The Journey Of Soul - Part Five

शमिकाला पडलेलं स्वप्नं तिच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार, हे पाहण्यासाठी नक्की कथा वाचा.


शमिकाला यशशी बोलून थोडं बरं वाटतं.. ती घरी येऊन दुर्वांकशी मस्त मस्ती करते.. सगळे एकत्र जेवतात.. तिलाही वाटतं की, आपण उगीच त्या स्वप्नाचा इतका विचार करतोय..

ती शांत झोपते..

सकाळी तिला जाग येते, तीच कसल्याशा गोंधळाने..

ती तशीच बाहेर येते..

नवीन कोणीतरी समोरच्या घरी राहायला आलेले असतात..


शमिका आवरायला आत जाते..


सगळे नाष्टा करत असतात, तेव्हा दारावर


" नमस्कार, आत येऊ का?? " : दारावरील बाई


सगळे संभ्रमित नजरेने बघतात..


" अहो, मी कावेरी.. इथे बाजूच्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झालोय आजच.. म्हटलं, शेजाऱ्यांशी ओळख करून घ्यावी.. " : ती बाई


" अहो, या ना आत.. अशा दारात का उभ्या.. " : स्नेहा


" पुन्हा कधीतरी येईन.. आता जरा गडबड आहे.. सगळं सामान लावायचंय.. " : कावेरी


" बरं बरं.. काही मदत लागली तर निसंकोच सांगा.. " : विशाल


कावेरी गेल्यावर..


" काय हो.. घरात इकडची काडी तिकडे करायला मागत नाही.. आणि तिला बरे म्हणताय मदत करतो म्हणून.. " स्नेहा नाक मुरडून म्हणाली.


" अगं पद्धत असते ती बोलायची.. " : विशाल


" हो तर.. म्हणे पद्धत असते बोलायची.. " : स्नेहा


इकडे ह्या दोघांची भांडणं सुरु होती आणि तिकडे शमिका आणि दुर्वांक ह्यांच्या live show चा आनंद घेत हसत होते..


शमिका संध्याकाळी घरी आली तेव्हा अंगणात एक 3 - 4 वर्षांची मुलगी खेळत होती..


शमिकाकडे बघून ती हसली..


" Hello, मी आर्या.." : ती मुलगी


शमिकानेही तिचा हात प्रेमाने हातात घेत आपली ओळख करून दिली..


" ये ताई, तू माझ्यासोबत खेळशील का?? " : आर्या


" आज नाही.. पण उद्या नक्की खेळू.. उद्या रविवार आहे ना.. " : शमिका


" ओके.. बाय.. " : आर्या


दुसऱ्या दिवशी शमिका, दुर्वांक आणि आर्या तिघांनी नुसता गोंधळ घातला.. दुर्वांकला त्याच्या वयाची नवीन मैत्रीण मिळाली होती आणि शमिकाला एक cute मैत्रीण..


" ए ताई, उद्या माझे बाबा येणारेत युएसवरून.. माझ्यासाठी भरपूर खेळणी घेऊन.. " : आर्या


" अरे वाह.. मज्जा आहे मग आरुची.. मला दाखवशील ना तुझी खेळणी?? " : शमिका


" हो.. " : आर्या


सगळेच खूप दमले होते, त्यामुळे लवकर झोपले..


शमिकाला गाढ झोप लागली होती.. तिला झोपेत पुन्हा तेच स्वप्न पडलं.. पण यावेळेला ज्या गाडीने accident होतो, त्या गाडीचा नंबर स्पष्ट दिसत होता.. आणि त्यापुढे चालणारी ती लहान मुलगी..


ती घाबरली.. उठून पाणी प्यायली.. स्वतःच स्वतःला धीर दिला आणि परत झोपली..


दुसऱ्या दिवशी ती बाल्कनीत उभी असताना समोरून एक आलिशान गाडी आली..


त्या गाडीचा नंबर आणि काल स्वप्नात दिसलेल्या गाडीचा नंबर एकच होता..


तिला समोर बघतोय ते सत्य की स्वप्न हेच कळत नव्हतं..


क्रमश :


🎭 Series Post

View all