(वाचक मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक रूपककथा, ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुमचे अभिप्राय आणि मतं नक्की नोंदवा)
ती अगदी साधी , सरळ, नाकासमोर चालणारी मध्यमवर्गीय घरातली आज्ञाधारक मुलगी. आपण भलं आणि आपलं काम भलं . "साधी राहणी आणि उच्च विचार" या विचारसरणीची, नियमित शाळा, कॉलेजात जाऊन स्वतःचा गृहपाठ करणारी, अभ्यासु मुलगी . शिक्षकांकडून प्रश्नांच शंकानिरसन करून घेणारी , स्वतःची दैनंदिन वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळण्याचा प्रयत्न करणारी.
तिच्याविरुद्ध तो! उनाड, हिप्पि कट, फंकी कपडे घालणारा , गळ्यात गिटार लटकवून संगीताची आराधना करणारा - एक टारगट आणि टपोरी मुलगा. त्याच्यासाठी शाळा-कॉलेज म्हणजे फक्त मज्जा , मस्ती आणि मित्रांबरोबर मौज करण्यासाठी असणारी हक्काची जागा-आणि याच धारणेत तो मोठा झालेला.
या अती लाडावलेल्या मुलाने उगवणारा सूर्य कधी पाहिलाच नाही. त्याच्यासाठी फक्त रात्र महत्त्वाची ! पार्ट्या ,मैफिली , जलसे यातच रममाण होणारा तो ,थोडक्यात अतिश्रीमंत बापाचं वाया गेलेलं पोर.
ती कॉलेजच्या दुसर्या वर्षाला होती तेव्हाची गोष्ट , कॉलेजच्या वार्षिकोत्सवात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात,कथ्थक डान्स ग्रुप मध्ये ती आणि तिच्या मैत्रिणींनी भाग घेतला होता. तोही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसर्या वेस्टर्न ग्रुप मध्ये होता. पण एकदम काय झालं कुणास ठाऊक? "वेस्टर्न ग्रुप" मधली मुलं आणि "कथ्थक ग्रुप" मधल्या मुली यांचं अचानक भांडण सुरु झालं .हमरीतुमरीवर गोष्ट आली, शेवटी सुपरवायझर सरांनी हस्तक्षेप केल्यावर तो वाद बंद झाला. पण संपूर्ण वार्षिकोत्सवात दोन्ही ग्रुपचं एकमेकांना टाॅन्ट मारणं सुरुच होतं. शेवटच्या दिवशी लास्ट इयर च्या मुलांना सेंड ऑफ होता, त्यावेळी ती एकटक त्याच्याकडे पहात होती ! अगदी डोळ्याची पापणी ही लवत नव्हती तिची!!
तिच्या मैत्रिणींनं चिमटा काढल्यावर ती भानावर आली, आणि थोडीशी गोंधळी सुद्धा . रात्री घरी बिछान्यावर पडल्या पडल्या \"ती\" "त्याचाच" विचार करत होती.
"कसा दिसतो तो? एकदम टपोरी ,मित्र हि तसेच टवाळखोर. काय ती फाटकी जीन्स ! काय ते अर्धे उघडे टी-शर्ट !! काय ते फन्कि शूज !!!आणि केसाचा तर विचारूच नका .पण तरीही \"तो\" "तिच्या" मनात घोळत राहिला.
दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत "तो" अचानक आला. "तिच्या" जवळ खुर्ची ओढून बसला. पुस्तक वाचण्याच्या बहाण्याने "तिच्याकडे" एकटक बघत होता. "ती" प्रथम घाबरली मग बावरली आणि पुस्तक गोळा करून लायब्ररीतून बाहेर पडली.
त्याने तिचा चौकापर्यंत पाठलाग केला आणि मग मागे फिरला . हे पाठलाग प्रकरण जवळपास महिनाभर चाललं .त्यानंतर दोन तीन दिवस "ती" कॉलेजमध्येच आली नाही. हा पण कासावीस झाला . चौथ्या दिवशी \"ती\" दिसली \"त्याला\" हायसं वाटलं.
तो परत तिच्या मागे कॉलेज लायब्ररी मध्ये गेला . तिने सगळे पुस्तक परत केले आणि घराचा रस्ता धरला . तर यानं तिला अडवलं आणि म्हटलं , "बोलायचं आहे मला" ती मुकाट्याने त्याच्या मागे कॉलेज कॅन्टीन मध्ये गेली. त्याने हिला सरळ सांगितलं ,"तू आवडतेस मला , माझा जीव जडला तुझ्यावर" पण ती शांत होती , खिन्नपणे म्हणाली, "हो मला माहिती आहे". "मला पण तु खुप खुप आवडतोस , अगदी शाळेतल्या दिवसांपासून" , "तुला कदाचित मी आठवतही नसेल पण त्या न कळत्या वयातही मी तुझ्यावर खुप खुप प्रेम करायचे" त्याचा चेहरा आनंदाने उजळला ,तेवढ्यात ती म्हणाली "माझं तुझ्यावर आताही तेवढच प्रेम आहे", तिच्या होकरा नं तो सुखावला.
************************************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा