दि लूप होल पर्व २ (भाग २३)

This is a saspence story

अभिज्ञाने सकाळी डोळे उघडले तर तिच्या बाजूला अगम्य नव्हता. ते पाहून ती ताडकन उठून बसली.पण मग तिच्या लक्षात आले की तो सप्तचक्र साधना करायला खाली गेला असेल.आज तिला ही ऑफिसला जायचे होतेच म्हणून मग ती ही अंघोळीला निघून गेली.ती बाहेर गाऊन घालून आली तर अगम्य टायशी झटत असलेला तिला दिसला ती त्याच्या जवळ गेली आणि टाय बांधत त्याला म्हणाली.

अभिज्ञा,“ आज उठवावे  ही लागले नाही की तुला ना चहा ना काही! रोज असाच वागत जा शहण्या सारखा!” ती हसून म्हणाली.

अगम्य,“ अजिबात नाही हे अजून अमावस्ये पर्यंत आहे. नंतर आहेच बेड टी आणि गोड मॉर्निंग! By the way बरेच दिवस झाले गोड मॉर्निंग झालीच नाही! असं ही आता नऊ वाजले आहेत अजून मॉर्निंग आहे!” तो तिला जवळ ओढत मिश्किलपणे म्हणाला.

अभिज्ञा,“ हे बघ झाली टाय बांधून आणि मिस्टर देशमुख चला खाली  उशीर होत आहे आपल्याला मी आलेच! तुम्ही पुढे जा!” ती त्याला जवळजवळ ढकलतच हसून म्हणाली.

अगम्य,“ अभी तुला  ना आज काल माझी किंमतच राहिली नाही! सतत आपलं नुसतं सूचना देत असतेस नाही तर दम! जातो मी ये तुला केंव्हा यायचे तेंव्हा!” तो तोंड फुगवून म्हणाला आणि वळून निघाला.तर पुढे जाण्याऱ्या त्याला अभिज्ञाने त्याच्या पुढे जाऊन मिठी मारली  आणि त्याला पाहत  म्हणाली.

अभिज्ञा,“ फुगल का तोंड पाहू गालाच्या पुऱ्या किती फुगल्या!” त्याचा गाल ओढत ती मिश्कीलपणे म्हणाली.

अगम्य,“ सोड अभी उशीर होतोय ना तुझं आवर आणि ये खाली!” तो लटक्या रागाने म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा!पण मी आज साडी नेसावी म्हणते मला मदत कर ना जरा!” ती मुद्दाम   म्हणाली.

अगम्य,“ मी मीराला पाठवतो तुझी मदत करायला!” असं म्हणून तो तिची मिठी सोडवून निघून गेला अभिज्ञा मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहतच राहिली.


 

    ती मनातच स्वतःशी बोलू लागली.झालं आता फुगला हा अभी तुला पण कळत नाही हल्ली या सगळ्या तणावामुळे आणि त्याच्या तब्बेतीमुळे त्याची जास्तच चिडचिड होत आहे आणि तू मात्र त्याला आज पुन्हा छेडलेस! आता हा दिवस भर फुगवून राहणार आणि राहुल बरोबर असल्याने आपल्याला याला बोलता ही येणार नाही! चला अभिज्ञा अगम्य देशमुख भोगा तुमच्या कर्माची फळं! आता याला रात्रीच मनवावे लागेल!तो पर्यंत याच्या आवडीची साडी नेसून खुश होतोय का पाहू! 

      ती मनात हा सगळा विचार करून बेबी पिंक कलरची अगम्यच्या आवडीची साडी नेसून खाली आली.तर सगळे नाष्टा करत होते. अज्ञांकने तिला पाहिले आणि तिला पापा देऊन तो शाळेत निघून गेला.अगम्यने अभिज्ञाला पाहिले पण न पहिल्या सारखे केले आणि त्याने नाष्टा केला.राहुल ही ऑफिसला जायला तयारच होता. अहिल्याबाईने अगम्यला विचारले.

अहिल्याबाई,“ अमू औषधे घे सकाळची अभी औषधे वर असतील ना!”

अगम्य,“ हो आऊ मी आत्ता घेऊन येतो!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ विसरलास ना! एका मुलाचा बाप झालास इतका मोठा बिझनेस संभाळतोस पण स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष नुसते!” त्या तक्रारीच्या सुरात म्हणाल्या.

अभिज्ञा,“ मी…. ” ती पुढे बोलणार तर अगम्य तिला मध्येच तोडत म्हणाला.

अगम्य,“ अभी चल कोठे आहेत औषधे ते सांग मला!” असं म्हणून तो निघाला ही!

       अभिज्ञाने खरं तर त्याची औषधे खाली आणली होती ती तेच सांगणार होती पण अगम्यने तिला मध्येच तोडले आणि मग अभिज्ञाने ही विचार केला की हाच चान्स आहे त्याला मनवायचा नाही तर दिवस भर रुखरुख लागून राहणार म्हणून ती ही त्याच्या मागे निमूटपणे रूममध्ये गेली.अभिज्ञा रूममध्ये केली आणि तिला मागून कमरेत घट्ट हाताचा विळखा पडला. ती गालातल्या गालात हसत म्हणली.

अभिज्ञा,“ सोड तुला औषधे देते अगम्य!”

आगम्य,“ मला माहित आहे खाली तुझ्या पर्समध्ये माझी औषधे आहेत.तू तिथेच दिली असतीस ती तर मग माझ्या मिठीत नसतीस  ना! आणि मुद्दाम नेसलीस ना माझ्या आवडीची साडी!” तिला स्वतः समोर वळवत तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

अभिज्ञा,“ sorry! मी तुला मुद्दाम छेडत होते! मला काय माहिती की तू फुगशील म्हणून!” ती तोंड पाडून म्हणाली.

अगम्य,“ अग sorry काय सॉरी! मी पण तुझी गम्मत करावी म्हणलं थोडी पण नेसलेली साडी आणि पडलेला चेहरा पाहून नाही रोखू शकलो स्वतःला! आणि तू कधी पासून घाबरायला लागलीस मला? सारख सारख सॉरी म्हणत जाऊ नकोस मला नाही आवडत ते! आणि थोडी फार नोक झोक पाहिजेच की!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ म्हणजे तुझा राग लटका होता तर! आणि मी तुला नाही तर तुझ्या तब्बेतीला घाबरते अगम्य! जेंव्हा पासून ते गोळीबार प्रकरण झाले आहे तेंव्हा पासून मला खूप भीती वाटते!” ती त्याच्या मिठीत शिरत रडकुंडीला येत म्हणाली. 

        अगम्यच्या तिच्या आवाजातील बदल लक्षात आला आणि त्याने तिला बेडवर नेऊन बसवले तिच्या शेजारी बसत तो म्हणाला.

अगम्य,“अभी I am sorry! मी इथून पुढे नाही करणार अशी गम्मत!आणि प्रत्येक गोष्टीला इतकं घाबरून कसे चालेल. मी ठीक आहे इतकी ही काळजी करत जाऊ नकोस माझी कळले का? आणि त्या राहुलला कशाला ग तयार केलीस ऑफिससाठी त्याला कमी व्याप आहेत का?आला आहे चार दिवस तर राहू दे की निवांत! मी  म्हणतो तू ही नको येऊस ऑफिसला मी करतो सगळं हँडल!” तो तिचा हात हातात घेऊन बोलत होता.

अभिज्ञा,“ बरं औषधे घे आणि चल खाली(ती उठून टेबलवरील गोळ्या त्याच्या हातात ठेवून त्याला पाणी देत म्हणाली) आला मोठा सगळं हँडल करणारा! आणि राहुल काय परका आहे का? मी आणि तो येतो आहे तुझ्या मदतीला! लवकर कामं झाली तर त्या पुस्तकातल्या पुढच्या स्टोऱ्या सांगून होतील आज!” ती दाराकडे निघाली आणि हाताला झटका लागला आणि ती मागे खेचली गेली. सरळ ती पुन्हा अगम्यच्या मिठीत होती.

अगम्य,“ अरे वा! निघालीस की लगेच! सकाळची उधारी कोण चुकवणार!” असं म्हणून त्याने तिचा  चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेतला आणि तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि राहुलने खालून आवाज दिला.

राहुल,“ मेडिसीन्स बनवून मग खाणार आहे का आम्या! उशीर होतो आहे आपल्याला!” तो मिश्कीलपणे म्हणाला.

अगम्य,“ आलो रे एक pd शोधतोय आज लागणार आहे मला!” त्याने आहे त्या स्थितीत त्याला उत्तर दिले आणि पुन्हा तो अभिज्ञाकडे वळला अभिज्ञा ही त्याच्या बरोबर विरघळत राहिली आणि दहा मिनिटात ते खाली गेले.

राहुल,“ मिळाला का रे pd?” त्याने विचारले.

अगम्य,“ हा बघ!” तो ब्लेझरच्या खिशातून pd काढून दाखवत त्याला म्हणाला.

अभिज्ञा,“ आऊ आज लवकर कामं झाली तर दुपारी लंचला घरी येऊ आणि मी त्या पुस्तकातील स्टोरीज सांगेन सगळ्यांना!” ती म्हणाली.

अहिल्याबाई,“ हो चालेल आणि आमच्या सगळ्यां पेक्षा अगम्यला त्या स्टोरीज ऐकण्याची गरज आहे बरं या मग लवकर आणि हो आज  मी आपल्या कारखाने आणि फूड फॅक्टरीसाठी  मॅनेजर नेमणे आहे अशी जाहिरात दिली आहे अगम्य! खरं तर हे आपण आधीच करायला हवे होते त्यामुळे तुझी इतकी दमछाक झाली नसती. तर हे सगळे मॅनेजर आपल्याला आठवड्याचा रिपोर्ट ऑफीसमध्ये आणून देतील आणि मी महिन्यातून केव्हा ही फॅक्टरी व्हिजित करेन म्हणजे कामगार आणि मॅनेजरवर ही कायम आपला धाक राहील. आणि पुढच्या महिन्यात इंटर व्ह्यूव घेऊ आपण! आता तर काय हे शक्य नाही!” त्या म्हणाल्या.

अगम्य,“ चांगली कल्पना आहे आऊ! बरं आम्ही निघतो!.

    असं म्हणून अगम्य, अभिज्ञा आणि राहुल निघून गेले. तिघांनी कामे केल्यामुळे कामे लवकर उरकली आणि दुपारी दोन वाजता सगळे घरी आले. जेवण करून सगळे थोडा आराम करून चारच्या सुमारास हॉलमध्ये जमा झाले.

राहुल,“ सांग बाई तुझ्या पोराच्या आवडत्या पुस्तकातील कथा अभी!” तो असं म्हणाला आणि सगळेच हसले.

अभिज्ञा,“  हो हो सांगते! पहिली कथा दोन राजकुमारांची आहे. जे सावत्र भाऊ आहेत राजवीर आणि रणवीर! हो पहिली स्टोरी तीच आहे! स्टोरीच नाव आहे सावत्र आई! तर एक गाव असत आणि त्यात एक राजा असतो.त्या राजाला दोन राण्या असतात आणि त्यांची दोन मुले मोठी राणी राजकुमाराला जन्म देताना मरते.तीच राणी राज्याची लाडकी असते तिच्यावर राजाचे खूप प्रेम असते पण राजकुमार राजवीरला जन्म देताना ती मरते म्हणून राजाचा त्याच्यावर राग असतो.राजा राजवीरला पाहत ही नाही बोलत ही नाही एक दासी त्याचे पालन पोषण करत असते  आता तो 16 वर्षांचा झालेला असतो बिचारा आई आणि बापाच्या प्रेमाविना आढत असतो.याचाच फायदा छोटी राणी आणि राजकुमार रणवीर घेत असतात रणविर 14 वर्षांचा असतो पण त्याच्या आईच्या सांगण्यावरून रणवीरशी वाईट वागत असतो. तो राजवीरला त्रास देत असतो.छोट्या राणीला रणवीरला गादीवर बसवायचे असते पण राजा तत्वनिष्ठ असतो नियमा प्रमाणे त्याला राजवीरला राज्य द्यायचे असते.त्यातच राज्यावर शत्रू आक्रमण करतात आणि युद्ध सुरू होते आणि राजवीर युद्धात पराक्रम गाजवतो आणि सगळ्यांची सुखरूप सुटका करतो. मग छोट्या राणीला आणि रणवीराला ही कळून चुकत की तोच राजवीर राज्य संभाळण्याच्या योग्यतेचा आहे राजा ही राजवीरला प्रेमाने जवळ घेतो आणि त्याचा राज्याभिषेक करतो.” तिने एका दमात सगळी गोष्ट सांगितली.

अहिल्याबाई,“ हुंम म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय दुसरी कोणती आहे कथा अभी?” त्यांनी विचारले.

अभिज्ञा,“दुसरी गोष्ट आहे एका मुलीची जीला परी भेटते! अदिती नावाची एक छोटी मुलगी असते. तिचे आई-बाबा हयात नसतात. म्हणून ती काकांकडे राहत असते. पण काकुला ते पसंत नसते. म्हणून मग काकू तिचा छळ करते तिला काम लावते एक दिवस ती रडत देवाला म्हणते की मला माझ्या आई-वडिलांकडे घेऊन जा आणि तर माझ्या मदतीला कोणाला तरी पाठव! आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या समोर परी उभी राहते. जी फक्त तिलाच दिसते. तिचे सगळी कामे ती जादूने करून देत असते पण काकुला संशय येतो तरी तिला काहीच कळत नाही यथावकाश तिला एका राजकुमाराचे स्थळ येते जे परीमुळेच आलेले असते. आदितीचे थाटामाटात लग्न होते आणि ती राणी होती.

अगम्य,“  म्हणजे इथे ही निगेटिव्ह आणि पोजिटिव्ह असा संघर्ष आहे तर!

अभिज्ञा,“ हो या पुस्तकात प्रत्येक कथा अशीच आहे अगम्य! पुढची कथा आहे एका सिंहाची त्याच नाव आहे रेंबो तो एका जंगलाचा राजा असतो आणि त्याने शिकारीचे आणि जंगलाचे काही नियम बनवलेले असतात.शिकार करायची पण लागेल तेव्हढिच उगीच मजा म्हणून कोणत्या ही प्राण्याला मारायचे नाही. असे नियम तो जंगलात लागू करतो पण लांडग्यांच्या एका टोळीला हे मान्य नसते पण रेंबो खूप शक्तिशाली असल्याने ते काहीच करू शकत नसतात पण एक दिवस एक बाहेरचा सिंह जंगलात येतो आणि लांडगे त्याला जाऊन मिळतात पण रेंबोच्या बाजूने सगळे जंगली प्राणी लढण्यास तयार होतात आणि त्या सिंहाला आणि लंडग्यांना पिटाळून लावतात!” ती म्हणाली.

राहुल,“ अरे वा म्हणजे प्राण्यांमध्ये पण राजकारण आहे का?” अस म्हणून तो हसला.

अगम्य,“ हो मग आता लहान मुलांचे पुस्तक मग त्यात काही ही होऊ शकते!”ती हसून म्हणाला.

        तो पर्यंत एक नोकर आला आणि म्हणाला.

नोकर,“ आऊसाब एक माणूस त्याच्या बरोबर एक बाई आणि एक लहान मुलगी आल्याती. त्यासनी त्या वोचमन आणि बॉडी कार्डनी अडवलं हाय! ते म्हणत्यात की ते धाकल्या बाईसाबच्या मैत्रीण हाय म्हणून मी निरोप घेऊन आलो आय जी!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ माझी मैत्रीण अशी अचानक कोण असेल ठीक आहे तू जा मी पाहते.” ती विचारात पडून म्हणाली.

अगम्य,“ जा पहा कोण आहे अभी! आऊ आता तरी हा पहारा उठाव बाई! किती दिवस लोक बाहेर ताटकळत राहणार भेटायला आलेले!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ नाही उठणार हा पहारा! हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे कळलं का?जा अभी पहा कोण आहे!” त्या म्हणाल्या 

       अभिज्ञा बाहेर गेली तर समोर सोनिया, मोनिका आणि केदार! सोनियाला पाहून अभिज्ञा तिच्या गळ्यात पडली. मोनिकाला सही सलामत पाहून तिला खूप आनंद झाला. ती सगळ्यांना आत घेऊन गेली.

     तर रहस्यमय हवेली मधील  सोनिया आणि केदारची एन्ट्री दि लूप होल सीझन दोन मध्ये झाली आहे. तर पाहू आता यांच्या एन्ट्रीने कथा कोणते रंजक वळण घेते.

हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा रहस्यमय हवेली आणि दि लूप होल सीझन दोन!

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule



 

🎭 Series Post

View all