Login

दि लूप होल (भाग ३१)

This is thriller and suspense story

     हे सगळं अहिल्याबाई सांगू पर्यंत जेवणाची वेळ टळून गेली होती.अभीज्ञाने घड्याळ पाहून डोक्याला हात लावला आणि सगळ्यांना जेवायला उठवले.जेवणं झाली.सगळे पुन्हा हॉलमध्ये जमा झाले आता अगम्यने अधीरतेने विचारले 


अगम्य,“ असा काय उपाय आहे की तुम्ही  सांगता सांगता थांबलात.ती पेंटींग तर नष्ट करावीच लागणार आहे! त्या शिवाय गत्यंतर नाही.काय उपाय आहे ही पेंटींग नष्ट करण्याचा सांगा मिसेस देशमुख!”अगम्यने विचारले.


अहिल्याबाई,“ तू म्हणतोस ते खरच आहे अमू पण उपाय सोपा नाही बाळ!तरी तो आपल्याला करावाच लागणार आहे. अघोरी बाबांच्या म्हणण्यानुसार! त्या पेंटींगमध्ये याच पेंटिंगची  एक प्रतिकृती आहे.जी सूर्यकांत भाऊंनी त्या बंगलीतील त्याच्या त्याच स्टुडिओ मध्ये ठेवली आहे.पण त्या स्टुडिओला कुलूप आहे त्याची चावी कुठे आहे हे फक्त सूर्यकांत भाऊंनाच माहीत आहे…..” त्या पुढे बोलणार तर मीरा मध्येच म्हणाली.


मीरा,“एक मिनिट काकू चावी! कसली चावी! एक चावी माझी आई माझ्या मामीकडे सोपवून गेली होती की ही चावी मीरा मोठी झाली की तिला द्या आणि तिला ही जीवापाड जपायला सांगा कारण पुढे  या चवीची गरज पडेल.” तिच्या गळ्यात एका दोऱ्याला बांधलेली चावी दाखवत म्हणाली.


राहुल,“ पण तुझ्या आईला त्या पेंटिंग आणि त्या चावी बद्दल तसेच ती पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे हे कसं कळलं होतं?” त्याने शंका विचारली.


मीरा,“माझी आई म्हणे एक दिवस माझ्या त्या नालायक बापाला भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती तेंव्हा माझ्या बापाने तिला सांगितले की ही चावी घे आणि जपून ठेव कारण ही चावी म्हणजे माझा जीव आहे असं समज!माझ्या आईला त्यावेळी काही समजले नाही पण जेंव्हा माझ्या बापाने आत्महत्या केली.आई प्रेत ताब्यात घ्यायला गेली तेंव्हा काका(आप्पासाहेब) आणि माझ्या बापामध्ये झालेले बोलणे तसेच त्या पेंटिंगबद्दलचे तथ्य तिला कळले आणि तिने अंदाज बांधला की ती चावी त्या पेंटींगशी संबंधित असणार म्हणून तिने ती चावी जपून ठेवली आणि ही चावी मामीकडे दिली.मामीला मला द्यायला सांगितली.” तिने खुलासा केला.


अगम्य,“ म्हणजेच आता एक प्रॉब्लेम मिटला म्हणायचा!उपाय काय आहे  पण?” त्याने विचारले.


अहिल्याबाई,“त्या बंगलीत जाऊन ती प्रतिकृती पेंटिंग या पेंटींगच्या बाहेर आणून तिच्यावर विधिवत  मंत्रोच्चार करून अग्नीत समर्पित करावी लागेल पण अमावस्येच्या रात्री ते लूप होल बंद होण्या आधी ती प्रतिकृती घेऊन बाहेर येणे आवश्यक आहे. हे सगळं करणं इतकं सोपं नाही कारण ही पेंटिंग म्हणजे सूर्यकांत पाटलाने स्वतः निर्माण केलेले जग आहे. ते त्या जगाचे अनभिषिक्त राजे आहेत आणि ती बंगली म्हणजे त्याची गढी आहे. आधीच अगम्यवर त्यांचा राग आहे! पहिल्यांदा ही त्यांनी अगम्यवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.त्या पेंटींगमधून अगम्य अत्यवस्थ होऊन बाहेर आला होता आणि मरणाच्या दाढेतून बाहेर आला कसा बसा!  जर तो आता गेला पेंटींगमध्ये तर सूर्यकांत पाटील याला मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार!मला भीती आहे की तो याच्यावर हल्ला नक्कीच करणार! आता तर ते खूपच चवताळले असतील!अगम्यच्या जीवाला धोका आहे!आणि अगम्य नाही गेला तरी तो आज ना उद्या त्या। पेंटींगमध्ये खेचला जाणार! पुढे जाऊन आज्ञांकला ही धोका आहे.इकडे आड आणि तिकडे विहीर आहे! ” असं म्हणून त्या रडू लागला.


अभीज्ञा,“ काय म्हणजे तुम्हांला असं म्हणायचे आहे की ती पेंटींग नष्ट करण्यासाठी अगम्यला पुन्हा त्या पेंटींगमध्ये जावं लागणार! असं असेल तर मी तुला जाऊ देणार नाही अगम्य!एकदा विषाची परीक्षा न कळत पणे घेऊन झाली आहे.त्या पेंटींगमधून बाहेर आल्यावर अगम्यची काय अवस्था होती ते मी जवळून पाहिले आहे! भोगले आहे!एकदा तो मरणाच्या दाढेतून बाहेर आला आहे कसा  बसा! मी पुन्हा त्याला तेथे नाही जाऊ देणार आणि सूर्यकांत या वेळी अगम्यला असाच सोडेल का?त्याला तर याला माराचेच आहे!अगम्य आपल्याला नाही करायचा असला जीवघेणा उपाय वाटलं तर आपण इथून कुठे तरी दूर जाऊ हे राज्य सोडू!वेळ पडली तर देश ही सोडू! पण तुला काही झाले तर मी काय करणार आहे? मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय!तू असलं नसत धाडस नाही करणार आहेस अगम्य समजलं तुला!” ती रडत हे सर्व बोलून तिथून बेडरूममध्ये निघून गेली.

    

      अगम्य तिच्या मागे गेला.ती बेडवर बसून हुंदके देत होती.अगम्य तिच्या जवळ गेला तशी अभीज्ञा त्याला मिठी मारून रडू लागली. अगम्य तिला शांत करत म्हणाला.


अगम्य,“ रडणं बंद कर अभी! मी तुझ्या मर्जी शिवाय काही करणार नाही.माझ्यावर विश्वास आहे ना तुझा?”


अभीज्ञा,“ तू नाही जाणार आहेस त्या पेंटिंगमध्ये मला तुला नाही गमवायचे! मी एकदा तुला गमावले आहे.तू मृत्यूच्या दाढेतून कसा बसा सुटलास पण मला आता कोणतीच रिस्क घ्यायची नाही.मी तुला नाही गमावू शकत अमू! Because I can't live without you! I love you so much!”असं म्हणून ती त्याला अजूनच घट्ट मिठी मारून रडू लागली.


अगम्य,“ I know that and I love you too!म्हणूनच म्हणालो ना मी! की मी तुझ्या मर्जी शिवाय काहीच करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर!” तो तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन तिचे डोळे अंगठ्याने पुसत म्हणाला.


अभीज्ञा,“हुंम!” ती   इतकच म्हणाली.


अगम्य,“ मग बाहेर चल असं बरं दिसत का? सगळे बाहेर आहेत आणि आपण दोघेच बेडरूममध्ये काय म्हणतील आपल्याला? का बसु दे त्यांना बाहेरच आपण आपलं!” तो तिच्या ओठांवर ओझरता किस करून तिला डोळा मारत म्हणाला.

        हे ऐकून अभीज्ञा हसली आणि त्याला फटका मारत म्हणाली.


अभीज्ञा,“ निर्लज्ज होत चालला आहेस तू आज काल!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ that's like a good girl! हसल्यावर किती छान दिसतेस! by the way! आज रात्रीचा काय प्लॅन आहे?” तो पुन्हा तिला जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ तुला कधी ही कसा  रोमान्स सुचतो रे कोणत्या ही सिचवेशन मध्ये?चला बास झाला रोमान्स आणि रात्रीच ना रात्री पाहू आणि मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना?”ती त्याला चिमटा काढत म्हणाली.


अगम्य,“हो बाई आहे लक्षात नाही करणार मी नसत धाडस ठीक आहे! पण बाहेर सगळे काय म्हणतात ते तरी पाहू या चल!” तो असं म्हणाला.


      अभीज्ञाने डोळे पुसले. अभीज्ञा आणि अगम्य बाहेर आले. सगळे त्यांचीच वाट पाहत होते.अगम्य सोफ्यावर बसत म्हणाला.


अगम्य,“ मला वाटतं आपण  हा विषय इथेच थांबवावा कारण अभीच्या मना विरुद्ध मी काही ही करणार नाही. तिला या सगळ्याची भीती वाटते आहे.” तो म्हणाला.

     

             हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहत होते. अभीज्ञा शांतपणे खुर्चीवर बसली होती. आता अभीज्ञाचे बाबा बोलू लागले.


बाबा,“ अभी मला तुझी अगम्य विषयी तुला वाटणारी काळजी समजते आहे आणि मागील काही अनुभव पहाता आणि अमूची ती अवस्था पाहून तुला भीती वाटणे साहजिकच आहे पण ही पेंटींग अशी तर नष्ट होणार नाही आणि तुमचा पिच्छा ही सोडणार नाही.तुच म्हणालीस ना मागच्या अमावस्येला तू अगम्यला त्या पेंटींग मध्ये जाताना अडवलंस मग  तूच विचार कर तू अगम्यला किती दिवस राखणार? आज ना उद्या त्या पेंटिंग मधले लूप होल आणि तो सूर्यकांत अगम्यला त्या पेंटींगमध्ये ओढणारच आहे तेंव्हा तू काय करणार आहेस? आणि पुढे जाऊन अज्ञांकला हा धोका आहेच की! जरा तरी डोक्याने विचार कर!त्या पेक्षा आत्ताच पूर्ण तयारी निशी अगम्य त्या पेंटींगमध्ये गेला आणि त्यातील ती पेंटींगची प्रतिकृती घेऊन आला तर हे संकट कायमच टळेल अभी! हा यात अगम्यच्या जीवाला धोका आहे पण तो  केंव्हा ना केंव्हा त्या संकटात अडकणारच आहे मग हा धोका पत्करून जर तो पेंटींग घेऊन आला तर!कायम साठीच हा पेंटिंगचा प्रश्न सुटेल ना!” ते अभीज्ञाला समजावत म्हणाले.


अहिल्याबाई,“ हे बघ अभीज्ञा मी अमूची आई आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी मी काय-काय केलं हे तुला तर आता माहीतच झालं आहे!मग विचार कर जरा मी अमुला अशीच त्या पेंटींगमध्ये जाऊ देईन का? मी सुरक्षिततेचे सर्व उपाय करणार! अगम्य सप्तचक्र जागृती मध्ये तरबेज आहे.मी आमचे गुरू ब्रम्हानंद महाराजाना  बोलावून घेणार आणि….” त्या पुढे बोलणार तर अगम्यने त्यांना मध्येच थांबवले.


अगम्य,“ एक मिनिट तुम्हांला कसं माहिती की मी सप्तचक्र जागृतीमध्ये तरबेज आहे ते?आणि ब्रह्मानंद महाराच माझे ही गुरू आहेत! तेच तुमचे ही कसे?तुम्हीच तर त्यांना.. ”त्याने आश्चर्याने विचारले व तो मध्येच थांबला.


अहिल्याबाई,“ हो मीच त्यांना अनाथ आश्रमात ही विद्या शिकवण्यासाठी पाठवले होते कारण अशी वेळ आलीच तर एखादी अध्यात्मिक विद्या तुला अवगत असावी म्हणून पण ब्रम्हानंद महाराजांना माहीत नाही की तू कोण आहेस ते!” त्या म्हणाल्या.


अगम्य,“बाप रे!इतका विचार आणि  बाकी कोणीच इंटरेस्ट देऊन शिकले नाही तसं मी ही; ही विद्या आत्मसात केली नसती तर?” त्याने शंका विचारली.


अहिल्याबाई,“ विचार तर करावाच लागला आई आहे मी तुझी अमू आणि माझा मुलगा आहेस तू माझे रक्त आहे तुझ्यात! मला चांगलं माहीत आहे तू काय शिकू शकतोस आणि काय नाही!” त्या हसून पण अभिमानाने म्हणाल्या.


     अगम्य मात्र यावर काहीच बोलला नाही पण हे ऐकून त्याच्या डोळ्यात अहिल्याबाई बद्दल आदर स्पष्ट दिसत होता.


अभीज्ञा,“हे मला मान्य की मागच्या वेळेस अगम्यला सप्तचक्र साधनेमुळे पेंटींग मधून बाहेर येण्याचा रस्ता सापडला पण  तुम्ही तुमच्या गुरूला बोलून त्याचा जसा उपयोग करून घेणार आहेत.


अहिल्याबाई,“ माझे करू आणि मी आमचे सप्तचक्र जागृत करून अगम्याच्या जागृत असलेल्या सप्तचक्राच्या माध्यमातून त्याला पेंटींगमध्ये गेल्या नंतर  शक्ती प्रक्षेपित करणार तो पेंटिंग मधून बाहेर येऊ पर्यंत! त्यामुळे सूर्यकांतच्या आत्म्या बरोबर त्याला लढण्यास बळ मिळेल.तसेच घरात महामृत्यूजय मंत्राचे उच्चारण आणि यज्ञ अगम्य बाहेर येऊ पर्यंत सुरू राहील आणि त्याच यज्ञात आपण ती पेंटिंग नष्ट करणार आहोत.विश्वास ठेव माझ्यावर अभीज्ञा अगम्यला काही होणार नाही!” त्या अगदी कळकळीने सांगत होत्या.


 हे सर्व ऐकून अभीज्ञाची आइ म्हणाली.


आई,“ ताई बरोबर बोलत आहेत अभी! मी ही अगम्यला सप्तचक्र माध्यमातून शक्ती प्रक्षेपित करेन!” त्या म्हणाल्या.


राहुल,“हे सगळे बरोबर बोलत आहेत अभी! अम्याला असं ही त्या पेंटींग पासून धोका आहे मग सगळ्या तयारी निशी जर तो त्या पेंटींगमध्ये गेला आणि त्या सूर्यकांतच्या आत्म्याशी लढून तो प्रतिकृती पेंटिंग घेऊन आला तर ही पेंटींग नष्ट होईल आणि अम्याच्या जीवाला असणारा धोका कायमचा टळेल!” त्याने दुजोरा दिला.


     अगम्य मात्र शांत होता तो अभीज्ञा काय निर्णय घेणार याची वाट पाहत होता.इतक्या सगळ्यांनी समजावून सांगितल्यामुळे अभीज्ञा जरा वरमली आणि ती म्हणाली.


अभीज्ञा,“ ठीक आहे जर तुमच्या सगळ्यांचे हेच म्हणणे आहे तर अगम्य तू जा त्या पेंटींगमध्ये आणि एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाव या पेंटिंगचा! ही पेंटींग आता मला जास्त दिवस माझ्या घरात आणि माझ्या डोळ्यासमोर ही नको आहे.” ती अगम्यकडे पाहून म्हणाली.


अगम्य,“ ठीक आहे मी तयार आहे! पण या साठी आपल्याला अमावस्ये पर्यंत ते लूप होल उघडण्याची वाट पाहावी लागेल!” तो म्हणाला.


अहिल्याबाई,“ हो! तो पर्यंत मी बाकीची तयारी करेन आणि महाराजांशी ही बोलून घेईन पण अगम्य तू तुझी सप्तचक्र साधना सुरू कर आणि सरिता ताई तुम्ही ही! जितके जास्त लोक शक्ती प्रक्षेपित करू शकतील तितके चांगले आहे.अमावस्येला अजून आठ दिवस आहेत. तो पर्यंत आपल्याला तयारी करायला बराच वेळ आहे!” त्या म्हणाल्या.


          अभीज्ञाने चहा करून आणला सगळ्यांनी चहा घेतला. मीरा कडून अहिल्याबाईनी चावी शुध्दीकरण करण्यासाठी घेतली. रात्री जेवण करण्यासाठी राहुल आणि मीराला अगम्यने आज  थांबवून घेतले आणि त्याला राहुलशी ही मीरा बद्दल बोलायचे होते. अभीज्ञा, मीरा आणि अभीज्ञाची आई आणि अहिल्याबाई किचनमध्ये गेल्या.अभीज्ञाचे बाबा, अगम्य आणि राहुल आज्ञांक बरोबर खेळत बसले होते.अगम्य भरपूर वेळ आहे हे पाहून राहुलला बेडरूममध्ये बोलण्यासाठी घेऊन गेला.

     

        राहुल व तो बेडरूमच्या गॅलरीत जाऊन बसले. तशी बेडरूमची गॅलरी प्रशस्त होती.तिथे  दोन खुर्च्या आणि टीपॉय अभीज्ञाने ठेवलेलेच होते.तिथेच हे दोघे बसले.अगम्य बोलू लागला.


अगम्य,“ राहुल्या मला तुझ्याशी बोलायचे आहे!”


राहुल,“ मला माहित आहे तुला काय बोलायचे आहे ते!” तो म्हणाला.


अगम्य,“ हुंम! मग मीरा बद्दल तू काय ठरवले आहेस?” तो त्याला पाहत म्हणाला.


राहुल,“ मला या नात्याचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल!” तो ठामपणे म्हणाला.


अगम्य,“ वेडा आहेस का तू राहुल्या! म्हणे पुन्हा विचार करणार!अरे मीरा चांगली मुलगी आहे.तिच्या एका चुकीची शिक्षा तू तिला देणार आहेस का? आधीच तिचा दोष नसताना तिने खूप सोसलं आहे आयुष्यात! त्यात तू आणखीन भर नको घालूस रे!” तो त्याला समजावत म्हणाला.


राहुल,“ ती माझ्याशी खोटं बोलली त्याच काय रे अम्या!”तो नाराजीनेच म्हणाला.


अगम्य,“मग काय करायला हवं होतं तिने रे! असल्या बापा बद्दल सांगायला हवं होतं तुला की त्याच नाव सुध्दा तिने टाकले आहे.ज्या बापाचा तिच्या जन्मा पासूनच काहीच संबंध नाही!योगायोगाने या गोष्टी बाहेर पडल्या आणि समज आपलं सगळं ऐकून ही तिने मनात आणलं असत तर सगळं आपल्या पासून लपवू शकली असती! पण तिने तसं केलं नाही! या वरूनच तिचा स्वभाव तुला नाही कळला का रे?” तो पोटतिडकीने बोलत होता.

       हे सगळं  ऐकून राहुल थोडावेळ विचारात पडला आणि अगम्यला म्हणाला.


राहुल,“तू मीराची जास्त वकिली करू नकोस काय!मी करेन तिच्याशी लग्न! तुझं बोलणं पटलं मला पण तिला शिक्षा तर मिळणारच!”तो हसून म्हणाला.


अगम्य,“शिक्षा देण्या आधी लक्षात ठेव हा तिचा भाऊ तिच्या पाठीशी आहे राहुल्या! तिच्या डबल शिक्षा तुला देणार मग!” तो त्याला धमकावत म्हणाला.


राहुल,“ आरे वा!हे चांगलं आहे की आता माझ्या पेक्षा ती जास्त जवळची झाली का अम्या तुझ्या?” तो तक्रार करत म्हणाला.


अगम्य,“ नको रडूस आता आणि लग्नाचं काय ते ठरवा लवकर  दोघ आणि सांगा आम्हाला!” तो हसून म्हणाला.


          सगळे जेवले.राहुल आणि मीरा निघून गेले.अगम्य आज्ञांकला हॉलमध्ये बसून झोपवत होता.अभीज्ञा आणि तिची आई किचन आवरत होत्या. अभीज्ञाच्या आई अज्ञांकला तो झोपला आहे पाहून त्याला घेऊन झोपायला निघून गेला. अगम्य अभीज्ञाला हाक मारून बेडरूमध्ये निघून गेला. अभीज्ञा थोड्या वेळाने बेडरूममध्ये गेली तर आगम्य लॅपटॉपवर काही तरी करत होता.तिने ते पाहिले आणि त्याला म्हणाली.


अभीज्ञा,“ झोपायचं नाही का आज तुला?ठेव तो लॅपटॉप!” ती  रागाने म्हणाली.


अगम्य,“ अग झालं! थोडच राहील आहे.तो लेख पाठवायचा आहे ना त्या वर्तमानपत्राला उद्या पर्यंत!इतकी चिडत का आहेस पण?थांब ठेवतो!” तो लॅपटॉप ठेवत म्हणाला.


अभीज्ञा,“ तुला जसं काही माहीतच नाही! सगळ्यांच्या समजावण्यामुळे मी तयार झाले अगम्य तुला पेंटींगमध्ये पाठवायला पण मला खूप भीती वाटतेय.” ती बेडवर बसून रडत म्हणाली.


अगम्य,“ झालं पुन्हा तुझं रडणं सुरू? अग काही नाही होणार! माझ्यावर तर विश्वास ठेव!” तो वैतागत म्हणाला.


अभीज्ञा,“ तुझ्यावर आहे पण त्या सुर्यकांतचा आत्मा काय करेल तुझ्या बरोबर याची मला भीती वाटते!” ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.


अगम्य,“ अग नाही होणार काही गेल्या वेळी त्याने इतके प्रयत्न केले पण काहीच करू शकला नाही! मग या वेळी मी पूर्ण तयारीने जाणार आहे ना!” तो तिला समजावत म्हणाला.


अभीज्ञा,“ हुंम्म” ती इतकच म्हणाली.


अगम्य,“बरं मी राहुलशी बोललो आहे आणि त्याला समजावून सांगितले आहे.त्याने ऐकले आहे माझे!त्यामुळे मीरा आणि त्याचा प्रश्न सुटला!” तो आनंदाने म्हणाला.


अभीज्ञा,“ बरं झालं! ते एक!” ती म्हणाली.


अगम्य,“ मग असं तोंड पाडून बसणार का आता आणि आज काय मिळणार की नाही! उधारी बाकी आहे म्हणलं अजून!” तो तिला जवळ ओढत म्हणाला.


अभीज्ञा,“ झालं तुझं सुरू परत! तुला कोणत्याच गोष्टीचे टेन्शन येत नाही ना?” ती चिडून म्हणाली.


अगम्य,“ ठीक आहे तू टेन्शन घेऊन बस मी झोपतो!” तो चिडून म्हणाला आणि तोंड फिरवून झोपला.


अभीज्ञा,“ ऐक ना अमू!इकडे बघ तर!” ती त्याच्या जवळ जात म्हणाली.


अगम्य,“ ऐकतो आहे बोल आणि मी कानाने ऐकतो डोळ्यांनी नाही!” तो तसाच झोपून म्हणाला.


अभीज्ञा,“ अच्छा! हे तर मला माहितीच नव्हते की!” ती हसून त्याला स्वतःकडे वळवत म्हणाली.


अगम्य,“ काय आहे आता? बोल!” तो तिच्याकडे पाहत वैतागून म्हणाला.


अभीज्ञा,“ तसं महत्वाचं काही नाही पण..!” असं म्हणून तिने त्याच्या ओठावर ओठ ठेवले.


           या अभीज्ञाच्या कृती मुळे अगम्य मात्र बर्फासारखा वितळला आणि अभीज्ञाला त्याने मिठीत घेतले. पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाचा खेळ रंगला होता.

क्रमशः


अगम्य पेंटींगमध्ये गेल्यावर सुर्यकांत त्याला जिवंत सोडेल का? अगम्य त्या पेंटींगची प्रतिकृती बाहेर घेऊन येण्यात यशस्वी होईल का?त्या पेंटींगमध्ये अडकलेल्या बाकी लोकांचे काय होणार होते?



या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule




















🎭 Series Post

View all