जाळं आंतरजालाचं (भाग-२)

This story is related to need of cyber security


 (कथा जरी काल्पनिक असली तरी आजच्या या technology च्या युगात डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकते... फक्त मोबाईल हवा म्हणून केलेला हट्ट आणि त्याचे झालेले परिणाम यातून पाहायला मिळतील... मनोरंजनाबरोबर थोडं सिरियसली सुद्धा काही गोष्टींकडे पाहावे. सदर भागात घेतलेले गेम चे नाव हे काल्पनीक आहे... वास्तवाचा याच्याशी संबंध नाही.)

      प्रसन्न ने जे काही सांगितलं होतं ते मन सुन्न करणारं होतं! तो म्हणाला होता; "आधी मी काही मोबाईल वर जास्त गेम खेळणे किंवा ब्राउजिंग करणे हे करत नव्हतो... हो मी खेळायचो गेम पण थोडा वेळच! एक दिवशी मी विचार केला आज अभ्यास झालाय तर छान रहस्य कथांचे व्हिडिओ पाहूया... म्हणून मी एक व्हिडिओ ओपन केला.... तो व्हिडिओ पाहताना मला एक लिंक दिसली 'द मिस्टेरिअस डेथ' नावाचा गेम होता तो! प्ले स्टोर वर मला असा गेम कधीच दिसला नव्हता.... हा काहीतरी भन्नाट दिसतोय म्हणून तिथूनच मी डाउनलोड केला.... सुरुवातीला फार छान वाटला हा गेम मला... रिअल लाईफ चॅलेंज होते त्यात! मला फार आवडले ते! गेम सुरु केल्यावर पहिलं चॅलेंज होतं, सगळ्या घराचा व्हिडिओ काढायचा.... त्या नुसार मग थ्री डी इफेक्ट ने पुढचे चॅलेंज येणार होते.... कारण त्यात लपलेले पुरावे शोधून पुढच्या मिस्ट्री सोडवायच्या होत्या... मी तसंच केलं! नंतर रोज एक एक टास्क यायला लागला... कधी किचन मध्ये, कधी माझ्या रूम मध्ये, कधी बाथरूम मध्ये असे पुरावे सापडायचे मग ते स्कॅन करून अपलोड केलं की स्कोर वाढायचा... मला वाटलं यामुळे माझी निरीक्षण क्षमता वाढेल म्हणून मी गेम सुरु ठेवला.... 
         दोन तीन दिवस असच सुरु होत... नंतर टास्क यायला लागले मध्यरात्री उठून ते जी व्हिडिओ क्लिप पाठवतील ती बघायची... दोन दिवस असच सुरु होतं! ती हॉरर क्लिप होती पण इतकी काही भीती नाही वाटायची... कारण दुसऱ्या दिवशी त्याच्याशी रिलेटेड मिस्ट्री सोडवावी लागायची..... एका मेमरी गेम सारखं व्हिडिओ मध्ये काही गोष्टी ज्या आसपास मिळतील त्या आणून त्यांना फोटो पाठवायला लागायचा... म्हणून मी तुमच्याकडे पैसे मागायचो.... कमीत कमी पाच वस्तूंचा फोटो पाठवावा लागायचा.... एक दिवशी तुम्ही दोघं काम आहे म्हणून लवकर गेलात आणि माझ्याकडे पैसे नव्हते... त्यामुळे एक वस्तू कमी पडली म्हणून मला शिक्षा झाली... जोकरा सारखं तोंड रंगवून, माकडा सारख्या उड्या मारून डान्स करायचा होता आणि तो व्हिडिओ सेंड करायचा होता.... नंतर एका चित्राचा फोटो आला ते वहीवर जस च्या तस काढायचं होतं! मला यात काही चुकीचं नाही वाटलं.... ते पण झालं... आणि मी सगळ्या लेव्हल्स पार केल्या... आता फक्त शेवटची लेवल राहिली होती.... त्या आधी तीन टप्पे होते... पहिल्या टप्प्यात काही puzzles होते ते सोडवले... दुसऱ्या मध्ये काही प्रश्न आले त्यात सगळी बेसिक माहिती विचारलेली होती त्याची माहिती देऊन My Family वर थोडं बोलायचं होत आणि त्यांना तो ऑडिओ पाठवायचा होता... केलं मी ते सुद्धा... नंतर हा तिसरा टप्पा आला.. यात सरळ सरळ धमकी होती.... हातावर कर्कटकाने जखम करून घ्यायची होती... आणि त्यांनी एक लिंक पाठवली आहे त्यावर जाऊन खंडणी भरायची आहे दोन दिवसांच्या आत..... दहा लाख रुपये मागितलेत त्यांनी.... असं म्हणून प्रसन्न पुन्हा रडायला लागला होता... आणि जर नाही दिले तर त्यांच्याकडे आपली पूर्ण माहिती आहे... मग आपलं काही खरं नाही... 
           नचिकेत:- तुला जेव्हा शिक्षा झाली तेव्हाच का नाही सांगितलंस? हे सगळं तेव्हाच थांबलं असत ना बाळा! 
प्रसन्न:- नाही बाबा! तेव्हा सांगितलं असत तर काहीतरी भलतंच घडलं असत! त्यांना आपण घरात काय बोलतो हे ऐकायला जातं... आपण कधी काय करत असतो हे पण त्यांना माहिती आहे... म्हणूनच मी घरात फक्त मोबाईल कडे बोट दाखवलं आणि काही बोललो नाही.... इथे सुद्धा तुम्ही माझा मोबाईल आणला असता तर मी हे बोललो नसतो... 
सगळं ऐकून सई च म्हणते; "नका काळजी करू माझा एक मित्र आहे, विनीत!  तो सायबर क्राईम मध्ये आहे.... आपण त्याच्या कानावर हि गोष्ट घालूया... तोच काहीतरी मदत करू शकेल... मी त्याला इथेच बोलावते आत्ता... तो आल्यावरच त्याच्या सांगण्याप्रमाणे करू सगळं!"
        सई विनीत ला फोन करून थोडी फार कल्पना देऊन तिच्या क्लिनिक ला बोलावते.... तासाभरात येतो असं तो सांगतो.... तो पर्यंत सई तिच्याकडच्या पेशंटना पाहून घेते... विनीत येतो... झालेला सगळा प्रकार सई विनीत ला डिटेल मध्ये समजावून सांगते... 
विनीत:- प्रसन्न बाळ इकडे ये... मला आता मी विचारतो ते सांग हा... तू या गेम ची लिंक अजून कोणाला पाठवली आहेस का?
प्रसन्न:- हो! माझा मित्र सुमित... त्याचं अजून दुसरं लेव्हल सुरु आहे... त्याला पटकन मिष्ट्री सोडवता येत नाहीयेत म्हणून वेळ लागतोय.... 
विनीत:- बरं ठीक आहे.... नचिकेत सर मला वाटतंय आपण सुमितच्या पालकांना बाहेर बोलावून सगळी कल्पना देऊया... माझा एक मित्र आहे वरूण! तो ethical हॅकर आहे... माझ्या पेक्षा जास्त अनुभव सुद्धा आहे त्याला..  आपण त्याची सुद्धा मदत घेऊ... आपल्या हातात दोन दिवस आहेत त्यात सगळं करावं लागेल... 
        आता पुढे विनीत आणि वरुण काय करतील? सुमित या सगळ्यात अडकण्याआधी वाचेल का? आणि प्रसन्न! त्याचं काय? पाहूया पुढच्या भागात... 
         

🎭 Series Post

View all