शेवटचा प्रवास

संत नामदेव यांच्या अंभागाचे एक निरूपण

आपण ह्या जगात येतानाही एकटे नसतोच ..अगदी आपला जन्मही आईच्या उदरात करतो..तिथुन आपला प्रवास सुरू होतो.. त्या प्रवासात सतत कोण नी कोण आपली सोबत करतचं.


एक प्रवास असा असतो जो आपण अगदी एकट्याने करतो .तो प्रवास आहे शेवटचा प्रवास ...मृत्युनंतरचा अंतयात्रेचा प्रवास.


आपले माता ,पिता, भाऊ आणि बहीणी ,लाडकी मुले जे आपल्यावर प्रेम करतात .आपण ज्यांच्या सेन्हबंधनात असतो. तेही शेवटी मृत्युच्या प्रवासात एकट सोडुन देतात.

अगदी साता जन्मीचे जोडीदारही तुम्हाला त्या वाटेवर साथ देत नाही, तुमचे जवळचे तुम्हाला चितेपर्यंत आणुन  ठेवतात..तेवढीच त्यांची साथ ... पण मृत्यृची वेदना ती तर एकट्यानेच सहन करायची असते .... जर हा प्रवास एकट्यानेच करायचा आहे आणि  आपण गेल्यावरही कुणाचे अडत नाही तर..व्यर्थच आसुया ,मोह,मान अपमान ,आपलं परकं हे न करता आयुष्यात थोडस देवाचही नामस्मरणही करावे...


आपण सर्वजण आपल्या व्यापात असे गुरफटतो की देवालाच विसरतो. मग अंतकाली आपल्याला देवच आठवतो.देवच आहे जो ह्या प्रवासात तुमच्याबरोबर असतो.ह्याच अर्थाचा संत नामदेवांचा अंभग  

वाचकांबरोबर सामाइक करते.



   अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥


नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ 


जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ 


बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ 


कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ 


देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनीं । मी जळतसें स्मशानीं । अग्निसवें एकला ॥६॥ 


मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानीं परतले । शेवटीं टाकोनियां गेले । मज परता येमजाल ॥७॥ 


ऐसा जाणोनि निर्धार । मन मज आला गहिंवर । तंव दाहीं दिशा अंधःकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥


ऐसें जाणोनियां पाही । मनुष्य जन्म मागुता नाहीं । नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥९