Dec 05, 2021
Kathamalika

दि लूप होल (भाग ११)

Read Later
दि लूप होल (भाग ११)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

     अभिज्ञा घरी गेली तिने तिच्या आईला आज घडलेले सगळे सांगितले आणि आईला उद्या अगम्य येणार आहे बाबांशी आमच्या लग्ना विषयी बोलायला हे ही सांगितले. हे सर्व ऐकून अभिज्ञाची आई पण खुश झाली.त्या चिंतीत होत म्हणाल्या 


आई,“ अभि पण बाबांना आज आपल्याला सांगावं लागेल सगळे! पण तुझे बाबा कसे रियाक्ट होतील या सगळ्यावर हे मात्र माहीत नाही.अगम्यमध्ये तसे ना पसंद करण्यासारखे काही  नाही. दिसायला देखणा, हुशार,कर्तृत्ववान आणि आता क्लास टू ऑफिसर पण तो अनाथ आहे ही एकच गोष्ट तुझ्या बाबांना खटकण्यासारखी आहे. होतील ते तयार तुझ्या आनंदासाठी!” त्या म्हणाल्या.


अभिज्ञा,“ तू नको काळजी करू मी करेन बाबांना तयार!” ती म्हणाली.

      

     रात्री जेवण झाल्या  नंतर अभिज्ञाच्या आईने जरा मन घट्ट करून अभिज्ञाच्या बाबांशी बोलायला सुरुवात केली.अभिज्ञा ही तिथेच होती.


आई,“ अहो तुमच्याशी बोलायचे आहे थोडे अभिच्या लग्ना विषयी!” त्या म्हणाल्या


बाबा,“बरं झालं विषय तूच काढलास! अभी तुझ्या लग्नाच काय ठरवले आहेस तू? म्हणजे कोणी पसंत असेल तर सांग नाही म्हणजे  उगीच मुलं पाहण्यात वेळ घालवायला नको!” ते हसून म्हणाले.


अभिज्ञा,“बाबा मला एक मुलगा पसंत आहे” ती खाली मान घालून जरा भीतच म्हणाली.


बाबा,“ हो का? मग कोण आहे तो भाग्यवान मला ही कळू दे?” ते तिच्यावर नजर रोखून म्हणाले.


अभिज्ञा,“ अगम्य देशमुख!आणि तो उद्या घरी येतोय आपल्या! माझा हात मागायला” ती जरा घाबरत म्हणाली.


बाबा,“ अगम्य तो तुझ्या बरोबर पी.एच. डी केलेला जो तुझ्या बरोबर आत्ता काम करतो आणि तुझ्या आईला सप्तचक्र जागृती शिकवायला येत होता तोच का?” ते अभिज्ञावर नजर रोखून जरा मोठ्यानेच म्हणाले.


  अभिज्ञा घाबरून गप्प होती. म्हणून मग तिची आई बोलू लागली.


आई,“ हो तोच अगम्य या दोघांचे प्रेम आहे एकमेकांवर आणि आता दोघांना लग्न करायचे आहे!" त्या सांगत होत्या.


बाबा,“ म्हणजे सुनीता तुला सगळं माहीत आहे तर!”ते आईला रोखून पाहत म्हणाले.


आई,“ हो आणि मला अगम्य पसंत ही आहे” त्या ठामपणे म्हणाल्या.


बाबा,“ म्हणजे पहिल्यांदा मुलीचे आणि नंतर आईचे मन जिंकलेले दिसतेय पठ्ठ्याने! मला तसा काहीच प्रॉब्लेम नाही पण तो…” ते पुढे बोलणार तर अभिज्ञाच्या आईने त्यांना तोडत बोलायला सुरुवात केली.


आई,“ पण तो अनाथ आहे! हेच ना पण त्याने काय फरक पडतो? मुलगा चांगला आहे सेटल्ड आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो!अजून काय हवं आपल्याला?” त्या म्हणाल्या.


बाबा,“ अग हो हो! उद्या येणार आहे ना तो मग मी त्याच्या समोर सांगेन काय ते?” ते असं म्हणून निघून गेले.


       हे पाहून अभिज्ञा मात्र जरा चिंतीत होत म्हणाली.


अभिज्ञा,“ आई बाबा लग्नाला परवानगी देतील ना आमच्या?”


आई,“ अग देतील ग तू नको काळजी करू हा पण अगम्यला सगळं नीट सांग बाई तुझ्या बाबांना वेंधळेपणा आणि बुजरे लोक आवडत नाहीत!उद्या तो जे काही बोलेल ते आत्मविश्वासाने बोलावं त्याने म्हणजे झाले!जा झोप आता!” असं म्हणून त्या ही झोपायला निघून गेल्या


      अभिज्ञा ही तिच्या रूममध्ये गेली आणि तिने अगम्यला फोन केला.अगम्यने फोन उचलला.


अभिज्ञा,“ झोपलास काय?” ती म्हणाली


अगम्य,“  नाही!बोला मॅडम आज इतक्या उशिरा फोन केला तो! आठवण येतेय का माझी खूप!” तो मिस्कीलपणे हसत म्हणाला.


अभिज्ञा,“ तुला फ्लर्टिग सुचतेय आणि इथे मला टेन्शन आलय उद्याचे जाम!” ती जरा रागाने म्हणाली.


अगम्य,“ अग परीक्षा माझी आणि टेन्शन तुला येत आहे! रिल्याक्स हो मी पाहीन सगळं!” तो तिला धीर देत म्हणाला.


अभिज्ञा,“ पण नापास तू झालास तर  तू एकटाच नापास नाही होणार मी पण नापास होणार आहे” ती काळजीने म्हणाली.


अगम्य,“ असं काही होणार नाही विश्वास आहे ना माझ्यावर?” तो सहज म्हणाला.


अभिज्ञा,“ हो आहे पण ऐक उद्या जे काही बोलशील ते आत्मविश्वासाने बोल आणि फॉर्मल कपडे घालून ये मी गिफ्ट केलेला तो स्काय ब्यु शर्ट घाल छान दिसतो तुला तो! कळतंय ना मी काय सांगते ते?” ती सूचना देत म्हणाली.


अगम्य,“ जो हुकूम राणी सरकार! अग किती सूचना देशील! टेन्शन घेशील! टेन्शन घेऊ नकोस आणि  सगळं नीट होईल तू झोप निवांत!” तो तिला समजावत म्हणाला.


अभिज्ञा,“ हो पण टेन्शन घेऊ नको म्हणून टेन्शन जात का?बरं झोप तू मी पण झोपते!” ती काळजीने म्हणाली.


अगम्य,“ हो का?बास इतकच का आणखीन काही नाही?” तो लाडात येत म्हणाली.


अभिज्ञा,“ तुला बरा रोमान्स सुचतो रे कधी ही!” ती हसून म्हणाली.


अगम्य,“ मग म्हण ना!” तो लाडात येत म्हणाला.


अभिज्ञा,“ हुंम I love you!उद्या भेटू!” ती म्हणाली.


अगम्य,“ आता कसं love you!” तो हसून म्हणाला.

●●●●


          दुसऱ्या दिवशी अगम्य बरोबर ठरलेल्या वेळेत म्हणजेच बारा वाजता राहुलला घेऊन अभिज्ञाच्या घरी पोहचला.दार तिच्या आईने उघडले. अभिज्ञा ही तिथेच होती तिने  हसून अंगठा दाखवून त्याला all the best! केले.अगम्यने फक्त स्माईल दिली. अभिज्ञाचे बाबा हॉल मध्ये आले अगम्यला आणि राहुलला त्यांनी हातानेच इशारा करून बसायला सांगितले.दोघे ही हॉलच्या सोफ्यावर बसले.अभिज्ञाच्या आईने त्यांना पाणी आणून दिले. पाणी पिऊन अगम्यनेच बोलायला सुरुवात केली.


अगम्य,“ सर! हा माझा मित्र राहुल( राहुलने नमस्कार केला) याच्या शिवाय माझं म्हणावं असं माझे असे कोणी नातेवाईक नाहीत.खरं तर लग्नाच्या गोष्टी घरातले मोठे करतात पण माझ्याकडे असं कोणी नाही म्हणून मी स्वतःच बोलायला आलो आहे. सर माझं आणि अभिज्ञाच ही एकमेकांवर प्रेम आहे.मी पुरत्व खात्यात क्लास टू पदावर कार्यरत आहे. पगार ही चांगला आहे. आत्ताच स्वतःचे घर घेतले आहे.तुमच्या घरा इतके मोठे नाही तरी अभिज्ञा सुखाने संसार करेल इतके तरी नक्कीच मोठे आहे. मी अभिज्ञाला कायम सुखात ठेवेन याची हमी आणि वाचन ही तुम्हाला देतो.” तो हे सगळं खूप आत्मविश्वासाने बोलत होता.


बाबा,“ तुझ्या बद्दल मला सगळी माहिती आहेच की पण काल रात्रीच नवीन माहिती मिळाली की तुला आणि आमच्या आभिला लग्न कराचे आहे म्हणून! खरं तर मी अभिच्या लग्नासाठी आणि तिच्या होणाऱ्या नावर्या बद्दल खूप वेगळी स्वप्न पाहिली होती पण ठीक आहे.शेवटी अभिची पसंती महत्त्वाची आहे.संसार तर तिलाच करायचा आहे आणि अभिच्या आईला ही तू पसंत आहेस माझ्यापेक्षा तिला माणसांची पारख जास्त आहे. मी तुमच्या लग्नाला परवानगी देत आहे. बोला कधी करणार लग्न?” ते अगदी सहज म्हणाले.

          हे सर्व ऐकताना अगम्य अभिज्ञाकडे पाहत होता.तिच्या बाबांचा होकार ऐकून अभिज्ञा मात्र खूपच खुश होती. तिचे सगळे टेन्शन गायब झाले होते. अगम्य अभिज्ञाकडे पाहत तिच्या बाबांना म्हणाला.


अगम्य,“सर लग्न कधी करायचे ते  अभिज्ञाच सांगू शकेल! कारण ती जितक्या लवकर आमचे घर सजवेल तितक्या लवकर आमचं लग्न होणार!” तो हसून म्हणाला.


बाबा,“ अच्छा असं आहे तर मग अभी किती दिवस हवेत तुला तुझं घर सजवायला?” ते अभिज्ञाकडे पाहत म्हणाले.


अभिज्ञा,“ एक महिना!” तिने उत्तर दिले.


आई,“ ठीक आहे तर मग एक महिन्यानंतर जो पहिला मुहूर्त असेल त्यावर देऊ उडवून बार! आणि हो दोघे जेवण करून जा काय आहे आज स्वयंपाक अभिने केलाय” त्या हसून म्हणाल्या.

             त्यानंतर सगळे जेवले अभिज्ञा आणि अगम्य ही आज भलतेच खुश होते का नसणार म्हणा त्याच्या नात्याला आता अप्रुअल मिळालं होतं अभिज्ञाच्या घरून! 


          दुसऱ्या दिवशी पासून ऑफिस आणि संध्याकाळी घरासाठी समानाची खरेदी आणि इंटेरिअर करण्याची अभिज्ञाची लगबग चालली होती. अगम्य होता म्हणा तिच्या मदतीला! पण अगम्यची मदत कमी आणि रोमान्सच जास्त असायचा! असेच एक दिवस अभिज्ञा आणि अगम्य फ्लॅटवर काही समान लावायला गेले होते. अभिज्ञा किचनमध्ये आणखीन काय हवं याची लिस्ट करत होती तिथले समान पाहून! तर अगम्य तिथे आला आणि त्याने अभिज्ञाला मागून मिठी मारली.अभिज्ञा चिडून त्याला म्हणाली.


अभिज्ञा,“ सोड अगम्य खूप काम आहे मला! एकच महिना आहे आपल्याकडे!” ती चिडून म्हणाली.


अगम्य,“ होईल ना सगळं!” तो तिला स्वतः कडे वळवत हळूच तिला मिठीत घेत म्हणाला.


अभिज्ञा,“ तू ना दिवसेंदिवस चावट होत चालला आहेस!” असं म्हणून त्याच्या मिठीत विसावली.


अगम्य,“ चावटपणा तर मी आता करणार आहे अभि!” असं म्हणून त्याने  तिच्या नाजूक ओठांवर ओठ ठेवले. 

      

                दोघे ही किती तरी वेळ एकमेकांमध्ये गुंतत होते. एकमेकांच्या प्रेमात  बुडालेले दोन जीव त्याच्या सुखी संसाराची स्वप्ने बघत होते.

           पण नियतीने त्याच्या समोर नवीनच डाव मांडून ठेवला होता. तो कोणता आणि काय होता?

क्रमशः


या कथेचे सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन आहेत


©swamini chougule

   


    


                   


       

     

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swamini Chaughule

Author

I am Crazy Read & Passionate Writer