दि लूप होल (भाग २७)

This is a thriller and suspense story

     रात्री सगळे जेवले. दुपारी जेवताना असणारा तणाव आणि अवघडले पणा  पूर्ण नसला तरी थोडा कमी झाला होता. अगम्य मात्र जेवल्यावर एक मिनिट ही तिथे थांबला नाही.. जाधवांनी अहिल्याबाई आणि त्यांचे समान हॉटेलमधून मागवून घेतले होते.


     तसे घरातील वातावरण तंगच होते. सगळे जाऊन झोपले.अभिज्ञाला सगळं आवरून आणि अहिल्याबाई व जाधवांची राहण्याची व्यवस्था लावून झोपायला जायला बराच उशीर झाला होता. पण  अगम्य तिची वाट पाहून झोपला होता. अभिज्ञाच्या चाहुलीने तो जागा झाला आणि तिला म्हणाला.


अगम्य,“ खूप उशीर झाला तुला आज अभी!” 


अभिज्ञा,“ हो रे! आज काम जरा जास्त होत ना त्या दोघांची राहायची व्यवस्था पण लावायची होती ना! आज जरा जास्तच मानसिक ताण पडला आहे आपल्या सगळ्यावर आणि खास करून तुझ्यावर आणि मिसेस देशमुखवर!” ती सहजच म्हणाली.


अगम्य,“ त्या मिसेस देशमुख आणि तू कोण ग अभी?” तो हसून म्हणाला.


अभिज्ञा,“ अच्छा! अरे वा! म्हणजे आज तोंड नाही फुगलेले वाटतं देशमुख साहेबांचे! मला वाटलं होतं  लाख मिनतवाऱ्या कराव्या लागणार आज! जे सकाळ पासून घडलं त्यामुळे साहेब भलतेच अपसेट असणार! पण बरं झालं माझं काम वाचलं म्हणायचे!” ती अगम्यचा मूड पाहून त्याची   फिरकी घेत म्हणाली.


अगम्य,“ बरं म्हणजे तुला मला मन्वयला खूप मेहनत करावी लागते तर आणि मूडच म्हणशील तर आहे मी अपसेट पण त्या बाईला मिसेस देशमुख म्हणालीस तू  मिसेस देशमुख असताना म्हणून गम्मत वाटली!”तो गंभीर होत म्हणाला.


अभिज्ञा,“ काय रे सारख ती बाई ती बाई लावलं आहेस! तुझ्या आई आहेत त्या अगम्य!” ती समजावत म्हणाली.


अगम्य,“ अच्छा! एका दिवसात त्या बाईने भुरळ पाडली का तुला? ती माझी बायोलॉजीकल आई असेल ही! पण तिने माझ्या बरोबर जे केले आहे ना अभी ते मी नाही विसरू शकत! मी वयाची तीस वर्षे म्हणजेच माझे अर्धे आयुष्य अनाथ म्हणून काढले आहे.ते ही माझी  आई जिवंत असताना जी अचानक आज प्रगट झाली आहे!तुला नाही कळणार अभी अनाथ म्हणून जगण्याचे दुःख! या जगात आपलं कोणीच नाही ही भावना खूप जेवघेनी असते!” तो राग आणि दुःख या संमिश्र भावनेने बोलत होता.त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.


           अभिज्ञा त्याच्या जवळ गेली आणि त्याचे अश्रू तिने पुसले आणि त्याला बिलगून बोलू लागली.


अभिज्ञा,“तसं नाही अमू पण त्यांनी ही खूप सोसलं आहे रे आयुष्य भर एका विधवा बाईने स्वतःचा एकुलता एक मुलगा जिवंत असताना तो मेला अस जाहीर करून त्या मुला पासून लांब राहणं सोपं नसत रे!” ती त्याला समजावत म्हणाली.


अगम्य,“ हे बघ सध्या मला नाही बोलायचे या विषयावर! आधीच विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझं!तुझ्याकडून मला एक प्रॉमिस हवं आहे अभी!” तो गंभीर होत म्हणाला.


अभिज्ञा,“ कसलं प्रॉमिस!” तिने विचारले.


अगम्य,“ मला असं वाटतंय की काही तरी खूप भयंकर घडणार आहे त्या पेंटिंगमुळे! जर माझं काही बरं वाईट झालं तर तू  आज्ञांक आणि आई-बाबा आणि आली तर त्या बाईला ही बरोबर घेऊन कुठे तरी लांब निघून जा!” तो गंभीरपणे म्हणाला.


अभिज्ञा,“ खबरदार! परत असं काही बोललास तर तुला खूप बदडेन हा मी! काही ही होणार नाही  तुला समजलं का? उगीच काही तरी अभद्र बोलू नकोस!” ती रागाने रडकुंडीला येत त्याला म्हणाली आणि आणखीनच त्याला बिलगून रडू लागली.


अगम्य,“ अभी रडतेस काय? मला वाटलं ते मी बोललो बरं मी  खूप स्ट्रेस मध्ये आहे अभी म्हणून बोललो असेन sorry!”तो तिला समजावत म्हणाला. 


अभिज्ञा,“ कशाला इतका स्ट्रेस घ्यायचा पण! होईल सगळं नीट आणि मी आहे तुझ्या बरोबर कायम समजलं! आणि तुझा स्ट्रेस घालवायचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे!” असं म्हणून ती अजूनच त्याच्या जवळ गेली.


अगम्य,“ तू नसतीस तर माझं काय झालं असत ग! You know me very well! And now I really need you!” असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतले.


अभिज्ञा,“ अच्छा! अजून काय?” असं म्हणून तिने त्याच्या ओठावर ओठ ठेवले.


            अगम्य आज काय झालं ते तातत्पुरत का  होईना विसरून अभिज्ञामध्ये गुंतत राहिला अगदी रात्र भर!अभिज्ञा फक्त त्याला साथ देत राहिली.अभिज्ञा उठली तेंव्हा सकाळचे आठ वाजले होते. घड्याळ पाहून तिने गडबडीने उठण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तिच्या लक्षात आलं की ती अगम्यच्या मिठीत आहे.अगम्य गाढ झोपला होता. तिने त्याच्याकडे एकदा पाहिले आणि अलगद त्याचा हात बाजूला करत ती उठून बसली. आज पुन्हा मला याच्यामुळे उठायला उशीर झाला. मी तर कुठं शहाणी आहे याचा बरोबर वाहवत जाते.म्हणा आहेच हा असा वाहवत जाण्यासारखा!  हा सगळा विचार करून त्याला पाहत. ती त्याचाच विचारांच्या तंद्रीत बाथरूममध्ये गेली.अंघोळ करून तयार होऊन तिने किचन गाठले. तर किचन मध्ये तिची आई आणि अहिल्याबाई काही तरी बोलत असताना तिला दिसल्या. ती घाईतच साडीचा पदर खोचत त्या दोघींना म्हणाली.


अभिज्ञा,“ आज मला उठायला उशीर झाला! तुम्ही दोघी  बसा मी नाष्ट्याचे पाहते!”


आई,“ अग नाष्टा तयार आहे तू फक्त अमूला चहा नेऊन दे आणि त्याला तयार होऊन नाष्टा करायला बोलावं!” त्या म्हणाल्या.


       इतकावेळ अभिज्ञाला निहाळत असलेल्या अहिल्याबाई तिच्या मानेवर रात्री कधी तरी अगम्यने दिलेले प्रेमाचे लेणे पाहत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ काही गुण रक्तातच असतात. अगम्य नुसता त्याच्या बाबांसारखा दिसतोच असं नाही तर बोलणं-चलन आणि स्वभाव ही  बहुतेक तसाच आहे त्याचा! खूप अपसेट असल्यावर याला ही बायको लागते वाटतं जवळ कदाचित रात्र भर तो ही आणि तू ही झोपलेले दिसत नाही!” त्या हसून म्हणाल्या.त्याचे हे बोलणे ऐकून अभिज्ञाचे मात्र गाल लाजून आरक्त झाले आणि तिने लाजून मान खाली घातली. 


       तिला असं पाहून तिची आई आणि अहिल्याबाई हसल्या आणि अभिज्ञाची आई चहा गरम करून कपात ओतत तिला म्हणाल्या.


आई,“ जा अभी अमुला चहा नेऊन दे आणि उठाव त्या शिवाय तो उठणार नाही!” 


अभिज्ञा,“ तूच नेऊन दे त्याला चहा! मी तो पर्यंत इथलं बघते!” ती म्हणाली.


आई,“काय ग!रोज तूच घेऊन जातेस ना चहा त्याच्यासाठी? परत भांडलीस का त्याला तू?” त्यांनी तिला दटावत विचारले.


अभिज्ञा,“ आन बाई नेते मीच चहा! तुझ्यात माझी सासू संचारायच्या आधी!” असं म्हणून ती तोंड वाकड करून चहा घेऊन गेली 


       आणि हे ऐकून अभिज्ञाची आई आणि अहिल्याबाई हसू लागल्या.अहिल्याबाई जरा भावनिक होत बोलू लागल्या.


अहिल्याबाई,“खरं तर मला अगम्यची खूप काळजी वाटत होती.त्याला अनाथ नसला तरी अनाथ  म्हणून त्याला बायको कशी मिळेल त्याला समजून घेणारी मानस मिळतील का?पण मी जेंव्हा अगम्य अभिज्ञाशी लग्न करणार होता तेंव्हा  तुमची माहिती काढली आणि माझा जीव भांड्यात पडला! आणि आता तुम्ही सगळे त्याची इतकी काळजी घेताय हे पाहून मी निश्चिंत झाले.” त्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या.


आई,“ खरं तर हे प्रेम,आदर  त्याने स्वतः कमावला आहे.आता त्याच्या सुख-दुःखा भोवती आमचं सुख-दु:ख फिरत. तो खुश तर सगळं घर खुश असतं! माझ्या सारख्या  निपुत्रिक बाईला त्याने पुत्र सुख दिले!” त्या भावनिक होत म्हणाल्या.


अहिल्याबाई,“ असं का म्हणता? अगम्य तुम्हाला आई म्हणतो ना आणि अभिज्ञा सारखी सुंदर आणि सालस मुलगी आहे की तुमची! माझ्या सारख पुत्रवती असून ही निपुत्रिक आयुष्य तुमच्या वाट्याला नाही आले भाग्यवान आहात तुम्ही!  हो अगम्यने सगळं स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलं हे 3bhk घर आमच्या चौपदरी सोळा खोल्याच्या वड्या पेक्षा ही मौल्यवान आहे माझ्यासाठी! त्याने स्वकर्तुत्वाने नुसती नोकरी, पैसे नाही तर नाती ही कमावली याचा त्याची आई म्हणून मला रास्त अभिमान आहे!” त्या अभिमानाने बोलत होत्या.


        इकडे अभिज्ञा अगम्यला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेली तर तो अजून झोपला होता. ती त्याच्या जवळ गेली आणि चहा टेबलवर ठेऊन म्हणाली.


अभिज्ञा,“ उठ अगम्य नऊ वाजून गेले आहेत किती वेळ झोपणार अजून?” ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.


अगम्य,“हुंम उठलो.”तो डोळे चोळत तिला म्हणाला आणि उठून बसला.


अभिज्ञा,“हा घे चहा! आणि आवर लवकर!” ती चहा त्याच्या हातात देत म्हणाली.


अगम्य,“आज काय नुसत्या चाहवरच भागवायच का गरिबाने” तो तिला एका हाताने जवळ ओढत म्हणाला.


अभिज्ञा,“ बास आ आता! तुझा चावटपणा वाढत चालला आहे! उठ आणि तयार हो बाहेर सगळे नाष्ट्यासाठी तुझी वाट पाहत आहेत.”ती त्याला  दटावत म्हणाली.


           अगम्यने चहा घेत होता पण जाणारी अभिज्ञा काही तरी आठवून थांबली आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसत म्हणाली.


अभिज्ञा,“ I love you! अमू” असं त्याच्या कानात हळूच म्हणून तिने त्याच्या ओठावर ओठ ठेवले.


       थोड्यावेळाने अगम्य तिला तिचे  चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत हसून म्हणाला.


अगम्य,“काय हवं तुला माझ्याकडून अभी? इतकं प्रेम उतू चाललं आहे ते! आत्ता तर मला दटावत होतीस मी चावटपणा करतो म्हणून आणि आता तू काय करत आहेस? मला माहिती तुला नक्किच काही तरी हवं आहे म्हणून तू मला मस्का मारत आहे.बोल! बोल!लवकर मला आवरायचं आहे!”


अभिज्ञा,“ अमू मी असा विचार करत होते की मी मिसेस देशमुखना आई म्हणू का? नाही म्हणजे तुझी परवानगी असेल तर!” तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत विचारले.


अगम्य,“काय? काल तर आली आहे ती बाई आपल्या घरी आणि आज तू तिला आई म्हणू का म्हणून मला विचारत आहेस? तुमच्या बायकांचं ना काहीच कळत नाही!म्हणजे एखाद्याला तुम्ही जन्मभर आपलं म्हणणार नाही आणि एखाद्याला पाच मिनिटात आपलं समजता!” तो तिच्याकडे पाहत म्हणाला.


अभिज्ञा,“ तू हो किंवा नाही ते सांग उगीच लेक्चर नको मला!” ती जरा वैतागून म्हणाली.


अगम्य,“ठीक आहे तुला काय म्हणायचे ते म्हण पण मला या सगळ्यात ओढू नकोस! म्हणून मला इतकी लाडिगोदी लावणं चालू होतं तर! तुला ना आत्ता सोडल नसत असच आयती संधी चालून आली होती पण माझ्याकडे वेळ नाही पण संधी तुझ्यावर उधार आहे.वसुली करणार मी नंतर!” असं म्हणून त्याने अभिज्ञा एकदा घट्ट मिठी मारली आणि सोडले.


अभिज्ञा,“ अच्छा पाहू ते उधारीच नंतर जा आता तयार हो सगळे ताटकळले असतील तुझ्यासाठी!” असं म्हणून ती हसत निघून गेली.


              थोड्यावेळाने अगम्य आवरून बाहेर आला सगळ्यांनी नाष्टा केला आणि सगळे हॉलमध्ये जमा झाले. अहिल्याबाई काही बोलणार तर अगम्य त्यांना थांबवत म्हणाला.


अगम्य,“जरा थांबा अजून कोणी तरी येणार आहे मग सांगायला सुरुवात करा!”


बाबा,“ कोण येणार आहे अगम्य अजून?”त्यांनी आश्चर्याने विचारले.


अभिज्ञा,“ अहो बाबा राहूल आणि मीरा येणार आहेत.राहुलला तशी अगम्यने काल फोनवर थोडक्यात कल्पना दिली आहे!” तिने सांगितले.


अगम्य,“ हो बाबा ज्या मित्राने माझ्या आत्ता पर्यंतच्या आयुष्यात मला भावा सारखी साथ दिली! त्याने मी आजारी असताना I. C. U. च्या बाहेर रात्रीच्या रात्री माझ्या काळजीने जागून काढल्या! मी नसताना तुम्हा सगळ्यांची साथ दिली काळजी घेतली. त्याला माझ्या आयुष्यातील इतके मोठे सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे.म्हणूनच मी त्याला आणि मीराला ही बोलावले आहे.” तो ठामपणे म्हणाला.


       तो पर्यंत दाराची बेल वाजली आणि अभिज्ञाने दार उघडले.समोर राहुल आणि मीरा उभे होते. दोघांच्या ही चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होते. तसं अगम्यने राहुलला कालची थोडक्यात माहिती दिली होती.  अर्थातच मीराला मात्र काहीच माहीत नव्हते.तिला अचानक का बोलावले आहे आपल्याला? हा प्रश्न पडला होता आणि राहुलला मात्र अगम्यकडून सगळं ऐकून धक्का बसला होता.दोघे आत आले आणि सगळ्यांन बरोबर हॉल मध्ये येऊन बसले.अगम्यने  राहूल आणि मीराची ओळख करून दिली आणि अहिल्याबाईची ही राहुल आणि मीराला मिसेस देशमुख अशीच ओळख करून दिली.

            अहिल्याबाई मात्र अचानक काही तरी आठवून म्हणाल्या


अहिल्याबाई,“अरे देवा मी जाधवांची तुम्हा सगळ्यांना ओळख करून द्यायची विसरलेच की काल! हे कृष्णांत जाधव आपले जुने विश्वस्त आणि अगम्यच्या बाबांचे मित्र!आज पर्यंत इतका मोठा डोलारा मी यांच्या आणि जोशी आणि नंतर त्याच्या मुलाच्या मदतीनेच सांभाळून शकले!” त्या म्हणाल्या.जाधवांनी  हसून फक्त सगळ्यांना नमस्कार केला.


अभिज्ञा,“ बरं आई ती पेंटींग आपल्याच मागे का लागली आहे हो!” अभिज्ञाने अहिल्याबाईकडे पाहून विचारले आणि अहिल्याबाईंनी चमकून अभिज्ञाकडे पाहिले.पुन्हा त्यांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले.अभिज्ञाने त्यांना डोळ्यांनीच आश्वस्त केले.अगम्य मात्र दोघींमधली नेत्र पल्लवी पाहत होता पण  त्याने दुर्लक्ष केल्याचा आव आणला.


अहिल्याबाई,“ आपल्यात आईला आऊ म्हणतात अभिज्ञा!(त्या डोळे पुसत म्हणाल्या) या दळभद्री पेंटींगचा आणि आपला तसा जवळचा संबंध आहे पोरी ही पेंटिंग आपल्या शत्रूने त्याचा सूड उगवण्यासाठीच बनवली आहे असं समज हवं तर!” त्या म्हणाल्या.


अगम्य,“ म्हणजे काय जरा स्पष्ट सांगाल का?” त्याने विचारले.


अहिल्याबाई,“ आप्पासाहेब देशमुख म्हणजे तुझे वडील एक उत्कृष्ठ चित्रकार होते अभिज्ञाचे बाबा म्हणाले तसं आज ही इतक्या वर्षांनंतर त्यांच्या पेंटींग करोडो रुपयाला विकल्या जातात आणि तीच त्यांची उत्कृष्ठ कला त्यांच्या आणि आपल्यासाठी कुठे तरी श्राप बनली!”त्या म्हणाल्या.


अगम्य,“म्हणजे काय म्हणायचे काय आहे तुम्हांला?” त्याने विचारले


अहिल्याबाई,“ माणसाच्या अंगी असलेले चांगले गुण ही त्याचे शत्रू निर्माण करत असतात. तसेच रावसाहेबांच्या बाबतीत झाले.” त्या म्हणाल्या.


राहुल,“आता रावसाहेब आणि कोण काकु?” राहुलने विचारले.


अहिल्याबाई,“ अरे  रावसाहेब म्हणजेच अगम्यचे बाबा! देशमुखांच्यात नवऱ्याला रावसाहेब म्हणून हाक मारण्याची पध्दत आहे!” त्या हसून म्हणाल्या.


         हे ऐकून अगम्य आणि अभिज्ञा एकमेकांकडे पाहून हसले आणि अभिज्ञाने अगम्यला डोळ्याने खुणावले पाहिलेस का म्हणून!  कारण कधी कधी अभिज्ञा त्याला देशमुख साहेब म्हणून हाक मारत असे!त्यांची ही नेत्र पल्लवी राहुलने पाहिली आणि तो अगम्यला म्हणाला.


राहुल,“ अम्या लका दोघात काय खिचडी शिजतीय रे?आँखों आँखों में!”त्याने हसून खोचकपणे विचारले.


अगम्य,“ काही नाही रे!” तो चोरी पकडली गेली या भावनेने  प्रश्न टाळत म्हणाला


राहूल,“ असं कसं काय नाय! आता तर सांगच ग अभी!”त्याने अभिज्ञाला विचारले.


अगम्य,“राहुल्या लाडात येऊ नको काय! गप्प बस जरा!” तो आता चिडून म्हणाला.


राहूल,“ लाडात मी आलो का तू रे!” तो म्हणाला. दोघांचं ही जुगलबंदी अजून रंगली असती पण अभिज्ञा मध्ये पडली.


अभिज्ञा,“ झालं का तुमचं सुरू! ये राहुल आमचं काय चाललं होत ते तुला नंतर सांगितलं तर चाललं ना! आऊ तुम्ही सुरू करा!” ती राहुलला नाटकीपणे बोलून अहिल्याबाईकडे पाहत म्हणाली.


      राहुलने नुसती होकारार्थी मान हलवली. तो आणि अगम्य न राहवून फिसकन हसले. ते पाहून घरात हशा पसरली. थोड्यावेळाने अहिल्याबाई बोलू लागल्या. 


अहिल्याबाई,“ रावसाहेब आणि सूर्यकांत पाटील दोघे कॉलेजपासून  जिगरी मित्र! दोघांना ही चित्रकलेचे वेड दोघांनी ही चित्रकलेचे धडे एकाच गुरूकडून एकत्र गिरवले.कॉलेजनंतर रावसाहेब शेती आणि बीजनेसकडे वळले तर सूर्यकांत भाऊना उच्चपदस्थ नोकरी मिळाली. दोघांची लग्न झाली. मी देशमुखांच्या घरी सून म्हणून आले.तर सुनिधी सूर्यकांत भाऊंची सहचारिणी  झाली.दोघे ही संसार काम यात गढून गेले तरी त्याची मैत्री आणि चित्रकला दोन्ही सुरूच होती. दोघे वेळ मिळेल तसे पेंटिंग बनवायचे आणि एकत्रच दोघांच्याही पेंटींगचे प्रदर्शन भरावयचे पण व्हयचं काय रावसाहेबांच्या पेंटींगचीला खूप मागणी असायची तर सूर्यकांत भाऊच्या पेंटींग त्या तुलनेत कमी विकल्या जायच्या! पण दोघांना ही तशी पेंटींग मधून मिळणाऱ्या  पैशाची गरज नव्हती.रावसाहेब तर पेंटिंग विकून मिळणारे पैसे अनाथ आश्रमात दान करत.चित्रकारिता त्यांचा व्यवसाय नव्हता तर छंद त्यांची सरस्वतीच्या चरणी आराधना होती. एक कला होती.रावसाहेबांनी सूर्यकांत भाऊंना कधीच प्रतिस्पर्धी मानले नाही पण सूर्यकांत भाऊ रावसाहेबांशी मनोमन स्पर्धा करू लागले. सुदृढ स्पर्धा असेल तर काहीच हरकत नाही पण त्या स्पर्धेची जागा सूर्यकांत भाऊंच्या मानत रावसाहेबांबद्दलच्या द्वेषाने आणि जळकुटेपणाने घेतली.  तरी आमच्या समोर सूर्यकांत भाऊंनी तसं काहीच दाखवलं नाही. त्यामुळे आम्ही दोघे ही या गोष्टी पासून अनभिज्ञ होतो.

                       आमच्या लग्नाला तीन वर्षे होत आली तरी मूल-बाळ नव्हतं तसं ते सूर्यकांत भाऊंना ही नव्हते. मग एक दिवस रावसाहेब आणि सूर्यकांत भाऊंनी ठरवले की नाशिकला देव दर्शनासाठी जाऊ.आम्ही सगळे नाशिकला गेलो म्हणजे मी, रावसाहेब, सूर्यकांत भाऊ आणि सुनिधी! देवदर्शन झाले मी देवाला संतान  प्राप्तीसाठी साकडे घातले.आम्ही मंदिरातून बाहेर निघालो तिथेच मंदिराच्या प्रांगणात एक अघोरी बाबा किती वेळ तरी आमच्या सगळ्यांकडे पाहत होते. ते आमच्या जवळ आले आणि सूर्यकांत भाऊंकडे पाहून बोलू लागला.

       “ तू तेरे दोस्त से जलता हैं क्योंकि इसकी कला तुझसे बेहतर हैं! ये आदमी कला का साधक हैं जो कला की साधना करता हैं!  ये दिल से चित्रकारिता करता हैं इसका साफ दिल उस में नजर आता हैं इसी लिए इसका चित्र लोगों को भाता हैं!इसे किसी को हराना नही हैं!लेकीन  तुझे तेरे इस दोस्त को हराना हैं!तू दिमाग से चित्रकारिता करता हैं! इसी लिए तो तू इसके आगे नहीं जा पा रहा तेरी कला में हो रूह ही नहीं हैं जो तेरे दोस्त की कला में हैं!”

                 हे सगळं ऐकून सूर्यकांत भाऊजी दचकले पण रावसाहेबांनी त्या अघोरी बाबाकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही सगळे हॉटेलवर गेलो.”त्या पुढे अजून सांगणार तर त्यांना मीराने थांबवले.

      खरं तर सूर्यकांत पाटील आणि सुनिधी हे नावं अहिल्याबाईंच्या तोंडून  ऐकल्या पासून मीरा अस्वस्थ होती.तिची वेगळीच चुळबूळ सुरू होती पण तिच्याकडे कोणाचेच लक्ष  नव्हते. ती उठून उभी राहिली आणि अहिल्याबाईंकडे पाहत रडत बोलू लागली.


मीरा,“ काकू तुमच्या सारखा साध्वीच्या तोंडून इतक्या आदराने त्या राक्षसाचे नाव घेणे शोभत नाही.तो माणूस सैतान होता.नीच होता.त्याला खरं तर खूप मोठी शिक्षा व्हायला हवी होती पण तो नीच त्याने जीव दिला तरी ही तो जिवंत आहे एका पेंटिंग मध्ये तुमच्या पिढ्यांचा घास घेण्यासाठी! तुमचा निर्वंश करण्यासाठी! तुमच्या वर सूड उगवण्यासाठी!आणि तरी तुम्ही त्याला भाऊ म्हणाला धन्य आहात तुम्हीं!”संताप राग आणि रडण्यामुळे ती थरथर कापत होती.तिला पुढे काहीच बोलता येत नव्हतं.


          पण सगळे मीराचा हा अवतार पाहून आवाक होऊन तिच्याकडे पाहत होते.अगम्यने डोळ्याने राहुलला खुणावले आणि राहुल ते पाहून भानावर आला आणि मीराला त्याने खुर्चीवर बसवले अभिज्ञाने पाण्याच्या ग्लास राहुलच्या हातात दिला.राहुलने तिला पाणी पाजले आणि तिला शांत केले.


 दोन मित्रांमध्ये असं काय घडलं असावं की सूर्यकांत पाटलाने आप्पासाहेबांचा सूड उगवण्यासाठी  स्वतःचा जीव दिला? तो सूड अप्पासाहेबांच्या दुसऱ्या पिढी पर्यंत म्हणजेच अगम्य पर्यंत पोहचला होता? मीरा कोण होती?तिला ही त्या पेंटींग बद्दल बरच काही माहीत असावे असे दिसत होते पण ती सूर्यकांत पटलाला तो राक्षस आहे असे का म्हणत होती तिचा त्यांच्याशी काय संबंध होता?आणि आप्पासाहेब हयात होते की ते गेले होते?अगम्यला शंका होती तसं त्या पेंटींगमुळे खरंच काही भयंकर घडणार होते का?

क्रमशः



या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहीण्यात आली आहे. या कथेचा उद्देश कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा व अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही.

©swamini chougule




         


    


        





 








               

           


    

🎭 Series Post

View all