प्रसन्न च्या सगळ्या फ्रेंड्स कडे मोबाईल होते.... हा पण हट्ट करू लागला... शिवाय तो आमच्या मोबाईल वर सुद्धा कधी गेम खेळायचा नाही.. त्याला वाचनाची आणि सस्पेन्स कथा पाहण्याची आवड होती तो तेच बघायचा.... म्हणून मग..
नचिकेत:- हो ना! आणि त्याला मोबाईल देताना मी अटी पण घातल्या होत्या.... शाळेत मोबाईल नाही घेऊन जायचा... अभ्यासावरच लक्ष उडू नाही द्यायचं आणि जर तसं झालं तर मोबाईल काढून घेतला जाईल आणि परत मिळणार नाही... मोबाईल दिल्या पासून त्याची प्रगती वाढत चालली होती म्हणून आम्ही त्याला काही बोललो नाही.... त्याला मोबाईल दिल्यावर एक, दोन गेम घेतले होते पण ते सुद्धा मेंदूला चालना देतील असेच होते.... शिवाय आम्ही दोघे कामाला बाहेर जाणार, पटकन कधी गरज पडली तर असावा जवळ फोन हे पण एक कारण होतं! 
वरुण:- बरं! Mr. प्रशांत तुम्ही का घेऊन दिला सुमितला मोबाईल?
प्रशांत:- नचिकेत म्हणाले तसंच घडलं होतं आमच्या घरी पण... 
वरुण:- प्रसन्न, सुमित इकडे या... मला सांगा तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणाला या गेम बद्दल माहिती आहे का? 
प्रसन्न आणि सुमित (एकत्र):- नाही!
       वरुण:- ठीक आहे... प्रसन्न मला सांग कोणता व्हिडिओ पाहताना तुला या गेम ची लिंक मिळाली होती, म्हणजे तू तो व्हिडिओ ओळखू शकशील का? 
प्रसन्न:- हो! मी रहस्य कथा असंच टाकलं होतं सर्च बार मध्ये.... आणि बराच खाली होता तो व्हिडिओ... तो व्हिडिओ सुरु करायच्या आधी जी इमेज दिसत होती ती बघूनच मी तो व्हिडिओ स्टार्ट केला आणि मला मिळाली ती लिंक... मला गेम आवडला म्हणून सुमित ला पाठवला... आणि त्याला सांगितलं आपला गेम खेळून झाला की मग आपण बाकीच्या मित्रांना पाठवू... 
वरुण:- Ok... मी आता तेच सर्च करतो मला व्हिडिओ दाखव हा तो... 
असं म्हणून तो सर्च करतो... प्रसन्न तो व्हिडिओ दाखवतो.... तिथे लिंक पण असते... तो व्हिडिओ बघून स्वतःच्या लॅपटॉप वर काहीतरी करतो... आणि नंतर म्हणतो; बरं सुमित मला सांग तुझं कोणतं लेव्हल सुरु आहे? 
सुमित:- मी अजून मिष्ट्री सॉलव्ह करायच्या शेवटच्या लेवल वरच आहे... घरात कुठेही पुरावे असतात आणि दिलेल्या वेळेत मला काही ते स्कॅन करून अपलोड करायला नाही जमत... 
वरुण:- ठीक आहे! मला एक प्लॅन सुचतोय... आपण संध्याकाळी चार ला इथेच भेटू... पण या वेळी येताना प्रसन्न आणि सुमित दोघांचे मोबाईल घेऊन या.... पण रस्त्यात या विषयी काहीही चर्चा करू नका.... नॉर्मल कुठेतरी फिरायला किंवा पार्टीला जातोय असं भासवा... तो पर्यंत विनीत आपण थोडी तयारी करूया... मी हनी ट्रॅप लावायचा विचार करतोय... मला तुझी मदत हवी आहे...

आता हनी ट्रॅप लावून पुढे काय होईल? वरुणच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे..... काय होईल या हनी ट्रॅप चा परिणाम पाहूया पुढच्या भागात.... 
         
          

🎭 Series Post

View all