समीक्षण- द केरला स्टोरी

Review About The Movie In Short In My View.
द केरल स्टोरी


पूर्ण चित्रपट नक्कीच डोळे उघडणारा आहे. कुटुंब पद्धती आणि मुलगा असो वा मुलगी दोघांना समान स्वातंत्र अधिकार देताना त्याच्या वर नजर सुद्धा असणे गरजेचे आहे.

चित्रपट सुरू होतो तो मुळातच वर्तमान काळात. मग भूतकाळ आणि वर्तमान मध्ये ये-जा सुरू होते. एक प्रेक्षक म्हणून, सतत असे बदलणारे काळ पाहता डोक्याचा थोडा भुगा होतो. त्यातही भाषा इंग्लिश, उर्दू, हिंदी आणि मल्याळम मिक्स असल्याने मेंदूची तारांबळ होते. मधेच मल्याळम मध्ये गाणी आणि मधेच हिंदी...आणि काही ठिकाणी अनावश्यक गाणी.


वयात येणाऱ्या प्रत्येक मुलगा- मुलगी ला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान देणे आवश्यक आहे. त्यासाठी सोपे आणि ठराविक मुद्दे तयार करणे आवश्यक आहे. जेव्हा वयात आलेले मुलगा मुलगी ऐकेनाशी होतात तेव्हा थोडे त्याच्या आणि थोडे आपल्या कलेने समजावून सांगता आलेच पाहिजे. कारण... आजची परिस्थिती पाहता हीच काळाची गरज आहे.

कारण, हा चित्रपट कुटुंब सगळे जाऊन पाहत असाल तर काही ठिकाणी ऑड वाटू शकते. जसे की शारीरिक सबंध, मग ते दोघांमधील असो, किंवा 10-12 लोकांनी मिळून एकीवर केलेल बलात्कार असो किंवा कैदेत असलेल्या महिलांवर सगळ्यांनी मिळून एकेक करून केलेला असो...नक्कीच मनाला त्रास देणारा आहे. बहुतेक करुन प्रेक्षकांचे डोळे मोठे झाले असावेत किंवा भुवया उंचावल्या गेल्या असाव्यात हे नक्की.
काहींनी स्वतःलाही त्या परिस्थितीशी जोडून पाहिले असावे. फरक इतकाच की, तेच सगळे कायद्यात राहून होत असावे आणि परिस्थिती. असो.
जगात असेही होते हेच कितीतरी लोकांना हा सिनेमा पाहिल्यावरच समजले असेल.


राहिली गोष्ट धर्म आणि जात...खरेतर जगभर ह्या गोष्टींचा आतंकवाद पसरलाय. कोणी एकाला दोष देऊन मोकळे होऊ नाही शकत. कारण?
' गुन्हा करणारा लाख गुन्हे करत जाईल...पण त्याला खत पाणी घालणारे कोण आहे?' हा सुद्धा विचार करण्यासारखे आहे.

आपल्या पाल्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे प्रत्येक पालकांचे जबाबदारी आहे. सणवार साजरे का केले जातात? त्यांचे महत्व सुद्धा समजावून सांगणे गरजेचे आहे. मग ते कुठलाही धर्म असो.
प्रत्येकजण जेव्हा आपापल्यापरीने मुलांना चांगले संस्कार देतात तेव्हा 'मूल चुकीच्या मार्गावर कसे गेले असावे?' ह्याचा सुद्धा विचार करून, योग्यरीत्या समजावले पाहिजे.


मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देताना ते कुठवर द्यावे आणि ते कुठवर नेईल हे नक्कीच पहावे. आजची शिक्षण पद्धती पाहता आता फक्त स्पर्धा उरली आहे. कारण एवढ्या सगळ्या अपेक्षा आणि किचकट शिक्षण पद्धती निर्माण झाल्यात की...काहींना घरी घुसमट होते काहींना बाहेर राहून.

सिनेमा मध्ये, तिन्ही मुली मध्ये एकीला घरी जावेसे वाटत नाही, दुसरीचे घर दूर आहे तिसरीला इथेच रमायला आवडते. घरी जावेसे वाटत नाही? का? आणि घर दूर आहे तर पालकांनी एकदाही भेटायला येऊ नये? नक्कीच खटकायला होते.
मॉल मध्ये त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवतो किंबहुना प्लॅन केलेल असतो...तेव्हा खरेच त्यांच्या मदतीला कोणीच येऊ नये? कपडे सुद्धा फाडले जातात आणि कोणीच येऊ नये?

प्रचंड प्रश्नार्थक सीन आहे. कारण त्यांच्यावर हात उगारणार्या माणसांकडे ना कुठले हत्यार होते ना अजून काही. त्यांनी फक्त शारीरिक बळाचा वापर केला गेला. तिघीच लढत होत्या, त्यांच्या परीने एकसाथ.


आता...पाल्य बाहेर शिकण्यासाठी राहणार आहे तर नीट शहानिशा करणे नेहमीच चांगले. नुसते बाजूची मुले...गल्लीतील पोरे...वाड्यातील मुले...सोसायटी मधील मुले शिकत आहेत ह्याचा अर्थ असा नाही की सगळे छान आहे. स्वतःहून जाऊन चौकशी करून येणे केव्हाही चांगले.

चित्रपटाच्या शेवटी, खऱ्या आयुष्यातील लोकांच मुलाखत आणि पिडा मांडलेली दाखविली. कोणावरही अज्ञातवासात रहायची वेळ नक्कीच येऊ नये. त्यासाठी हा समाज नक्कीच जबाबदार आहे. कारण समाजात बदनामीचा भीतीने कुठेतरी जगाशी पूर्णपणे संबंध तोडून राहणे सोप्पे नाही. कोणीतरी मारून टाकेल ह्या भीतीने कुठेतरी अज्ञाता सारखे जीवन जगाची वेळ कोणावर येऊ नये.

' एकमेकांन साह्य करू '...काळानुसार लुप्त होत आहे.

शेवटी काय...कोणीतरी काहीतरी होईपर्यंत वाट बघत नाही. पण ते होण्यापासून नक्कीच एक जीव वाचविला जाऊ शकतो.

चित्रपट एकतर पुर्ण पणे हिंदी मध्ये असावा कारण बरेच पालक आहेत ज्यांना इंग्लिश कळत नाही आणि हिंदी सबटायटल्स पटापट वाचता येत नाही. मल्याळम गाणी अनावश्यक होते. एक गाणे हिंदी आणि दुसरे मल्याळम मध्ये काही लॉजिक नाही. आणि मधेच उर्दू. असो. एवढेच.

-
लेखिका-पूजा आडेप ©