शमिका तिच्या घरच्यांसोबत हॉरर चित्रपट बघत असते.. थोड्या वेळाने तिचे आई बाबा आत झोपायला निघून जातात.. मूवी संपतो.. आणि अचानक लाइट्स ऑफ.. सगळीकडे काळोख.. रातकीड्यांचा आवाज.. भयाण शांतता आणि कोणीतरी जोरात किंचाळलं..
तेवढ्यात सगळ्या लाइट्स लागल्या..
मंद, माकडा.. घाबरले ना मी.. : शमिका
हीहीहीहेहे.. : दुर्वांक ( शमिकाचा भाऊ )
येहह.. दी घाबरली.. : दुर्वांक
क्षमिकाने त्याच्या पाठीत जोरात मारलं.. तसं लागलं ते भोकाड पसरून रडायला.. ??
तशी शमिकाची आई आत आली..
"काय चाललंय तुमचं.. झोपा बघू गपचूप.. " : शमिकाची आई
" हा नालायक बघ ना.. मला घाबरवत होता.. " : शमिका
तसा दुर्वांक खट्याळ हसतो..
" तो लाख घाबरवेल पण तुलातरी हौस कमी आहे का ते हॉरर पिक्चर बघायची.. " : शमिकाची आई
"दुर्वांक चल झोपायला.. " : शमिकाची आई
ती दुर्वांकला सोबत घेऊन जाते..
आता शमिका तिच्या रूममध्ये एकटीच असते.. आईच्या ओरड्यामुळे जरा दुखाववलेली असते.. डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करते..
सकाळी तिच्या नेहमीच्या वेळेत ती उठत नाही.. म्हणून आई तिच्या खोलीत बघायला जाते..
बघते तर, शमिका थंडीने कुडकुडत असते.. कपाळाला हात लावून बघते तर चटकाच लागतो, इतका ताप असतो..
ती डॉक्टरांना फोन करते.. डॉक्टर येऊन चेक करून इंजेक्शन, औषधं देतात.. पण का कुणास ठाऊक, त्यांना असं वाटतं की, तिने कसलातरी धसका घेतलाय..
दोन दिवस उलटतात..
तीन दिवस उलटतात..
पण शमिकाचा ताप काही जात नाही..
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा