ती तिच्या नोकरीत आता स्थिरस्थावर झाली होती. तेवढ्यात तिच्या वडिलांना हार्टअटॅक आला, त्यामुळे आता घरच्यांना तिच्या लग्नाची घाई झाली होती. हिनं आईजवळ विषय काढला -त्याचा! एकंदरीतच दोघांचीही आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती फारच भिन्न होती ,त्यामुळे आई नकारच देईल याची तिला शाश्वती होती आणि झालंही अगदी तसेच! आईनं तिला समजावलं , परिस्थितीची जाणीव करून दिली , एकंदरीत सगळा विचार करून , आणि वडलांवर असणाऱ्या प्रेमाखातर तीनं अरेंज मॅरेज केलं
तसं तिचं वैवाहिक आयुष्य ठीकच होतं ,चार-चौघांसारखं. सासरीही तिच्यावर जबाबदाऱ्या होत्या दिर -नंणदांच्या, सासू-सासऱ्यांचं हि करावं लागे, नवराही त्याच्या व्यापात गुंतलेला. चार दोन क्षण निवांत पणाचे भेटले तर भेटले नाही तर नुसतं कॅलेंडरची पानं बदलणं सुरू होतं. त्याच त्या रटाळ आयुष्याला ती कंटाळली ,पण तिचा नवरा मात्र चिडका, हेकेखोर आणि जरा विचित्रच ,त्याच्या वक्तशीरपणा पुढे साऱ्यांनीच हात टेकले. सकाळी उठण्याच्या वेळेपासून , रात्री झोपेच्या वेळेपर्यंत त्याचे वेळापत्रक अगदी ठरलेलं , कधी पाच मिनिट हि इकडेतिकडे झालेले त्याला खपत नसे. त्याचा अबोल,शिस्तप्रिय स्वभाव, यामुळे ती त्याच्यासमोर कधी व्यक्तच झाली नाही!
.
एकदा आँफीस मधुन परततांना मैत्रीणींनी तिला जबरदस्तीने शहरातल्या तलावाकाठी असणाऱ्या चौपाटीवर नेलं. तलावाच्या आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य बघून ही पण तिथे रमली. बोटिंग, पाणीपुरी , पॅटीस सगळं मस्त एन्जॉय करताना पलीकडे तिला ओळखीचे सूर ऐकु आले , तिने तिकडे पाहिले तर तोच ! मग त्याचा परफॉर्मन्स संपल्यावर ती त्याला भेटली.
सुरुवातीला दोघही जरा गोंधलेले पण मग नंतर छान बोलले , जुजबी प्रश्न आणि त्यांची हो-नाही चे उत्तर , पुन्हा भेटण्याचे ठरवून दोघेही आपापल्या घरी परतले.
आताशा त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. त्याच्या सहवासात ती उमलू लागली , फुलू लागली , त्या नादात मग छान छान कपडे , सँडल्स आणि इतर खरेदी वाढली . घराकडे ही जरा दुर्लक्षच होत होतं पण ही आता जरा निर्धास्त होती .
©® राखी भावसार भांडेकर.