Login

दि लूप होल (भाग 36)

This is thriller and suspense story

     डॉक्टर पाटलांनी अगम्यला तिथेच चेक केले आणि सगळ्यांच्या मदतीने त्याला उचलून बेडरूममध्ये नेले. त्यांनी अभीज्ञा सोडून सगळ्यांना बाहेरच थांबायला सांगितले. अभीज्ञा रडतच अगम्यचा हात धरून त्याच्या जवळ बसली होती. डॉक्टरांनी अगम्यचा रक्ताने भिजलेला शर्ट अलगद कापून काढला त्याची खांद्यावरची जखम आता दिसू लागली. अगम्यच्या डाव्या खांद्याला एखादी भेग पडावी अशी मोठी जखम होती. खांद्यावरचे त्या ठिकाणचे  मास कुठे तरी गायब होते आणि तिथून रक्त पाझरत होते.अभीज्ञाने ती जखम पाहिली आणि ती जवळजवळ ओरडली तिने तोंड फिरवून घेतले.


        डॉक्टरांनी त्यांची ब्रिफकेस उघडली आणि  अभीज्ञाला अगम्यला धरायला सांगून त्यांनी त्या जखमेला साफ करून स्टीचेस घालायला सुरवात केली.  तशी बेशुद्ध असलेल्या अगम्यची हालचाल सुरू झाली. अभीज्ञाचा हात त्याने घट्ट पकडला होता. त्याच्या बंद डोळ्यातून पाणी वाहत होते. अभीज्ञा रडतच त्याचे डोळे पुसत होती. डॉक्टरांनी स्टीचेस घालून जखमेला पट्टी बांधली व अगम्यचा हाताची हालचाल होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात बांधला. डोक्याच्या जखमेला ही पट्टी बांधली. तो पर्यंत अगम्यला ताप ही भरला होता. ताप ही खूप जास्त होता. डॉक्टरांनी फोन केला आणि थोड्याच वेळात एक नर्स व वार्डबॉय सलाईन स्टँड तसेच खूप सारी औषधे घेऊन हजर झाले.डॉक्टरांनी सलाईन अगम्यला लावली आणि काही इन्स्ट्रक्शन्स नर्सला दिल्या आणि इशाऱ्यानेच अभीज्ञाला बाहेर ये असे सांगितले. हे सगळं होई पर्यंत बाहेर सगळे टेन्शनमध्ये डॉक्टरची वाट पाहत होते. नर्स आणि वार्डबॉयला सामान घेऊन आलेले पाहून सगळ्यांना कळून चुकले होते की मामला गंभीर आहे त्यामुळे सगळे आणखीनच काळजीत पडले होते. डॉक्टर अभीज्ञा बरोबर बाहेर आले. तसे सगळे त्यांच्या भोवती जमा झाले.सगळ्यांच्या नजरेतील प्रश्न पाहून डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली.


डॉक्टर,“ मला तुमच्या नजरेतील काळजी कळत आहे. खरं सांगायचं तर अगम्यची अवस्था ठीक नाही.त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि डोक्याला ही! त्याचा परिणाम म्हणून त्याला खूप जास्त ताप आला आहे आणि असं वाटत की तो खूप जास्त थकला आहे. रक्त ही बरच गेलं आहे आणि  सगळ्यात काळजीची गोष्ट म्हणजे तो बेशुद्ध आहे. जर त्याला उद्या दुपारी दोन पर्यंत शुद्ध नाही आली म्हणजेच तो बारा घंट्यांपेक्षा जास्त वेळ बेशुद्ध राहिला तर तो क्रिटिकल होईल आणि आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल. अभीज्ञा मी नर्सला सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. ती रात्र भर तुमच्या बरोबर राहील आणि अगम्यच्या तब्बेतीची माहिती मला कळत राहील. तू अगम्यच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेव कारण त्याचा ताप उतरण गरजेचं आहे आणि हो तो शुद्धीवर आला की मला कळव किती वाजले याचा विचार न करता! मी लगेच येईन! मला आता निघाव लागेल कारण मी काल दुपार पासून इथेच आहे.मला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. Please take care of him!”असं म्हणून डॉ.पाटील निघून गेले.


 हे सर्व ऐकून सगळे स्तब्ध होते.   डॉक्टरांकडून हे ऐकून अहिल्याबाईंचा धीर सुटला.त्या अभीज्ञाला मिठी मारून रडत बोलू लागल्या.


अहिल्याबाई,“ कशाची शिक्षा भोगतंय माझं लेकरू! आई असून आणि इतक्या मोठ्या इस्टेटीचा एकुलता एक वारस असून माझ्या लेकराने  अनाथ म्हणून आयुष्य जगले. त्याला ना बापाचे प्रेम मिळले! ना आईचे! ना हक्काचे घर! चुकला चूक म्हणणे गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणणे इतके मोठे पाप आहे का? की त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याने तर भोगलीच पण माझ्या लेकाच्या ही वाटल्या आली. इतकं करून ही सुर्यकांतने माझ्या लेकरावर वार केलाच! जाता जाता ही तो  माझ्या अमुला मृत्यूच्या दारात लोटून गेला! त्याला काय झालं तर मी नाही जगू शकणार अभीज्ञा! आत्ता पर्यंत अमूच्या सुरक्षिततेसाठी मी त्याला स्वतः पासून लांब ठेवलं. कोणता ही गुन्हा न करता त्याने आजपर्यंत शिक्षा भोगलीच की! इतकं करून मी त्याला आता नाही गमवू शकत!” असं म्हणून त्या हुंदके देत होत्या.


        खरं तर अगम्यची अवस्था आणि ती जखम पाहून अभीज्ञा ही आतून खूप घाबरली होती पण आत्ता जर ती खचली तर  अहिल्याबाईना धीर कोण देणार म्हणून ती त्यांचे डोळे पुसत त्यांना म्हणाली.


अभीज्ञा,“ आऊ माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? मग माझं ऐका अगम्यला काही नाही होणार तो या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडेल! चला त्याला पाहा त्याला पाहून तुम्हांला ही बरं वाटेल”असं म्हणून तिने अहिल्याबाईना बेडरूममध्ये नेले.


      अहिल्याबाईनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्या बराच वेळ त्याचा उष्ण हात हातात धरून बसल्या होत्या. अगम्य मात्र तापाने भाजत होता. अभीज्ञा गार पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवत होती. हे सगळं होई पर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. बाकी सगळ्यांनी ही अगम्यला पाहिले आणि सगळे हॉलमध्ये जाऊन बसले.अहिल्याबाई मात्र अजून तेथेच होत्या अभीज्ञा अहिल्याबाईना म्हणाली.


अभीज्ञा,“ आऊ तुम्ही जाऊन झोपा काल रात्री ही तुम्ही झोपलेल्या दिसत नाही. अगम्यला शुद्ध आल्यावर मी बोलवेण तुम्हाला!” ती काळजीने म्हणाली.


अहिल्याबाई,“ अगम्य उठल्याशिवाय मला झोप कशी येईल अभी? मी बाहेर बसते.तो उठला की हाक मार मला” असं म्हणून त्या हॉलमध्ये जाऊन बसल्या आणि जपमाळ ओढू लागलेल्या.प्रत्येक जण अगम्यसाठी प्रार्थना करत होते. 


      पण दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून गेल्या तरी अगम्य डोळे उघडत नव्हता.सगळ्यांचा जीव टांगलीला लागला होता.अभीज्ञाचा ही आता धीर खचत चालला होता.या सगळ्यात एकच गोष्ट दिलासा देणारी होती ती म्हणजे अगम्यचा ताप थोडासा उतरला होता.  पण तो एक वाजून गेला तरी शुद्धीवर आला नव्हता. डॉ.पाटलांनी अगम्यला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी आता केली होती. ते दोन वाजण्याची वाट पाहत होते. सगळेच आता चिंतेत होते. अभीज्ञा अश्रू ढाळत अगम्यकडे पाहत उदास बसली होती. आता पुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार करून तिच्या अंगावर काटा येत होता. अगम्यला गमावण्याची भीती तिच्या मनात आता घर करत होती.अहिल्याबाई आणि बाकीच्यांची अवस्था ही वेगळी नव्हती. अभीज्ञा अगम्यच्या कपाळावरची गार पाण्याची पट्टी बदलत होती. तर अगम्यने तिचा हात अचानकपणे धरला. अभीज्ञाने चमकून पाहिले तर अगम्य डोळे उघडून किलकिल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. अभीज्ञाने डोळे पुसले आणि नर्सला ती म्हणाली.


अभीज्ञा,“ नर्स डॉक्टरांना फोन करा.अगम्य शुद्धीवर  आला.” 


       अगम्य  अभीज्ञाकडे पाहून तुटक तुटक बोलत होता.

अगम्य,“ सगळे कुठे?...” तो म्हणाला.


अभीज्ञा,“आहेत सगळे बाहेर आहेत.तू बोलू नकोस शांत राहा!” ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.


        डॉक्टर पाटलांना नर्सने बाहेर जाऊन फोन केला आणि अगम्य शुद्धीवर आल्याचे सगळ्यांना सांगितले. सगळ्यांचा जीव हे ऐकून भांड्यात पडला. डॉक्टर पाटील ताबडतोब घरी आले.आगम्यला त्यांनी तपासत विचारले.


डॉ.पाटील,“ how are you feeling now young man?”


अगम्य,“better! पण खांदा खूप दुखतोय डॉक्टर!” तो हळू आवाजात म्हणाला.


डॉ. पाटील,“ हुंम! आता युद्ध करायचं आणि ते जिंकायचे म्हणाल्यावर जखमा तर होणारच आणि त्या दुःखणारच ना!पण अगम्य मानलं तुला खूप brev आहेस तू! बरं आरामकर आता!” ते गंभीरपणे म्हणाले. नर्सला काही सूचना करून डॉक्टर बाहेर आले. अभीज्ञा ही त्यांच्या मागे गेली.


 सगळे डॉक्टरांची वाट पाहत होते. अभीज्ञाच्या आईने डॉक्टरांना विचारले.


आई,“डॉक्टर अगम्य कसा आहे आता?”त्या काळजीने म्हणाल्या


डॉ.पाटील,“ don't worry! He is out of danger now! आता काळजी करण्याचे काही कारण नाही पण काळजी मात्र घ्यावी लागेल अगम्यची! तुम्ही सगळे भेटू शकता त्याला! तो थकव्यामुळे दोन-तीन दिवस सतत झोपेल तर घाबरू नका आणि अभीज्ञा जरी तो झोपला तरी त्याला वेळेवर उठून खायला आणि औषधे दे आज सलाईन काढू आपण त्याची संध्याकाळ पर्यंत!आणि हो त्याला पेंटींगमध्ये काय झाले ते कोणीच कमीत कमी काही दिवस तरी विचारू नका!मी दिवसातून एकदा तपासून जाईन त्याला!”  ते बोलले.


     अहिल्याबाई अगम्य जवळ गेल्या. त्यांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला त्या स्पर्शाने अगम्यने डोळे उघडले. अहिल्याबाई बोलू लागलेल्या


अहिल्याबाई,“ कसं वाटतंय बाळा तुला आता?”


अगम्य,“ मी ठीक आहे आऊ!” तो नकळतपणे बोलून गेला.

 

         तो त्यांना आऊ  बोलला हे अहिल्याबाईच्या लक्षात आले.त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. अगम्यने त्यांचा हात धरून  पुन्हा म्हणाला.


अगम्य,“ रडू नकोस आऊ! त्या पेंटिंगचे काय झाले?” त्याने विचारले.


अहिल्याबाई,“ ती पेंटिंग संपली आणि आपल्या मागचे दुष्टचक्र ही! तू फक्त आरामकर!कोणताच विचार नको करून बाळा!” त्या काळजीने बोलत होत्या.


         अगम्य नुसतेच हुंम म्हणाला. अहिल्याबाई बाहेर गेल्या.अभीज्ञाचे आई-बाबा, राहुल आणि मीरा अगम्यला भेटले. पुढचे तीन दिवस अगम्य फक्त झोपून होता. त्याला कशाचीच शुद्ध नव्हती डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे अभीज्ञा त्याला बळेच उठवून खायला घालत होती.चौथ्या दिवशी सकाळी अभीज्ञा त्याच्यासाठी नाष्टा घेऊन गेली तर  अगम्य स्वतःच उठून बसलेला अभीज्ञाला दिसला. अभीज्ञा फक्त आनंदाने नाचायचीच राहिली होती. अगम्यने तिच्या हातात नाष्टा पाहिला आणि तो तिला म्हणाला.


अगम्य,“ काय मॅडम विसरलात की काय? मला बेड टी लागतो! बेड ब्रेकफास्ट नाही!” तो हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ थांब घेऊन येते चहा!” नाष्ट्याची प्लेट टेबलावर ठेवत हसून म्हणाला आणि पुन्हा किचनकडे निघाली.


       अगम्य आज बराच फ्रेश दिसत होता.नाही तर गेल्या तीन दिवसांपासून तो फक्त  मलूल होऊन झोपून होता आणि त्यामुळे सगळे घर ही मरगळले होते. कोणी कोणाशी नीट बोलत नव्हते की खात-पित नव्हते. त्याची काळजी प्रत्येकाला लागून राहिली होती.आता पुन्हा सगळे फ्रेश आणि प्रफुल्लित होणार! या विचारातच अभीज्ञा किचनमध्ये पोहोचली. अभीज्ञाला असे लगेच माघारी आलेले पाहून अभीज्ञाच्या आईने तिला विचारले.अहिल्याबाई ही तिथेच होत्या.


आई,“ काय झालं अभी लगेच माघारी आलीस ती?अगम्य उठत  नाही का?” त्यांनी काळजीने विचारले.


अभीज्ञा,“ अग आई अगम्य स्वतःच उठून बसलाय आणि तो आज फ्रेश वाटतोय! त्याला चहा हवा आहे म्हणून आले मी चहा  न्यायला!” ती आनंदाने म्हणाली.


अहिल्याबाई,“खरंच! देवच पावला बाई! पोराने नुसता घोर लावला होता जीवाला!जा तू लवकर चहा घेऊन!” त्या खुश होऊन म्हणाल्या.


अभीज्ञा,“ हो जाते मी पण डॉक्टर पाटलांना फोन करून सांगा आऊ हे! म्हणजे ते येऊन अमुला तपासत आणि पुढची ट्रिटमेंट ही देतील.


अहिल्याबाई,“ हो मी सांगते तू जा चहा घेऊन! नाही तर तो चिडचिड करेल उगीच!”त्या काळजीने म्हणाल्या.


    अभीज्ञा चहा घेऊन गेली आणि अगम्यच्या हातात चहा देत म्हणाली.


अभीज्ञा,“ कसं वाटतंय अगम्य तुला आता?” ती काळजीने म्हणाली.


अगम्य,“ मला बरं वाटतंय! पण मी किती दिवस झोपून होतो अभी? कारण त्या दिवशीच मला धूसर आठवत आहे!” तो म्हणाला.


अभीज्ञा,“ हे बघ तू बाकीचा विचार नको करुस आता! फक्त आरामकर!” ती काळजीने म्हणाली.


अगम्य,“ काय आरामकर आरामकर लावलय ग! मी ना कंटाळलो आहे या सगळ्याला! मी काय विचारतो त्याचे उत्तर दे आधी” अगम्य चिडून म्हणाला.


अभीज्ञा,“ मग काय म्हणू तुला? तुला माहीत तर आहे का तू पेंटींगमधून आल्यावर काय-काय झाले? तुझी अवस्था काय होती? तुला डॉक्टरांनी बारा तासांची मुदत दिली होती मुदतीवर माणूस केंव्हा असतो तुला चांगलंच माहीत आहे अगम्य! आमच्या सगळ्यांचे धाबे दणाणले होते आणि तू मस्त झोपला होतास!त्या नंतर ही गेले तीन दिवस तू नुसता झोपून होतास! तुला कशाचीच शुद्ध नव्हती  आणि आज जागा झाला आहेस की लागला चिडचिड करायला!चहा पी आणि नाष्टा करून घे!” असं म्हणून ती डोळे पुसत रागानेच जायला लागली.


अगम्य,“ पण मी नाष्टा करणार कसा एकाच हाताने? डिश कोण धरणार? एक हात गळ्यात आहे माझा” त्याने तिला विचारले.


अभीज्ञा काहीच न बोलता नाष्ट्याची प्लेट घेऊन त्याच्या समोर बेडवर बसली.अगम्य खाता खाता पुन्हा बोलू लागला.


अगम्य,“ आता असच तोंड फुगवून बसणार का? मघाशी हसत होती तसं हास की जरा!” तो खोडसाळपणे म्हणाला.


अभीज्ञा,“ मी काही कळसूत्री बाहुली नाही. तू म्हणशील तसं वागायला!खा लवर मला खूप काम आहेत. औषध देऊन जाते तुला ” ती फंनकाऱ्याने म्हणाली.


अगम्य,“ अग किती चिडशील? सॉरी!” तो वरमून म्हणाला.


अभीज्ञा,“बरं तुझा खांदा कसा आहे आता?” तिने काळजीने विचारले


अगम्य,“काय माहीत मला कुठे दिसतो ना!” तो मुद्दामच  म्हणाला.


अभीज्ञा,“ अरे मूर्खा कसा आहे म्हणजे खूप दुखतोय का?”ती हसून डोक्याला हात लावत म्हणाली.


अगम्य,“हसताना छान दिसतेस!” तो तिला हसून म्हणाला.


अभीज्ञा,“झालं का तुझं? अरे मी काय विचारले.खांदा दुखतो का खूप! अजून स्टीचेस काढायचे आहेत.खूप मोठी जखम आहे अमू आणि तुला मस्करी सुचते!” ती काळजीने म्हणाली.


अगम्य,“ दुखतोय! अजून पण लागलंय म्हणल्यावर दुःखणारच ना!” तो तोंड वाकड करत म्हणाला.


अभीज्ञा,“ हो ते तर आहेच! डॉक्टर पाटील येतील आता! तू मात्र आरामकर नाय तर!” ती धमकावत म्हणाली.


अगम्य,“ नाही तर काय?” तो तिला एका हाताने जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“असा कसा रे तू?काही झाले तरी तुझं आपलं सुरूच! But I love you!” ती त्याला बिलगत म्हणाली.


अगम्य,“ म्हणून तर मी आज इथे आहे अभी!एक वेळ अशी आली की आता मी लढू शकणार नाही असे वाटत होतं मला त्या सुर्यकांतशी! पण तुला दिलेलं प्रॉमिस आठवलं आणि पळत सुटलो! नाही तर…” तो गंभीरपणे बोलत होता. त्याला अभीज्ञाने मध्येच थांबवले आणि ती बोलू लागली.


अभीज्ञा,“ गप्प बस आणि आरामकर!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.


अगम्य,“ love you abhi! बरं अदु कुठं आहे ग? आणि आऊ आणि आई-बाबा?” तो विचारत होता.


अभीज्ञा,“ सगळे आहेत. आणि काय म्हणालास तू आऊ? अरे वा!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“आता किती दिवस उगीच फुगणार ना! आणि त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले मला की मला इथे काही झाले तर? मी तर माझ्या आईला अजून नीट स्वीकारले पण नाही. तिला बिन स्वीकारातच मी गेलो तर! म्हणून हा बदल आणि तिने शेवटी हे सगळे माझ्याच तर साठी केले ना!मी तिच्या प्रेमाला पारखा झालो तर ती ही माझ्या शिवाय राहिलीच की मग कशाची शिक्षा द्यायची तिला!” तो गंभीर होत म्हणाला.


        अभीज्ञा काहीच बोलली नाही पण तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. डॉक्टर पाटील येऊन चेकअप करून गेले 


●●●●

       त्या घटनेला ही आता तीन आठवडे होऊन गेले होते.अगम्य आता बराच सावरला होता पण रात्री तो दचकून   घामाघूम होऊन उठत होता. डॉ.पाटील यांचे असे म्हणणे होते की अगम्यने जे काही त्या पेंटींगमध्ये भयंकर भोगले त्याचे पडसाद त्याच्या मनावर कुठे तरी खोलवर उमटले आहेत आणि हा त्याचाच परिणाम आहे.फक्त त्याला शक्यतो एकट्याला रात्रीच्या वेळी सोडू नका.


            अगम्यची तब्बेत आता ठीक असल्यामुळे अहिल्याबाईनी परत गावी जाण्याच्या निर्णय घेतला होता. अभीज्ञा, तिचे आई-बाबा यांनी त्यांना इथेच राहा म्हणून किती समजावले पण त्या काही तयार होत नव्हत्या शेवटी अगम्य त्या जायची तयारी करत असताना त्यांच्या रूममध्ये गेला आणि त्यांना म्हणाला.


अगम्य,“ आऊ काय हट्ट आहे हा! जाऊ नको  ना तू गावी इथेच राहा माझ्या जवळ प्लिज! मला तुझी गरज आहे!” तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.


अहिल्याबाई,“ इथे ये अमू!( त्यांनी त्याला जवळ बोलावले.अगम्य त्यांच्या मांडीवर डोके ठेऊन झोपला) बेटा माझा पण पाय नाही निघत रे इथून तुला अभीला आणि आदुला सोडून!मला कळतंय तुझं मन पण मी रावसाहेबांना वचन दिले आहे की त्यांची धरोहर त्यांच सगळं माझ्या श्वासात श्वास असे पर्यंत आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करेन! मी येत जाईन की अधून मधून तू ही येत जा! शेवटी ते सगळं तुझंच तर आहे अमू म्हणून मला जावं लागेल.” त्या प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवत बोलत होत्या.


        अहिल्याबाई दुसऱ्या दिवशी निघून गेल्या. अगम्यला मात्र आता त्यांची काळजी लागून राहिली होती. तो त्यांना दिवसातून दोन-तीन वेळा फोन करायचा पण त्याला आता वेगळीच हुरहूर लागून राहिली होती. अभीज्ञा त्याची ही चाललेली तगमग पाहत होती. म्हणूनच तिने काही तरी ठरवले!


अहिल्याबाई मुलगा, सून आणि नातू असं स्वतःचे कुटुंब असून ही  शेवट पर्यंत एकट्याच राहतील का? अभीज्ञाने कोणता असा निर्णय घेतला होता?

क्रमशः




या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule








                   


     




       


         

 


🎭 Series Post

View all