दि लूप होल पर्व २ (भाग २०)

This is a suspense story

      ते पुस्तक घेऊन अगम्य आणि बाकी सगळे हॉलमध्ये आले. अगम्य तर अंगातून त्राण गेल्या सारखा सोफ्यावर जवळजवळ कोसळलाच! त्याला दरदरून घाम आला होता आणि चेहरा भीतीने कालावंदला होता.अभिज्ञाच्या आईने त्याला पाणी आणून दिले. तो ग्लास भर पाणी एका दमट घाटाघट प्याला. अहिल्याबाई त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ अमू अरे  बरा आहेस ना तू? डॉक्टरला बोलवू का? मला भीती वाटतेय रे! तूच असं केलंस तर कसं होणार अमू! आधीच तुला इतक्या कमी वयात बी.पी. चा त्रास आहे! बोल ना काही तरी!” त्या रडत काळजीने म्हणत होत्या.

अगम्य,“मी ठीक आहे आई! नको काळजी करुस इतकी! अदू कुठे आहे त्याला बोलावं लवकर!” तो घाम पुसत म्हणाला.

बाबा,“ बाहेर खेळतो आहे हरी बरोबर! थांब मी घेऊन येतो त्याला!” असं म्हणून ते उठले तर राहुल त्यांना म्हणाला.

राहुल,“ मी घेऊन येतो त्याला!” असं म्हणून तो गेलाही आणि अज्ञांकला घेऊन आला ही!

         अज्ञांकला समोर पाहून अगम्यचा  बांध फुटला आणि त्याने त्याचे पापे घेतले आणि त्याला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. अज्ञांक मात्र या सगळ्याची बवरला. त्याच्या बाबाला रडताना पाहून तो ही रडत अगम्यचे डोळे पुसत म्हणाला.

अज्ञांक,“ काय जालं बाबा तुला रलायला? आईची आठवण येते का? ती उद्या येणार आहे की मग इतका मोठ्ठा असून रलतो काय?” तो निरागसपणे बोलत होता.सगळ्यांच्या डोळ्यात खरं तर पाणी होत पण त्याच बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य विलसत होते.


 

अगम्य,“ हो रे बच्चा मला ना तुझ्या आईची आठवण येत होती.” तो स्वतःला सावरून डोळे पुसत अज्ञांकला प्रेमाने कुरवाळत म्हणाला.

राहुल,“ अदू बच्चा जा तू आणि मीरा काकू बाळा बरोबर खेळा!” तो मीराला डोळ्याने इशारा करत म्हणाला आणि अज्ञांक अगम्यचे डोळे पुसत म्हणाला.

अज्ञांक,“ मी जाऊ काकू बरोबर तू रलू नकोशपण!”

अगम्य,“ हो जा! Love you बच्चा!” असं म्हणून त्याने  त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मीरा अज्ञांकला घेऊन गेली.

       थोडावेळ हॉलमध्ये एक शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हते. कोणाला काहीच बोलायचे सूचना नव्हते. अगम्य मात्र त्या पुस्तकाला नुसता पाहत होता.अहिल्याबाई शांततेचा भंग करत बोलू लागल्या

अहिल्याबाई,“ अमू तू स्वतःला सावर बाबा पोरग किती कावरबावर झालं तुझ्या वागण्याने! मला माहित आहे तुला ते पुस्तक सापडलं पण ते अज्ञांकच्या रूममध्ये आणि त्याचेच आहे ते पुस्तक काही वर्षांपूर्वीचे जे त्याला आज ही आवडते आणि म्हणूनच अजून ही त्याच्या रूममध्ये होते.या सगळ्याचा धक्का बसला आहे पण तूच असा वागलास तर मी कोणाच्या तोंडाकडे पहायचे आणि या सगळ्यामुळे तुझी तब्बेत बिघडली तर!” त्या डोळे पुसत म्हणाल्या.

अगम्य,“ हुंम मी ठीक आहे आऊ पण अशा किती अमावस्या गेल्या असतील.  माझा अदू त्याच्या रूममध्ये रात्री दहा दहा वाजे पर्यंत खेळत बसायचा! तो चुकून लूप होल मध्ये गेला असता तर हा विचार करून  माझा थरकाप उठतो आऊ! तरी बरं मी अभिज्ञा आणि अज्ञांकला पुण्याला ठेवले होते आणि ते पुस्तक इथेच त्याच्या रूममध्ये पडून होते  तरी अदू आठवड्यातले दोन दिवस यायचेच की! मला बाप म्हणून माझ्या पोरा पासून लांब जाण्याची भीती वाटते तो त्या लूप होल मध्ये गेला असता तर हा विचार करून माझा जीव कासावीस होतो आऊ पण तू मी तीस वर्षांचा होई पर्यंत माझ्या पासून दूर राहिलीस याच भीतीच्या सावटा खाली जगत राहिलीस! खरंच तू खूपच स्ट्रॉंग आहेस आऊ I am proud of you!” असं म्हणून तो अहिल्याबाईला मिठी मारून पुन्हा रडू लागला.

अहिल्याबाई,“ अमू एक आई म्हणून मला ते करण भाग होत राजा! मी जगा वेगळं असं काही केलं नाही! पण या सगळ्याचा किती त्रास करून घेशील तू! बास झालं आता आपल्याला पुढचे नियोजन करायचे आहे ना! आणि हा का विचार करत नाहीस तू की आपली पुण्याई कुठे तरी कामाला आली आणि अदूला काहीच झाले नाही! तो सुखरूप आहे!आणि हो अभीचा फोन आला तर यातलं काही सांगू नको तिला आजू पुस्तक शोधलं नाही असेच सांग तिला नाही तर तिला ही टेन्शन येईल आपण तिला उद्या सांगू सगळं ती घरी आल्यावर!” त्या त्याच्या पाठीवरून  प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या.

अगम्य,“ हो! नाही सांगणार मी तिला!” तो म्हणाला.

राहुल,“ झाला का अम्या तुझा इमोशनल ड्रामा करून! तर ते पुस्तक उघडून पाहूयात का आपण त्यात असे काय आहे की  तो सूर्यकांत  त्यात जाऊन बसला आणि अज्ञांकने इतकी वर्षे झाली पुस्तक सोडले नाही!” तो म्हणाला

अगम्य,“ हो (असं म्हणून त्याने ते रंगीबेरंगी पुस्तक  काही मिनिटे चाळायले आणि तो बोलू लागला.) यात एकूण पाच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट एका राजकुमाराची आणि त्याच्या भावाची आहे. दुसरी एका मुलीची जिला परी भेटते. तिसरी सिंहाची आहे जो जंगलाचा राजा आहे. चौथी एका मुलाची आहे जो खूप खोडकर आहे आणि पाचवी एका मुलीची आणि चेतकीनीची आहे!” त्याने ढोबळ मानाने पुस्तकाचे विश्लेषण केले.

      आता रात्रीचे साडे  आठ झाले होते आणि जेवायची वेळ ही! अहिल्याबाईनी सकाळी अभिज्ञाला फोन  केल्यामुळे  तिचे आणि अज्ञांकचे बोलणे झाले होते. सगळ्यांची जवणे झाली. सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. अज्ञांक अगम्यच्या मांडीवर बसून पेंगत होता. म्हणून मग तो त्याला घेऊन वर झोपवायला गेला अज्ञांक गाढ झोपला. आता  रात्रीचे दहा वाजून गेले होते. अहिल्याबाई अगम्य जवळ आल्या आणि हळुच कुजबुजल्या.

अहिल्याबाई,“ झोपला ना रे अदू! मी घेऊन जाते त्याला!” 

अगम्य,“ राहूदे आऊ झोपू दे माझ्या जवळ त्याला!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ अरे तुला अभीचा फोन येईल तू रात्री तीन पर्यंत जगणार फोनवर बोलत! मग त्या आवाजाने हा उठून बसेल ना मग भोकाड पसरेल! त्या पेक्षा मी घेऊन जाते त्याला आणि हो अभिला काही सांगू नको रे अमू उगीच ती अपसेट होईल! एक तर जायचं जीवावर आले होते तिच्या पण गेली बापडी मैत्रिणीची मदत करायला उद्या सांगू आल्यावर सगळं!” त्या त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाल्या.

अगम्य,“ हो आऊ नाही सांगत मी तिला आणि मी झोपयुन येतो चल अदूला तुझ्या बेडवर!” तो म्हणाला.

अहिल्याबाई,“ अरे कशाला मी जाईन घेऊन इतकी ही म्हातारी नाही झाले की नातवाला कडेवर ही उचलू शकणार नाही!” त्या हसून म्हणाल्या आणि  झोपलेल्या अज्ञांकला अलगद कडेवर उचलून घेऊन गेल्या. अगम्यने दार लावले आणि त्याचा फोन वाजला.फोन अभिज्ञाचा होता त्याने फोन उचलला आणि म्हणाला.

अगम्य,“ हा बोला देशमुख  मॅडम!” तो हसून म्हणाला

अभिज्ञा,“ बाप रे चक्क देशमुख मॅडम आज काय भानगड!” ती ही हसून म्हणाली.

अगम्य,“ काहि नाही ग असंच! कस सुरू आहे तुझं काम आवरलं ना म्हणजे तू उद्या येते आहेस ना? ” त्याने विचारले.

अभिज्ञा,“ अरे हो  हो श्वास घे! मी उद्या दुपार पर्यंत येईन घरी! बरं पुस्तक सापडले का ते?” ती म्हणाली.

अगम्य,“नाही ग म्हणजे उद्या शोधणार आहोत! आणि तू काय ग रोमॅंटिक वगैरे बोलायचे सोडून हे घेऊन बसली! मी झोपू का नाही तर!” तो विषय बदलत मुद्दाम म्हणाला.

अभिज्ञा,“ अच्छा! तर आज देशमुख साहेबांचा मूड रोमँटिक आहे तर!” ती हसून म्हणाली.

अगम्य,“हुंम! तू कधी येतेस अस झालय अभी खूप आठवण येतेय तुझी!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हो का? दोन दिवसातच आठवण येतेय माझी दोन वर्षे कसा राहिलास रे अमू!”तिने विचारले.

अगम्य,“अग तू रोज दिसायचीस की मला ऑफिसमध्ये मग मी खुश!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ अरे वा! नुसते पाहून खुश मग इथून पुढे ही तसच करत जा!” ती त्याची खेचत म्हणाली.

अगम्य,“ तू घरी ये मग तुला चांगलाच पाहतो!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हो पहा आ मी थोडीच घाबरते तुला! बरं अदू झोपला का?” ती म्हणाली.

अगम्य,“ हो झोपला आज त्याला खेळायला बाहेर सोडले होते. चांगला दमू पर्यंत खेळू दिला मग काय साहेब जेवायला ही कुणकुण करत होते झोपायचे होते त्याला आईंनी  भरवलं आणि मग नऊ वाजताच पेंगायला लागला मग झोपवला त्याला! खरं सांगू अदूकडे आपण जास्त लक्ष  द्यायला हवं होतं  आणि आता ही जरा जास्त आपल्याला अजून लक्ष द्यावे लागेल.” तो जरा भावुक होत म्हणाला.

अभिज्ञा,“ असं अचानक का वाटतय तुला? म्हणजे आपण लक्ष देतोच की उलट तो जास्तच लाडात वाढला आहे मी या चार महिन्यात   किती वेळा म्हणाले की तो आता सहा वर्षांचा होईल त्याला आपण एकट झोपायची सवय लावू पण तुझं आपलं अजून लहान आहे तो रात्री दचकून उठला तर वगैरे वगैरे!” ती सहज म्हणाली.

अगम्य,“ अदू अजून खूप लहान आहे अभिज्ञा मी त्याला अजून कमीत कमी दहा-बारा वर्षे तरी  एकट सोडणार नाही आणि उलट आज पासून तर नाहीच नाही!” तो चिडून तिच्यावर जवळजवळ ओरडलाच.

अभिज्ञा,“ अरे हो हो इतकं चिडवायला काय झालं आणि आज पासून एकट सोडणार नाही म्हणजे काय झालंय अगम्य तू विनाकारण इतकं चिडणारी नाही!”ती संशयाने विचारले.

अगम्य,“काही नाही ग! असंच मला जरा अदूची काळजी वाटते मागच्या काही महिन्यात काय काय घडून गेले!” तो सारवा सारवी करत म्हणाला.

अभिज्ञा,“ अमू तू ठीक आहेस ना? काही लपवत तर नाहीस माझ्या पासून!” तिने संशयाने विचारले.

अगम्य,“ आता मी काय लपवणार तुझ्या पासून? माझी चिडचिड होतेय कारण ना I want you! समजून घेणा अभी!” तो विषय बदलत लाडात येत म्हणाला.

अभिज्ञा,“ काय करू मी तुझं अमू! I love you! मी उद्या येणारच  आहे की!”;ती म्हणाली.

अगम्य,“ आज तू जर असतीस ना इथे तर…… राहू दे love you!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ थांब मी व्हिडीओ कॉल करते.” ती म्हणाली.

अगम्य,“ कर पण मी म्हणेल  ते करावे लागेल तुला” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ नालायक आहेस तू!”  ती हसून म्हणाली.

         आणि  अभिज्ञाने व्हिडीओ कॉल केला. आणि दोघे ही एकमेकांच्या बोलण्यात गुंतले.

★★★★


 

     दुसऱ्या दिवशी अभिज्ञा घरी आली तर अगम्य ऑफिसला गेला होता.अज्ञांक मात्र हट्टाने आज शाळेला बुट्टी मारून बसला होता.ती आली तर सगळे तिचेच वाट पाहत होते तिला पाहून अज्ञांक तिला जाऊन बिलागला. सखुने  पाणी आणून तिला दिले.सगळे जेवणासाठी तिची वाट पाहत थांबले होते.आज ही अगम्य लंचसाठी घरी येणार नव्हता.त्याचा डबा अहिल्याबाईनी ऑफिसमध्ये पाठवून दिला होता.अहिल्याबाई अभिज्ञाला म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ जा अभी फ्रेश होऊन ये मग आपण जेवू!”

अभिज्ञा,“ हो आऊ मी आलेच!” ती म्हणाली आणि अज्ञांक ही तिच्या बरोबर वर गेला.

अज्ञांक,“ माझी आक्सिव्ही कुठे आहे ग आई? आणि कॅटबरीज?” त्याने उत्सुकतेने विचारले.

अभिज्ञा,“ अरे हो हो ही घे बाबा तुझी गाडी काय रे तू जास्त त्रास नाही दिलाना बाबाला आणि आजीला!” तिने एक गिफ्ट रॅप बॉक्स त्याच्या हातात ठेवला आणि   वॉशरूमकडे जात त्याला  विचारले.

अज्ञांक,“ नाही ग आई उलट ना बाबा ना मला जवल घेऊन काल रलत होता! तुझी आठवण येत होती ना त्याला म्हणून मी म्हणालो की जाऊ नको तू होफिशला तू ही बुट्टी मार तर हसला आणि गेला!” तो बॉक्स खोलत बोलत होता आणि हे ऐकून अभिज्ञा थबकली आणि तिने त्याला जवळ बोलावून विचारले.

अभिज्ञा,“ काय बाबा रडत होता?तुला जवळ घेऊन?कधी?” तिने विचारले.

अज्ञांक,“ काल संध्याकाली ग खूप रलत होता! मी विचरले तर की तुला आईची आठवण येते का?तर हो म्हणाला.  ये मी जातो  माझी एक्सिव्ही दाखवतो आता सगल्याला!”तो गाडी हातात घेऊन खुश होत म्हणाला आणि जाऊ लागला.अभिज्ञा मात्र हे ऐकून विचारात पडली आणि अगम्य काही तरी लापावतो आहे ही तिला आलेली शंका खरी ठरली हे ही तिच्या लक्षात आले होते.

अभिज्ञा,“ थांब! तुला किती वेळा सांगितले जिना चढून एकट यायचं नाही आणि जायचं ही नाही!” ती चिडून म्हणली.

अज्ञांक,“ पण मी मोठा जालो ना…”तो पुढे बोलणार तर ती पुन्हा त्याच्यावर ओरडली.

अभिज्ञा,“ गप्प बस इथे मोठा झाला म्हणे! मी आले!” आणि ती वॉशरूमला गेली.

       

     तिच्या ओरडण्याने मात्र अज्ञांकचे डोळे काठोकाठ पाण्याने भरले आणि तो तोंड फुगवून तिथेच बसून राहिला.अभिज्ञा बाहेर आली आणि अज्ञांकला असे बसलेले पाहून तिला कसे तरी वाटले आणि त्याला मिठी मारत ती म्हणाला.

अभिज्ञा,“ सॉरी बच्चा!” 

अज्ञांक,“ ही घे तुजी एक्सिव्ही!” मला नको तो तोंड फुगवून रडत म्हणाला.

अभिज्ञा,“ सॉरी ना! आई कान धरते ना! मी ना अजून काही तरी आणले आहे माझ्या अदुसाठी आणि हो आपल्यात छोटूल बाळ आहे ना त्याच्यासाठी ही!” ती बॅगेतून अजून दोन बॉक्स काढत  त्यातील एक बॉक्स त्याच्या हातात देत म्हणाली.

अज्ञांक,“ ये पजल!आणि कॅटबरीज कुठे माजे!” तो बॉक्स खोलून पाहत म्हणाला.

अभिज्ञा,“ हो हो देते की पण जेवण केल्यानंतर आईला एक पापा तर दे मग!” ती म्हणाली आणि अज्ञांक खुदकन हसला आणि तिच्या गालावर एक पापा दिला. दोघे ही खाली गेले.

      जेवण झाले पण अभिज्ञा मात्र मनातून अस्वस्थ होती.तिच्या मनात अनेक प्रश्न फेर धरून नाचत होते की अगम्य असा अज्ञांकच्या समोर त्याला मिठी मारून का रडला असेल?त्याने अजून काय काय आपल्या पासून लपवले आहे? पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला अगम्य ऑफिसमधून आला तरी रात्री झोपायला गेल्या शिवाय मिळणार नव्हती आणि तो पर्यंत तिला धीर धरावा लागणार होता.अगम्य ऑफिसमधून आला आणि अभिज्ञाला पाहून खुश झाला पण त्याच्यात आणि अभिज्ञामध्ये विशेष असे बोलणे झाले नाही आणि कोणी ही त्या पुस्तकाचा ही विषय काढला नाही.म्हणून मग अभिज्ञाने ही गप्प राहणेच पसंत केले.रात्रीची जेवण उरकली आणि अभिज्ञाने अज्ञांकला अहिल्याबाईच्या रूममध्ये झोपवले आणि ती रूममध्ये गेली तर अगम्य लॅपटॉपवर काही तरी काम करत बसला होता.अभिज्ञा त्याच्या जवळ जात रागानेच त्याला म्हणाली.

अभिज्ञा,“ अगम्य ठेव तो लॅपटॉप मला तुला काही विचारायचे आहे” ती म्हणाली.

अगम्य,“ बाप रे आल्या आल्या आग पाखड! मला वाटलं होतं आज प्रेमाचा गारवा अनुभवायला मिळणार!” तो लॅपटॉप ठेवून तिला डोळे मिचकावत म्हणाला.

अभिज्ञा,“ अगम्य फाजीलपणा बास झाला! तू काल रडत का होतास? ते ही अज्ञांक समोर आणि त्याला मिठी मारून! मला काल रात्रीच शंका आली होती तुझ्या बोलण्यावरून पण आज पक्के कळले अजून काय लपवले आहेस माझ्या पासून?” ती चिडून म्हणली.

अगम्य,“ हुंम अदु पचकला तर! मी तुला सांगणारच होतो!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ कधी सांगणार होतास की मागच्या वेळी सारख लपवणार होतास सगळं?” ती चिडून म्हणली.

अगम्य,“अग ऐकशील तर खरं! तू टेन्शन घेशील म्हणून तुला नाही सांगितलं पण कालच पुस्तक शोधले आणि ते सापडले ही!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ पण त्यात अदुचा संबंध?” तिने विचारले.

अगम्य,“ अभी ते पुस्तक अदुचे आहे स्टोरी बुक जी त्याला खूप आवडते म्हणून त्याने ती आजतागायत जपून ठेवली आहे!” तो गंभीर होत म्हणाला.

अभिज्ञा,“ अरे देवा! ते जुने पुस्तक जे त्याने हट्टाने ठेवून घेतले जे त्याच्या खेळण्याच्या  म्हणजेच त्याच्या रूममध्ये आहे.पुण्याला गेल्यावर तो ते विसरला! बाप रे अरे तो किती तरी वेळ तिथे खेळत बसायचा अशा किती अमावस्या येऊन गेल्या असतील आणि पुण्यात आम्ही होतो तरी तो आठवड्याले तीन-चार दिवस इथंच असायचा आता ही कधी कधी तो रात्री खेळत तिथेच झोपतो. माझ्या लेकराला त्या लूप होलने ओढून नेले असते तर! मला आत्ताच्या आत्ता अदू जवळ जायचं आहे!” असं म्हणून ती दार उघडून अहिल्याबाईच्या रूम जवळ आली तर रूम उघडीत होती अहिल्याबाई जणू तिचीच वाट पाहत होत्या. अगम्य  ही तिच्या मागे गेला.

अहिल्याबाई,“ मला माहित होतं अभी तू अदुला पाहायला येणार एक आई दुसऱ्या आईला चांगलं ओळखू शकते.” त्या असं म्हणाल्या 

    आणि अभिज्ञा बेडवर जाऊन अज्ञांक जवळ बसली तिने झोपलेल्या अज्ञांकला उचलून मिठी मारली आणि ती हुंदके देऊन रडू लागली.तिच्या असे वागण्याने अज्ञांक झोपलेला जागा झाला आणि अभिज्ञाला डोळे उघडून म्हणाला.

अज्ञांक,“ जोपु दे ना आई!” 

अभिज्ञा,“ झोप हा बच्चा पण आईला पापा तर दे!” ती डोळे पुसत पेंगणाऱ्या अज्ञांकला म्हणाली. 

    अज्ञांकने झोपेतच तिला पापा दिला आणि तिला मिठी मारून तो झोपला.हे सगळं अहिल्याबाई आणि अगम्य डोळ्यात पाणी आणून पाहत होते.अभिज्ञा अज्ञांकला तसेच घेऊन बराच वेळ कुरवाळत राहिली आणि थोड्या वेळाने ती अहिल्याबाईना म्हणली.

अभिज्ञा,“ आई आज मी अदुला घेऊन जाऊ का?” 

अहिल्याबाई,“ अभी अग विचारतेस काय अदु तुझा मुलगा आहे सगळ्यात जास्त अधिकार त्याच्यावर तुझा आहे! जा की घेऊन! मी समजू शकते तुला काय वाटते आहे आज ते!” त्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून म्हणाल्या.

अगम्य,“ बरं चल मग आता आऊला हि झोपू दे रात्र खूप झाली आहे!” तो म्हणाला.

अभिज्ञा,“ हुंम! असं म्हणून ती झोपलेल्या  अज्ञांकला घेऊन निघाली अगम्यने मात्र अहिल्याबाईना मिठी मारली आणि म्हणाला.

अगम्य,“ love you आऊ!”

अहिल्याबाई,“ love you too बेटा! जा झोपा आता!” त्या मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

     अभिज्ञा बराच वेळ अज्ञांकला बिलगून पडून राहिली.ती न राहवून सतत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती.अगम्य मात्र बेडला टेकून तिलाच पाहत होता. थोड्या वेळाने अभिज्ञा सावरली आणि तिने अज्ञांकला व्यवस्थित पांघरून घातले आणि अगम्यचा हात धरून त्याला ओढतच गॅलरीत घेऊन गेली. आणि त्याच्याकडे हाताची घडी घालून प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली.

अगम्य,“ सांगतो बाई सविस्तर सगळं! काल तो कापूर घेऊन मी घर भर फिरलो तेंव्हा अनपेक्षितपणे तो अज्ञांकच्या रूममध्ये त्याच्या त्या पुस्तकावर प्रज्वलित झाला.मला ही हा धक्काच होता आणि तुझ्यासारखा मी ही विचार करून अज्ञांकला मिठी मारून रडलो काल आणि त्याने आज लगेच तुला पिन मारली!” तो हसून म्हणाला.

अभिज्ञा,“ खरंच अमू मानले पाहिजे आऊला त्या तुझ्या पासून किती वर्षे दूर राहिल्या! मी अदु पासून नाही राहू शकत दूर त्या विचारानेच माझा जीव कासावीस होतो आणि सोनिया कशी दिवस काढत आहे त्याच्या मुलीविना काय माहीत रे! तिची तर मुलगी कीडन्याप झाली आहे!” ती डोळे पुसत म्हणली.

अगम्य,“ मग तू तिची मदत केलीस ना त्या हवेलीचे रहस्य उलगडायला?”त्याने विचारले.

अभिज्ञा,“ ही मी केली तिची मदत तिथे एक तालावर आहे जी ते लोक पुरातन आहे असं म्हणतात पण ती पुरातन वगैरे नाही रे पाच सहा वर्षांपूर्वीची आहे.त्या हवेलीत बरीच रहस्य आहेत.ते जाऊ दे मला ना बोलण्यात वेळ नाही घालवायचा आता!चल ना!” ती अगम्यला मिठी मारत लाडिकपणे म्हणली.

अगम्य,“ हुंम! चला बाकी सगळं उद्या बोलू!” तो हसून तिला रूममध्ये नेत म्हणाला.


 

     आज अज्ञांकच्या पुस्तकात सूर्यकांतचे अस्तित्व आहे हे कळल्या नंतर पुन्हा एकदा नात्यांची समीकरणे बदलली होती. अगम्य, अहिल्याबाई, अभिज्ञा आणि अज्ञांकच्या नात्याची वीण अजूनच घट्ट झाली होती.

 सूर्यकांत अज्ञांकच्या बालकथांच्या पुस्तकात का आणि कसा जाऊन बसला होता? आता पुढे काय घडणार होते? अभिज्ञाने तलवारीचे तर रहस्य उलगडले होते पण तिने अजून काय काय मदत सोनियाला केली होती?

              ही सगळी रहस्य जाणून घेण्यासाठी वाचत राहा दि लूप होल पर्व २ आणि रहस्यमय हवेली!

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule 

             

 

        

 


 

🎭 Series Post

View all