दि लूप होल सिझन 2 भाग 33(अंतिम)

This Is A Sospens Story


अभिज्ञा बेशुद्ध झाली आणि सगळे घाबरले. अगम्य घाबरून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. सगळ्यांनी तिच्याकडे धाव घेतली. राहुल आणि मीरा ही पूजेतून उठणार तर अहिल्याबाई त्यांना थांबवत म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ राहुल! मीरा तुम्ही अजिबात पूजेतून उठणार नाही आहात! गेल्या वेळी आपण हीच चूक केली म्हणून तर सूर्यकांत परत येऊ शकला! अभिज्ञाची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे विधी पूर्ण केल्या शिवाय उठणार नाही आहात!”


त्यामुळे राहुल आणि मीरा पुन्हा विधी करू लागले.डॉक्टरांना आधीच बोलवून ठेवल्यामुळे डॉक्टर तिथेच होते. ते अभिज्ञाला तपासात म्हणाले.

डॉक्टर,“ आपण यांना वर घेऊन जाऊ म्हणजे मला त्यांना व्यवस्थित तपासता येईल!”

अगम्यने अभिज्ञाला दोन हातावर उचलले व तो तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला. डॉक्टर तिला तपासात होते आणि अहिल्याबाई, अभिज्ञाची आई-बाबा आणि अगम्य चिंतीत होते.डॉक्टरांनी तिला तपासले आणि ते खुश होत म्हणाले.

डॉक्टर,“ अभिनंदन आऊ साहेब तुम्ही पुन्हा एकदा आजी होणार आहेत!”

हे ऐकून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद खुलला. तरी अगम्यने काळजीने विचारले.

अगम्य,“ पण काळजी करण्याचे काही कारण नाही ना?”

डॉक्टर,“ नाही काळजेचे काही कारण नाही! त्यांना ट्रेस आल्यामुळे बेशुद्ध झाल्या आहेत! थोड्या वेळात शुद्धीवर येतील!”

हे ऐकून अगम्य आणि सगळ्यांनाच बरं वाटलं. अगम्य बेड वरून उठला पण त्याला चक्कर आल्यामुळे त्याचा तोल गेला. त्याला अहिल्याबाईनी पुढे येऊन सावरले आणि सवरताना त्यांचा हात त्याच्या पाठीवर गेला. त्यांच्या हाताला काही तरी ओलसर चिकचित लागले म्हणून त्यांनी अगम्यच्या पाठीकडे पाहिले तर त्याचा पांढरा कुर्ता पूर्ण रक्ताने लाल झाला होता. घाबरून कुठे लागले आहे त्यांनी पाहिले तर अगम्यच्या डोक्याला मागच्या बाजूला खोप पडली होती आणि त्यातून रक्त गळत होते. अगम्यच्या दंडाला देखील बरच लागलेल दिसत होतं. अगम्यला आता गरगर होते. अहिल्याबाई घाबरल्या आणि त्या डॉक्टरांना म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ डॉक्टर अगम्यच्या डोक्याला आणि दंडाला देखील खूप लागले आहे.”

डॉक्टरांनी अगम्यला खुर्चीवर बसवले आणि त्यांनी त्याच्या जखमा पहिल्या. त्यांनी लगेच त्याच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि त्याचा बी.पी तपासला. त्याचा बी.पी पाहून ते काळजीत पडले आणि अहिल्याबाईना म्हणाले.

डॉक्टर,“ आऊ साहेब! सरांचा बी.पी. खूप वाढला आहे आणि रक्तस्त्राव ही खूप झाला आहे. मी हॉस्पिटलमध्ये फोन करून नर्स आणि वॉर्डबॉयला काही औषधे आणि ड्रीप घेऊन बोलावतो आपल्याला त्यांना दुसऱ्या रूममध्ये न्यावे लागेल!”

अभिज्ञाची आई,“काय? काळजी करण्या सारखे काही आहे का डॉक्टर अमूला काही होणार नाही ना?मागच्या वेळी तो लूप होल मधून बाहेर आल्यावर मरणाच्या दारात पोहोचला होता!” त्यांनी रडतच विचारले.

अगम्य,“ आई मी ठीक आहे! इतकं काही झालं नाही मला!” तो खुर्चीवर बसून हळू आवाजात बोलत होता.


डॉक्टर,“ सर तुम्ही चला प्लिज दुसऱ्या खोलीत मी फोन करून आलो!” ते म्हणाले

आणि अभिज्ञाच्या बाबांनी आणि अहिल्याबाईनी त्याला अहिल्याबाईच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवले. डॉक्टरांनी फोन केला आणि विसच मिनिटात एक नर्स आणि वॉर्डबॉय काही समान घेऊन वर गेले. ते पाहून राहूल आणि मीरा देखील घाबरले होते पण पूजा पूर्ण झाल्या शिवाय ते उठू ही शकत नव्हते.

डॉक्टरांनी अगम्यला लगेच ड्रीप लावली आणि कसलीशी दोन इंजेक्शन्स दिली. त्यामुळे तो थोड्याच वेळात झोपला.अहिल्याबाई आणि अभिज्ञाचे बाबा तिथेच चिंताक्रांत स्थितीत थांबले होते. अहिल्याबाईंचा आता धीर खचला होता. त्यांनी रडतच डॉक्टरांना विचारले.

अहिल्याबाई,“ डॉक्टर माझ्या अमूला काही होणार तर नाही ना? मी नाही सहन करू शकणार आता त्याला काही झालेले!”

डॉक्टर,“ आऊ साहेब तुम्ही शांत व्हा! अगम्य सरांना काही नाही होणार! त्यांच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे आणि त्यातून बराच ब्लडलॉस झाला आहे त्यामुळे त्यांना विकनेस आला आहे आणि ट्रेसमुळे बी.पी वाढला आहे! पाच-सहा दिवस आराम केला की ते बरे होतील! काळजी करण्या सारखे काही नाही! थोड्या वेळाने त्यांना काही तरी खायला द्या आणि मी दिलेली मेडिसीन्स ही द्या आणि मॅडमला ही मी काही मेडिसीन्स देत आहे ती खायला घालून द्या! नर्स रात्र भर इथेच राहील चार ड्रीप लावू आपण सरांना त्यामुळे त्यांना लवकर बरं वाटलं! बाकी मॅडमला उद्या किंवा परवा हॉस्पिटलमध्ये घेऊन या आपण सोनोग्राफी करू कदाचित तीन महिन्यांची प्रेग्नन्सी आहे. आता तर सगळं ठीक दिसत आहे तरी ही बाळाची ग्रोथ वगैरे सगळं तपासून घेऊ आपण सोनोग्राफी करून! बरं मी निघतो! दोघांची ही काळजी घ्या आणि शक्य तो आठवडा भर आराम करू द्या मी उद्या सरांना पाहायला येईनच!” त्यांनी सविस्तर सगळं सांगितले आणि नर्सला काही इन्स्ट्रक्शन देऊन ते निघून गेले.

डॉक्टरांच्या बोलण्यामुळे अहिल्याबाई आणि अभिज्ञाचे बाबा यांचा जीव भांड्यात पडला. इकडे पूजा आटोपली आणि मीरा-राहुल पळतच वर आले तर अहिल्याबाई अगम्यच्या जवळ त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बसल्या होत्या. अभिज्ञाचे बाबा अभिज्ञाच्या आईला अगम्यबद्दल आणि अभिज्ञाबद्दल डॉक्टरांनी काय सांगितले ते सांगायला गेले होते. राहुलने अहिल्याबाईना काळजी विचारले.

राहुल,“ काकू अभी ठीक…… आणि अम्याला काय झाले!” तो अभिज्ञा विषयी चौकशी करत होता पण अगम्यला असे झोपलेले पाहून त्याने काळजीने विचारले.

अहिल्याबाई,“ राहुल अरे काळजी नको करू दोघे ही ठीक आहेत. अगम्यला थोडं लागलं आहे बाकी काही नाही आणि अभिज्ञा पण ठीक आहे. तू पुन्हा एकदा काका होणार आहेस!”त्या आनंदाने म्हणाल्या.

राहुल,“ काय म्हणजे अभी…” तो आश्चर्य मिश्रित आनंदाने म्हणाला.

अहिल्याबाई,“ हो अभी आई होणार आहे!”

मीरा,“ अरे वा! एक तर इतके मोठे संकट टळले आणि ही आनंदाची बातमी मिळाली देवच पावला म्हणायचा! ताई कुठे आहे आऊ?” तिने विचारले.

अहिल्याबाई,“ त्यांच्या रूममध्ये! मीरा बेटा एक काम करशील का? अभीला पाहून खाली जा आणि आपल्यासाठी स्वयंपाक!बाबांच्यासाठी सात्विक आहार आणि अमू-अभीसाठी भाताची खिचडी करायला सांग बाईला! मी ही येतेच खाली!” त्या म्हणाल्या.

मीरा,“ हो आऊ मी ताईला पाहते आणि लगेच खाली जाते.” ती म्हणाली आणि गेली.

राहुल अगम्य जवळ खुर्चीवर बसला. अहिल्याबाईंनी अगम्यला नीट पांघरून घातले त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून राहुल म्हणाला.

राहुल,“ काकू आता रडू नका! सगळं व्यवस्थित पार पडले आहे आणि त्या सुर्यकांतचा कायमचा बंदोबस्त झाला आहे! अगम्य आणि अभिज्ञा देखील ठीक आहेत ना मग कशाला रडायचे! मी आहे इथे तुम्ही जा खाली बाबा एकटेच आहेत!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ हो रे माझ्या अमूवर आलेलं आणखीन एक गंडांतर आज टाळले! मी जाते खाली!” त्या म्हणाल्या आणि डोळे पुसत निघून गेल्या.

हे सगळं होई पर्यंत रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते. अहिल्याबाईनी सांगितल्या प्रमाणे मीराने किचनमध्ये जाऊन बाईला सूचना दिल्या होत्या. अज्ञांकला तिने गोड बोलून खायला घातले आणि झोपवले. तिचे बाळ देखील झोपले होते. बाबा अहिल्याबाईंचीच वाट पाहत होते. अहिल्याबाई आल्या आणि त्यांना पाहून बाबा म्हणाले.


बाबा,“ सब ठीक है माई!आता चिंता करण्याची गरज नाही! आम्हाला आता आज्ञा द्या!”

अहिल्याबाई,“ इतक्या रात्री कस जाणार बाबा तुम्ही? आज मुक्काम करा आणि उद्या जा!”

बाबा,“ आमच्या सारख्या वैरागी माणसांना क्या दिन और क्या रात! आम्हाला एका ठिकाणी इतका वेळ थांबता येत नाही! आमचं काम झाले आम्ही निघतो!”

अहिल्याबाई,“ बरं मग जेवण करा मी ड्रायव्हरला तुम्हाला कुठं पर्यंत जायचं तिथं पर्यंत सोडायला लावते!” त्या म्हणाल्या.

बाबा,“ ठीक हैं!”ते म्हणाले


थोड्याच वेळात स्वयंपाक झाला आणि बाबा निघून गेले. इकडेवर अभिज्ञाला शुद्ध आली आणि इकडे तिकडे पाहत काही तरी आठवून घाईतच उठली. तिची आई तिच्या जवळच बसून होती.

आई,“ अग अभी हळू बेटा आता सगळं जपून करायचं!” त्या काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होत्या.

अभिज्ञा,“ आई अगम्य कुठे आहे? त्याच्या दंडाला खूप लागलं आहे? कुठे आहे तो?” ती इकडे तिकडे त्याला शोधत बोलत होती.

आई,“ अभी तू शांत हो आधी! तो ठीक आहे आणि ताईंच्या रूममध्ये झोपला आहे! तू उगीच टेन्शन घेऊ नकोस अग तू आता पुन्हा आई होणार आहेस!” त्या तिला समजावत बोलत होत्या.

अभिज्ञा,“ काय?” तिने विचारले.

आई,“हो कदाचित तीन महिने झाले असतील असे डॉक्टर म्हणत होते! उद्या किंवा परवा हॉस्पिटलमध्ये बोलवले आहे सगळे चेकअप करायला!” त्या आनंदाने सांगत होत्या.

अभिज्ञा,“ आsss हा! अगम्यला माहीत आहे का हे?” ती लाजून मान खाली घालत म्हणाली.

आई,“ हो माहीत आहे त्याला!”

अभिज्ञा,“ मला त्याच्या जवळ जायचं आहे आई! त्याला पाहिल्या शिवाय माझं समाधान नाही होणार!” ती म्हणाली.

आई,“ बरं चल!”

असं म्हणून त्या तिला अहिल्याबाईच्या रूममध्ये घेऊन गेल्या. राहुल अगम्य जवळ बसून होता. नर्स तिथेच होती. अगम्यच्या डोक्याला बांधलेली पट्टी आणि त्याला लावलेली ड्रीप तसेच नर्सला तिथे पाहून अभिज्ञा घाबरली. तितक्यात खालून अहिल्याबाई आणि मीरा दोघांसाठी भाताची खिचडी घेऊन आल्या होत्या.

अभिज्ञा,“ आई अगम्यला काय झालंय खरं खरं सांग! तू तर म्हणाली तो ठीक आहे मग त्याला ही ड्रीप, डोक्याला कधी लागलं याच्या?” ती काळजीने त्याच्या जवळ जात बोलत होती.

अहिल्याबाई,“काही नाही झालं त्याला तो ठीक आहे अभी! आता त्याच्या डोक्याला काय लागलं तोच सांगू शकेल! काळजी करण्या सारख काही नाही! त्याचा ब्लड लॉस झाला आहे थोडा म्हणून ड्रीप लावली आहे! तू पॅनिक नको होऊस ते तुझ्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी देखील चांगलं नाही!मीरा खिचडीच्या प्लेट्स ठेव इथे! नर्स तुम्ही आमच्या बरोबर जेवायला चला. अभी अमूला उठाव आणि त्याला खिचडी खायला घाल आणि तू ही खा!थोड्या वेळाने दोघांना ही औषधे देते मी!आपण सगळे जेवयला जावू!” त्या म्हणाल्या आणि सगळे त्यांच्या मागे निघाले.

अभिज्ञा,“ आऊ अदू कुठे आहे?”तिने विचारले.

अहिल्याबाई,“ तो जेवण करून झोपला आहे ताई-दादांच्या रूममध्ये!” त्या म्हणाल्या आणि सगळे निघून गेले.

अभिज्ञाने दार लावून घेतले आणि डोळ्यातील पाणी पुसून ती अगम्य जवळ बसली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उठवू लागली.

अभिज्ञा,“अगम्य उठ! थोडं खाऊन घे! मेडिसीन्स घे मग झोप!” ती आवंढा गिळत म्हणाली

तिच्या मनात येऊन गेले की“ आपण किती मोठे तोंड करून आऊला शब्द दिला होता की अगम्यला काही होऊ देणार नाही पण आपण कुठे पाळू शकलो आपला शब्द? त्याच्या सोबत असून देखील त्याला किती लागलं आहे” या विचारने न कळत तिचे डोळे वाहत होते. तिच्या उठवण्यामुळे जाग्या झालेल्या अगम्यकडे तिचे लक्षच नव्हते.

अगम्य उठून बसण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमत नव्हते. त्याच्या चुलबुळीमुळे अभिज्ञा भानावर आली आणि ती त्याला उठवून बसायला मदत करत म्हणाली.

अभिज्ञा,“ कस वाटतंय अमू तुला?”

अगम्य,“ मी ठीक आहे!” तो बेडला टेकत म्हणाला.

अभिज्ञा,“ तुझ्या डोक्याला काय आणि कसं लागलं?” तिने त्याच्या पट्टी बांधलेल्या कपाळावरून प्रेमाने आणि काळजीने हात फिरवत विचारलं.

अगम्य,“ खरं तर मला पण नाही कळलं पण त्या घरातून बाहेर पडताना चौकट लागल्याचं आठवतं! तू ठीक आहेस ना!” त्याने विचारले.

अभिज्ञा,“नीट पाहून चालता येत नाही का? आपण लंबू आहोत हे विसरून कसे चालेल! मी ठीक आहे!तू खिचडी खा आऊ येतील आत्ता मेडिसीन्स द्यायला!” ती खिचडीचे झाकून ठेवलेले ताट त्याच्या पुढ्यात ठेवून चमच्याने त्याला खिचडी भरण्याच्या तयारीत म्हणाली.

अगम्य,“ मला तुझ्याशी बोलायचं नाही! मी खाईन स्वतःच स्वतः तू जा!” तो तोंड फुगवून म्हणाला आणि अभिज्ञाला आता रडू आवरणे अशक्य झाले ती रडत म्हणाली.

अभिज्ञा,“ sorry ना! मी आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याशी खोटं बोलले असेन पण मी तरी काय करणार होते! तू मला त्या लूप होलमध्ये घेऊन जायला तयार नव्हतास आणि मला तुला या वेळी एकटं सोडायच नव्हतं म्हणून मी…! ती पुढे बोलणार तर अगम्य तिचे बोलणे मध्येच तोडत बोलू लागला.

अगम्य,“ म्हणून तू मला खोटं बोलून माझ्या मागे आलीस! तुला काही झालं असत तर?” तो रागाने बोलत होता.

अभिज्ञा,“ उगीच चिडचिड करू नकोस आता एकतर अजून बी.पी वाढलं आहे तुझं आणि काही नाही झालं मला! उलट तुलाच लागलं आहे किती बघ जरा! तुला काही तरी सांगायचं आहे!” ती म्हणाली.

अगम्य,“हो ना काही झालं नाही म्हणून ट्रेस सहन न होऊन बेशुद्ध पडलीस आणि तुला जे सांगायचं आहे ना ते मला माहित आहे!” तो हसून तिला पाहत म्हणाला आणि अभिज्ञा त्याच्या मिठीत शिरली.

अभिज्ञा,“ मला तर माहीत ही पडलं नाही या वेळी!” ती लाजून त्याला मिठी मारून बोलत होती.

अगम्य,“ कसं माहीत पडणार किती काय-काय सुरू होत आपल्या आयुष्यात! अभी या वेळी मात्र मला मुलगी हवी अगदी तुझ्यासारखी!” तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला.

अभिज्ञा,“ वेडा कुठला! ते काय माझ्या हातात आहे का?मला तर वाटलं होतं साहेब आता कमीत कमी महिना भर तोंड फुगवून बसतील मी ऐकलं नाही म्हणून पण!” ती लाडीकपणे बोलत होती.

अगम्य,“ मी तर ठरवलं होतं की तुझ्याशी चार-पाच महिने बोलायचं नाही! नाही तर पुण्याला जाऊन राहायचं पण तू बातमीच अशी दिली की…” तो तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा हाताने वर करत म्हणाला.

अभिज्ञा,“ हो का? पण तुला असं सोडलं असतं का? आला मोठा पुण्याला राहायला जाणारा!” ती म्हणाली.

अगम्य,“ पण अभी तू खुश आहेस ना या बातमीने?” त्याने विचारले.

अभिज्ञा,“ म्हणजे काय खूप खुश आहे मी अज्ञांकच्या वेळी जे क्षण आपल्याला एकत्र जगता आले नाहीत ते आता जगता येतील आणि thanks इतकी सुंदर भेट दिल्या बद्दल!” ती त्याच्या चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.

अगम्य,“ अच्छा तू मला thanks म्हणणार का आता?खरं तर मला तुझा खूप राग आला आहे पण आता मी काहीच बोलू शकत नाही! इथून पुढे काळजी घ्यायला हवी! तू आता ऑफिसला येणार नाही! घरातच राहायचं आणि आपण आता खाली शिफ्ट होऊ म्हणजे पायऱ्या चढाव्या लागणार नाही! आता आदूला उचलून घ्यायचं नाही! आदू कुठे आहे ग?” तो बडबडत होता पण त्याला आता दमल्या सारखे झाले.

अभिज्ञा,“ बास झाले बोलणे! आणि तो म्हणशील तसं होईल सगळं! तू शांत राहा! आदू आई-बाबांच्या रूममध्ये झोपला आहे. जाग आली तर मीरा आणून सोडेल त्याला माझ्या जवळ!तू आधी खिचडी खा थंड झाली बघ!” ती बोलत होती आणि कोणी तरी दार वाजवले.

अभिज्ञाने दार उघडले तर अहिल्याबाई, अभिज्ञाचे आई-बाबा, राहुल-मीरा सगळेच होते.


अहिल्याबाई,“ हे काय तुम्ही दोघांनी ही अजून खिचडी खाल्ली नाही! अमू बच्चा कसं वाटतंय तुला आता?” त्यांनी त्याच्या जवळ बसत कातर आवाजत विचारले.

अगम्य,“ आऊ मी ठीक आहे काही नाही झालं मला आणि आता प्लिज तू रडू नकोस आता तर मला thanksम्हणा तुम्ही सगळेच!” तो सगळ्यांना पाहत म्हणाला.

अहिल्याबाई,“ते आणि का?” त्यांनी आश्चर्याने विचारले.

अगम्य,“ अरे तू, आई-बाबा पुन्हा आजी-आजोबा होणार आणि राहुल्या तू आणि मीरा काका-काकू!” तो मिश्किलपणे हसत म्हणाला आणि अभिज्ञाला मात्र लाजल्याहुन लाजल्या सारखे झाले ती त्याच्याकडे लटक्या रागाने पाहत म्हणाला.

अभिज्ञा,“निर्लज्ज कुठला!”

आणि सगळेच हसायला लागले.
★★★★


आज ती घटना घडून दोन आठवडे झाले होते आणि अगम्य पूर्णपणे बरा होऊन ऑफिसला जायला लागला होता. अभिज्ञाला मात्र त्याने आता सक्तीने घरी बसवले होते. तो आणि बाकी सगळेच अभिज्ञाची योग्य ती काळजी घेत होते. राहूल आणि मीरा अजून ही तिथेच होते. आज सकाळी अहिल्याबाईनी सत्यनारायणाची पूजा आणि संध्याकाळी पार्टी ठेवली होती. मुंबईवरून केदार आणि सोनिया देखील येणार होते. सगळ्यांना आधीच आमंत्रण गेली होती.

सकाळी अहिल्याबाईंची लगबग सुरू होती. सगळी तयारी नीट झाली का ते त्या पाहत होत्या. सगळी तयारी झाल्याची खात्री त्यांना गुरुजींनी करून दिली आणि अगम्य-अभिज्ञा पूजेला बसले. पूजा व्यवस्थित पार पडली आणि संध्याकाळच्या पार्टीची तयारी झाली का ते अगम्य बाहेर पाहत होता.या सगळ्यात दिवस कधी निघून गेला कळलेच नाही.सगळे पार्टीसाठी तयार व्हायला गेले. अभिज्ञाने पहिल्यांदा अज्ञांकला तयार केले आणि त्याला रूम बाहेर पाठवून दिले.तिने नुसतीच साडी नेसली होती. तिची तयारी अजून बाकी होती. अगम्य आरशात पाहून टाय बांधण्याचा प्रयत्न करत होता. अभिज्ञा ते पाहून हसत होती.

अगम्य,“ तू हास नुसती पण मला मदत करू नकोस!” तो लटक्या रागाने म्हणाला.

अभिज्ञा,“ दे बांधून देते टाय!” ती म्हणाली आणि ती त्याला टाय बांधून देत होती तर अगम्यने मात्र तिच्या कमरे भोवती हातानी विळखा घातला.

अगम्य,“अभी तू खूप छान दिसत आहेस!”तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

अभिज्ञा,“ हुंम पण देशमुख साहेब सोडा मला! मला अजून आवरायचे आहे माझे!” ती हसून म्हणाली.

अगम्य,“ असं काय? तुला रात्री सांगतो काय ते!” तो हसून म्हणाला आणि तीच आवरू पर्यंत तिला पाहत तिथेच बसून राहिला.

दोघे ही एकदमच खाली निघाले. अगम्यने फॉर्मल ड्रेस घातला होता बेबी पिंक ब्लेझर आणि पांढरा शर्ट-पॅन्ट त्या कपड्यात तो अगदी रुबाबदार दिसत होता तर अभिज्ञाने थोडी डार्क पिंक कलरची साडी आणि त्यावर अगदी नकळत मेकअप, केस मोकळे सोडलेले आणि फक्त गळ्यात मंगळसुत्र आणि त्याला मॅच लोंबते कानातले,हातात सोन्याचे गोट घातले होते ती देखील सुंदर दिसत होती.सगळे हॉलमध्ये आले होते. दोघांना येताना अहिल्याबाईनी पाहिले आणि मोलकरणीलाकडून मीठ मिरची मागवून त्यांची नजर काढली. दोघांना अस पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ते पाहून अगम्य त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना मिठी मारली.

अगम्य,“ काय ग आऊ आता काय झाले रडायला! आता सगळं ठीक झालं आहे ना मग!”

अहिल्याबाई,“ हो बच्चा आलेलं गंडांतर गेले एकदाच कायमच!” त्या म्हणाल्या आणि बाहेरून अज्ञांक पळत आला. त्याने अगम्यला आणि अहिल्याबाईला असे पाहिले आणि तिथे येऊन तोंड फुगवत म्हणाला.

अज्ञांक,“ कला कला सगले बाबाचा लाल कला!”

हे ऐकून सगळे हसायला लागले. अगम्यने अज्ञांकला उचलून घेतले आणि तो म्हणाला.

अगम्य,“ आज पासून फक्त माझ्या अदूचा लाड करायचा सगळ्यांनी! हो ना अदू?” त्याने विचारले आणि अज्ञांकने निरागसपणे मान हलवली.

तेव्हढ्यात केदार आणि सोनिया आले. संध्याकाळी मस्त पार्टी रंगली आणि अगम्य-अभिज्ञाच्या सुखी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात झाली.
★★★★
समाप्त

©Swamini chougule 



🎭 Series Post

View all