Login

दि लूप होल (भाग ३२)

This is thriller and suspense story

     आज जरा  अभीज्ञा निवांत होती कारण मागचे तीन दिवस सगळं झटपट आवरून हॉल मध्ये जाऊन बसावे लागत होते.अहिल्याबाईची कहाणी ऐकायला; पण आज तसं काही नव्हतं पण तरी अभीज्ञा टेन्शनमध्ये होती कारण अगम्यला पुन्हा त्या पेंटींगमध्ये जावे लागणार होते आणि अभीज्ञा या विचारानेच आतून घाबरली होती. सगळ्यांच्या समजावण्यामुळे ती अगम्यला त्या पेंटींगमध्ये जाऊ द्यायला तयार झाली खरी तरी तिला अगम्यला काही झालं तर याची चिंता लागून राहिली होती.हे वादळ मनातच ठेऊन ती नॉर्मल वागत होती कारण अगम्यला तिने टेन्शन घेतलेले आवडणार नव्हते आणि त्याने मग चिडचिड केली असती.

          सगळे जरा निवांतच होते.अभीज्ञाने नाष्टा बनवून सगळ्यांना नाष्टा करण्यासाठी बोलावले. सगळे नाष्टा करायला टायनिंग टेबलवर जमले. अहिल्याबाईने अभीज्ञाला विचारले.


अहिल्याबाई,“ अभीज्ञा तुला आज जरा वेळ आहे का ग?”


अभीज्ञा,“हो आहे की काय काम होत का आऊ?” तिने विचारले.


अहिल्याबाई,“ जरा माझ्या बरोबर खरेदीसाठी येशील का?औरंगाबादला येऊन खूप वर्षे लोटली आहेत ग आता खूप बदलले आहे शहर म्हणून म्हणाले की तू आली असतीस बरोबर तर..  ” त्या बोलायच्या थांबल्या.


अभीज्ञा,“ त्यात काय इतकं विचारायचे आणि विचार करायचा मी येईन तुमच्या बरोबर फक्त कधी जायचे ते सांगा?” ती म्हणाली.


अहिल्याबाई,“ संध्याकाळी जाऊ या!” त्या म्हणाल्या.


          अभीज्ञाने नुसती हसून होकारार्थी मान हलवली. अगम्य नुसता त्या दोघींचे गुळपीठ ऐकत होता आणि मनात विचार करत होता की या दोघी फक्त तीन दिवस आधी भेटल्या आहेत का? असं वागत आहेत जसं की वर्षानुवर्षे एकमेकींची ओळख आहेत.  

                   अभीज्ञा अहिल्याबाई बरोबर खरेदीला जाण्यासाठी तयार होत होती.मस्त ड्रेस घालून ती ड्रेसिंग टेबल समोर बसली होती.अगम्य तिथेच बेडवर बसून लॅपटॉपवर काही तरी काम करत होता पण त्याच सगळं लक्ष अभीज्ञाकडेच होत.तो अभीज्ञाकडे पाहून गालात हसत होता. अभीज्ञाच्या ही ते लक्षात आले होते तरी तिने  मुद्दाहून त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती पुन्हा आरशात पाहू लागली.ती मेकअप करण्यात गुंतली. अगम्य तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि तिच्या गळ्यात हात घालून तिला म्हणाला.


अगम्य,“ अभी किती दिवस झाले तुला असं नटताना पाहून! आज काय खरं नाही!किस पे बिजली गीरानी हैं आज?” तो तिला आरशा  पाहत म्हणाला.


अभीज्ञा,“काय नाही रे असंच! नाही मिळाला मागे काही दिवस वेळ आणि मूड ही नव्हता! आज बाहेर निघाले आहे बऱ्याच दिवसांनी मूड आणि टाईम ही होता म्हणून!”ती उठून उभी राहत म्हणाली.


अगम्य,“ अच्छा! पण इतकी सुंदर दिसत आहेस तर मला पण फायदा घेऊ दे की जरा!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“नाही! सोड बरं मला माझा मेकअप खराब होईल! आऊ माझी वाट पाहत असतील बाहेर!” ती लटक्या रागाने म्हणाली.


अगम्य,“ नाही सोडणार! मला जे हवं आहे ते दे मग जा!” तो हसून तिच्या  डोळ्यात पाहत म्हणाला.


अभीज्ञा,“ मला माहित आहे तुला काय हवं ते पण तुला आज काही नाही मिळणार! तू ना जास्त शेफारला आहेस!” ती स्वतःला सोडवून घेत म्हणाली.


अगम्य,“ माहीत आहे तर दे ना मग!” तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ तर तू ऐकणार नाहीस माझं?” तिने त्याच्या गळ्या भोवती हात घालून हसून विचारले.


अगम्य,“ सगळंच तर तुझच ऐकतो की!” तो तिला म्हणाला.


अभीज्ञा,“ अच्छा! मग सोड बरं मला जाऊ दे!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ एकदा तू ऐक ना माझं!” तो तिला हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ ठीक आहे! तू मला असा तर सोडायचा दिसत नाही!उगीच बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा घ्या तुम्हाला काय पाहिजे ते!” ती असं म्हणून हसली आणि अगम्यने तिला आणखीन जवळ ओढून  तिच्या ओठावर ओठ ठेवले.दोघांचे ही श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते.दहा मिनिटं झाले असतील त्यांना एकमेकांमध्ये गुंतून की बाहेरून अभीज्ञाच्या आईने हाक मारली.


आई,“ अभी अग आवरलं का तुझं? अहिल्याताई वाट पाहत आहेत तुझी!” त्या म्हणाल्या.


अभीज्ञा,“  आले आई पंधरा मिनिटं!” तिने  अगम्यच्या मिठीतुनच उत्तर दिले आणि पुन्हा ती त्याच्यात गुंतली थोड्या वेळातच भानावर येत त्याच्या पासून स्वतःला सोडवून घेत. तिने त्याच्या ओठावर लागलेली लिपस्टिक तिच्या हाताने पुसली आणि त्याच्या कानात हळूच म्हणाली.


अभीज्ञा,“ love you!  खुश! जाऊ आता मी?”असे म्हणून तिने आरशात पाहून पसरलेली लिपस्टीक व्यवस्थित केली.


अगम्य,“love you! बरं ऐक मिसेस देशमुखनी जर तुझ्या माझ्या किंवा अदुसाठी काही घेतले तर…”तो पुढे बोलणार तर अभीज्ञा त्याचे बोलणे मध्येच तोंडत त्याला म्हणाली.


अभीज्ञा,“ तर घ्यायचे नाही! कळत मला ते तू सांगायची गरज नाही त्यांच्याकडून काही घेतलेले माझ्या मानी नवऱ्याला आवडणार नाही!” ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.


अगम्य,“ that's  like my abhi!” तो तिला हसून म्हणाला.


अभीज्ञा,“ झाल्या तुझ्या सूचना देऊन आणि मिळालं ना काय हवं होतं ते! आता जाऊ मी आणि हो त्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसू नकोस जरा अदुला घे! हल्ली तो बाबांना आणि आईला खूप सतावतो!खोडसाळ झालाय तो तुझ्या सारखाच!मी येते दोन तासांत!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ जो हुकूम राणी सरकार!” असं म्हणून तो हसला.


       अभीज्ञा आणि अहिल्याबाई घरातून बाहेर पडल्या! अहिल्याबाईनी त्यांच्या ड्रायव्हरला गाडी एका मंदिरा जवळ थांबवायला सांगितली. अभीज्ञाने आश्चर्याने अहिल्याबाईंना विचारले.


अभीज्ञा,“ आपण खरेदीला जाणार होतो ना आऊ?मग मंदिरा समोर गाडी का थांबवली?” 


अहिल्याबाई,“ अग चल तर सांगते!”त्या हसून म्हणाल्या

  

          दोघी मंदिरात गेल्या.महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या आवारात असलेल्या एका बाकड्यावर दोघी बसल्या.अभीज्ञाला अहिल्याबाईच्या मनात काय आहे हेच कळत नव्हते.तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून अहिल्याबाईंनी बोलायला सुरुवात केली.


अहिल्याबाई,“ इतकी गोंधळू  नकोस अभीज्ञा! अग मी म्हातारी काय आणि कोणासाठी खरेदी करणार आहे? मी ज्या पांढऱ्या कॉटनच्या साड्या वापरते. त्या वर्षभराच्या  साड्या एका महिला आश्रमातून खरेदी करते मी कायम आणि तुमच्या कोणासाठी खरेदी केलेली तुझ्या मानी नवऱ्याला आवडणार नाही.त्याने तुला पढवून पाठवलं असणार की माझ्याकडून काही घेऊ नकोस म्हणून! तू  ही त्यामुळे काही घेणार नाही माहीत आहे मला!मी तुला काही महत्त्वाचे बोलण्यासाठी बाहेर घेऊन आले आहे.जे मी घरात बोलू शकत नव्हते! ” त्या हसून म्हणाल्या.


अभीज्ञा,“ ते सगळं ठीक आहे पण अगम्यने मला सांगितलं असणार की काही घेऊ नको तुमच्याकडून हे कसे कळले तुम्हांला?” तिने आश्चर्याने विचारले.


अहिल्याबाई,“ अग त्याला जन्म दिलाय मी! हा आता मी त्याच्या पासून दूर राहिले हे खरं आणि तो माझ्यावर खूप नाराज आहे हे ही खरं!पण अगम्यची नाळ माझ्याशी जोडली गेली आहे! मी  चांगलं ओळखते त्याला!” त्या पुन्हा हसून म्हणाल्या.


अभीज्ञा,“बाप रे! आई-मुलाचं नात जगा वेगळं असत किती!म्हणजे मी पण आई आहे पण अदू आणि माझं नात वेगळं आहे!आणि तुमचं आणि अगम्यच वेगळं त्याच्या जवळ नसून ही तुम्हांला त्याचा स्वभाव!तो कसा वागेल कोणत्या वेळी हे तुम्हांला चांगलं समजत! बरं बोला ना काय बोलायचे होते तुम्हांला?!” ती म्हणाली.


अहिल्याबाई,“ काम थोडं अवघड आहे अभीज्ञा पण केलं तर हे काम तूच करू शकणार हे मला माहित आहे!”त्या गंभीर होत म्हणाल्या.


अभीज्ञा,“असं काय काम आहे जे मीच करू शकणार आहे आऊ?” तिने विचारले.


अहिल्याबाई,“ हे बघ अमावस्येला अजून आठ दिवस आहेत तर माझी अशी इच्छा होती की तू आणि अमू म्हणजे तुम्ही सगळेच दोन दिवस आपल्या गावी चलावे.त्यामुळे लोकांना कळेल की अमू देशमुखांचा वारस आहे आणि तो जिवंत आहे आणि तुमचा गृहप्रवेश ही मला करता येईल तसेच आपली इस्टेट ही पाहून घ्याल तुम्ही! शेवटी सगळं तुमचंच आहे ते तुम्हालाच सांभाळायचे आहे.मला लवकरात लवकर या जबाबदारीतुन मोकळे होता येईल.खरं तर मला वाटलं नव्हतं की मला तुमचा संसार माझ्या डोळ्याने पाहायला मिळेल पण नशीब माझे आणि त्या परमेश्वराची कृपा म्हण! पिकलं पान आम्ही कधी कळून पडेल सांगता येत नाही! तू अगम्यशी बोल ना  तुझं ऐकेल तो!” त्या तिच्याकडे आशेने पाहत म्हणाल्या.


अभीज्ञा,“ असं काय म्हणता आऊ तुम्ही अदुचे लग्न पाहत की काही नाही होणार तुम्हाला! हा आणि प्रश्न तुमच्या इच्छेचा तर पाहू मी हिम्मत करून बोलेण  अगम्यशी या विषयावर!” ती त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली.


अहिल्याबाई,“ हिम्मत करून म्हणजे?” त्यांनी विचारले.


अभीज्ञा,“ हो हिम्मतच करावी लागेल त्याच्याशी हे बोलायला! तुम्हांला जितका शांत वाटतो ना तुमचा मुलगा इतका शांत नाही आऊ! आणि तो प्रत्येक गोष्ट माझी ऐकतोच असं ही नाही! पंधरा दिवस आधीच मी त्याच्या कडून कानाखाली खाता खाता वाचले आहे.त्याने हात आवरला नाही तर मी त्याची कानाखाली खाऊन दोन दिवस जागची उठले नसते! चूक माझीच होती म्हणा! मग काय साहेबांनी स्वतःच त्रास करून घेतला बी.पी.,वाढला त्याचा आणि आईकडून मी बोलणी खाल्ली! आता हा विषय काढायचा त्याच्या समोर म्हणजे हिम्मतच लागेल!” ती गंभीर पणे म्हणाली.


अहिल्याबाई,“ अरे बाप रे! तुझ्यावर हात उगारला अगम्यने!इतका राग येतो त्याला? रावसाहेब आणि माझ्यासारख्या शांत माणसांच्या पोटी हा जमदग्नी कुठून अवतरला? मग राहू दे बाई माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण नको!” त्या माघार घेत म्हणाल्या.


अभीज्ञा,“ जमदग्नी! आऊ हा माणूस ऑफिसमध्ये खडूस म्हणून ओळखला जातो. याला सगळा स्टाफ घाबरून असतो!माझं आणि याच पद सेम आहे.मला सहकारी विचारतात बऱ्याचदा मॅडम तुम्ही सरां बरोबर संसार कसा करता मी फक्त हसते! आता काय सांगणार या लोकांना अगम्य म्हणजे काटेरी फणस आहे वरून काटे आणि आतून रसाळ गोड गरे! ज्याचे काटे मला कधीच टोचत नाहीत रादर त्याच्या जवळ असणाऱ्या माणसांना ते टोचत नाहीत!” ती अगम्य विषयी भान हरपून बोलत होती आणि अहिल्याबाई कौतुकाने ऐकत होत्या. तिने अहिल्याबाईकडे एकदा पाहिले आणि गप्प झाली.


अहिल्याबाई,“ थांबलीस का ग बोल ना! तुझ्या प्रत्येक शब्दात अमू विषयी प्रेम दिसत!नशीबवान आहे अमू तुझ्यासारखी नि:सीम  प्रेम करणारी बायको मिळाली त्याला!” त्या हसून म्हणाल्या.


अभीज्ञा,“ तुमचं तर काही तरीच आऊ!बरं जायचं का आता?” ती लाजून मान खाली घालत म्हणाली.


अहिल्याबाई,“ बरं चल हा पण खाण्यासाठी वगैरे काही घेतले तर चालेल ना तुझ्या नवऱ्याला का ते पण नाही चालणार?म्हणजे जाताना त्याच्या,तुझ्या आणि आदूच्या आवडीचे काही घेतले असते म्हणून विचारले!” अभीज्ञाला काहीसं चिडवतच त्या म्हणाल्या.


अभीज्ञा,“ हो चालेल की! जाता जाता घेऊन जाऊ!” ती हसून म्हणाली.

●●●●

         अभीज्ञा आता अगम्य समोर  श्रीरंगपूरला जाण्याचा विषय कसा आणि कधी काढावा याचा विचार करत होती.ती रात्री  हाच विचार करत होती. अगम्यशी या विषयावर बोलण्यासाठी तिला त्याचा मूड पाहायला हवा होता.तसेच तिच्याकडे वेळ ही खूप कमी होता.या विचारतच तिला रात्री कधी तरी झोप लागली आणि सकाळी सहा वाजता ती जागी झाली. आजच सकाळी तिने अगम्यशी या विषयावर बोलायचे असे ठरवले! खरं तर विषय तसा नाजूकच होता आणि अगम्य कसा रियाक्ट करेल हे तिला ही माहीत नव्हते. आयुष्य पहिल्यांदाच अगम्यशी काही तरी बोलण्याची तिला भीती वाटत होती.ती या विचाराच्या तंद्रीतच आज आवरून किचनमध्ये गेली. तिची सगळी कामे यंत्रवत सुरू होती. पण तिच्या मनात मात्र खूप सारे प्रश्न फेर धरून नाचत होते.तिने नाष्टा तयार केला.सगळ्यांचा नाष्टा झाला आणि सगळे मंदिरात निघून गेले. ती नेहमी प्रमाणे चहा घेऊन बेडरूममध्ये गेली. तिला हीच वेळ तो विषय काढण्यासाठी बरोबर वाटली कारण सकाळ सकाळ अगम्यचा मूड चांगला असतो हे तिला माहीत होते. हा त्याचा  मूड अजून चांगला करण्याचा मार्ग तिला चांगलाच माहीत होता.त्या तयारीत ती गेली.अगम्य अजून झोपला होता. तिने चहा टेबलवर ठेवूला आणि त्याच्या केसात हात फिरवत त्याला म्हणाली.


अभीज्ञा,“ गुड मॉर्निंग अगम्य! उठ सात  वाजले! तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस!” 


अगम्य,“ काय सात वाजले! खरंच आज काल मी खूपच उशिरा उठत आहे ग! तू उठवल्या शिवाय तर मला जागच येत नाही!” तो डोळे चोळत उठून बसत म्हणाला.


       अभीज्ञाने त्याला चहा दिला आणि म्हणाली.

अभीज्ञा,“ हुंम उद्या पासून अलार्म लावून झोपत जा!” ती त्याला चिडवत म्हणाली.


          तिला वाटत होतं की नेहमी प्रमाणे तो तिला जवळ ओढले आणि मग गोड मॉर्निंग दे असं म्हणेल मग तिला विषय काढायला सोप जाईल पण हा तर आज काहीच बोलत नाही. चला म्हणजे आपल्यालाच आता याची आणि आपली मॉर्निंग गोड करून विषयाला हात घालावा लागेल.या सगळ्या विचारत ती मग्न असतानाच! अगम्यने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली आणि ती भानावर आली. त्याने नजरेनेच तिच्या हातात कप देत काय झाले विचारले.तिने कप घेऊन टेबलवर ठेवत नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या जवळ जात म्हणाली.


अभीज्ञा,“आज काही नको वाटतं?” तिने सुचकपणे विचारले.


अगम्य,“ अरे वा आज मूड आहे वाटतं मॅडमचा! आम्हाला तर काय हवंच असत पण असा  चान्स मात्र रोज-रोज मिळणार नाही!” असं म्हणून तो तिला स्वतःकडे ओढत म्हणाला व तिच्या ओठावर ओठ ठेवले.


                 अगम्यने मात्र अभीज्ञाला तेवढ्यावर सोडले नाही. अभीज्ञाने ही फारसे आढेवेढे  घेतले नाही. ती अलगद त्याच्या मिठीत शिरली. अभीज्ञाने थोड्या वेळाने हळूच विषय काढला.


अभीज्ञा,“ मला तुझ्याशी काही तरी बोलायचे आहे!” ती म्हणाली.


अगम्य,“ अच्छा! म्हणजे माझ्याकडून काही तरी  पाहिजे म्हणून इतकं प्रेम उतू चाललं होतं का सकाळी सकाळी?आणि ते ही न आढेवेढे घेता!खरं तर मला आधीच कळलं होतं की तुला काही तरी हवं आहे मग आलेली संधी कशाला सोडा!” तो हसून तिला घट्ट मिठी मारत म्हणाला.


अभीज्ञा,“ एक नंबर नालायक आहेस मग तू! तुला ना माझा फायदा कसा आणि कुठे घ्यायचा चांगलं कळत!” ती लटक्या रागाने म्हणाली.


अगम्य,“ तू काय कमी आहेस का?तुला काही हवं असेल तर लगेच लाडीगोडी! नाही तर  सकाळी सकाळी तू माझ्या मिठीत अशक्य!But that's why I love you!”असं म्हणून त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.


अभीज्ञा,“ बरं ऐक ना! माझ्याकडे वेळ नाही.आई-बाबा,आऊ,अदूला घेऊन  मंदिरात गेलेत. ते येऊ पर्यंत…!” ती पुढे बोलणार तर अगम्य तिला मध्येच म्हणाला.


अगम्य,“ आणि ते यायच्या आत तुला माझ्याशी बोलायचे आहे.आता प्रस्तावना झाली असेल तर बोलशील का?” तो म्हणाला.


अभीज्ञा,“ अमू आपण तुझ्या गावी जाऊन येऊ या का?” ती विचारून मोकळी झाली.


अगम्य,“ म्हणजे?” तो असमंजसपणे म्हणाला.


अभीज्ञा,“ श्रीरंगपूरला!” ती जरा कचरत म्हणाली.


अगम्य,“ तिकडे काय काम आहे आपलं आणि हे खुळ तुझ्या डोक्यात कोणी घातलं?मिसेस देशमुखांनी ना!” त्याचा आवाज आता चढला होता.


अभीज्ञा,“ हो त्यांनीच सांगितले मला त्याची इच्छा आहे की आपण म्हणजे तू तुझ्या गावी  त्यांच्या बरोबर जावे! तुझा वाडा, इस्टेट सगळं पहावस! लोकांना कळवा की तू देशमुखांचा वारस आहेस आणि तू जिवंत आहेस!” तिने तिच्या मनातलं सगळं बोलून दाखवलं.


अगम्य,“कोणतं गाव?कोणती इस्टेट आणि कसला वारस ग? मी  माझं अर्ध आयुष्य अनाथ म्हणून काढलं आहे. आत्ता आल्या आहेत  त्या की त्यांचा मी मुलगा आहे म्हणून आणि त्या माझ्या आई आहेत म्हणून!मला ना त्याची इस्टेट हवी ना काय!आणि मी नाही जाणार त्यांचा वारस म्हणून त्यांच्या गावी!” तो रागाने म्हणाला.


अभीज्ञा,“ आणखीन किती दिवस तू त्यांना अशी शिक्षा देणार आहेस! तू अनाथ आश्रमात वाढलास तर त्या ही काही सुखात लोळत नव्हत्या.स्वतःच्या मुलाला असं अनाथ आश्रमात सोडून त्यांना खूप आनंद नाही झाला समजलं का? त्यांनी तुझ्याच भल्यासाठी सगळं केलं ना आणि हे तुला ही माहीत आहे तरी तू किती दिवस असं तुझ्याच जखमा कुरवाळत बसणार आहेस रे? तुला त्यांचे दुःख दिसत नाही का?त्या माऊलीने नवरा गेल्यावर आपल्या मुला शिवाय इतके दिवस कसे काढले असतील याचा विचार कधी केलास का?त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांनी किती दिवस आणि का भोगावी सांग ना? त्यांनी खूप मोठी गोष्ट नाही मागितली तुला फक्त जे त्यांनी इतक्या वर्षांपासून तुझ्यासाठी जतन केल.जे तुझं आहे ते तू पहावस आणि पुढे जाऊन स्वीकारावेस  इतकीच इच्छा आहे त्यांची! इतकी वर्षे आईसाठी तिच्या प्रेमासाठी तरसलास आणि तुझी आई आता तुझ्या समोर आहे तर त्यांना स्वीकारायचे सोडून त्यांची हेटाळणी काय करतोस रे! त्या आहेत तो पर्यंत त्यांची किंमत कर अगम्य! परत पश्चात्ताप करून हाती काही लागणार नाही.” अभीज्ञा त्याची कानउघाडणी करत होती.अगम्य आता खूपच चिडला होता.त्याच्या चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तो अभीज्ञावर चिडून मोठ्याने बोलू लागला.


अगम्य,“मी तुझ्यावर प्रेम करतो! तू माझी बायको आहेस याचा अर्थ असा नाही की मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकावी समजलं तुला! आणि  तुला मी पहिल्यांदा ही सांगितलं होतं आणि आता ही सांगतोय तुला काय करायचं ते कर मी अडवणार नाही तुला! पण मला या सगळ्यात ओढायचे नाही समजले तुला!” असं म्हणून तो अंघोळीला निघून गेला.


       अभीज्ञा मात्र अगम्यच्या बोलण्यामुळे हतबल झाली होती. तिला त्याच्या वागण्याचा राग ही येत होता तरी तिला मनात भीती होतीच कुठे तरी की तो असं वागू शकतो! ती ही डोळे पुसत उठली आणि तिच्या आईच्या बेडरूम मध्ये जाऊन आवरून आली. ती बाहेर आली तर अगम्य तो पर्यंत आवरून बाहेर निघाला होता. तिने त्याला अडवले आणि म्हणाली.


अभीज्ञा,“कुठे निघालास?बरं नाष्टा तर करून जा!”ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.


        हे सर्व अभीज्ञाचे आई-बाबा आणि अहिल्याबाई दारात उभे राहून पाहत होते.अगम्यचे मात्र कोणा कडेच लक्ष नव्हते. तो  तसाच रागात तिला काहीच न बोलता निघून गेला. हे पाहून अभीज्ञाची आई अभीज्ञाला म्हणाल्या.


आई,“ पुन्हा भांडलीस ना त्याच्याशी?तुला किती वेळा….” त्या पुढे बोलणार तर अभीज्ञाने त्यांचे बोलणे मध्ये तोडले व ती रागाने तणतणत म्हणाली.


अभीज्ञा,“ आई प्रत्येक वेळेस माझीच चूक असेल असं तू गृहीतच धरलं आहेस का? तू त्याची आई आहेस का माझी?”


आई,“ अग पण कोठे  गेला तो जा त्याच्या मागे!” त्या अभीज्ञाचे हे बोलणे ऐकून जरा वरमल्या आणि हळूच म्हणाल्या. 


अभीज्ञा,“ जाऊदे येईल स्वतः हुन तासा भरात! आपण त्याची काळजी करतो ना म्हणून तो जास्त शेफारला आहे!”ती रागाने तणतणत म्हणाला आणि किचनमध्ये निघून घेली.


        अहिल्याबाईंच्या लक्षात आले की अभीज्ञा आणि अगम्यमध्ये कशा मुळे भांडण झाले असावे.


आगम्य कुठे गेला असेल?अगम्य  श्रीरंगपूरला जायला तयार होईल का? अहिल्याबाईंना तो आई म्हणून स्वीकारेल का? 

क्रमशः





या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule





  


                


       


 




       


           





🎭 Series Post

View all