Feb 25, 2024
नारीवादी

पाळी....बापरे....अळीमिळि गुपचीळी भाग दोन

Read Later
पाळी....बापरे....अळीमिळि गुपचीळी भाग दोन


आई- "छोटू ,मला सांग की सगळ्या प्राण्यांना पिल्लं होतात हे तुला माहिती आहे ना! पण फक्त माद्यांना होतात, म्हणजे फिमेल्स ना! बरोबर? जसा तू आणि दादा तुम्ही दोघं माझी पिल्लं
आहात.(आईने छोटू चा गालगुच्चा घेतला)."

पण छोटू सगळं ऐकायला उतावीळ झाला होता . त्याला असं वाटत होतं आई एवढे फिरून फिरून का सांगते आहे ? तिने लवकर मुद्द्यावर यायला हवं.

आई- "सगळ्या सजीवांमध्ये नर आणि मादी असतात. माणसांमध्ये पण असतात. जसे की तू, दादा, बाबा आणि मोठे काका सगळे मेल्स आहात म्हणजे नर. आणि मी ,काकी ,आजी आणि ताई .आम्ही आहोत फिमेल्स म्हणजे मादी."

छोटू- "अरे खरंच ! मी तर असा विचारच केला नव्हता की, मुलगा आणि मुलगी असं वेगळं असतं आणि ते का असतं?"

आई -"सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे की ,मुलांना जन्म देण्याची पावर किंवा क्षमता फक्त माद्यांकडेच असते. का? कारण त्यांना काही स्पेशल अवयव मिळाले आहेत, जे नरांकडे नसतात. आणि त्यातलेच मुख्य अवयव आहेत अंडाशय आणि गर्भाशय म्हणजे ओव्हरीज आणि युटेरस."

दादा -"हे बघ ! हे असे दिसतात" आणि दादांनी घेऊन छोटूला दोन चित्र दाखवले.

ती दोन चित्र बघून छोटूचे तर डोळेच विस्फारले . बापरे ! त्याला हे सगळं खूप चमत्कारीक वाटायला लागलं होतं.

छोटू - "आई तुझ्या पोटात हे आहे?" छोटूने उत्सुकतेने आईला विचारलं.

आई - "अर्थातच म्हणून तर तुम्ही दोघे झालत ना मला ! आता तुला मेन मुद्दा सांगते की, पाळी म्हणजे काय? आणि ती कशी येते. तर माझ्या पोटात जे अंडाशय आहे ना ,त्यातून दर महिन्याला एक अंड गर्भाशयात पाठवलं जातं ज्या अंड्याचं पुढे जाऊन बाळ बनणार असतं."

छोटू मनात विचार करायला लागला की , \"अरे बापरे म्हणजे मी आधी एक अंड होतो त्याला एकावर एक धक्के बसत होते.

आई- "पण प्रत्येक वेळी या अंड्याचं पिल्लू बनत नाही. नाहीतर विचार कर मला किती मुले झाली असती? आणि आई खुदकन हसली. तर जे गर्भाशय असतं, तिथे अंड्याचं बाळात रूपांतर होणार असतं. त्यासाठी तिथे स्पेशल अरेंजमेंट केली जाते. त्या लहान बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी रक्ताचं एक जाडसर आवरण बनतं आत मध्ये. बाळ पोटात असताना पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. अगदी खाण्या-पिण्यात पासून ते श्वास घेण्यापर्यंत. पण जर बाळ तयार होणार नसेल , तर मग उपयोग काय त्या आवरणाचा? काही ठराविक काळानंतर मग ते आवरण आपोआप गळून पडतात रक्ताच्या रूपात. त्याला म्हणतात मासिक पाळी. दर महिन्याला येते म्हणून मासिक. मुली थोड्या मोठ्या झाल्या म्हणजे साधारणतः 13 - 14 वर्षाच्या झाल्या की मग येते पहिल्यांदा पाळी. आणि मग 45 -50 वर्षापर्यंत पाठ सोडत नाही."

आईच्या चेहर्‍यावरचा वैताग छोटूला स्पष्ट दिसत होता.

आई परत सांगू लागली….

आई -"पाळी आली याचा अर्थ ती मुलगी मोठी झाली. तिच्या कडे बाळ जन्माला घालण्याची शक्ती आली."

छोटूला आताहे सिक्रेट अजिबात भारी वाटत नव्हतं, तर थोडंसं भीतीदायक वाटत होतं त्याने परत प्रश्न केला

छोटू -"आई मग हे रक्त बाहेर कुठून येतं?"©® राखी भावसार भांडेकर.


*******************************************************
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//