The Letter

Short Story

(ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून ह्या कथेतील व्यक्तींचा आणि प्रसंगांचा वास्तव जीवनात कोणाशीही कसलाही संबंध नाही तसे आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.)

                 नेहमीप्रमाणे आजही संध्याकाळी तिने दिवा लावला, देवाला हात जोडले. रोज ती हेच करत असे, सारा दिवस घर काम, पोटापुरते शिवण आणि महिनोन् महिने ,"त्याची"वाट पाहण्यात निघून गेले, तारुण्य सरून आता चंदेरी केस आणि काही सुरकुत्या चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या.

                       घरातली थोरली, वडिलांची लाडकी आणि म्हणूनच वडिलांनी खूप प्रेमानं, मायेनं, हौसेने मोठी केली पण, मध्यमवर्गीय घरात पाच बहिणीत थोरली काय ? अन धाकटी काय? नशीब थोड्या फार फरकानं सारखच!

               मॅट्रिक झाल्यावर चांगली स्थळ आली नाही असं नाही , पण लेकीच्या आग्रहाखातर बापानं "तिला"शिकवलं."ती"ही हुशार, कॉलेजात पास होत राहिली , वरच्या वर्गात जात राहिली पण, वय आडवं येतच ना! आई वडिलांना सांगून थकली "अहो, आपल्या जातीत एवढं शिक्षण? एवढं वय! पोरीचं लग्न कसं व्हावं?"पण बाप म्हणाला "माझा मुलगाच आहे हा" . हिचा ऊर अभिमानाने भरून आला, परंतु मनातलं सांगणार कोणाला? कॉलेजात आवडलेला "तो" त्याचं मागणी घालणं, भरभरून कविता करणं,"हिला" फारच आवडला "तो". तोही सर्वसामान्य घरातला, शिवाय जात ही वेगळी! तिनं ठरवलं "हा" नाहीतर,कोणीच नाही.त्यालाही ते माहिती अन् मान्य होतं.

              मोठी शिकली मग धाकट्या हि शिकल्या, पण दुसरी साठी चांगलं स्थळ आलं आणि आईनं बापाचं न ऐकता , दुसरीचे हात पिवळे करून, कन्यादान केलं. पाठोपाठ तिसरी आणि चौथी ही सासरी गेल्या. आता फक्त धाकटी, आई आणि थोरली च राहिल्या. काळंन बापाला फोटोत नेऊन बसवलं तर "तो" नोकरी करता शहरात गेला ,तसा परतलाच नाही.

                     तो नाही पण, त्याची पत्र येत राहिली, हिची आस फुलवत राहिली. वडिलांच्या जागी थोड्याफार खटपटी न "तीन ंं धाकटी ला नोकरीला लावली, मग धाकटी ही सासरी गेली.

                    आता ही रोज देवाजवळ दिवा लावते आणि त्याच्या येण्याची वाट पाहते! "आपण तर खरं प्रेम केलं पण समोरच्याचं काय?,"काय चुकलं आपलं? जगाचा निखळ व्यवहार आपल्याला का जमला नाही? त्याच्या परत न येण्याचं काही तरी कारण असेलच ना!"तोही आपल्या सारखाच मध्यमवर्गीय घरातला, घरातल्या जबाबदाऱ्या कशा टाकणार? लहान बहिणीच लग्न, मोडकळीस आलेलं घर, अर्धा संसार करून घरातून निघून गेलेल्या मोठ्या भावाची दोन मुलं-त्यांचीही जबाबदारी त्याच्यावरच!

            पण त्याची पत्र आली की आई मात्र फार चिडायची, वैतागायची, म्हणायची,"अगं जबाबदाऱ्या साऱ्यांनाच असतात पण म्हणून कोणी स्वतःचं आयुष्य असं पणाला लावता का?, तो निव्वळ बहाणे सांगतो आहे, तो परत कधीच येणार नाही" ,"मी उन्हात नाही केस पांढरे केले" पण हिचा निर्धार ठाम, आता वयही झालेलं, अर्ध्या वयाची घोड नवरी , कोण आपल्याशी लग्न करेल? आणि आपला निर्धार त्याचं काय?

            हिनं त्याच्या पत्रांना कधीच उत्तर दिलं नाही, आणि त्याची वाट पाहन हे बंद केलं नाही. कातरवेळी मात्र रोज हीच मन कातर होत होतं. पण निर्णय तिचाच होता, परिणामांचा विचार करण्याला आता अर्थ नव्हता! केवळ पदवीच्या शिक्षणावर फारशी चांगली नोकरी मिळणार नाही, याची जाणीव तिला होतीच म्हणूनच ती शिवण कामही शिकली, आता तेच तिच्या रोजीरोटीचं साधन होतं. वडिलांचं तुटपुंजे पेन्शन आणि हीच शिवण दिवस निघत होते एवढच, कुणासमोर हात पसरवावे लागत नाही याचं तिला समाधान वाटायचं.

                     एक दिवस तो येईल आणि इतकी वर्ष न येण्याच काहीतरी समाधानकारक उत्तर देईल याच आशेवर ती जगत होती आणि येणारा दिवस पुढे ढकलत होती.

               आणि एक दिवस त्याचं पत्र आलं! तो तिला भेटायला, स्वतःबरोबर न्यायला येणार होता." तो येणार" ह्या पत्रातल्या ओळीवरून तिला अनेकदा हात फिरवला, शंभर वेळा तरी तीनं ती ओळ वाचली, आणि तो दिवस आला! काळा च्या मीतीनं त्याच्याही वर परिणाम केला होता, आता तोही वयस्क दिसत होता. "बहिणींची लग्न केली, आई-वडील काळाच्या पडद्याआड गेले, पुतणे हि आता नोकरीला लागले"-तो सांगत होता. ही आणि आई शांतपणे ऐकत होत्या. तो म्हणाला "चल आपण आता सोबत राहू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे" ,"आयुष्याची उरलेली अर्धी वाट तुझ्या सोबतीने पूर्ण करायची आहे". ती म्हणाली "माझ्या आईचं काय?" तो उत्तरला,"तुझी आई-ती माझी आई, ती ही आपल्या सोबतच राहीन".

        आता ती-तो आणि तिची आई आनंदाने सोबत राहत होते.





https://youtu.be/f4sE_uPUP_ohttps://youtu.be/f4sE_uPUP_o

🎭 Series Post

View all