अभीज्ञा रूम मध्ये आली तर अगम्य बेडला टेकून बसला होता.तो तिचीच वाट पाहत होता.अभीज्ञाने त्याला पाहिले आणि म्हणाली.
अभीज्ञा,“ हे काय तू अजून जागाच का?मला वाटलं झोपला असशील!” ती बेडवर बसत म्हणाली.
अगम्य,“ तुझीच वाट पाहत होतो आणि अदु झोपला का?” त्याने विचारले.
अभीज्ञा, “नाही ना! अजून जागाच आहे मी चल म्हणाले आऊला झोपू दे तर नाही म्हणाला मला! ” ती म्हणाली.
अगम्य,“ अग मग आणायच ना त्याला उचलून आऊ थकली असेल की आधीच किती लांबून प्रवास करून आली आणि आल्या आल्या हे सगळं!” तो काळजीने म्हणाला.
अभीज्ञा,“ हो मी आणत होते त्याला पण आऊ म्हणाल्या की माझ्या आमुचे बाल हट्ट नाही पुरे करता आले कमीत कमी याचे तरी करू दे आणि अदु ही बिलगला त्यांना मग मी काय बोलणार आता!” ती म्हणाली.
अगम्य,“आऊ पण ना कधी कधी जास्तच करते!”तो हसून म्हणाला.
अभिज्ञा,“ अरे अमू हे तर काहीच नाही! आऊ आज तुझ्या फोटोंवर प्रेमाने हात फिरवत होत्या!” ती म्हणाली.
अगम्य,“काय मला बोलवायचे ना मग!”तो आश्चर्याने म्हणाला.
अभिज्ञा,“ मी म्हणाले ना तुला बोलावते तर मला म्हणाल्या की नको त्याला आराम करू दे! मला विचारत होत्या तू आधी असाच हट्टी आणि हेकेखोर होतास का?” ती हसून म्हणाली.
अगम्य,“ अच्छा मग तू काय म्हणालीस?” त्याने उत्सुकतेने विचारले.
अभिज्ञा,“ मी सांगितले की तू हेकेखोर होता पण हट्टी नव्हतास तू या तीन वर्षात झालास हट्टी!” ती म्हणाली.
अगम्य,“ खरं आहे अभी मी हेकेखोर होतो पण हट्टी नव्हतो. कारण हट्ट कुणाकडे करणार ना? कळायला लागलं तस मी अनाथ आहे म्हणजेच आपल्याला आई-बाप कोणी नाही हे समजले! मग जे समोर येईल ते खायचे ना कोणती आवड ना निवड कपडे ही तसेच कोणी जुने आणून देई तर कोणी नवीन आणून देई! कधी कोणा बड्या माणसाच्या मुलाचा वाढदिवस असेल तर तो चांगले जेवण द्यायचा!आऊ वर्षातून एकदा यायची माझ्यासाठी त्याच बरोबर सगळ्याच मुलांना कपडे आणि जेवण वगैरे असायचे त्या दिवशी; पण हा विचार ही मनाला कधी शिवला नाही की ती माझाच वाढदिवस साजरा करायला येत असेल! अठरा वर्षे पूर्ण झाले आणि बारावी ही मग राहुल आणि मी आश्रमातून बाहेर पडलो. काम करत शिकलो आणि तू भेटलीस तुझ्या येण्याने माझे आयुष्यच बदलून गेले. माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. तुझ्यात मला बायको, मैत्रीण तुझ्या आई-बाबांमध्ये आई-बाबा मिळाले पण तरी हट्ट असा नाही केला कधी पण आऊ आली आणि माझे आयुष्यच बदलले. मला हट्ट करायला हक्काची आई मिळाली म्हणून करतो हट्ट तिच्या जवळ ती असली आसपास की बेफिकीर असतो मी! आयुष्यात कधीच विचार केला नव्हता इतकं प्रेम आणि ऐश्वर्य दिल तिने!” तो डोळे पुसत म्हणाला.
अभिज्ञा,“हुंम! पण आज भलत्याच चिडल्या होत्या मी घाबरले होते खरं तर आऊचा अवतार बघून पण तू केलंस हँडल सगळं!” ती निश्वास सोडत म्हणाली.
अगम्य,“ बरं झोप आता आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता.” तो म्हणाला.
अभिज्ञा,“ थांब जरा मला तुझ्याशी बोलायचे आहे!” ती गंभीरपणे म्हणाली.
अगम्य,“ बोला मॅडम!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.
अभिज्ञा,“ झालं तुझं सुरू परत तू कधी सिरीयस होणार रे!”ती त्याला बिलगत म्हणाली.
अगम्य,“ बोल मी सिरिअसच आहे!” तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला.
अभिज्ञा,“ तुझ्या कडून मला एक प्रॉमिस हवे!” ती त्याचा हात धरत म्हणाली.
अगम्य,“ प्रॉमिस ते आणि कसलं?” तो हसून म्हणाला.
अभिज्ञा,“ तू मला कधीच सोडून जाणार नाहीस!” ती आवंढा गिळत म्हणाली.
अगम्य,“ आता हे काय नवीन ग मी तुला सोडून कुठे जाणार! वेड्यासारखं काही तरी! आणि तूच मला सोडून निघाली होतीस आठव जरा!” तो नाराजीने हात काढून घेत म्हणाला.
अभिज्ञा,“ त्याची चांगली सहा दिवस मला रडवून तू शिक्षा दिलीस की! आता नाही करणार तसला मूर्खपणा तू किती ही जा म्हणालास तरी! मला तुझ्याकडून आश्वासन हवं की काही झालं तरी तू मला सोडून कधीच जाणार नाही अमू मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय I love you!” ती त्याला बिलगून बोलत होती.
अगम्य,“ अच्छा म्हणजे मी तुला रडवले का सहा दिवस!बरं मी तुला प्रॉमिस करतो नाही जाणार तुला सोडून कुठे ही आता झालं समाधान! आणि तुझं जस माझ्यावर प्रेम आहे माझं ही आहेच की तुझ्यावर मी ही नाही राहू शकत तुझ्या शिवाय!बरं झोपायचं का आता उद्या बरीच काम आहेत!” तो ती तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
अभिज्ञा,“ अच्छा तर तुला झोपायचं आहे! पण मला तर…” ती खट्याळ हसून म्हणाली.
अगम्य,“ हुंम! म्हणजे आज मॅडमचा मूड वेगळाच आहे तर!” तो सुचकपणे पाहत म्हणाला.
अभिज्ञा,“ उगीच ना मनाचे मांडे नको खावूस! मला म्हणायचं होत की थोडावेळ बस ना निवांत! आज खूप काही घडले आहे खूप जास्त स्ट्रेस आला आहे मला आणि उद्या आऊ काय सांगणार याच टेन्शन ही so I want spend some time with you!” ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली.
अगम्य,“अच्छा मग यात मनाचे मांडे मी काय खाल्ले ग?” तो हसून म्हणाला.
अभिज्ञाला जाग आली तेंव्हा ती नेहमी प्रमाणे अगम्यच्या बाहुपाशात होती. अगम्य अजून उठला नव्हता. तिने घड्याळ पाहिले तर आठ वाजून गेल्या होत्या. ती अलगद उठली आणि आवरून खाली निघून गेली तर अहिल्याबाई चहा पीत बसल्या होत्या. त्यांना पाहून अभिज्ञा म्हणाली.
अभिज्ञा,“ good morning आऊ!” ती हसूण म्हणाली.
अहिल्याबाई,“ good morning! अभी अगम्य कुठे आहे अजून उठला नाही का ग?” त्यांनी विचारलं.
अभिज्ञा,“ नाही उठला तो आऊ अजून! मी ही नाही उठवलं त्याला झोप नाही झाली तर तो लहान मुला सारखा चिडचिड करतो उगीच! आणि काल जे काही झालं रादर आम्ही जे काही केलं त्याचा सगळ्यात जास्त स्ट्रेस त्याला आला होता म्हणून म्हणलं झोपू द्यावं त्याला अजून!” ती काळजीने बोलत होती.
अहिल्याबाई,“ तुम्ही दोघांनी काल जे नसत धाडस केले ना अभी ते मला अजिबात पटलेलं नाही खरं तर मी त्यामुळे तुमच्याशी बोलणारच नव्हते पण अमू एक नंबर हेकेखोर आहे आणि हट्टी ही मी जर नसते काल दार उघडले तर त्याने खरंच स्वतःला कोंडून घेतलं असत. मागचा अनुभव आहेच गाठीशी म्हणा! दिवसेंदिवस हा हट्टी होत चालला आहे” त्या नाराजीने बोलत होत्या आणि अगम्यने त्यांना मागून येऊन मिठी मारली आणि बोलू लागला.
अगम्य,“ काय सकाळ सकाळ हमारी तारीफो के पूल बांधे जा रहे हैं!” तो हसून दोन्ही हात अहिल्याबाईंच्या गळ्यात गुंफून बोलत होता.
अहिल्याबाई,“ आलास? आणि बिन अंघोळ करताच आलास वाटतं? बरे माझ्या राजकुमाराचे डोळे उघडले आज बिना बेड टीचे!” त्या मिश्कीलपणे म्हणाल्या.
अगम्य,“ काय करणार आजकाल कोणी आम्हाला बेड टीच आणून देत नाही मग आलो मीच म्हणलं चहा घ्यावा आणि मग आवरावे!” तो अभिज्ञाकडे तिरकस पाहत म्हणाला आणि अभिज्ञाने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले ते पाहून अहिल्याबाई म्हणाल्या.
अहिल्याबाई,“ जा बाई अभिज्ञा याला चहा आणुन दे! नाही तर हा चहा नाही मिळाला म्हणून अजून जाऊन झोपेल याच काही सांगता येत नाही. दिवसेंदिवस हा आळशी होत चालला आहे आता खूप झाला आराम आज डॉक्टर येणार आहेत त्यांना विचारून निघा ऑफिसला आता! अगम्य तुझा ना अति लाड झालाय म्हणूनच तू मनमानी करू लागला आहेस आजकाल!” त्या नाराजीने म्हणाल्या. हे ऐकून अभिज्ञा चहा आणायला घेऊन गेली.
अगम्य,“sorry ना आऊ पण काल जे केलं ते करण गरजेचं होतं आऊ कारण काल धाडस केले नसत तर आपण आज मोकळा श्वास घेऊ शकलो नसतो.” तो खुर्चीवर बसत समजावण्याच्या सुरात म्हणाला.
अहिल्याबाई,“ अच्छा? पण जर तुम्हांला काही झालं असत तर?” त्या काळजीने म्हणाल्या.
अगम्य,“ प्लिज सोड ना आता ते सगळं आऊ! बरं मग उद्या पासून मी ऑफिस जॉईन करतो!” तो उत्साहाने म्हणाला.
अहिल्याबाई,“ हो करा ऑफिस जॉईन पण डॉक्टर काय म्हणतात काय सूचना करतात ते सगळं सांभाळून!” त्या म्हणाल्या आणि अभिज्ञाने अगम्यच्या हातात चहा देत अहिल्याबाईना विचारले.
अभिज्ञा,“ आऊ आई-बाबा आणि अदू कुठे आहेत आणि नाशिकमध्ये काय झाले?”
अहिल्याबाई,“ ते मंदिरात गेले आहेत अभी! आणि अमू तयार होऊन येऊ दे ताई-भाऊ येऊ देत अज्ञांकला शाळेत पाठवू मग आपण सविस्तर बोलू तुला तर माहीत आहे की अदू त्याच्या बापा सारखा अति हुशार आहे तो आपल्याला नीट बोलू देईल का? त्याचेच प्रश्न सुरू होतील?”त्या चहा घेत असलेल्या अगम्यकडे हसून पाहत म्हणाल्या आणि अभिज्ञा ही हसायला लागली.
अगम्य,“ मी अति हुशार का? जाऊदे करा चेष्टा गरिबाची!” तो लटक्या रागाने म्हणाला.
अहिल्याबाई,“ नाही रे बच्चा तू तर माझा कर्तृत्ववान मुलगा आहेस!” त्या अगम्यच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या.
अगम्य,“आता कसं बरं वाटलं!” तो त्यांच्या कुशीत शिरत म्हणाला.
अहिल्याबाई,“ जा लवकर तयार होऊन ये! नाष्टा करायला!पुरे झाले लाड!” त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अगम्यने होकारार्थी मान हलवली आणि तो निघून गेला.अभिज्ञा हे सगळं कौतुकाने फक्त पाहत होती.
अभिज्ञा,“ मी ही जाते आऊ! मला दोन फोन कॉल करायचे आहेत आणि अगम्यला काही सापडेल असे वाटत नाही!” ती हसून म्हणाली.
अहिल्याबाई,“ जा पण थांब जरा! अग राहुल आणि मीराचा काय पत्ता?मीराला आठवा महिना लागला असेल ना मी तर सातव्याच महिन्यात ये म्हणून सांगितले होते तिला डोहाळे जेवण आणि बाळंतपण इथेच झाले असते सगळे! एकटा राहून काय करणार तिथे? अमूला गोळी लागली तेंव्हा आणि तो बेशुद्ध होता ते पाच दिवस त्याचा फोन न चुकता येत होता पण आता त्याचा फोन ही बंद झाला! तुला काही माहीत आहे का त्याच्या विषयी नाही तरी मी फोन लागणारच होते आज त्याला पण आधी तुला विचारावे म्हणले!” त्या काळजीने बोलत होत्या.
अभीज्ञा,“ आऊ राहुलला मुलगी झाली आहे ज्या दिवशी आमच्यावर गोळीबार झाला त्याच दिवशी मीरा आश्रमात पाय घसरून पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिचे सी सेक्शन करावे लागले आणि तिला प्रीमॅच्युअर मुलगी झाली. बाळ चांगलं सुदृढ होत पण मीराला I.C.U.मध्ये ठेवावे लागले.त्यातच त्याला न्यूज मधून गोळीबाराची माहिती आणि अगम्य जखमी झाला ही माहिती मिळाली त्याने तेव्हाच मला फोन केला आणि सगळं सांगितलं खूप रडत होता तो इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती त्याची बिचारा! इकडे अगम्यसाठी त्याचा जीव तुटत होता आणि तिकडे मीराची काळजी पोखरत होती. तरी रोज फोन करत होता अगम्यची चौकशी करत होता.मीराला दोन दिवसात I.C.U. मधून बाहेर काढले तेंव्हा कुठे मला ही बरं वाटलं पण अगम्यसाठी त्याची काळजी त्याच्या आवाजातून दिसत होती. त्याला इतक्यात इकडे येणं शक्य ही नव्हतं कारण मीराची तब्बेत आणि प्रीमॅच्युअर बेबी! अगम्य शुद्धीवर आला तेंव्हा त्याला ही बरं वाटलं अगम्यशी बोलला ही तो! आता म्हणाला आहे पुढच्या आठवड्यात येतो म्हणून!” ती सांगत होती.
अहिल्याबाई,“ इतकं सगळं झालं आणि तू किंवा राहुलने एका शब्दांनी ही सांगितले नाही मला! हे अमुला आणि ताई-दादांना तरी माहीत आहे की नाही?” त्यांनी विचारले.
अभीज्ञा,“ अमुला माहीत नाही या बद्दल आणि तुम्हांला ही राहुलनेच सांगू नको असे सांगितले होते.आधीच आपण अमूच्या टेन्शनमध्ये होतो मग त्यात अजून भर कशाला म्हणून आणि आई-बाबांना ही माहीत नाही हे सगळं तरी मी आईला पाठवून देऊ का विचारले होते त्याला पण तोच नको म्हणाला कारण इथे अज्ञांकला सांभाळायला कोणी तरी हवं ना अस म्हणणे होते त्याचे आणि किती ही झाले तरी बिझनेसचे रोजचे व्यवहार करणे गरजेचेच आहे त्यात आपण दोघी बिझी असणार हे माहीत होतं त्यात अपघाताची अवयी उठली त्याचा काल ही फोन आला होता. प्रीमॅच्युअर बाळ आणि मीराला एकट्याने कसे हँडल केलं त्याच त्याला माहित! अगम्यला त्याने अजून तरी मला काहीच सांगू दिलं नाही फक्त मुलगी झाली हे त्यानेच सांगितले!” ती म्हणाली.
अहिल्याबाई,“ अग पण आता महिना झाला आहे की आता तरी ये म्हणावं त्याला तिथे बाळ-बाळंतिणीचे व्यवस्थित कोण करणार सगळे? राहू दे मीच फोन करून बोलते आणि कान पिळते त्याचे! आणि अगम्य पासून तू हे लपवले आहेस तो चिडणार तुझ्यावर मग बसा भांडत!” त्या काळजीने म्हणाल्या.
अभीज्ञा,“ राहुल आणि मीरा चार-पाच दिवसात येणार आहे आणि राहुलने सांगितले आहे की तो सांगेल अगम्यला आणि तुम्ही काळजी नका करू आऊ अमू जरी माझ्याशी भांडला तरी मी नाही भांडणार त्याच्याशी आता!” ती बोलत होती आणि वरून अगम्यने अभीज्ञाला हाक मारली आणि अभीज्ञा अहिल्याबाईंना मी जाते असा इशारा करून वर गेली.
अभिज्ञा बेड रूममध्ये गेली तर अगम्य तिला आरशात पाहून केस विंचरताना दिसला. तिला पाहून तो म्हणाला.
अगम्य,“अभी तुझा फोन वाजतोय पाहा कोणाचा आहे?”
अभिज्ञाने मोबाईल घेतला आणि तिने काही जुजबी बोलणे करून फोन ठेवला आणि अगम्यकडे पाहत म्हणाली.
अभिज्ञा,“ वाजत होता मोबाई तर उचलायचा ना! ऑफिस मधून फोन होता! आज येणार नसाल तर काही पेपर्सवर साह्य हव्या आहेत प्युनला पेपर्स घेऊन पाठवून देऊ का म्हणून?” ती त्याच्या जवळ जात म्हणाली.
अगम्य,“ अग तुझा मोबाई आहे मी कसा उचलणार म्हणून तुला बोलवले!” तो म्हणाला.
अभिज्ञा,“ हो का? कपडे वगैरे सापडलेले दिसतंय! मला वाटलं की त्याचसाठी बोलावले मला!” ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.
अगम्य,“ हो आता काय करणार घेतलं शोधून! सकाळी मला न उठवता मुद्दाम गेलीस ना?” तो लटक्या रागाने म्हणाला.
अभिज्ञा,“ नाही रे तू गाढ झोपला होतास आणि काल तुला ही खूप स्ट्रेस आला होता म्हणून नाही उठवले म्हणलं झोपू द्यावं आणि मी येणारच होते चहा घेऊन पण तूच आलास खाली!” ती म्हणाली.
अगम्य,“ अच्छा! बरं मग जायचं खाली?” तो हसून म्हणाली.
अभिज्ञा,“ हो चल आई-बाबा आणि आदू ही आले असतील ना!” ती वळून जात म्हणाली.
अगम्य,“ जरा थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे अभी!” तो गंभीर होत म्हणाला.
अभिज्ञा,“ बोल ना!” ती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
अगम्य,“ अभी काल काय झालं होतं काय सारखी प्रॉमिस मागत असतेस ग? अग मी कुठे जाणार तुम्हाला सोडून आणि तुम्हा सगळ्यांना जशी माझी गरज आहे तशी मला ही तुमची गरज आहेच की! मग हे असं काय असत ग तुझं! मी काल नाही बोललो काही कारण तुझी मनःस्थिती ठीक नव्हती!” तो नाराजीने बोलत होता.
अभिज्ञा,“ अगम्य मला खूप भीती वाटते आहे तुला गमावण्याची खास करून तुला त्या अवस्थेत पहिल्या पासून तू नाही समजू शकत काही गोष्टी? मी तुला प्रॉमिस मागितलं तू मला तुझ्या मनाने सोडून जाशील म्हणून नाही तर मला भीती वाटते तुला काही झालं तर आता ही आऊ काय सांगणार आहेत अजून आपल्याला कोणत्या नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे याचा विचार करून माझं डोकं सुन्न होत!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.
अगम्य,“ वेडी आहेस का अभी तू? अग काही नाही होणार प्रत्येक गोष्टीला तोडगा असतो अभिज्ञा तसा याही गोष्टीला असणार आणि काय माहीत तू जितकं हे भयंकर समजतेस तितकं नसेल ही कारण मला स्वप्न पडतात अभिज्ञा आणि स्वप्न ही खरी नसतात हे तुला ही माहीत आहे!” तो तिचे डोळे पुसत समजावत म्हणाला.
अभिज्ञा,“ हुंम! बरं तुझी जखम कशी आहे?” तिने त्याचा दंड पाहत विचारले.
अगम्य,“ मला वाटत जखम पूर्ण बरी झाली आहे कारण आता मला इतकस दुखत नाही! आज डॉक्टर सांगतील की आणि!” तो म्हणाला.
अभीज्ञा,“हो बरं चल नाही तर आऊ ओरडतील!” ती हसूण म्हणाली.
दोघे ही खाली आले तर अज्ञांक अभीज्ञाला येऊन बिलगला.अभीज्ञाचे आई-बाबा आणि अहिल्याबाई सगळे डायनिंग टेबलावर त्या दोघांची वाटच पाहत होते.सगळ्यांनी नाष्टा केला.अभीज्ञाने अज्ञांकला तयार करून शाळेत पाठवून दिले आणि अकरा वाजता सगळ्यांची सभा हॉलमध्ये बसली.अभीज्ञा आणि अगम्यचे लक्ष आता अहिल्याबाई काय बोलतात या कडे लागले होते.अहिल्याबाई मात्र चिंताक्रांत दिसत होत्या.शेवटी अगम्यनेच न राहवून विचारले.
अगम्य,“ आऊ काय झाले ग नाशिकमध्ये ते अघोरी बाबा भेटले का?”
अहिल्याबाई,“ नाही रे त्यांचा खूप शोध घेतला ते ज्या नेहमीच्या स्मशानात असत तिथे पाहिले मंदिराचा आवर खूप शोध घेतला त्यांचा दोन दिवस पण ते कुठेच सापडले नाहीत.तिथे लोकांकडे चौकशी केली तर ते हिमालयत गेले आहेत असं कळले मग निराश होऊन आम्ही तिसऱ्या दिवशी मंदिरातुन महादेवाचे दर्शन करून निघालो तर मंदिराच्या आवारात एक भगवी कफनी घातलेल्या बाबांनी आम्हाला अडवले व ते बोलू लागले.
बाबा,“ तुम जिसे ढूढ़ रही हो ओ यहाँ मैजूद नहीं हैं लेकिन उसने मुझे तुम्हारी समस्याओं का समधान बताने के लिए भेजा हैं। तुम्हरे बेटे के सपने जो शैतान आता हैं जिसका मुकाबला तुम्हारा बेटा अगम्य एक बार कर चुका हैं वो तुम्हारी एक गलती के कारण फिर से वापस आने वाला हैं वो भी पहले से ज्यादा ताक़दवर बनकर (आम्हाला आश्चर्यकचकित झालेले पाहून ते पुढे हसून म्हणाले) इस तरह अचरज से मत देखो मुझे उसी अघोरिने तुम्हारे पास भेजा हैं जिसने ये कहानी सुरु की थी। उसीने मुझे आंतरिक लहरों से संदेश भेजे हैं मेरे साथ चलो मैं सब कुछ बता हूँ।(अस म्हणून त्यांनी आम्हाला एका आश्रमात नेले)
तुम्हारे बेटे के स्वप्न में आकर वो उसे रोज डरता हैं। मैं सही कह रहा हूँ ना?” त्यांनी विचारले.
अहिल्याबाई,“ हो बाबा तो दोन वर्षांपासून माझ्या मुलाला त्रास देतो आहे. आता तो म्हणतोय की तो परत येणार आहे! तो खरंच येणार आहे का परत पण कसा? आमच्या कडून काय चुकलं आहे त्यामुळे सूर्यकांतची आत्मा मुक्त नाही झाली अजून?” त्यांनी काळजीने विचारले.
बाबा,“ तो तुझ्या मुलाच्या स्वप्नात येऊन त्याला का घाबरवतो त्रास देतो माहीत आहे का तुला कारण तो स्वप्न लोकांच्या माध्यमातून तुझ्या मुलाला त्रास देऊन तो आगम्यची ऊर्जा शोषतो आणि त्यातून तो स्वतःची ऊर्जा वाढवत आहे तो दिवसेंदिवस शक्तिशाली होत आहे आणि तुझा मुलगा अगम्य शक्तीहीन कारण दोन वर्षांपासून त्याची धर्म पत्नी त्याच्या बरोबर नाही तो एकटाच त्या आत्म्याला तोंड देत आहे जर ती किंवा तू त्याच्या बरोबर असतात तर तो आत्मा असं करू शकला नसता कारण पुरुषाची शक्ती ही स्त्री आहे. पण ती शक्ती अगम्य बरोबर नव्हती त्यामुळे सूर्यकांतचा आत्मा त्याच्या ऊर्जेचे शोषण करू शकला आहे.अगम्य आतून पोखरला गेला आहे तो वरून जरी धडधाकट दिसत असला तरी तो आतून त्याची ऊर्जा गमावून बसला आहे!” ते गंभीरपणे म्हणाले.
अहिल्याबाईंच्या तोंडून हे ऐकून अभीज्ञा मात्र अपराधीपणे त्यांना मध्येच थांबवत बोलू लागली.
अभीज्ञा,“ खरच आऊ मी खूप मोठी चूक केली अगम्यला या दोन वर्षात एकट सोडून जर मी त्याच्या बरोबर असते तर सूर्यकांतने इतक्या लवकर डोके वर काढले नसते आणि तो पूर्वी पेक्षा जास्त शक्तीने पुन्हा आला नसता. माझे खरंच चुकलं पण आता त्याची काय शिक्षा मिळणार आहे देवच जाणे!” ती म्हणाली.
अहिल्याबाई,“ तुझी चूक जितकी आहे तितकीच माझी ही आहे अभी एक तर मी तुला तेंव्हाच घरी आणायला हवे होते किंवा मग मी तरी अगम्य बरोबर राहायला हवे होते त्या काळात पण पेंटिंग जाळल्यामुळे मी इतकी बेफिकीर झाले की माझ्याच मुलाकडे लक्ष दिले नाही!तुझ्या पेक्षा ही घोड चूक मी केली आहे अभी!”त्या अपराधीपणे म्हणाल्या ते पाहून अगम्य चिडला आणि म्हणाला.
अगम्य,“ झाले तुमच्या दोघींच परत सुरू? तुमचा ब्लेम गेम आणि रडारड झाली की मग बोलावा मला! एक तर तुमच्या दोघीची ही यात काहीच चूक नाही एकट राहण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता आणि जे काही झाले किंवा होईल त्याला पूर्णपणे जबाबदार मी आहे!” तो चिडून बोलत होता.
अभीज्ञा,“ नाही अगम्य मी कायमच चुकले तेंव्हा ही माझा इगो मोठा करून मी निघून गेले आणि आता ही तेच करत होते मी! तुला काही झाले असते तर? या विचारणानेच मला पिसे लागते.खूप मोठी चूक झाली माझी!” ती डोळ्यात पाणी आणून बोलत होती.
अगम्य,“ समज मी मेलोच असतो तर? माणूस आहे तो पर्यंत नाती असतात पण माणूस एकदा निघून गेला की मागची माणसे हळूहळू का होईना सावरतात आणि त्या माणसा शिवाय जगायला शिकतात अभीज्ञा!कटू असलं तरी सत्य आहे हे! उगीच रडारड करणं बंद करा” तो रागाने म्हणाला.
अहिल्याबाई,“ थोबाड फोडीन आ अगम्य तुझे असं काही अभद्र बोललास तर तुला काय माहीत रे आपल्या माणसाला गमावण्याचे दुःख काय असते!” त्या तावातावाने बोलत होत्या वातावरण तापलेले पाहून अभीज्ञाच्या आईमध्येच म्हणाल्या.
आई,“ ताई तूर्त आपण इथेच थांबू घड्याळ बघा एक वाजून गेले आहेत! जेवण करू आणि मग पुढचे सांगा काय ते!” त्या सौम्य आवाजात म्हणाल्या आणि सगळे जेवायला गेले.
कधी कधी एखाद्या माणसाची अति काळजी कोणी करत असेल किंवा अति प्रेम करत असेल तर ज्या व्यक्तीची काळजी केली जाते किंवा अति प्रेम ज्या व्यक्तीवर केले जाते त्याचा मात्र भावनिक आणि मानसिक कोंडमारा होतो. आता तसेच काही अगम्य बाबत घडत होते अभीज्ञा आणि अहिल्याबाई त्याच्या आयुष्यतील अति महत्वाच्या दोन स्त्रिया त्याची अति काळजी करत होत्या आणि त्याच्यावर अति प्रेम करत होत्या त्यामुळे अगम्यचा कोंडमारा होत होता आणि त्यामुळे तो चिडला होता.
सूर्यकांत अजून कोणत्या नवीन रुपात आता अगम्य समोर येणार होता?अहिल्याबाई पुढे काय सांगणार होत्या?कोणत्या नवीन संकटाचा सामना आता अगम्य आणि त्याच्या कुटूंबाला करावा लागणार होता?
या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.
©swamini(Asmita) chougule
Sorry for late! दिवाळी आणि माझ्या काही व्यक्तीगत कारणा मुळे पुढचा पार्ट लिहायला उशीर झाला. इथून पुढे दोन ते तीन दिवसातून पुढचे पार्ट येत राहतील.लवकरच भेटू पुढच्या भागात आपल्या लाडक्या अगम्य आणि अभीज्ञा सोबत एका नव्या अडव्हेंचर बरोबर!