Login

दि लूप होल पर्व २ (भाग २२

This is a suspense story

आत्ता पर्यंत

मागच्या भागात आपण पाहिले की अगम्यची ऑफिस,फॅक्टरी आणि साधना आणि पुस्तकाचे टेन्शन यामुळे दमछाक होत होती.अभिज्ञा आणि अहिल्याबाईना त्याची काळजी वाटत होती म्हणून मग त्यांनी अगम्यची डॉक्टरकडून तपासणी करून घेतली आणि डॉक्टरांनी त्याला जास्त स्ट्रेस येत आहे असे सांगितले आणि अशक्तपणा आला आहे म्हणून औषधे ही दिली.राहुलने आणि अभिज्ञाने त्याच्या मदतीसाठी ऑफिसला जायचे ठरवले. अहिल्याबाईनी पुस्तका बाबत नाशिकला बाबांना फोन केला तर बाबांनी ते पुस्तक अगम्यच्या रूममध्ये राहू द्यावे आणि अमावस्ये पर्यंत ते पुस्तक उघडू नये. ते अमावस्येला येत आहे आणि अभिज्ञा अगम्य  त्या पुस्तकातील कथा समजावून सांगेल असे सांगितले. या सगळ्यात मात्र अहिल्याबाई अपसेट होत्या पण त्या का अपसेट आहेत हे अगम्यला कळत नव्हते.

आता पुढे...


 

     अगम्य अज्ञांक बरोबर  खेळत होता पण त्याचा जीव मात्र थऱ्यावर नव्हता.त्याच्या मनात अहिल्याबाई विषयीची काळजी घर करून राहिली होती.आज अभिज्ञा आणि राहुल त्याला बोलत असताना अहिल्याबाई ही नक्कीच काही तरी बोलल्या असत्या पण त्याचं लक्ष नव्हतं कुठे?त्या कुठे  खुपच अपसेट दिसत होत्या. नीट जेवल्या देखील नाहीत.तो हाच सगळा विचार करत होता आणि  अभिज्ञा रूममध्ये आली.ती अज्ञांकला पाहून म्हणाली.

अभिज्ञा,“ अदू झोपायचं नाही का तुला?किती खेळशील?” तिच्या बोलण्याने अगम्य देखील भानावर आला.

अज्ञांक,“ मी इत नाही जोपनार! आऊ आजीकडे जाणार!” तो म्हणाला.

अगम्य,“ चल मग! अभी चल आऊ आज खूप अपसेट दिसत होती. तिच्याशी बोलू!” असं म्हणून तो अज्ञांकला घेऊन निघाला त्याच्या पाठोपाठ अभिज्ञा ही गेली.अभिज्ञा आणि अज्ञांक बेडवर बसले होते. अज्ञांकला ती झोपवत होती. अहिल्याबाई आराम खुर्चीवर काही तरी हातात घेऊन डोळे झाकून बसलेल्या दिसल्या. अगम्य त्याच्या जवळ खाली जाऊन बसला आणि त्यांच्या मांडीवर त्याने डोके ठेवले. त्या स्पर्शाने अहिल्याबाईनी डोळे उघडले. अगम्य त्यांना बोलू लागला.

अगम्य,“ काय झाले आऊ? तू दुपार पासून अपसेट दिसत आहेस जेवली ही नाहीस नीट आणि रडत होतीस वाटत आणि हातात काय आहे तुझ्या(हातून फोटो फ्रेम घेत)माझा फोटो! आऊ मी समोर असताना तू का फोटो घेऊन काय करतेस?” त्याने विचारले.

अहिल्याबाई,“ काही नाही! जा झोप जा अमू खूप वेळ झाला आणि औषधे घेतलीस का?” त्या विषय बदलत म्हणल्या.

अगम्य,“ तू घेतलीस का औषधे आणि काही तरी नक्कीच आहे ठेव माझ्या डोक्यावर हात आणि म्हण काही नाही!” तो त्यांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणाला.

अहिल्याबाई,“ काय वेडेपणा आहे अगम्य?” त्या चिडून हात मागे घेत म्हणाल्या.

अगम्य,“ मग सांग लवकर आता!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“काय सांगू मी अमू खरं तर ना तुझ्यासारख्या कर्तृत्ववान मुलाने माझ्या पोटी जन्म घेऊन चूक केली बघ! मी चांगली आई कधीच होऊ शकले नाही. तुला माझ्या पोटी जन्म घेऊन काय मिळाले रे! तीस वर्षे अनाथांचे जिने आणि त्या पेंटिंगचा श्राप! त्या नंतर ही इथे येऊन तुला काय मिळाले इतक्या मोठ्या बिझन्सची जबाबदारी! तुला होत असलेला त्रास मला दोन वर्षे दिसला नाही तू आणि अभी  भांडलात  तर मी तुमच्यात समेट घडवून आणण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. तू मात्र एकटाच दोन वर्षे सगळं सहन केलंस! अभी पुन्हा आली आणि तुला होणार त्रास तिच्या लक्षात आला पण तू काहीच सांगायला तयार नव्हता तेंव्हा पुन्हा तुमच्या भांडण झाले आणि मी तुलाच दोष दिला एकदा ही तुला काय झाले विचारले नाही! या इस्टेटीसाठी गोखले वकिलानी  अभीवर गोळी बार करवला आणि जखमी तू झालास! एव्हढच काय तर त्याने हॉस्पिटलमध्ये ही तुझ्यावर हल्ला करवला काय मिळाले रे माझ्या पोटी तुला जन्माला येऊन दुःख आणि जखमा!मी खरंच चांगली आई नाही होऊ शकले अमू!” त्या रडत बोलत होत्या.

अगम्य,“आऊ असं काही नाही आहे तू खूप चांगली आई आहेस आणि मी भाग्यवान आहे तुझ्या पोटी जन्म मिळाला मला! अग तू या गोष्टींचा त्रास करून घेत आहेस अग तुझ्या मनात असे विचार आलेच कसे ग! तू माझ्यासाठी काय-काय केले हे मी तुला सांगायला हवे का?अग मी बाप असून अदू पासून लांब जायला घाबरतो पण तू माझ्या भल्यासाठी मला दूर ठेवलेस हे सोपे होते का तुझ्यासाठी? भेटल्या  नंतर किती तरी दिवस मी नाराज होतो तुझ्यावर तू ते ही सहन केलेस! इतकी मोठी इस्टेट तू निगुतीने संभाळलीस आणि वाढवलीस कोणा साठी माझ्यासाठीच ना? मग ती आता सांभाळायची  जबाबदारी माझीच की! आणि या पंचक्रोशीत मला मान सन्मान मिळाला तो तुझा मुलगा म्हणूनच ना! मग मी भाग्यवानच की! याच जन्मी का पुढच्या सगळ्या जन्मी मला तूच आई हवी आहेस! तू हे सगळं बोलून आणि विचार करून  स्वतःला आणि मला ही त्रास देत आहेस!” तो त्यांच्या मांडीवर डोके ठेवून बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.

अभिज्ञा,“ अगम्य बरोबर बोलतोय आऊ तुमच्या बरोबर तुम्ही त्याला ही त्रास देत आहात असा विचार करून! तुम्हीं खूप चांगल्या आई आहात आऊ!” ती डोळे पुसत म्हणाली.

अहिल्याबाई,“ तुला त्रास होणार असेल तर मी नाही करणार असा विचार आणि बोलणार ही नाही!सॉरी अमू!” त्या स्वतःचे  डोळे पुसून अगम्यचे डोळे पुसत त्याचा चेहरा प्रेमाने कुरवाळत म्हणाल्या.

अभिज्ञा,“ अदू! झोपला आहे मी दूध घेऊन येते आऊ तुम्ही नीट जेवला नाहीत!”  असं म्हणून ती निघाली.

अहिल्याबाई,“नको ग मला!” त्या तिला थांबवत म्हणाला.

अगम्य,“ तू घेऊन ये अभी! आणि आऊ औषधे घेतलीस का?” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“नाही!” त्या म्हणाल्या.

अगम्य,“मग आता अभी दूध घेऊन येईल औषधे आणि दूध घे आणि कसला ही विचार न करता झोप! काही तरी विचार करत जाऊ नकोस तू!कळतंय का तुला मी काय म्हणतोय?” त्याने विचारले.

अहिल्याबाई,“ हो कळतंय मला! नाही करणार मी असा विचार परत! आणि नाशिकला बाबांशी संपर्क झाला आहे! अभी ते काय म्हणाले तुला सांगेल सगळं!” त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.


 

    तो पर्यंत अभिज्ञा दूध घेऊन आली आणि अगम्यने अहिल्याबाईना  औषधे आणि दूध दिले आणि त्यांना झोपवून तो आणि अभिज्ञा स्वतःच्या रूममध्ये आले!


 

अगम्य,“आऊ ना काही ही विचार करत बसते!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“अगम्य त्यांना असे वाटणे साहजिक आहे रे!त्या आई म्हणून विचार करत आहेत पण तू त्यांना चांगलं हँडल केलंस आज त्या नाही करत बसणार आता हा विचार!” टी त्याचा हात धरून म्हणली.

अगम्य,“ हुंम! बरं झालं आज तिच्याशी बोललो नाही तर ती मनात कुडत बसली असती.बरं काय म्हणाले ते नाशिकचे बाबा?” त्याने बेडवर बसत विचारले.

अभिज्ञा,“ हो सकाळी आऊनी त्यांच्या आखाड्यात फोन लावला होता.त्यांनी आता पुस्तक उगडू नका आणि ते आपल्या रूममध्ये राहू दे म्हणून सांगितले आहे आणि मला त्यातल्या सगळ्या कथा माहीत आहेत त्या तुला आणि बाकीच्यांना ही समजावून सांगा म्हणून सांगितले आहे! ते अमावस्येला स्वतः येणार आहेत!” ती  त्याच्या शेजारी मांडी घालून  बसत म्हणाली.

अगम्य,“ मी ते पुस्तक उघडून पाहिले आहे त्यात पाच स्टोरीज आहेत एकूण! आता प्रत्येक स्टोरी तूच सांग मग!” तो तिच्या मांडीवर झोपत म्हणाला.

अभिज्ञा,“ मी कधीच विचार केला नव्हता अगम्य की अदुच्या स्टोरी बुक मधील स्टोरी तुला सांगावी लागेल!” ती हसून म्हणली.

अगम्य,“ अग माणसाला कोणती वेळ येईल सांगू शकत नाही! बरं तू सांग ना पहिली स्टोरी एक राजकुमार आणि त्याच्या भावाची आहे ना?” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हो पहिली स्टोरी तीच आहे! स्टोरीच नाव आहे सावत्र आई! तर एक गाव असत आणि त्यात एक राजा असतो.त्या राजाला दोन राण्या असतात आणि त्यांची दोन मुले मोठी राणी राजकुमाराला जन्म देताना मरते.तीच राणी राज्याची लाडकी असते तिच्यावर राजाचे खूप प्रेम असते पण राजकुमार राजवीरला जन्म देताना ती मरते म्हणून राजाचा त्याच्यावर राग असतो.राजा राजवीरला पाहत ही नाही बोलत ही नाही एक दासी त्याचे पालन पोषण करत असते  आता तो 16 वर्षांचा झालेला असतो बिचारा आई आणि बापाच्या प्रेमाविना आढत असतो.याचाच फायदा छोटी राणी आणि राजकुमार रणवीर घेत असतात रणविर 14 वर्षांचा असतो पण त्याच्या आईच्या सांगण्यावरून रणवीरशी वाईट वागत असतो. तो राजवीरला त्रास देत असतो.छोट्या राणीला रणवीरला गादीवर बसवायचे असते पण राजा तत्वनिष्ठ असतो नियमा प्रमाणे त्याला राजवीरला राज्य द्यायचे असते.त्यातच राज्यावर शत्रू आक्रमण करतात आणि युद्ध सुरू होते आणि राजवीर युद्धात पराक्रम गाजवतो आणि सगळ्यांची सुखरूप सुटका करतो. मग छोट्या राणीला आणि रणवीराला ही कळून चुकत की तोच राजवीर राज्य संभाळण्याच्या योग्यतेचा आहे राजा ही राजवीरला प्रेमाने जवळ घेतो आणि त्याचा राज्याभिषेक करतो.” तिने एका दमात सगळी गोष्ट सांगितली.

अगम्य,“ म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय होतो.पण सूर्यकांत पुस्तकात घुसल्यामुळे आता या स्टोरीचे काय झाले असेल काय माहीत!” तो डोळे मोठ्या कष्टाने उघडे ठेवून म्हणाला.

अभिज्ञा,“ हो ते ही आहेच की!अगम्य तुला झोप येतेय ना मग झोप तू” ती म्हणली.

अगम्य,“ नाही तू पुढची स्टोरी सांग!” तो उठून बसत म्हणाला.

अभिज्ञा,“ काही नाही तू ना झोप आता डोळे बघ जरा तुझे किती झोप आहे त्यात आणि आज ऑफिस कारखाना आणि पहाटे उठून साधना! दमला आहेस! पुढची स्टोरी उद्या सांगते.अमावस्येला पंधरा दिवस आहेत अजून!” ती असं म्हणली आणि तिने अगम्यला बळेबळे झोपवले.अगम्य दहाच मिनिटात गाढ  झोपला.

      दुसऱ्या दिवशी पासून ऑफिसला जायचा विचार करत.अभिज्ञा ही त्याला व्यवस्थित झोपवून झोपली.

   पुढे काय घडणार होते? या सावत्र आई या स्टोरी मध्ये सूर्यकांतने काय धुमाकूळ घातला असेल? कारण आता त्याने त्या पुस्तकात स्वतःचे राज्य निर्माण केले होते.

पुढच्या भागा पासून वाचा रहस्यमय हवेली आणि दि लूप होल या दोन कथांचा सुरेख संगम!

© स्वामिनी चौगुले





 

🎭 Series Post

View all