Love Triangle अंतिम भाग

It Is A Love Story Of Three People Who Loves Each Other Very Much


त्याच्या सोबत चा क्षण अन क्षण ती जगून घ्यायची.
एकदा ते दोघं असेच पार्कमध्ये बोलत बसले होते,

ती- "माझं तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे".


तो "मला ही तू खूप खूप आवडते ,माझ्या संगीताची प्रेरणा तूच आहेस ,तुझ्या मुळे मला माझं अस्तित्व कळलं".

ती -"मला तुझ्याबरोबर जगायचं आहे संपूर्ण आयुष्य तुझ्या सहवासात राहायचं आहे".

तो -"तू भेटल्यामुळे मला जगण्याचा आधार मिळालेला आहे".


ती - "मला माझ्या वैवाहिक आयुष्यात परत जायचं नाही ,त्या कंटाळवाण्या जगण्याची शिसारी येते मला. मी परत जाणार नाही! मी निर्णय घेतला आहे, मी तुझ्याच सोबत राहणार ,आयुष्याची उरली वाट मला तुझ्या सहवासातच पूर्ण करायची आहे".तेवढ्यात तिचा नवरा तिथे आला.....


नवरा-"अग तू हे काय बोलते आहे ?तुला मी आवडत नाही! तुला माझा कंटाळा आला आहे का"?


ती-"हो, नाही आवडत तुम्ही मला! मी नाही येणार तुमच्या बरोबर घरी!! मी आता याच्या सोबतच राहणार आहे".


तो- "अगं असं काय करतेस मान्य आहे की , मी तुझ्यावर प्रेम करतो पण, तुझ्या पती मुळे तुला समाजात जी प्रतिष्ठा, जो मान मीळतो तो माझ्या सह नाही मिळणार. मी तुला कसं सांगू? अगं मी एका ठिकाणी फार काळ थांबूच शकत नाही ,घर ,संसार, गृहस्थी ह्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. जा तु!आपल्या वैवाहिक आयुष्यात परत जा!! माझ्यासह येशील तर मनस्ताप शिवाय दुसरं काहीही मिळणार नाही!!!


नवरा-"मान्य आहे की मी तुला वेळ देऊ शकलो नाही. आपलं नातं उमलायला , फुलवायला, मी काही प्रयत्नच केले नाहीत. मी क्षमा मागतो तुझी आयम सॉरी वचन देतो मी , तुला आणि आपल्या नात्याला नक्की वेळ देईन .तुझी मनापासून काळजी घेईलं.


तिनेही मनात क्षणभर विचार केला, खरंच आपण समाजाच्या बेड्या तोडू शकतो का? नाही! तो कितीही आवडत असला तरीही आपण आपलं वैवाहिक आयुष्य सोडू शकत नाही !.शेवटी "तो" म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय गृहिणी साठी "मृगजळच" आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनात परतायला हवं आणि ती आपल्या नवऱ्याकडे परत जाते.


*********************************************
या कथेतील पात्र-

तो- (सर्व चाकरमानी लोकांचा आवडता सुट्टीचा दिवस -रविवार).


ती-सर्व सामान्य नोकरदार जनता.

नवरा- (सामाजिक ,आर्थिक, कौटुंबिक प्रतिष्ठा, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य).


©® राखी भावसार भांडेकर.


(मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली त्याबद्दल आपली मतं आणि अभिप्राय नक्की नोंदवा)

🎭 Series Post

View all