May 15, 2021
रहस्य

दि लूप होल पर्व २(भाग १)

Read Later
दि लूप होल पर्व २(भाग १)

   आज देशमुख उद्योग समूहाची बोर्ड मिटिंग पुण्यातील कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये होती मेहता फूड बरोबर बिजनेस करायचा की नाही यावर निर्णय होणार होता जो खूप महत्वाचा होता कारण खूप मोठी डील होती म्हणूनच सगळे बोर्ड ऑफ डायरेक्ट मिटिंगला हजर होते. अभीज्ञा गाडीतून उतरली आणि कॉम्फरंस हॉलमध्ये गेली.तर अगम्य सोडून सगळे वेळेत हजर होता. अगम्य ही गाडीतून उतरला आणि धावतच कॉन्फरंस हॉलमध्ये आला. पहिल्यांदा त्याने लेट झालं म्हणून दिलगिरी व्यक्त केली व मिटिंग सुरू झाली. अभीज्ञा बोलू लागली.


अभीज्ञा,“ आपण जर मेहता अँड मेहता बरोबर ही डील केली तर आपल्या फायद्याचीच आहे कारण आपल्या फूड प्रोडक्टची चांगली पब्लिसिटी होईल! आणि आपले प्रोडक्ट  बऱ्याच जिल्ह्यात पोहोचतील!” ती म्हणाली.


एक बोर्ड मेम्बर(सरनाईक)“ बरोबर आहे मॅडम तुमचं त्यांच्या फूड प्रोडक्ट बरोबर आपल्या ही फूड प्रोडक्टला ही चांगले मार्केट उपलब्ध होईल!” त्यांनी दुजोरा दिला.


अगम्य,“ अजिबात नाही कारण ही डील झाली तर मेहता अँड मेहता आपल्या नावावर स्वतः लो कॉलेटीचे  प्रोडक्ट बनवून ते मार्केटमध्ये विकू शकतात कारण माझ्या माहिती नुसार त्यांनी एका कंपनी बरोबर डील करून असे केले आहे. त्यामुळे ही डील आपण केली तर आपल्या कंपनीची बदनामी होऊ शकते म्हणून मला ही डील मान्य नाही.” तो म्हणाला


अभीज्ञा,“ प्रत्येक वेळी मला विरोध करणे गरजेचे आहे का Mr.देशमुख? मी पूर्ण अभ्यास केला आहे.its a good deal for our business!” ती चिडून म्हणाली.


अगम्य,“ ok then do what you want but I  can't be part of this!”असं म्हणून तो त्याच्या केबिन मध्ये निघून गेला.त्यामुळे मिटिंग अर्धवट राहिली.

   

        मग काय सगळे बोर्ड मेम्बर निघून गेले. अभीज्ञा तावातावाने उठली आणि अगम्यच्या केबिनमध्ये गेली. अभीज्ञा त्याला पाहून म्हणाली.


अभीज्ञा,“ प्रत्येक गोष्टीत माझा विरोध करणे गरजेचे आहे का अगम्य?” तिने रागानेच विचारले.


अगम्य,“मी तुझा विरोध करत नाही अभी तर तू जो चुकीचा निर्णय घेत आहेस त्याचा विरोध करत आहे कारण ही डील खरच आपल्या कंपनीसाठी चांगली नाही मेहता फ्रॉड आहे मी चौकशी केली आहे!” तो ही रागानेच म्हणाला.


अभीज्ञा,“ अच्छा म्हणजे मी मूर्ख आहे का? मी ही अभ्यास केलाच आहे ना!” ती चिडून म्हणाली.


अगम्य,“ हे बघ मी सावध करायचे काम केले तुला शेवटी निर्णय तुझा आहे शेवटी कंपनीची M. D. तू आहेस!एक्कावन्न टक्के शेअर्स तुझ्या नावावर आहे.मी निघतोय मला फॅक्टरीत काम आहे जाताना स्कुल मधून  अदुला घेऊन जात आहे आज शनिवार आहे आणि उद्या रविवार सोमवारी त्याला आणून सोडेण!” असं म्हणून तो निघून गेला.


                अभीज्ञा मात्र त्याच्याकडे चिडून पाहत राहिली. अगम्य अज्ञांकला शाळेतूनच श्रीरंगपूरला घेऊन गेला.

               रात्री अगम्य अज्ञांक बरोबर झोपला होता.त्याचा फोन वाजू लागला आणि अगम्यने वैतागून  घड्याळ पाहिले तर बारा वाजले होते एवढ्या रात्री कोणाचा फोन आला म्हणून त्याने रागानेच फोन उचलला तर तिकडून एक अनोळखी व्यक्ती बोलत होती.


व्यक्ती,“आपण अभीज्ञा देशमुखचे कोण?त्याने विचारले.


अगम्य,“ मी तिचा नवरा आहे पण का?” त्याने आश्चर्याने विचारले.


व्यक्ती,“ त्यांचा एक्सिडंट झाला आहे त्यांच्या पर्स मध्ये मला तुमचे व्हिजिटिंग कार्ड दिसले म्हणून फोन केला.तुम्ही आत्ताच्या आत्ता पुण्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये या!” तो माणूस बोलत होता.


अगम्य,“ काय? कधी?कसा आणि अभीज्ञा कशी आहे? मी निघतो आहे लगेच!” तो घाबरून काळजीने बोलत होता.


     अगम्यने घाईनेच कपडे घातले आणि तो खाली आला. अहिल्याबाईंना उठवले आणि अज्ञांक जवळ जायला सांगितले. अभीज्ञाचा एक्सिडंट झाला आहे हे ऐकल्यावर त्या ही काळजीत पडल्या.अगम्य हॉस्पिटलमध्ये पोहोचला तो पर्यंत अभीज्ञाचे आई-बाबा ही तिथे पोहोचलो होते. त्याने बाबांना विचारले.


अगम्य,“ कशी आहे अभीज्ञा?ती ठीक आहे ना?” तो काळजीने विचारत होता.


बाबा,“ हो अमू ती ठीक आहे. तिचा  हात फॅक्चर झाला आहे आणि डोक्याला आणि पायाला बराच मुक्कामार लागला आहे.ती  डॉक्टरने झोपेचे इंजेक्शन दिले आहे त्यामुळे   झोपली आहे. उद्या आपण घेऊन जाऊ शकतो तिला घरी! तू पाहू शकतो तिला त्या रूममध्ये आहे ती!” ते अगम्यला समजावत म्हणाले.


       अगम्य रूममध्ये गेला तर अभीज्ञा गाढ झोपली होती. डोक्याला बराच मुक्कामार लागलेला दिसत होता.हाताला प्लास्टर करून हात गळ्यात अडकवला होता. अगम्य तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्याने अभीज्ञाच्या आई-बाबांना जबरदस्तीने घरी पाठवून दिले.अहिल्याबाईना फोन करून सांगितले. अभीज्ञा ठीक असल्याचे!

         अगम्य रात्र भर अभीज्ञा जवळ बसून होता.सकाळी सहा वाजता तिला जाग आली तर अगम्य खुर्चीत बसून झोपला होता. तिने उठण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हातातून आणि पायातून जोरात कळ आली तशी ती विव्हळली  आणि तिच्या आवाजाने अगम्य जागा झाला व तिला उठायला मदत करत  काळजी मिश्रित रागाने म्हणाला.


अगम्य,“ काय चालल अभी तुझं? उठायचंच होत तुला तर मला हाक का मारली नाहीस! एक तर किती लागलय तुला! आणि रात्री कुठे गेली होतीस ग धडपडायला?”त्याने विचारले.


अभीज्ञा,“ अरे जरा श्वास तर घेऊ दे मला! मी काल जोशी वकिलांनी सांगितलेल्या पत्त्यावर मेहताची चौकशी करायला गेले होते. तू म्हणत होतास ते बरोबर आहे अमू ते फ्रॉड आहेत! पण घरी जाताना समोरून एका गाडीने  माझ्या कारला ठोकरले! त्या नंतर मला काहीच माहीत नाही! आई बाबांना कळलंच असेल की कुठे आहेत ते?” ती म्हणाली.


अगम्य,“ मी रात्रीच त्यांना घरी पाठवले! तुझ्या अपघाताचा फोन आला किती घाबरलो होतो मी अभी! एकटीनेच कशाला जायचं ग कडमडायला ते ही इतक्या रात्री?” तो रागाने म्हणाला.


अभीज्ञा,“ अच्छा म्हणजे मला काही झाले तर तुला अजून ही फरक पडतो तर!” ती खिन्नपणे हसून म्हणाली.


अगम्य,“काय बोलतेस अभी तू उगीच आता भांडण उकरून काढू नकोस!तुझ्यासाठी नाष्टा घेऊन येतो मी तुला काही हवं का अजून वॉशरुमला जाणार आहेस का तू?” त्याने विचारले.


अभीज्ञा,“ थोडं पाणी देतोस का? बाकी काही नको!” ती म्हणाली.


      अगम्यने तिला पाणी दिले आणि तो कॅन्टीनमध्ये तिच्यासाठी नाष्टा आणायला  गेला. तो पर्यंत पोलीस एक्सिडंटची  चौकशी करायला आले.


इन्स्पेक्टर,“ मिसेस देशमुख कशा आहात?खरं तर रात्रीच हॉस्पिटलमधून फोन अल्यावर चौकशी करायला आम्ही येणार होतो पण तुम्ही झोपलात म्हणून डॉक्टरांनी सांगितले म्हणून आलो नाही पण बाकी सगळी माहिती काढून आत्ता आलो! बरं  तुमचा अपघात कसा झाला?” त्यांनी विचारले.


अभीज्ञा,“ मी ठीक आहे!  मी काल रात्री काही कामा निमित्त एके ठिकाणी गेले होते आणि तिथून घरी येताना माझ्या कारला एका गाडीने ठोकरले!” ती म्हणाली.


इन्स्पेक्टर,“ तुम्हाला कुणावर संशय म्हणजे कोणी तुमचा अपघात घडवला असेल तर?” ते तिला तिरकस पाहत म्हणाले.


अभीज्ञा,“ आता माझा कोण घडवणार अपघात इन्स्पेक्टर? तो  चुकून झालेला अपघातच होता!” ती म्हणाली.


इन्स्पेक्टर,“ नाही म्हणजे मिसेस देशमुख तुमचं व मिस्टर देशमुख म्हणजे तुमच्या नवऱ्याचे फारसे पटत नाही काल ही तुमचा आणि त्याचा बोर्डमिनींग मध्ये वाद झाला म्हणे!त्यात तुम्ही कंपनीच्या M. D.,एक्कावन्न टक्के शेअर्स तुमच्या नावावर! त्यांनी तर हा घातपात……” ते पुढे बोलणार तर अभीज्ञा त्यांना मध्येच थांबवत म्हणाली.


अभीज्ञा,“ हे बघा इन्स्पेक्टर तो आमचा पर्सनल मॅटर आहे त्याचा आणि मला झालेल्या  अपघाताचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.अगम्य देशमुख माझे पती आहेत आणि by the way तुमच्या माहितीसाठी सांगते. देशमुख फूड इंडस्ट्री त्यांच्या मालकीची आहे त्यांच्या आई म्हणजे माझ्या सासुबाईनी मला M. D. बनवले आहे आणि त्या हयात आहेत अजून पाहिजे तेंव्हा त्या सगळं त्यांच्या मुलाच्या नावावर करू शकतात आणि Mr. देशमुख ते स्वतःच्या नावावर करून घेऊ शकतात. तेंव्हा असलं काही करण्याची त्यांना काहीच गरज नाही आणि ते अस कधी करणार ही नाहीत कारण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे! तुमची चौकशी झाली असेल तर तुम्हीं निघू शकता!” ती तावातावानेच इन्स्पेक्टरला म्हणाली.


इन्स्पेक्टर,“ ठीक आहे या पेपर्सवर सही करा आम्ही निघतो!” असं म्हणून इन्स्पेक्टरने जबाबावर सही घेतली आणि ते निघाले.


       अगम्य तो पर्यंत नाष्टा आणि चहा घेऊन आला होता आणि तो रूमच्या बाहेर उभा राहून सगळं ऐकत होता. इन्स्पेक्टर गेले आणि अगम्य रूममध्ये आला.त्याने अभीज्ञाला नाष्टा भरवला तो पर्यंत डॉक्टर आले.त्यांनी अभीज्ञाचे चेकअप केले आणि तिचे रिपोर्ट्स पाहून ते म्हणाले.


डॉक्टर,“ मिसेस देशमुख आता तुम्ही ठीक आहात पण हाताला सिव्हीयर फ्रॅक्चर आहे तुमच्या आणि पायाला आणि डोक्याला बराच मुक्कामार लागला आहे. त्यामुळे तुम्हांला बेडरेस्ट घ्यावा लागेल.” ते म्हणाले.


अभीज्ञा,“ पण माझ्या हाताचे प्लास्टर कधी काढणार तुम्ही?” तिने विचारले.


डॉक्टर,“ कमीत कमी दीड महिना तरी नाही!” ते म्हणाले.


अगम्य,“ डॉक्टर काही काळजी करण्यासारखे तर नाही ना?” त्याने काळजीने विचारले.


डॉक्टर,“ नाही तसं काळजीचे कारण काहीच नाही!आणि आज दुपारी तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता! माझ्याबरोबर चला  Mr. देशमुख थोडं बोलायचं आहे!”असं म्हणून डॉक्टर गेले आणि अभीज्ञाला झोपायला मदत करून अगम्य डॉक्टरच्या पाठोपाठ गेला.


        अभीज्ञा मात्र जागेवर पडून विचार करत होती.


अगम्य आणि अभीज्ञा मध्ये असे काय झाले होते की अभीज्ञा पुण्यात आणि अगम्य श्रीरंगपूरला राहत होता? या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule


 आज पासून लूप होल पर्व २ सुरू करत आहे. पहिल्या पर्वाला जसा उस्फुर्त प्रतिसाद दिलात तास या ही पर्वाला मिळेल ही अपेक्षा!


 चला तर मग निघुया आणखीन एका रोमांचक प्रवासाला अगम्य आणि अभीज्ञा बरोबर! 

 


    


  


           

Circle Image

Swamini Chaughule

आमची टीम मारवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे इरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने जादुई शब्दांची मेजवानी तर आमच्या कथा वाचा आणि लाईक ,कमेंट नक्की करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे