Login

लूप होल पर्व २(भाग २४)

This is a suspens story

मागील भागात आपण वाचले
      अगम्यला कामात  मदत करायला राहुल आणि अभिज्ञा जातात आणि लंच ब्रेक पर्यंत परत येतात.सगळे जेवण करून अज्ञांकच्या पुस्तकातील गोष्टी ऐकायला बसतात.अभिज्ञा तीन कथा सांगते.एक कथा दोन सावत्र भाऊ असलेल्या राजकुमारांची असते.ज्यात राजवीर आणि रणवीर दोन भाऊ असतात.राजवीरची आई हयात नसते त्यामुळे राजाचे ही त्याच्याकडे दुर्लक्ष होते पण राज्यावर परकीय  आक्रमण होते आणि राजवीर युद्धात पराक्रम गाजवतो.दुसरी कथा आदीतीची आहे जी काका-काकू जवळ राहते तिची काकू तिला छळत असते पण तिला परी भेटते आणि यथावकाश परीमुळे तिचे लग्न एका राजकुमाराशी होते.तिसरी कथा एका रॅम्बो नावाच्या सिंहाची जो न्याय प्रिय आहे पण लांडग्याना तो राजा मान्य नाही म्हणून बाहेरून आलेल्या सिंहा हाताशी धरतात पण जंगलातले प्राणी त्यांना निकराचा लढा देतात.
    तेव्हढ्यात बाहेर सोनिया,केदार आणि मोनिका येतात 

आता पुढे

    अभिज्ञा तिघांना वाड्यात घेऊन गेली. तर त्यांना पाहून अगम्यला ही आनंद झाला.अगम्य आणि अभिज्ञा सोडून सोनिया आणि केदारला तसं कोण ओळखत नव्हतं अभिज्ञा फक्त सोनिया नावाच्या मैत्रिणीची मदत करायला मुंबईला गेली इतकंच सगळ्यांना माहीत होतं पण सोनिया कोण आहे काय आहे कोणाला ही काहीच माहीत नव्हतं म्हणून मग अभिज्ञा तिची ओळख करून देत म्हणाली.

अभिज्ञा,“ ही माझी मैत्रीण सोनिया आणि हा तिचा नवरा केदार आणि ही मुलगी मोनिका! हिचीच तर मदत करायला मी गेले होते मुबंईला! आता हिला काय कशी मदत केली ते नंतर सांगेन! बरं सोनिया मोनिका कशी आहे आता! मी ऐकलं होतं की तिला cidने शोधून काढल्या नंतर ती icu मध्ये होती आणि केदार केंव्हा आला जहाजावरून?” ती बोलत होती.

अगम्य,“ अग हो हो अभी जरा स्पीड ब्रेकर लाव तुझ्या प्रश्नांना! त्यांना श्वास तरी घेऊ दे! ते प्रवासातून आलेत त्यांना खोली दाखव त्यांना जरा फ्रेश होऊ दे!काही तरी खाउपिऊ दे! मग विचार पूस कर ग!” तो अभिज्ञाकडे तिरकस पाहत म्हणाला.

अभिज्ञा,“ अरे देवा! मी पण इतकी एक्साटेड झाले की माझ्या लक्षातच नाही आलं! चल सोनिया,केदार तुम्हाला गेस्ट रूम दाखवते! फ्रेश व्हा काही तरी खा मग बोलू आपण निवांत! काय ग मोना भूक लागली की नाही?” ती हसून म्हणाली.

मोनिका,“ हो माऊ भूक तर लागली मला!” ती म्हणाली.

     अभिज्ञाने त्या तिघांना  रूम दाखवली! तो पर्यंत सगळे आप-आपल्या कामाला निघून गेले होते.असं ही आज पुस्तका बद्दल बरच काही सांगून झालं होतं त्यामुळे अभिज्ञा ही थोडी रिलॅक्स होती आणि सोनियाला पाहून खुश! सगळे फ्रेश होऊन आले आणि मग सगळ्यांनी नाष्टा केला. मुलं खेळायच्या रूममध्ये  निघून गेली

     अगम्य,अभिज्ञा,सोनिया,केदार आणि बाकी सगळे गप्पा मारत बसले. अगम्यने मात्र न राहवून सोनियाला विचारले.

अगम्य,“ सोनिया अग तुझ्या मोनिकाला का किडनॅप केले? आणि ते तलवारीचे आणि हवेलीचे काय प्रकरण आहे ग?” त्याने विचारले.

सोनिया,“ तुला तर माहीतच आहे की पुरातन वास्तूंवर संशोधन करते आणि तसेच हवेली मध्ये ही केले होते तर अचानक एक दिवस मोनिका किडनॅप झाली कारण मी तिथं चाललेल्या बेकायदेशीर गोष्टींची वाच्छता कोठे करू नये.मग आम्ही cidची मदत घेतली आणि ते गुप्तपणे मोनिकाचा शोध घेऊ लागले पण मोनिकाला कोणी किडनॅप  केले हेच नीटसं कळत नव्हतं.पण तिथे एक तालावर होती जी ते लोक खूप पुरातन आहे असं सांगत होते आणि त्या तलवारीला कोणाला ही हात लावू देत नव्हते.मी त्यावर चोरून कार्बन टेस्ट केल्यावर मला कळले की ती पुरातन नाही तर तीन-चार वर्षांपूर्वीची आहे म्हणून मग मी ती तलवार चेक करायला आणि त्याचे रहस्य जाणून घ्यायला अभिज्ञाला बोलावले! तिने ती तलवार पाहिली त्याची चाचपणी केली तर त्या तलवारीला एक ट्रिगर आढळून आले जे दाबल्यावर खोल्या फिरत आणि तिथल्या राणीचा फोटो बोलतो असा भास होई सगळं आधुनिक तंत्रज्ञान होत ते! पण लोकांना हवेली पासून दूर ठेवण्यासाठी हे सगळं कोणी का करेल हे मात्र कोडं होत.त्याच ही उत्तर अभिनेच सोधलं आम्ही जिथे रिसर्च करायचो तेथून एक गुप्त दरवाजा होता आणि तो एका खोलीत उघडत असे तिथे गुप्तपणे बेकायदेशीर रिसर्च चालू होती.अशी रिसर्च ज्यामुळे माणसात जेनेटिक चेंजेस करून माणसाचे DNA बदलून माणसाचे काही आजार बरे केले जाऊ शकतील पण त्यामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते आणि जेनेटिक विकृती निर्माण होऊ शकते! अभिज्ञाने मदत करून हे सगळं शोधून काढले आणि cidने सगळ्याचा पर्दा फाश केला आणि माझी मोनिका ही सापडली.” ती म्हणाली.

अगम्य,“ बाप रे इतकं सगळं घडत होतं त्या हवेलीत! पण अभी I am proud of you!”तो अभिमानाने म्हणाला.

राहुल,“ प्राऊड तर असणारच ना अम्या तुझ्या सारख्या येड्या गबाळ्याला असली हुशार बायको मिळाली!” तो असं म्हणाला आणि सगळे हसले.

अहिल्याबाई,“ बरं पुरे झाल्या गप्पा आता जेवण करा आणि झोपा जाऊन!” त्या म्हणाल्या आणि सगळ्यांनी माना डोलावल्या!
★★★


   रात्री साधारण नऊ वाजले असतील अगम्य लॅपटॉपमध्ये काही तरी काम करत होता आणि अभिज्ञा त्याला म्हणाली.

अभिज्ञा,“ अगम्य तू लहान आहेस का रे? औषध मी दिल्या शिवाय स्वतः घ्यायचीच नाहीत का?समज मी नाही राहिले तर!” ती वैतागून त्याच्या हातात गोळ्या देत म्हणाली.

अगम्य,“ तोंड आवर आ अभी! उगीच काही तरी बरळू नकोस! तुला नाही द्यायच्या ना मला गोळ्या ठीक आहे माझे मी पाहून घेईन!” तो चिडून म्हणाला आणि आपण काही तरी चुकीचं बोलून गेलो हे अभिज्ञाच्या लक्षात आले.

अभिज्ञा,“ सॉरी! मला तसं म्हणायचे नव्हतं बर हे घे पाणी आणि झोप आता!” ती वरमून म्हणाली.

अगम्य,“बोलायचं आणि वरून असं म्हणायचे नव्हते मला आणि तसं म्हणायचे नव्हते मला!” तो तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेत तोंड फुगवून म्हणाला.

अभिज्ञा,“ मी म्हणाले ना सॉरी! लगेच इतकं चिडायची गरज नाही!” ती त्याच्या जवळ बसत म्हणाली आणि दारावर कोणी तरी नॉक केले.

अगम्य,“ अरे सोनिया ये ना! बाहेर का उभी तू!” तो सावरून बसत म्हणाला.

सोनिया,“ ते मी अभिला थोडा वेळ घेऊन जाऊ का? थोड्या गप्पा होतील!” ती म्हणाली आणि अगम्य आणि अभिज्ञा तिच्या अशा विचारण्यावर मोठ्याने हसले.

अगम्य,“ जा की घेऊन अग विचारायचे काय त्यात! सरळ म्हणायचे ना चल अभी!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ काय ग सोनिया इतकी फॉर्मेलिटी कशा साठी!” ती म्हणाली.

सोनिया,“ बरं मी आहे खाली तू ये!” असं म्हणून ती तिथून सटकली कारण अगम्य आणि अभिज्ञा आता तिची खेचनार हे तिला माहीत होतं.

अगम्य,“ तुझी मैत्रीण पण तुझ्या सारखी येडी!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ येडी नाही म्हणायचे आ तिला! झोप तू आता बास झाले! तुला अजून पहाटे साधनेला उठावे लागते आणि दिवस भर तुला कामातून फुरसद नसते रात्री काय तो अराम!” ती काळजीने म्हणाली आणि उठू लागली तर अगम्यने तिचा हात धरला.

अगम्य,“ मगाशीच भांडण अजून मिटल नाही बरका माझा राग अजून गेला नाही!” तो लटक्या रागाने म्हणाला.

अभिज्ञा,“ हो का बरं! मला माहित आहे देशमुख साहेबांचा राग कसा जातो ते! तर झोपा आता गुड नाईट!” ती तिचा हात सोडवून घेत हसून म्हणाली आणि खाली गेली.तर सोनिया सोफ्यावर बसली होती.तिला पाहून अभिज्ञा म्हणाली.

अभिज्ञा,“चल आपण झोपाळ्यावर जाऊ बाहेर!मस्त गप्पा मारू मग थोडा वेळ!” ती म्हणाली आणि सोनियाने होकारार्थी मान हलवली आणि दोघी बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसल्या.

      बाहेर सिक्युरिटी गार्ड आणि दोन बॉडी गार्ड रात्रीच्या ड्युटीवर होते.खरं तर दुपारीच जेंव्हा सोनियाला त्यांनी अडवलं होत तेंव्हाच सोनियाला तिला या बाबतीत विचारायचे होते पण ती गप्प राहिली पण न राहवून ती म्हणाली.

सोनिया,“ मला माहित आहे अभी तुला माझा प्रश्न ऑड वाटेल.तुम्ही मोठी लोकं! हे अशी सिक्युरिटी वगैरे तुमच्यासाठी नवीन नाही.पण आधी मी कधी तुमच्यात हे सर्व पाहिले नाही ग!” ती चाचरत म्हणाली.

अभिज्ञा,“ काय सोनिया मोठी लोकं वगैरे काय बोलतेस तू ग? असं काही नाही ग! आम्ही ही सिक्युरिटी वगैरे ठेवत नव्हतो रादर असलं काही मुळात अगम्यलाच आवडत नाही पण तीन महिन्यां पूर्वी आमच्या वर गोळी बार झाला आणि मग आऊने सिक्युरिटी ठेवली.ती अजून काढली नाही आणि आता काढण्याची शक्यता ही नाही.” ती म्हणाली.

सोनिया,“ काय गोळी बार? काय बोलतेस तू अभी!” तिने काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ हो पुण्यात माझ्यावर गोळी बार झाला त्यात अगम्य जखमी झाला होता.त्या आधी माझा अपघात घडवून आणला गेला आणि नंतर हॉस्पिटलमध्ये अगम्य वर हल्ला झाला! हल्लेखोर आणि त्या मागचा सूत्रधार आता पकडले गेले आहेत पण आऊच्या मनात कायमची भीती बसली ग!या सगळ्यात अगम्य मरता मरता वाचला आहे!” ती गंभीरपणे सांगत होती.

सोनिया,“ बाप रे खूप काही घडले की या दिवसात मग आऊंचे बरोबर आहे ग! जास्त सुख ही माणसाला बोचत म्हणतात ते असं बघ!” ती म्हणाली.

अभिज्ञा,“ सुख!” असं म्हणून ती खिन्नपणे हसली.

सोनिया,“ अग अभी इतकं उदास व्हायला काय झालं?” तिने विचारले.

अभिज्ञा,“ कसलं सुख आणि कसलं काय सोनिया! अग कधी कधी वाटते आम्ही औरंगाबाद मध्ये होतो तर सुखी होतो आमच्या छोट्याशा घरात!” ती उदास होत म्हणाली.

सोनिया,“ नेमकं काय झालंय अभी आणि अगम्यला तू कसल्या गोळ्या देत होतीस मगाशी!” तिने विचारले.

अभिज्ञा,“ बी.पी.आहे त्याला म्हणून त्याच्या गोळ्या!नाही तर हार्ट अट्याक येऊ शकतो त्याला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे!” ती उदास होत म्हणाली.

सोनिया,“ काय बोलतेस अभी अग इतक्या कमी वयात हे सगळं!” तिने काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ याला कुठे तरी मीच जबाबदार आहे सोनिया अग मी अगम्यला समजून घेण्यात कमी पडले.त्याला एकट्याला सोडून पुण्यात जाऊन राहिले आणि आता सूर्यकांतने डोके वर काढले आहे ना त्याला ही मीच जबाबदार आहे बघ!” बोलता बोलता तिचा आवाज कातर झाला.तिच्या हातावर हात ठेवत सोनिया म्हणाली.

सोनिया,“ काय झालंय अभी नीट सांग जरा मला!” 

अभिज्ञा,“औरंगाबादमध्ये असताना पेंटिंग जळाली आणि मी  निश्चिंत झाले हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती.आम्ही पुण्याला आलो.मी बिझनेसमध्ये लक्ष घातले आणि अगम्य त्याची नोकरी करत होता तिथेच त्याच्या मागे एक मुलगी लागली आणि अगम्यची चूक नसताना मी त्याच्यावर संशय घेतला.माझा गैरसमज दूर झाला पण अगम्यने त्याचे निमित्त करून मला आणि अज्ञांकला स्वतः पासून दूर केले.त्याचे कारण म्हणजे सूर्यकांत त्याच्या स्वप्नात येऊन धमकावत होता त्याला!दोन वर्षे हा माणूस सगळा त्रास एकटा सहन करत राहिला त्याचा परिणाम म्हणजे अगम्यला त्रास देऊन सूर्यकांत पुन्हा एकदा शक्तिशाली झाला.त्यातच तो गोळी बार पाच दिवस अगम्य बेशुद्ध होता.या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्याची तब्बेत ढसाळली आहे.त्याची आत्मिक शक्ती क्षीण झाली आहे. आता पुन्हा सूर्यकांतचा सामना म्हणजे काय हे मी तुला वेगळे सांगायला नको. या सगळ्याचा विचार करून माझे हातपाय गळतात ग मला खूप भीती वाटते त्याला गमावण्याची पण मी हे आऊ,आई,बाबा समोर नाही बोलू शकत कारण मीच हातपाय गाळले तर ते तिघे मोडून पडतील.या सगळ्याला मीच जबाबदार आहे कुठे तरी अगम्यला मी एकट सोडलं नसत तर सूर्यकांत एका कागदाच्या तुकड्याच्या रुपात त्या पुस्तकात पडून राहिला असता अनंत काळासाठी आणि माझ्या अगम्यचे नको तितके नुकसान झाले नसते.मी तुझ्या डोळ्यात आज केदारने बरच काही लपवल तुझ्या पासून म्हणून राग पाहिला आहे.सोनिया असं नको वागूस त्याला समजून घे कारण तू त्याला समजून नाही घेतलीस तर नको तितके नुकसान होऊन बसेल केदारचे आणि माझ्या सारखी पश्चात्ताप  करण्याची वेळ येईल तुझ्यावर!मी अगम्यच्या बाबतीत जी चूक केली ती तू केदार बाबतीत करू नकोस. वेळ आलीच तर थोडं पडत नमत घे!त्याला समजून घे!” ती बोलत होती पण तिच्या डोळ्यातून मात्र अश्रुधारा लागल्या होत्या.सोनियाने अभिज्ञाचे डोळे पुसले आणि ती म्हणाली.

सोनिया,“ तू आधी शांत हो अभी!जे झालं ते झालं! तू आहेस ना अगम्य बरोबर आता मग काही नाही होणार त्याला!तू काळजी नको करुस!पण अगम्य इतका क्षीण झाला आहे तो सूर्यकांतचा सामना एकटा कसा करणार ग? म्हणजे तूच म्हणालीस ना की अगम्य जाणार आहे त्या पुस्तकात एकटाच!” तिने काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ असं त्याला वाटतं की तो एकटाच जाणार आहे पुस्तकात म्हणजे त्याने ठरवले आहे तसे कारण त्याला वाटतं जे बरेवाईट होईल ते त्याचे झाले तर चालेल पण माझ्यावर किंवा अज्ञांक वर कोणते संकट नको यायला! म्हणून तर त्याने दोन वर्षे सगळे सहन केले आहे आणि स्वतःचे नुकसान करून घेतले आहे.वरून तो महा हट्टी आणि हेकेखोर आहे ग! त्याला काही बोलायला   गेले तर मग तो स्वतःला त्रास करून घेतो म्हणून मी त्याला म्हणाले की तू म्हणतो असं आपण करू पण तो पुढे पुस्तकात गेला की मी त्याच्या मागे जाणार आहे.तो समोर होता म्हणून मी तसं बोलले तुला!” ती म्हणाली.

सोनिया,“ काळजी करू नकोस अभी अग या वेळी केदार ही तुमची मदत करेल जे बाबा आहेत ना तुम्हांला मदत करायला येणार आहेत तेच त्याचे गुरू आहेत आणि बाबांनी त्याला स्वप्न लोकांतून संदेश पाठवून इथे यायला सांगितले आहे!”

अभिज्ञा,“ हुंम केदारची या सगळ्यात आम्हांला मदत झाली तर चांगलेच आहे बाकी तुला  मनातील सल बोलून खरंच बरं वाटलं बघ! हे मी ना आऊला बोलू शकते ना आई-बाबांना आणि आमच्या देशमुख साहेबां विषयी  तर न बोललेलंच बरं साहेब लगेच चिडचिड करणार मग!” ती हसून म्हणाली.

सोनिया,“ बरं चला झोपू या! नाही तर तुमचे देशमुख साहेब आमच्या वर भडकायचे माझी बायको घेऊन कुठे गेली ही बया म्हणून!” ती म्हणाली आणि दोघी हसल्या आणि झोपायला निघून गेल्या. 

हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा रहस्यमय हवेली आणि दि लूप होल सीझन दोन!

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.
©swamini(Asmita) chougule
क्रमशः

  

    

🎭 Series Post

View all