दि लूप होल पर्व २(भाग १५)

It's a thread story

    सगळे जेवायला बसलो खरे पण अगम्यचे मात्र जेवणात लक्ष नव्हते. आज पुन्हा आपण काही तरी चुकीचं बोललो आहोत. त्यामुळे अहिल्याबाई आणि अभिज्ञा दुखावल्या आहेत या विचाराने तो अस्वस्थ होता. त्याचे जेवणात लक्ष नाही हे पाहून अहिल्याबाई पुन्हा त्याच्यावर डाफरल्या.

अहिल्याबाई,“ काय चालले आहे अगम्य तुझे? नीट जेवण कर तुझी नाटक बास झाली आता! जेवणावर राग काढशील ना तर याद राख!” त्या त्याला धमकावत म्हणाल्या आणि अगम्यने खाली मान घालून जेवण केले ते पाहून अभिज्ञा मात्र हसत होती पण कुठे तरी तिला ही अगम्यच्या बोलण्याचा राग आला होता. सगळे जेवले आणि पुन्हा हॉलमध्ये जमा झाले. अहिल्याबाई  आणि अभिज्ञा रागावल्या आणि दुखावल्या गेल्या आहेत हे दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.अभिज्ञाशी त्याने नंतर बोलायचे मनोमन ठरवत त्याने! अगम्य अहिल्याबाईं जवळ बसत त्यांची मनधरणी करत म्हणाला.


 

अगम्य,“ sorry ना आऊ! माझं चुकलं मी असं बोलायला नको होतं!पण मी तरी काय करू तूच सांग तुमच्या दोघींच्या अति प्रेमामुळे आणि काळजीमुळे माझी घुसमट होते आहे आऊ! Please try to understand!जे झालं त्यात तुमच्या दोघींचा ही काहीच दोष नव्हता आणि नाही एकट राहण्याचा चॉईज माझा होता.पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे करताय त्यामुळे माझी घुसमट होतेय!”  तो अहिल्याबाईंचा हात धरून म्हणाला.

अहिल्याबाई,“हो का?नाही म्हणजे अजून काही आम्हा दोघींना बोलायचे राहिले असेल तर तेही बोलून घे! तुला कळत कसं नाही अगम्य आमचा जीव तुझ्यात गुंतला आहे. तुला काही झालं तर आमच्या जीवाची घालमेल होते. तुला गमावण्याची आम्हाला भीती वाटते आणि तरी ही तू असं  अविचाराने बोलतोस? मला मान्य की आमच्या अति काळजी करण्याने तुझी चिडचिड होते पण तुही आम्हाला समजून घेना जरा! बाकी सगळं जाऊ दे पण तीन वर्षांपूर्वी  डॉ.पाटलांनी  हि तुला एकट सोडू नका असं सांगितलं होतं पण मी आणि अभिज्ञा तुझ्या बाबतीत इतक्या बेफिकीर झालो की तुझा विचारच करणे सोडून दिले आम्ही! इतक्या निर्धास्त झालो की तुझ्याकडे लक्षच दिल नाही अभिज्ञाने चूक करून ही ती पुण्याला निघून गेली आणि मी तुझ्या बरोबर असून ही तुझ्याकडे लक्ष दिले नाही एवढंच काय  महिन्याभरापूर्वी तुझ्यात आणि अभिज्ञामध्ये झालेल्या भांडणात तुला काहीच न विचारता  तुलाच चुकीचे ठरवून  मोकळी झाले ती ही माझी चुकच होती आणि त्याचे भयंकर परिणाम समोर आल्यावर माझे डोळे उघडले. मी कायमच आई म्हणून कुठे तरी कमी पडत आले! मग मला आणि अभिज्ञाला गिल्ट येन साहजिक आहे ना आणि त्यातून तुझी काळजी वाटन ही! आणि काय म्हणालास की माणूस जिवंत असे पर्यंत नाती असतात तो एकदा गेला की सगळं संपत माणूस हळूहळू त्याच्या शिवाय जगायला शिकतो तुला कोणाला तरी कायमचे गमावणे म्हणजे काय हेच माहीत नाही अमू म्हणून तुला तसे वाटते. मला विचार आपले माणूस गमावणे आणि त्याच्या शिवय जगणे म्हणजे काय असते मी रावसाहेबांना म्हणजेच तुझ्या वडिलांना गमावले आहे. माणसाच्या मृत्यू बरोबर नाती कधीच संपत नाहीत अगम्य ती तशीच राहतात आणि त्या व्यक्तीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते जी कायमची उणीव आयुष्यात निर्माण होते ना ती कधीच भरून नाही निघत बच्चा! माणूस जगतो  त्या व्यक्ती शिवाय पण त्याच जगणं फक्त एक फॉर्मेलिटी बनून राहते तो श्वास घेतो पण जगणे त्या व्यक्ती बरोबरच निघून गेलेले असते. म्हणून मला काय किंवा अभीला काय तुला गमण्याची भीती वाटते. जशी तुला  वाटतेच ना आम्हाला गमावण्याची!”त्या डोळे पुसत म्हणाल्या.

अगम्य,“ हुंम!  Sorry आऊ मी हल्ली जास्तच चिडचिड करतोय! मी खरंच चुकीचं बोललो इथून पुढे नाही बोलणार असे काही बरं पुढे काय झाले नाशिकमध्ये ते बाबा काय म्हणाले ते सांग ना आता!” तो अहिल्याबाईंना मिठी मारत म्हणाला आणि त्याच्या अशा वागण्याने अहिल्याबाईंचा राग मात्र निवळला.

अहिल्याबाई,“ नालायक आहेस तू तुला चांगलं माहीत आहे आईला घट्ट मिठी मारली की तिचा राग पळून जातो!” त्याच्या केसातून मायेने हात फिरवत त्या हसून म्हणाल्या. पण अभिज्ञाच मात्र तोंड फुगलेलंच होत.ते पाहून अभिज्ञाच्या आई म्हणाल्या.

आई,“ अमू तुझ्या आऊचा  तर रुसवा घालवलास पण हा फुगा कसा फोडणार आता? मी कायम तुझ्या बरोबर असते पण या वेळी मात्र माझ्या लेकीच्या बाजूने आहे!”त्या मिश्कीलपणे हसून म्हणाल्या त्यावर अगम्य काही बोलणार तर त्या आधी अभिज्ञाच म्हणाली.

अभिज्ञा,“ आई ते सगळं महत्त्वाचे नाही आत्ता हो मला राग तर खूप आला आहे पण सध्या महत्वाचं नाशिकमध्ये काय काय झाले. ते बाबा काय म्हणाले हे ऐकून आणि जाणून घेणे आहे!” ती थोडी रुक्षपणे म्हणाली. अगम्यला तिच्या चेहऱ्यावरचा राग आणि तिचे रुक्षपणे बोलणे जाणवत होते पण त्याने तूर्त तरी शांत राहणेच पसंत केले आणि अहिल्याबाई बोलू लागल्या.

अहिल्याबाई,“ मी त्यांना विचारले की मग सूर्यकांतचा आत्मा स्वप्न लोकांतून  अगम्यच्या स्वप्नात न येणासाठी काय उपाय आहे आणि अगम्यच्या ऊर्जेची झालेली हानी कशी भरून निघणार आणि आमच्या कडून असं काय चुकलं पेंटींग जाळण्यात ज्यामुळे सूर्यकांतचा  आत्मा फिरून परत आला?आणि तो कोणत्या रुपात येणार आहे?”तेंव्हा बाबा बोलू लागले. 

बाबा,“ तुझ्या मुलाला सूर्यकांतचा आत्मा जो स्वप्न लोकांतून येऊन त्रास देतो आणि त्याची ऊर्जा  शोषण घेतो ते आपल्याला आधी थांबवावे लागेल त्याची स्वप्न लोकांतून येण्याचे द्वार आपल्याला आधी बंद करावे लागेल.सूर्यकांतचा आत्मा अमावास्ये नंतर आठ  दिवसाच्या कालावधीत अगम्यच्या स्वप्नात रात्री बाराच्या नंतर ब्रम्ह मुहूर्ता पर्यंत म्हणजे तीन पर्यंत त्याच्या स्वप्नांत येतो कारण ती एक वाईट शक्ती आहे त्यामुळे त्याचा स्वप्न लोकांतून त्याच्या पर्यंतचा हाच कालावधी त्याच्यासाठी आहे म्हणून तो या कालावधीमध्येच त्याच्या स्वप्नत येतो आणि येऊ शकतो! त्या कालावधीत अगम्य बरोबर त्याच्या धर्म पत्नीने असावे व तो अमावस्येनंतर  आठ दिवस बारा ते तीनच्या दरम्यान झोपणार नाही याची दक्षता घ्यावी तीनच्या नंतर म्हणजे  ब्राम्ह मुहूर्तात किंवा बाराच्या आधी तो झोपला तर चालेल यामुळे सुर्यकांतसाठी  अगम्यच्या स्वप्न लोकाचे  व्दार बंद होईल आणि तो त्याची ऊर्जा संपादीत करू शकणार नाही आणि सूर्यकांतची शक्ती कुठे तरी थोड्या फार प्रमाणात क्षीण होईल.” 

अहिल्याबाई,“ पण बाबा हे असं किती दिवस चालणार आणि आता जे अगम्यचे नुकसान झाले ते कसे भरून निघणार आणि सूर्यकांतचा कायम स्वरुपी बंदोबस्त कसा करायचा?” मी त्यांना विचारले.

बाबा,“ अगम्यचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याला सप्तचक्र साधना करावी लागेल तसेच शुद्धीकरण होम, महारुद्र , महामृत्युंजय  यज्ञ  करावा लागेल. तूला आई या नात्याने आणि त्याची  धर्मपत्नी  अभिज्ञाला  त्याच्यासाठी महिनाभर रोज शुचीर्भूत होऊन तुम्हाला जमेल तितका महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा लागेल. सूर्यकांतच्या आत्म्याचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी मात्र तो आता ज्या रुपात जिथे कुठे आहे त्या रुपात तिथे जाऊन त्याने अगम्यला आणि त्याच्या पत्नीला  ओढून घेण्या आधी तिथे जाऊन त्या दोघांना त्याचा सामना करून ज्या वस्तुमुळे त्याचे अस्तित्व टिकून आहे ती वस्तू आणून नष्ट करावी लागेल आणि सूर्यकांतच्या वंशजाला बोलवून  पालाश विधी करावा लागेल.” हे सगळं सांगून अहिल्याबाईंनी एक निश्वास सोडला आणि त्या म्हणाल्या.

अहिल्याबाई,“ म्हणजे या वेळी फक्त अगम्यला नाही तर अभिज्ञाला ही त्या सूर्यकांतचा सामना करावा लागणार आहे आणि अशीच काहीशी धमकी सुर्यकांत तुला देत आहे ना अमू म्हणून तू दोन वर्षे अभिज्ञाला स्वतः पासून दूर ठेवतेस तिने तुझ्यावर संशय घेतला या रागाच्या आडून बरोबर का?” त्यांनी अगम्यकडे पाहत थोड्याशा जाब विचारण्याच्या सुरात त्याला विचारले.

अगम्य,“ हो हे खरं आहे आऊ! खरं तर अभीवर माझा राग होता तिने माझ्यावर संशय घेतला म्हणून पण तो तिने माझी माफी मागितली तेंव्हाच  निवळला होता पण सूर्यकांत माझ्या स्वप्नात येत होता रादर अजून ही येतो आणि मला धमकवतो की तो या वेळी दुप्पट ताकदीने येणार आहे तसेच  अभिज्ञा आणि पुढे जाऊन अज्ञांकला ही सोडणार नाही. पहिल्यांदा मी स्वप्न म्हणून दुर्लक्ष करत होतो पण त्याची  स्वप्नात येण्याची तीव्रता वाढू लागली आणि त्याचे माझ्या स्वप्नात गळा अवळण्याचे व्रण माझ्या गळ्यावर दिसू लागले मग मात्र मी घाबरलो आणि त्यातच वैदेही प्रकरण घडले आणि मला अभिज्ञा आणि अज्ञांकला माझ्या पासून दूर करण्याचे पर्यायाने सूर्यकांतच्या सावटा पासून दूर करण्याची आयती संधी मिळाली आणि मी अभिज्ञाला पुण्याला पाठवून दिले. त्यामुळे तुम्हां कुणालाच मला पडणारी स्वप्ने किंवा मला होणारा त्रास याबद्दल कळले नाही पण अभिज्ञाचा अपघात झाला आणि तिला मला घरी घेऊन यावे लागले आणि ती झोपली आहे समजून भावनेच्या भरात माझ्याकडून तिला सत्य कळले  बाकी पुढचं तर तुम्हाला माहीतच आहे की! पण अभिज्ञाला अपघात झाला नसता ना तर इतकं सगळं घडलं ही नसत आणि ही गोष्ट आज तागायत तुम्हाला कोणाला कळली नसती आणि मी ही तुम्हाला ती सांगितली नसती.या सगळ्याला तो नालायक गोखल्या जबाबदार आहे त्याने जोशी वकिलाला सांगून जर अभिज्ञाला त्या मेहाताची चौकशी करायला पाठवलं नसतं तर कदाचित पुढचं सगळं टाळता आलं असत!” तो नाराजीने बोलत होता.

अभिज्ञा,“ पाहिलं आऊ इतकं सगळं होऊन ही याच गुऱ्हाळ सुरूच आहे! याला अजून ही आपल्याला  सूर्यकांत आणि त्याच्या स्वप्नांबद्दलचे सत्य सांगायचेच नव्हते. आपल्या सर्वांना अंधारात ठेवून काय करणार होता हा काय माहीत? का तो सूर्यकांत कुठे आहे तिथे तो याला घेऊन जाऊ पर्यंत आपल्याला कळू देणार नव्हता हा माणूस? पण त्या नंतर आपलं काय झालं असत याचा जरा ही विचार नाही याला! याला दोष देण्यात तर काय अर्थ आहे म्हणा चूक तर माझीच आहे!” ती नाराजीने अगम्यकडे पाहून बोलत होती.

अहिल्याबाई,“ झालं ते झालं अभी आता पश्चाताप करून काही उपयोग नाही आणि याला तर बोलण्यात नाहीच अर्थ नाही. एक नंबर नालायक आहे हा याला स्वतः ची पर्वा कधी नव्हतीच आणि नाही पण! आपणच चुकलो म्हणायचे आणि इथून पुढे यांच्याकडे लक्ष द्यायचे!” त्या ही नाराजीने अगम्यकडे पाहून म्हणाल्या.

अगम्य,“ झालं तुमचं! दोघी सासू-सुना घसरलात का माझ्यावर? अरे देवा वाचव मला या सासू-सुना पासून!पुन्हा  यांचं सुरू झालं!” तो नाटकीपणे म्हणाला पण ते पाहून अभिज्ञा आणखीनच चिडली आणि म्हणाला.

अभिज्ञा,“ हा कोणत्याच गोष्टी बाबत सिरीअस नसतो आऊ! पाहिलत कशी चेष्टा करतोय!” ती चिडून म्हणाली.

अगम्य,“ अवघड आहे बाबा मी सिरीयस झाल्यावर ही  हीच मला म्हणते मी हिला राडवले म्हणून! आता मी काय करू!” तो पुन्हा अभिज्ञाची चेष्टा करत म्हणाला आणि अभिज्ञाचे बाबा आता म्हणाले.

बाबा,“ अगम्य या गोष्टी चेष्टा मस्करी करण्याच्या नाहीत. अभी काहीच चुकीच बोलत नाही आहे. तू जर तेंव्हाच हे सगळं सांगितले असतेस तर तुला आणि पर्यायाने आम्हा सगळ्यांना ही इतका त्रास झाला नसता. अभिज्ञाने विचारून ही तू सांगायला तयार नव्हतास ती तुझ्याच काळजी पोटी विचारत होती ना तर तू तिला निघून जा म्हणालास! त्या नंतर तिने केलेला आततायीपानाचे  मी समर्थन करत नाही कारण ती तर चुकीचे वागलीच तू असं का म्हणाला असशील याचा सारासार विचार न करता तिने ती गोष्ट इगोवर घेतली तिला सगळ्या गोष्टींची कल्पना असताना सुद्धा! मला कळतंय की तू हे सगळं अभीला आणि अदूला सूर्यकांतच्या सावटा पासून दूर ठेवण्यासाठी केलेस पण या सगळ्यात तुला काही झाले असते तर आम्ही काय केले असते याचा थोडा तरी विचार तू आमच्या सगळ्यांच्या बाजूने केलास का? पण तुही काही बरोबर वागला नाहीस अमू!” ते ही नाराजीने बोलत होते.

अगम्य,“I am sorry baba!पण मला तुम्हा सगळ्यांना हे सगळं सांगून टेन्शन द्यायचं नव्हतं. कारण ही स्वप्न आणि त्या बद्दल मला ही खात्री नव्हती. कारण सूर्यकांतच्या या सगळ्या पोकळ धमक्या असू शकतात असं मला वाटत होतं आणि तो खरं जरी  बोलत असला तरी मला अभिज्ञाला या सगळ्यांपासून लांब ठेवायचं होत कारण अभिज्ञावर कोणते ही संकट मला येऊ द्यायचं नव्हतं!पण हे सगळं या टोकाला जाईल असं मला वाटलं नव्हतं!”तो समजावून सांगण्याच्या  सुरात बोलत होता.

अहिल्याबाई,“बरं! भावना पोहोचल्या! चार वाजून गेल्या आहेत अज्ञांक येईल आता आणि पाच वाजता डॉक्टर येणार आहेत. आता बाकीच  उद्या   बोलू! अमू जा अराम कर जा थोड्या वेळ मी चहा नाष्टा  तयार झाल्यावर बोलावते तुला!” त्या म्हणाल्या आणि अगम्य होकारार्थी मान हलवून निघून गेला. त्याला वाटत होतं की अभिज्ञा त्याला बोलवायला येईल म्हणजे तिला बोलता येईल पण अभिज्ञा आलीच नाही तर तिने सखुबाईला पाठवून दिले त्याला बोलवायला. 

          चहा आणि नाष्टा घेऊ पर्यंत अज्ञांक आणि डॉक्टर ही आले. अभिज्ञाने अज्ञांकला दूध पाजवून एका नोकरा बरोबर बाहेर खेळायला पाठवून दिले.डॉक्टरांनी अगम्यची जखम आणि बी.पी चेक केला. सगळ्यांचे लक्ष डॉक्टर आता काय सांगणार याकडे लागून राहिले होते. तेंव्हाच अभिज्ञाने न राहवून डॉक्टरला विचारले.

अभिज्ञा,“ डॉक्टर आता अगम्यची जखम कशी आहे? आणि त्याचा बी.पी. आता कमी झाला आहे का?” तिने काळजीने विचारले.

डॉक्टर,“ मिसेस देशमुख काळजी करण्यासारखे काही नाही आता मिस्टर देशमुखांची दंडाची जखम पूर्णपणे भरली आहे इथून पुढे ड्रेसिंग करण्याची गरज नाही आता फक्त हातावर जास्त भार पडू देऊ नका आणि कार ड्रायव्हिंग आणि बाईक चालवणे अजून सहा महिन्यांसाठी नाही करायचे!” ते म्हणाले.

अहिल्याबाई,“ ते सगळं ठीक आहे डॉक्टर आम्ही सगळी काळजी घेऊ पण बी.पी. चे काय तो नॉर्मल झाला की नाही!” त्यांनी काळजीने विचारले.

डॉक्टर,“ हो बी.पी. बराच कमी आहे मागच्या वेळे पेक्षा पण बी.पी.ची मेडिसीन्स अजून थोडे दिवस घ्यावे लागतील. आता तीन महिन्यांतून मी येईन!” ते म्हणाले.

अगम्य,“ मी ऑफिसला जाऊ शकतो ना आता मग?" त्याने विचारले.

डॉक्टर,“ हो मिस्टर देशमुख नक्कीच उद्या पासून तुम्ही जाऊ शकता ऑफिसला पण जास्त धावपळ आणि स्ट्रेस घेऊ नका बास! मी निघतो!” असं म्हणून डॉक्टर निघाले आणि अभिज्ञा त्यांना वाड्याच्या बाहेर पर्यंत सोडायला गेली आणि तिने काळजीने डॉक्टरांना विचारले.

अभिज्ञा,“काळजी करण्या सारखे खरच काही नाही ना डॉक्टर?”

डॉक्टर,“ नाही मिसेस देशमुख काळजीचे काही कारण नाही मागच्या वेळी पेक्षा त्यांचा बी.पी. खूप नॉर्मल आहे त्यामुळे चिंतेचे कारण नाही पण हो त्यांना जास्त धावपळ आणि कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ देऊ नका! काय आहे ते आत्ताच खूप मोठ्या आजारपणातुन उठले आहेत त्यामुळे त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल!” ते म्हणाले व निघून गेले.

          अगम्य अज्ञांक बरोबर हॉलमध्ये बसून खेळत होता पण त्याचे सगळे लक्ष अभिज्ञाकडे होते आणि अभिज्ञा त्याला टाळत होती. अगम्य जेवण करून वर गेला तरी अभिज्ञा अजून खालीच होती तिने अज्ञांकला अहिल्याबाईंच्या रूममध्ये झोपवले तरी ती हॉलमध्ये घुटमळत टाईमपास करत होती. जेंव्हा केंव्हा तिचे आणि अगम्यचे भांडण होई तेंव्हा ती अगम्यच्या समोर जाणे टाळत असे ती अगम्य झोपेल याची वाट पाहत होती. तिची ही जुनीच खोड होती जी अगम्य आणि अहिल्याबाईंना ही चांगलीच माहीत होती. अहिल्याबाईंनी ती  झोपायला का जात नाही अजून ते हेरले होते. म्हणून त्या हॉलमध्ये टी. व्ही. पाहत टाईमपास करणाऱ्या अभिज्ञा जवळ आल्या आणि बोलू लागल्या.

अहिल्याबाई,“ मला माहित आहे अभी तू अजून  झोपायला का जात नाहीस ते! मी तुला आज ओळखते का? मला माहित आहे की तू अगम्यच्या बोलण्यामुळे दुखावली गेली आहेस पण तुला ही माहीत आहे तो कसा आहे माझ्या पेक्षा जास्त तू त्याला ओळखतेस!”त्या म्हणाल्या.

अभिज्ञा,“ हो आऊ मला त्याचा बोलण्याचे खूप वाईट ही वाटले आणि राग ही आला या साठी नाही की तो मला बोलला पण यासाठी की तो स्वतःचीच कदर करेंनासा झाला आहे! तुम्ही पाहताय ना तो स्वतः विषयी किती बेफिकीर झाला आहे. असं करून कसे चालेल आऊ त्याने स्वतःला नाही जपले तर कसं होणार!मला त्याची काळजी वाटते आऊ! त्याने एक तर किती मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवली आणि त्यामुळे तो आतून पोखरला गेला आहे त्यातून भरीस भर म्हणजे तो गोळीबार त्यामुळे  त्याची तब्बेत अजून ढासळली आहे मी तर मूर्ख आहेच! पण याला स्वतःच स्वतःला नाही कळत का?मला खूप गिल्ट आलेय आऊ जेंव्हा अमुला माझ्या साथीची सगळ्यात जास्त गरज होती तेंव्हा मी नव्हते त्याच्या बरोबर आणि त्याने मात्र मला वाचवायला जाऊन स्वतःला नसत्या संकटात टाकले त्याच्या आधी ही मी त्याच्याशी मागचा पुढचा विचार न करता खूप भांडले होते आऊ! मला वाचवण्यासाठी त्याने सूर्यकांतचा त्रास दोन वर्षे सहन केला आणि मला या गोष्टीची पुसटशी कल्पना ही नसावी! तो कायम नाते निभावण्यात माझ्या वरचढ ठरतो आऊ!” असं म्हणून ती अहिल्याबाईंच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागली.

अहिल्याबाई,“ अभी रडू नकोस बच्चा! जे झाले ते झाले ते तुझ्या आणि माझ्या ही हातात नव्हते पण इथून पुढे जे होईल ते तर आपल्या हातात आहे ना! अगम्य पूर्णपणे त्याच्या बाबांवर गेला आहे दिसण्यातच नाही तर स्वभावात ही! स्वतः पेक्षा दुसऱ्याचा विचार करणारा आहे तो! म्हणून असा वागला! त्यात तुझी ही पूर्ण चूक नाही आणि त्याची ही! तो इथून पुढे ही स्वतःची कदर करेल काळजी घेईल असे नाही त्याच्या वाटनीची त्याची कदर आणि काळजी ही तुलाच घ्यावी लागणार आहे.जा आता तो तू गेल्याशिवाय आणि तुझ्याशी बोलल्या शिवाय झोपणार नाही हे तुला ही माहीत आहे. आणि डोळे नीट पुसून जा बाई नाही तर तू रडत होती त्याला कळले तर तो अजून चिडचिड करणार!” त्या हसून तिचे डोळे पुसत म्हणाल्या.


 

          अभिज्ञा रूममध्ये गेली तर अगम्य अजून झोपला नव्हता. तो तिचीच वाट पाहत बसला होता. अभिज्ञाने त्याला पाहिले आणि ती तिच्या बेडवर तिच्या जागेवर झोपणार तर अगम्यने तिचा हात धरला आणि तो बोलू लागला.

अगम्य,“ सॉरी ना अभी मला माहित आहे मी चुकीचे बोललो!” तो बारीक तोंड करून म्हणाला.

अभिज्ञा,“ बरं! उद्या खूप कामे आहे ऑफिसला ही जायचं आहे आणि आऊ अजून काय सांगणार आहेत ते ही आहेच!” ती सहज म्हणाली.

अगम्य,“ नुसतं बरं आणि उद्या काय काम आहे ते मला ही माहीत आहे! पण तू बोलणा काही तरी!माझ्यावर चीड रागाव पण प्लिज अशी शांत नको ना राहुस!” तो रडकुंडीला येऊन म्हणाला.

अभिज्ञा,“ काय ऐकायचे आहे रे माझ्याकडून तुला? तुला बोलायचे होते ते तुझे बोलून झाले ना! मी तुला त्यावर काहीच बोलणार नाही! झोप आता!” असं म्हणून ती झोपू लागली तर अगम्यने तिला दंडाला धरून जवळ ओढले आणि बोलू लागला.

अगम्य,“ तुला काहीच बोलायचे नाही? मला माहित आहे तुला माझा राग आला आहे. मी तुला आज दुखावले ही आहे! रागाव माझ्यावर चीड पण अशी गप्प नको राहुस ना प्लिज!” तो आता काकुळतीला येऊन म्हणाला.

अभिज्ञा,“ तुला काय वाटते रे अगम्य मला तुझा राग आला? अजिबात नाही मी दुखावले गेले तुझ्या बोलण्याने पण तुझा राग नाही आला उलट मला तुझी काळजी वाटते. I care for you!   कारण तू स्वतःची केअर करत नाहीस रादर तुला स्वतःची कदरच नाही! तू प्रत्येक वेळी दुसऱ्याला स्वतःच्या वर ठेवतोस  आणि तुझ्या याच स्वभावाची मला काळजी आणि  भीती वाटते. Because I love you and I don't want to lose you! मी या पेक्षा जास्त स्पष्टीकरण नाही देऊ शकत तर तू ही झोप आणि मला ही झोपू दे!” ती स्वतःचा दंड त्याच्या हातातून सोडवून घेत म्हणाली.

अगम्य,“ प्लिज अभी try to understand तुझ्या अति काळजी करण्यामुळे माझा कोंडमारा होतोय त्यामुळेच कदाचित माझी चिडचिड होते. मी आज चुकीचं बोललो I am sorry for that!” त्याच्या डोळ्यातुन आता अश्रू वाहत होते. 

         त्याच्या डोळ्यात पाणी पाहून अभीज्ञा मात्र स्वतःला रोखू शकली नाही आणि त्याचे डोळे पुसत त्याला बिलगत म्हणाला.

अभीज्ञा,“ हे असा रडताना तू नाही चांगला दिसत तू तर अखडू आणि अटीट्यूट दाखवतानाच चांगला दिसतोस! खरं तर मी ठरवलं होतं की तुझ्याशी चांगलं चार-पाच दिवस नाही बोलायचं पण तू नालायक आहेस!I hate you but I love you more!”असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि बराच वेळ दोघे एकमेकांमध्ये गुंतत राहिले. त्या नंतर  अगम्य म्हणाला

अगम्य,“ अभी I love you too!आणि मी अखडू आहे काय?आणि अटीट्यूट पण दाखवतो का!” तो प्रश्नार्थक  नजरेने तिला मिठीत घेत म्हणाला.

अभीज्ञा,“ हो तू  अखडू आहेस आणि अटीट्यूट ही खूप आहे तुझ्याकडे but that's way I love you!आणि जरा हसून दाखव की तुझी ती किलरवाली स्माईल किती दिवस झाले मी मिस करतेय!” ती म्हणाली.

अगम्य,“ अच्छा! असुदे मी अखडू! पण मी हसल्यावर मला काय मिळणार?” तो मिस्कीलपणे म्हणाला.

अभिज्ञा,“ काही नाही मिळणार तुला जे मिळालं ना तेच खूप झालं! झोप आता उद्या ऑफिसला जायचं आहे ना आणि हो दोन तरी फॅक्टरी व्हिजिट कराव्या लागतील महिना झालं कोण फिरकले नाही तिकडे!झोप आता!” ती त्याला पाहून म्हणाली.

अगम्य,“बरं बरं झोपतो मी!” तो असं म्हणून झोपला आणि अभिज्ञा ही लाईट बंद करून झोपली.

            अभिज्ञा गाढ झोपेत असताना घड्याळात सडे बारा झाले होते आणि  अगम्यच्या ओरडण्याच्या आवाजाने ती जागी झाली. तिने टेबल  लॅम्प लावला आणि अगम्यला जागे केले अगम्य घाम्याघुम झाला होता. त्याच्या तोंडातून नीट आवाज ही निघत नव्हता. अभिज्ञाने त्याला उठवून बसवले आणि त्याला पाणी दिले त्याला आलेला घाम पुसला अगम्य बराच घाबरलेला दिसत होता. दहा मिनिटांनी तो नॉर्मल झाला. अभिज्ञा त्याचा हात हातात घेऊन बसली होती. तिने अगम्यला काळजीने विचारले.

अभिज्ञा,“ पुन्हा तो राक्षस आला होता का अमू स्वप्नात आता तुला कसं वाटतय?”

अगम्य,“ मी  ठीक आहे!” असं म्हणून तो अभिज्ञाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. 

           अचानक आज अहिल्याबाईंनी सांगितलेली गोष्ट अभिज्ञाच्या लक्षात आली की अगम्यला बारा ते तीन या वेळेत झोपू द्यायचे नाही.  तिने   घड्याळात पाहिले  तर एक वाजल्या होत्या. ती अगम्यला म्हणाली.

अभिज्ञा,“ अमू तू झोपण्या आधी काही तरी म्हणत होतास!” 


 

अगम्य,“ मी काय म्हणालो?” तो तिचा हात धरून म्हणाला.

अभिज्ञा,“ तुला काही तरी हवं होतं ना?” ती सुचकपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली.

अगम्य,“ अच्छा! उगीचच फाजीलपणा बंद कर अभी मला माहित आहे तुला आऊचे बोलणे आठवले असेल की मला बारा ते तीन झोपू द्यायचे नाही म्हणून तुझं हे चालले आहे ना? पण मी झोपू नये म्हणून मनात नसताना तुला असं काही तरी करायची आता ही गरज नाही आणि या पुढे ही नाही! समजलं तुला आणि झोप आता कारण सूर्यकांत माझ्या स्वप्नात एकदाच  येऊ शकतो आणि तो येऊन गेला आहे.आता तो परत नाही येणार मला त्रास होऊ नये म्हणून तू स्वतःच्या मना विरुद्ध काही ही केलेले मला चालणार नाही!” तो उठून बसत  गंभीरपणे बोलत होता.

अभिज्ञा,“ असा कसा रे तू? स्वतःला इतका त्रास होत असताना दोन वर्षे एकट्याने निमूटपणे तू सगळं सहन केलास! आता ही तुला स्वतः पेक्षा माझा विचार! माणसाने कधी तरी स्वार्थी व्हावं की!” ती त्याचा हात धरून त्याच्याकडे पाहत म्हणाली.

अगम्य,“असाच आहे मी! झोपुयात का आता मग?” त्याने तिला हसून पाहत विचारले.

अभिज्ञा,“ हुंम झोपा! अगम्य I am so lucky to have you!”ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली.

अगम्य,“ I am also lucky!” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला.

                            प्रेम प्रेम म्हणजे तरी असं काय असत जगा वेगळं?एकमेकांच्या भावना जपत आणि एकमेकांना जपत जगणं म्हणजे  प्रेमच ना! एकमेकांच्या  सुखासाठी काही ही करायला तयार असणे म्हणजे प्रेम! प्रेम म्हणजे निस्वार्थ आणि निर्मळ भावना! जे अगम्य आणि अभिज्ञा एकमेकांवर करत होते. एकमेकांसाठी करत होते तेच तर प्रेम आहे.


 

           सूर्यकांत आता कोणत्या नवीन रुपात येणार होता? अहिल्याबाईंना बाबांनी कोणता उपाय सांगितला असेल? पेंटिंग जाळण्यात काय चूक झाली होती की ज्यामुळे सूर्यकांत चे अस्तित्व अजून टिकून होते?अगम्य आणि अभिज्ञा आता या सगळ्या गोष्टींचा सामना कसा करणार होते?


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini(Asmita) chougule
























 




 

🎭 Series Post

View all