किमयागार अंतीम भाग

Story Of A Brother


घराला घरपण यावं म्हणून नाना जोशींनी लग्न केलं. पण नानांची भगिनी मधुरा हीच तिच्या वहिणीशी पटतं की नाही आणि नाना हा तिढा कसा सोडवतात ते बघूया या भागात…


वहिणीच्या हातचा खायचं नाही असा मी हट्ट केला की, नाना माझ्यासाठी दुसरी भाजी करून न बोलता शाळेत निघून जायचा, तेव्हा मात्र मला खूप त्रास व्हायचा. पण वहिनी मला कधीही रागवली नाही. गिरिजा वहिनीने तिच्या संयमी, प्रेमळ स्वभावाने मला केव्हाच जिंकून घेतलं होतं. मीरा च्या वेळी वहिनी गर्भवती असताना मात्र मी, नाना आणि नितीन यांनी वहिणीची खूप काळजी घेतली. पण तरीही माझा स्वभाव ओळखून वहिनी जरा काळजीतच होती पण मीरा झाल्यावर नाना म्हणाला होता, \" मधुरा तुला खेळासाठी सोनेरी केसांची बाहुली आणली आहे.\" मग मीच वहिनीची आणि मीरा ची खूप काळजी घ्यायची, आणि मी, मीराचे खूप खूप लाड करायची

मी, नाना, नितीन, गिरीजा वहिनी, नारायण - नानांचा मुलगा आणि मीरा त्यामुळे घरचा खर्च वाढत होता , वाढत्या खर्चाला हातभार लावायचा म्हणून गिरीजा वहिनीने गृह उद्योग सुरू केला. तिच्या हातचे मसाले, लोणची ,पापड यांची चव काही औरच होती, आणि त्यासाठी लागणारा कच्चामाल नाना आणून द्यायचा आणि तयार झालेला मालही शहरात नेऊन मोठ्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये तोच नेऊन विकायचा. नाना वरचा भार कधी हलका झाला असं वाटलंच नाही , पण मग जेव्हा नितीन इंजिनियर होऊन नोकरीला लागला , आणि नारायणनेही आर्किटेक केले, तेव्हा मात्र नाना खऱ्या अर्थाने भरून पावला. आमच्या सोबत राहणारा नंदू आता एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करतो आहे.


पाटलांच्या इच्छेखातर, आणि नंदूच्या अर्थसाहाय्याने पाटलांनी दिलेल्या पाच एकराच्या जागेवर नानांनी एक शाळा बांधली आहे. आणि बाजूलाच गरिबांच्या मुलांसाठी होस्टेलची ही सुविधा केली आहे.


नानांचा आदर्श डोळ्यासमोर असल्याने, मी पण शिक्षिका झाले. मला पण आता अनेक मुलांचे जीवन घडवायचे आहे. त्याकरिता नानांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.


माझ्या लग्नाच्या वेळी नाना किती उत्साही होता आणि पाठवणी करताना त्याची किती घालमेल झाली होती, हे मी शब्दात सांगू शकत नाही. जे प्रेम त्याने मीराला दिले कदाचित काकणभर जास्तच प्रेम नानाने मला दिले आहे. प्रत्येक वेळी आवश्यक नाही की, आपण मुलांना जन्मच द्यायला हवा. नानाने आपल्या भावंडांवर डोळस प्रेम करून असे एक अनोखे उदाहरण आपल्या समोर उपस्थित केले आहे नाही का? धन्यवाद!

मधुराने लिहिलेल्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचून, नानांच्या डोळ्यात दोन अश्रू आले, ते त्यांनी टिपले आणि नानांचा सत्कार समारंभ संपला.


ग्रंथतुलातले सगळे ग्रंथ शहरातल्या एका महाविद्यालयाला दान म्हणून देण्यात आले, शर्करा गावातल्या मुलांच्या होस्टेलला देण्यात आली आणि नाणे तुलातले नाणे ही शहरातल्या वृद्धाश्रमाला देणगी म्हणून देण्यात आले.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.





🎭 Series Post

View all