दि लूप होल (भाग १४)

It is a treeling and suspense story

   डॉक्टरचे हे बोलणे ऐकून  “अगम्यला वाचवणे त्यांना अशक्य वाटत आहे” सगळेच  कोलमडले होते.राहूल तर रडायला लागला होता आणि अभिज्ञाचे बाबा मटकन खाली बसले होते.अभिज्ञाच्या आईचा ही धीर सुटला होता.गेली तीन वर्षे सगळ्यांनीच अगम्य कधी तरी माघारी येईल किंवा त्याला आपण शोधून काढू. या आशेवर काढली होती. आज तो आला होता पण अशा अवस्थेत की कोणालाच त्याची अवस्था पाहवत नव्हती आणि त्यातून त्याला कायमचे गमावण्याची भीती सगळ्यांना आता खात होती. कोणीच कोणाला धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हते.अभिज्ञा मात्र भानावर होती तिने डॉक्टरचे बोलणे ऐकले आणि ती डॉक्टरांना म्हणाली.


अभिज्ञा,“ डॉक्टर मला अगम्यशी बोलयचे आहे.मी जाऊ ना आत?” ती डोळ्यातले पाणी पुसत काही तरी मनाशी ठरवत म्हणली.


डॉक्टर,“ हो भेटा तुम्ही तुमचा आवाज ऐकून कदाचित मिस्टर देशमुख रिस्पॉन्स देतील मी आधीच म्हणालो होतो हे! आणि त्यांनी जर तुम्हाला रिस्पॉन्स दिला आणि एकदा जरी डोळे उघडले तर आपल्याला नक्कीच त्यांना वाचवण्यात यश मिळेल!” ते म्हणाले.


      अभिज्ञा मोठ्या धीराने I. C. U चे दार उघडून आत गेली. बऱ्याचशा मशिन्स लावलेला आणि नाका तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेला जीर्ण शरीर असलेला अगम्य बेडवर पडून होता. खरं तर अभिज्ञाला त्याला असं पाहवत नव्हतं त्याची अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. पण ती हिम्मत करून त्याच्या बेड जवळ असलेल्या खुर्चीवर बसली. त्याचा रुक्ष आणि हडकुळा हात तिने तिच्या दोन्ही हातात धरला आणि ती बोलू लागली.


अभिज्ञा,“ मला माहित आहे तू मला ऐकू शकतोस अगम्य! हे बघ तू असा हार मानून नाही जाऊ शकत समजलं! तुला या अवस्थेशी लढावं लागेल कारण आम्हा सर्वांना तुझी खूप गरज आहे. तुला जगायचं आहे माझ्यासाठी आपल्या अदूसाठी, आई-बाबासाठी आणि हो तुझ्या त्या राहुल्यासाठी सुद्धा जो तुझ्यासाठी बाहेर बसून रडतोय! प्लिज अगम्य असा नको वागूस किती परीक्षा घेणार आहेस तू माझी? तीन वर्षे मी तू कधी तरी परत येशील कुठे तरी सापडशील या एका आशेवर घालवली आहेत रे! पण तू जर मला असा कायमचा सोडून गेलास तर मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय आपल्या अदूला तुझी गरज आहे तुझ्या प्रेमाची मायेची त्याला खूप गरज आहे रे! त्याने आत्ता पर्यंत तुला फक्त फोटोत पाहिलं आहे त्याला त्याचा बाबा हवा आहे  तू ऐकतो आहेस ना!” ती रडत त्याला बोलत होती. पण अगम्य कडून काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. ती बसून राहिली तशीच बराच वेळ त्याचा हात हातात घेऊन.


              थोड्या वेळाने  अभिज्ञाला त्याच्या हाताची हालचाल जाणवली त्याची बोटे तिचा हात धरत होती. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले तर अगम्य तिला तिच्या अर्धवट उघड्या किलकिल्या डोळ्यांनी पाहत असलेला दिसला. तिने तिथेच बसून बेल वाजवली. बेल ऐकून नर्स आली तिला अभिज्ञाने डॉक्टरांना बोलवायला सांगितले  आणि अगम्यशी पुन्हा बोलू लागली.


अभिज्ञा,“ अमू ऐकतो आहेस ना माझं?”तिच्या प्रश्नावर अगम्यने तिच्या हातात असलेल्या बोटांची हालचाल करून हो असे सांगितले.“ हे बघ थोडा धीरकर तुला काही होणार नाही. आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय.I love you!तू लवकर बरा होशील!” तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.


       डॉक्टर तोपर्यंत आले. त्यांनी अभिज्ञाला बाहेर जायला सांगितले. ती बाहेर जाण्यासाठी अगम्यचा हात बेडवर ठेऊ लागली तसा अगम्यने त्याच्या हातात असलेल्या उरल्या-सुरल्या बळाने तिचा हात धरला. हे पाहून अभिज्ञा समाधानाने म्हणाली.


अभिज्ञा,“ मी इथेच आहे अमू कुठे ही जात नाही थोड्यावेळाने पुन्हा येईन तू फक्त आरामकर” असं म्हणून तिने तिचा हात  सोडवून घेतला आणि बाहेर गेली. बाहेर सगळे तिचीच वाट पाहत होते. राहुलने तिला पाहून अधीरतेने विचारले.


राहुल,“ कसा आहे अभिज्ञा तो?” त्याच्या आवाजात काळजी होती.


अभिज्ञा,“ not so good! पण माझा आवाज ऐकून त्याने रिस्पॉन्स करायला सुरुवात केली आहे. त्याने डोळे उघडून मला पाहिले आणि माझा हात ही धरला होता. हे पण कमी नाही! तो होईल हळूहळू ठीक डॉक्टर उपचार करत आहेत!” असं म्हणून तिने एक निःश्वास सोडला आणि एका खुर्चीवर बसली.


      थोडया वेळाने   डॉक्टरांना बाहेर आलेले पाहून पुन्हा सगळे डॉक्टरांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.ते पाहून डॉक्टर म्हणाले.


डॉक्टर,“ मला तुमच्या नजरेतील प्रश्न आणि काळजी दोन्ही कळते आहे.don't worry he is responding our treatment! पण त्यांची तब्बेत अजून ही नाजूक आहे त्यामुळे रिकव्हर व्हायला बराच वेळ लागेल. मिसेस देशमुख तुम्ही सतत त्यांच्या जवळ राहिलात तर  ते ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद देतील.” डॉक्टर म्हणाले.


राहुल,“ मी त्याला  भेटू शकतो का डॉक्टर?”


डॉक्टर,“ तुर्तास तरी नाही कारण ते खूप विक आहेत आणि जर त्याच्या संपर्कात जास्त लोक आले तर त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे म्हणून ही रिस्क आपण नाही घेऊ शकत” ते म्हणाले


राहुल,“ ठीक आहे. अम्या लवकर बार होऊ दे म्हणजे झाले.” तो काळजीने म्हणाला.


                पोलिस डॉक्टरांनी रिपोर्ट केल्यामुळे आता आले होते. अभिज्ञाकडे पोलिसांनी चौकशी केली. तिला कोणावर संशय आहे का? की अगम्यचे कोणी अपहरण करून त्याची अशी अवस्था करू शकेल  अभिज्ञाने नाही असे उत्तर दिले. अगम्यला भेटून त्याचा जबाब नोंदवण्याचा तर प्रश्नच नव्हता.कारण तो त्या अवस्थेत नव्हता म्हणून मग पोलीस डॉक्टरांना अगम्य बोलण्याच्या अवस्थेत आल्या नंतर आम्हाला बोलवा अशा सूचना करून निघून गेले.

●●●●


   आता अगम्यला परत येऊन आणि हॉस्पिटलमध्ये ही ऍडमिट होऊन एक महिना झाला होता.त्याच्यात आता बरीच सुधारणा दिसत होती. चेहऱ्यावरची गेलेली रया आता पुन्हा थोडी आली होती.हाडाचा सापळा झालेले शरीर आता पुन्हा जरा बाळसे धरू लागले होते.  तो अजून ही बराच अशक्त असला तरी आता थोडे थोडे बोलू लागला होता. या सगळ्यात अभिज्ञा मात्र रात्रंदिवस त्याच्या जवळ होती. अज्ञांक त्याच्या आजी-आजोबांबरोबर मस्त होता. अभिज्ञा अज्ञांकला दिवसातून तास भर भेटून पुन्हा हॉस्पिटलमध्ये येत असे. तिने ऑफिस मधून तीन महिन्यांची रजा घेतली होती.राहुल ही रोज अगम्यची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत होता पण अगम्य आणि त्याची भेट अजून ही होऊ शकली नव्हती. तो आगम्यला लांबून पाहून समाधान मानत होता.

             दोन दिवसात डॉक्टरांनी त्याला I. C U. मधून बाहेर काढू असे सांगितले होते.नेहमी सारखेच अभिज्ञा अगम्य जवळ बसली. अगम्य आता पूर्णपणे ग्लानीतून बाहेर आला होता.तो अभिज्ञाला पाहून तिच्या मदतीने बेडला टेकून बसत म्हणाला.


अगम्य,“ अभी मी किती दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे?” तो हळू आवाजात म्हणाला.


अभिज्ञा,“ ते तुला काय करायचे? तू अजून बरा झाला नाहीस! तू फक्त आरामकर  नसत्या चौकशा नको करूस!” ती जरा रागातच म्हणाली.


अगम्य,“ मला आई-बाबा,राहुल आणि हो आपल्या अदुला भेटायचे आहे.अदु किती वर्षाचा झाला ग आपला?अदु आता बोलत असेल ना ? तो बाबा म्हणतो का ग? मी किती दिवस नव्हतो तुमच्यात?” एव्हढे बोलू पर्यंत त्याला दम लागला होता.

                  अभिज्ञाने त्याला उठून पाणी पाजले आणि ती त्याच्यावर रागवत म्हणाली.


अभिज्ञा,“ किती प्रश्न विचारशील? इतकं बोलायला तू अजून बरा नाही झालास कळलं तुला! मला कळतंय तुला सगळ्यांना भेटायचे आहे दोन दिवस थांब! तुला I. C. U मधून बाहेर काढणार आहेत तेंव्हा भेट सगळ्यांना! तो पर्यंत हे घे सफरचंद खा!” ती त्याची समजूत काढत त्याला सफरचंद कापून देत म्हणाली.


अगम्य,“ बरं” तो काहीशा नाराजीनेच म्हणाला.

             डॉक्टरांनी आता पोलिसांना कळवले होते की ते दोन दिवसांनी येऊन  अगम्यची चौकशी करू शकतात. आता अगम्य इतके दिवस कोठे होता? त्याच्या बरोबर नेमके काय घडले?आणि तो अशा मरणासन्न अवस्थेत कसा काय पोहचला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दोन दिवसांनी मिळणार होती.

क्रमशः

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.

©swamini  chougule

         

      





 

     

  

     

  


 

           

🎭 Series Post

View all