दिवस उजाडला प्रत्येक जण आपापले काम करत होता पण आज अहिल्याबाई कोणते भयंकर सत्य सांगणार होत्या अजून कोणता धक्का देणार होत्या.याचाच विचार प्रत्येक जण करत होता.चहा नाष्टा झाला आणि सगळे पुन्हा हॉलमध्ये जमले.राहुल ही मीराला घेऊन हजर होता.अभीज्ञाच्या बाबांनी अहिल्याबाईना विचारले.
बाबा,“ ताई! सूर्यकांत पटलाचे सत्य समोर आले होते. त्याने आप्पासाहेबां पेक्षा चित्रकलेत जास्त नाव आणि यश मिळवण्यासाठी आठ निष्पाप मुलांचा बळी घेतला होता. याच्या पेक्षा अजून भयंकर काय असणार आहे अजून?”
अहिल्याबाई,“ इथे कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही भाऊ प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते.अगदी कर्माची ही जितकं भयंकर कर्म त्या ही पेक्षा भयंकर किंमत मोजावी लागते.तशीच ती किंमत सूर्यकांत भाऊंना ही मोजावी लागणार होती.”त्या गंभीरपणे म्हणाल्या.
अगम्य,“ म्हणजे?” तो न राहवून म्हणाला.
अहिल्याबाई,“ सांगते! सूर्यकांत भाऊंच्या विरुद्ध कोर्टात खटका उभा राहिला.कोर्टाने त्यांना वकील हवा का?हवा असेल तर तो देण्याची तयारी दर्शवली पण सूर्यकांत भाऊंनी वकील नाकारला.या सगळ्यात सहा महिने गेले. सूर्यकांत भाऊ तुरुंगातच होते. एक दिवस तुरुंगातून रावसाहेबांना फोन आला आणि ते तातडीने गेले. सूर्यकांत भाऊंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो ही खूप विचित्र पद्धतीने! त्यांनी त्यांना पेंटिंग करायची आहे म्हणून पेंटींगच्या साहित्याची मागणी केली होती.त्यांच्या मागणी प्रमाणे त्यांना ते पुरवण्यात आले पण सूर्यकांत भाऊंनी त्याच्या कोठडीत पेंटिंग करत असताना स्वतःची नस ब्लेडने कापून स्वतःचे रक्त त्या रंगात मिसळून ही पेंटिंग तयार केली. ही गोष्ट खूप उशिरा तुरुंग प्रशासनाच्या लक्षात आली होती. त्यामुळे रक्तस्त्राव खूप झाला होता आणि त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची अवस्था खूपच बिकट होती आणि ते सारखं रावसाहेबांना भेटायचे असे म्हणत होते म्हणून पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले.रावसाहेब भेटायला गेले तेंव्हा सूर्यकांत भाऊ अत्यवस्थ होते.रावसाहेब त्यांच्यावर आणखीनच चिडले आणि त्यांच्या बेड जवळ बसत ते म्हणाले.
अप्पासाहेब-“ काय आहे हे सुर्या? तू का केलंस असं मूर्ख आहेस का तू?दुसऱ्याच्या रक्ताने पेंटींग केलीस ते केलीस पण आज स्वतःच्याच रक्ताने पेंटींग तयार केलीस अरे कसली इतकी रक्ताची तहान लागली आहे रे तुला?”
सूर्यकांत-“ हो मला रक्ताची तहान लागली आहे आणि ती इतक्यात शमणार नाही.समजलं तुला! तुला मी त्या दिवशी सांगितले ते तर फक्त अर्ध सत्य होते पूर्ण सत्य तर अजून खूप भयंकर आहे!तुला तेच सांगायला मी आज बोलावले आहे.माझ्याकडे वेळ खूप कमी आहे तर ऐक नीट मी काय सांगतो आहे ते! त्या अघोरी बाबांनी मला उपाय सांगितला होता तुझ्या पेक्षा जास्त यश मिळवण्याचा पण त्यासाठी मला खूप भयंकर किंमत ही मोजावी लागणार होती.जी मी आज मोजत आहे!” ते अगदी क्षीण आवाजात बोलत होते.
अप्पासाहेब-“ कसली किंमत?”त्यांनी विचारले.
सूर्यकांत,“ मी मुले मारून त्यांच्या रक्ताने पेंटिंग तयार केल्या तर मला यश नक्की मिळणार पण त्याची किंमत मला माझ्या रक्ताने चुकवावी लागणार. मी माझी वेळ आल्यावर नैसर्गिक मरणाने मेलो किंवा मला जर कोणी मारले तर त्या सगळ्या मुलांचे आत्मे माझ्या आत्म्याला अनंत काळा पर्यंत यातना देत राहणार म्हणून मला जर यातून वाचायचे असेल तर मला माझ्याच रक्ताने पेंटिंग काढून स्वतःचा जीव घ्यावा लागणार आणि त्याच पेंटींगमध्ये लपावे लागणार!” ते हळूहळू सांगत होते.
अप्पासाहेब-“ काय मिळाले रे तुला हे सगळे करून सांग मला?”ते हळहळत म्हणाले.
सूर्यकांत-“ खूप काही मिळाले असते पण तू ते मला मिळवू दिले नाहीस!जगात सगळ्यात जास्त मी कोणाचा तिरस्कार करत असेन तर तो तू आहेस आप्पा! ही पेंटींग तयार करण्याचं अजून एक कारण होत.मला तुझा सूड घ्यायचा आहे.ती पेंटींग नुसती पेंटींग नाही तर ते एक लूप होल आहे.ज्यात मी तुला लवकरच घेऊन जाणार आहे आणि तुझा ही जीव घेणार आहे आणि बघशीलच तू तुझ्या वंश ही मी पुढे चालू देणार नाही आप्पा तुला जर मुलगा झाला तर तो ही माझ्या हातून मरणार त्याच लूप होलमध्ये अडकून! म्हणून तुला मुलगी व्हावी अशी प्रार्थनाकर देवाकडे आज पासून कारण माझे लूप होल मुलींना आणि स्त्रियांना ओढून घेण्यात असमर्थ आहे! पण मुलगा झाला तुला तर तो ही मरणार आप्पा आणि तुझे ही खूप दिवस नाही राहिलेत दिवस मोजणे सुरू कर! ” असं म्हणून त्याने जीव सोडला
त्यानंतर मात्र आप्पासाहेब खूप काळजीत दिसत. मी गरोदर असल्याने त्यांनी मला यातलं काही सांगितलं नव्हतं पण ही दळभद्री पेंटींग मात्र आमच्या घरात मनानेच पोहोचली होती!रावसाहेब कितीदा तरी ती पेंटिंग लांब सोडून आले पण ती त्यांच्या घरी पोहचण्याच्या आतच घरात हजर असे! आणि सूर्यकांत भाऊ जाऊन एक महिना व्हायसच्या आताच रावसाहेब एक दिवस गायब झाले.मला सातवा महिना सुरू होता.मी ते कुठे गेले याचा खूप शोध घेत होते पण ते कुठेच सापडत नव्हते! एक दिवस रात्री ते अचानक घरात आले.ते खूप जास्त जखमी होते.असं वाटत होतं की त्यांच्यावर कोणी तरी हल्ला केला असावा.मी घाबरून डॉक्टरला फोन करणार तर त्यांनी मला अडवले आणि म्हणाले.
आप्पासाहेब,“ अहिल्या माझ्याकडे खूप वेळ नाही आणि डॉक्टरला बोलून ही काही फायदा नाही.मी सांगतो ते नीट ऐक तो सुर्या या पेंटींगमध्ये लपून बसला आहे ही पेंटींग नसून एक लूप होल आहे.तो त्यात रक्ताच्या वासावरून लोकांना अमावस्येच्या रात्री ओढून घेतो.तसेच त्याने मला ही घेतले.त्याने ही पेंटिंग आपल्यावर सूड उगवण्यासाठी तयार केली आहे. तो आपल्या मुलाला ही सोडणार नाही.तू देवा जवळ प्रार्थना कर की आपल्याला मुलगीच व्हावी तरच तू सुखी राहशील कारण ही पेंटींग स्त्रियांना ओढून नाही घेऊ शकत आणि जर आपल्याला मुलगा झाला तर त्याला तुला स्वतः पासून म्हणजेच या पेंटींग पासून खूप लांब ठेवावे लागेल. बाकी तू समजदार आहेसच!” असं म्हणून त्यांनी जीव सोडला.
आज ही तो प्रसंग आठवला तर आज ही माझ्या जीवाचा थरकाप उडतो. त्या पेंटींगला घाबरून मी राहिलेले तीन महिने औरंगाबाद मध्ये येऊन राहिले.मी मुलगी व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. पण अगम्यचा जन्म झाला.नियतीला माझ्या मातृत्वावर ही घाला घालायचा होता.मी चार दिवसाच्या अगम्यला जाधवां करवी काळजावर दगड ठेऊन आश्रमात सोडले.पण माझ्या मधली आई मला स्वस्थ बसू देत नव्हती.”त्या पदराने डोळे पुसत म्हणाल्या.
अगम्य,“ म्हणजे माझ्या बाबांचा ही बळी याच पेंटींग मधील या सूर्यकांत पाटलाने घेतला तर आणि आता त्याला माझा जीव घ्यायचा आहे. शेवटी तुम्ही इतके प्रयत्न करून ही त्या पेंटींगने माला गाठलेच तर!”अगम्य अहिल्याबाईकडे पाहत म्हणला.
अहिल्याबाई,“हो!पोरा या पेंटींगला मी रावसाहेब गेल्या नंतर एका कपाटात बंद करून ठेवले होते पण ही पेंटींग मनानेच गायब व्हायची आणि परत त्या जागेवर यायची! शेवटी या पेंटींगने तुला शोधून गाठलेच!”त्या म्हणाल्या
अगम्य,“पण मग या पेंटींग मध्ये अजून पंधरा वीस माणसे आहेत त्यांचा ही या पेंटींगशी संबंध आहे की…”तो पुढे बोलणार तर अहिल्याबाई त्याला थांबवत पुढे म्हणाल्या.
अहिल्याबाई,“ हो अगम्य त्या पेंटींगशी त्या लोकांचा संबंध आहे.ही ती लोक आणि त्याचे वंशज आहेत ज्यांनी सूर्यकांत भाऊंच्या केसचे काम पाहिले. त्यांना या नीच माणसाने छळून सूड उगवण्यासाठी कैद करून ठेवले आहे.” त्या जरा रागानेच म्हणाल्या.
अभीज्ञा,“ पण आऊ तुम्हीं या पेंटिंगला नष्ट करण्याचा उपाय नाही का शोधण्याचा प्रयत्न केला इतक्या वर्षात?” तिने विचारले.
अहिल्याबाई,“ हो पोरी मघाशी म्हणाल्या प्रमाणे माझ्यातली आई मला गप्प बसू देत नव्हती.मला माझ्या मुलाला परत मिळवायचे होते म्हणून मी नाशिकला गेले.जिथून या भयंकर प्रकारची सुरवात झाली होती.मला खात्री होती की ज्या अघोरी बाबाने सूर्यकांत पाटलाला यश मिळवण्याचा असला अघोरी उपाय सांगितला तेच अघोरी बाबा मला या पेंटींगला कसे नष्ट करता येईल त्याचा उपाय ही सांगतील.अगम्यला आश्रमात सोडून मी घरी न जाता तडक नाशिक गाठले. तिथे खूप शोध घेतल्यावर मला ते बाबा सापडले. मी जाऊन त्याचे पाय धरले व त्यांना सूर्यकांत भाऊंचा सविस्तर वृत्तांत सांगितला.हे ऐकीन ते सूर्यकांत भाऊंवर खूप क्रुद्ध झाले.त्याचे म्हणणे असे होते की त्यांनी सूर्यकांत भाऊंना फक्त यश मिळवण्याचा उपाय सांगितला होता.त्यांनी त्याचे भोगावे लागणाऱ्या परिणामां पासून ही सावध केले होते सूर्यकांत भाऊंना आणि जर तुला यशाच हवं तर तू हा उपाय एका मर्यादे पलीकडे करू शकणार नाही हे ही सांगितले होते.पण सूर्यकांत भाऊंनी याचा गैरफायदा घेतला आणि आता स्वतःच्या सूड घेण्यासाठी ते त्याचा वापर करत आहेत हे कळल्यावर अघोरी बाबानी मला सांगितले की मी अगम्यला माझ्या पासून दूर केल्यामुळे त्याला तसा काही धोका आता नसला तरी सूर्यकांत गप्प बसणार नाही आणि तो अगम्यला शोधेल कदाचित तसं होणार ही नाही कारण त्या पेंटींग आणि सूर्यकांत भाऊंच्या काही मर्यादा आहेत पण जर सूर्यकांत भाऊंनी अगम्यला शोधलेच तर त्यावरचा उपाय ही त्यांनी मला दोन दिवस ध्यान लावून सांगितला पण….” असं म्हणून त्या घाबरून बोलायच्या थांबल्या.
अगम्य,“ पण काय मिसेस देशमुख!” अगम्यने न राहवून विचारले.
स्वतः साठी अगम्यकडून मिसेस देशमुख असं संबोधन ऐकून त्या समाधानाने हसल्या कारण ती बाई! ही बाई! इथून सुरू झालेला प्रवास आज मिसेस देशमुख पर्यंत पोहचला होता आणि एक ना एक दिवस तो आऊ पर्यंत पोहोचेल अशी त्यांना खात्री होती.
अहिल्याबाईंना असा कोणता उपाय अघोरी बाबांनी सांगितला होता जो सांगायला त्यांना भीती वाटत होती? सूर्यकांत आता त्या पेंटींग मधून अजून काय काय करणार होता आणि तो अगम्यला मारू शकेल का?राहुल आणि मीराच्या नात्याचं काय होणार होते?मीराला राहुलच्या माध्यमातून अगम्य आणि अभीज्ञाच्या आयुष्य येण्या मागे नियतीचा काय हेतू असावा?अगम्य ती पेंटींग नष्ट करू शकेल का?
क्रमशः
या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.
©swamini chougule
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा