माहेरवाशिणी भाग दोन

Feelings Of Married Women


पहिल्या भागात आपण पाहिलं की चौघी मैत्रिणी आपापल्या घर संसार आणि मुलाबाळांच्या विषयी गप्पा करत आहे. आता बघूया या माहेरवाशीणींना माहेर आणि  त्यांच्या संसाराबद्दल काय वाटते ते…..


दुसरी -"माझ्याकडे तर मुलाच्या आवडीचे डब्यात दिलं नाही तर तो शाळेत डब्बाच खात नाही. सासूबाईंना आयतीच  संधी मिळते बडबड करायला."


तिसरी -"हो ना! दिवसभर ते सासू-सुनांचे सीरियल्स बघून थकतही नाही माझी सासू. संध्याकाळी दिवे लागणीला काही स्तोत्र, प्रार्थना म्हणावी, निदान \"सदा-सर्वदा\" तरी पण नाही! आपण दिवा लावला की यांच्या डोक्याची खाण्याची समई प्रज्वलित होते.

सासू -"आता रात्री काय बनवणार? नवऱ्याच्या आणि \"गणूच्या\" आवडीचं बनव बाई! मी काय दोन-चार घास खाईल तर खाईल. जास्त भूक नाही हो मला. नाहीतर असं कर नितीन (दिरालाच) विचार!"

तिसरी -"म्हणजे मुलगा, नवरा आणि दीर यांना जे आवडतं ते बनवायचं आणि सासूबाईंनी ते पोटभर खायचं. मुलां-नातवंडांचे नाव आणि

पहिली -"सासुबाईंचे गाव."

दुसरी -"लहानपणी दिवाळीत आपण मातीचं घरकुल बनवल होत."

तिसरी -"गंमत-जंमत म्हणून भातुकलीचा खेळ खेळताना स्वयंपाकही केला होता."


चौथी -"पण काय माहिती होतं की, ती बालपणीची भातुकलीतली भांडी लग्न होऊन, सासरी गेल्यावर आपला अख्खा दिवस खाऊन टाकतील."

पहिली -"कधी कधी तर वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं! महिनाभर येऊच नये."


दुसरी -"हो ना! आधी नवीन लग्न झालं तेव्हा दर दिवाळी, उन्हाळ्यात माहेरी जाता यायचं. पण आता मुलांच्या शाळा, परीक्षा, नवर्याची नोकरी.."

तिसरी -"सासू-सासर्‍यांची दुखणी-खूपणी त्यामुळे ना इच्छा असूनही माहेरी जाता येतच नाही!"

चौथी -"आणि गेल तरी चार दिवसांच्या वर राहत आहे येत नाही."


पहिली -"आई वडील जिवंत असेपर्यंतच माहेर असते ग बाई! एकदा का ते देवा घरी गेले की, माहेर संपलस म्हणून समजा!"

दुसरी -"अगदी खराय ग हे! आई गेली की, माहेरची माया ही आटते. वडील बिचारे एकटेच त्यांच्या खोलीत बसून टीव्ही बघतात, वर्तमानपत्र वाचत असतात.. वहिनी तिच्या कामात व्यस्त, भाचवंड त्यांच्या दुनियेत मस्त आणि भाऊ त्याच्या नोकरी व्यवसायाने त्रस्त. एकदम सगळे चित्रच पालटत ग!"


तिसरी -"हो ना! आई असताना आपण येणार म्हणून ती आपल्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असायची, बाबा उगाच दिवाणखान्यात वर्तमानपत्र तोंडासमोर धरून वाचत असल्याचं नाटक करायचे पण बाबांचं मन आणि आईची नजर दहा वेळा तरी फाटका जवळ जाऊन परत यायची.

ती दोघेही मग एकमेकांना विचारायची…

कधी आई म्हणायची,

आई -"गाडी लेट झाली वाटते आज."

तर कधी बाबा म्हणायचे…

बाबा -"ऑटो नसेल मिळाला लवकर."

चौथी -"आणि मग फाटकाजवळ ऑटो थांबला की, लहान बहिणी-वहिनी सगळे जमायचे. घराच्या उंबरठ्यावर आई भाकर तुकडा ओवाळून, पाण्याचा तांबा ओवाळून दरवाजाजवळ रीता करायची."

पहिली -"नातवंडांवरून दोन्ही हात ओवाळून, कानाजवळ दुमडून लिंबलोण करायची."


दुसरी -"माझी मुलं आणि भाऊची मुलं खूप दंगामस्ती करायची, घर नुसतं आनंदाने भरून जायचं."


तिसरी -"रात्री गप्पा पण किती रंगाच्या! बालपणीच्या आठवणी, दादाच्या खोड्या, आपली अभ्यासातली प्रगती, त्यावर बाबांच रागावणं आणि आईची माया, जुने फोटोचे अल्बम बघता बघता कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर अगदी जिवंत व्हायचे! त्या बालपणीच्या आठवणींच्या मागे धावताना मध्यरात्री कधी सरायची ते कळायचंही नाही."


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


फोटो साभार गूगल.


🎭 Series Post

View all