Jan 29, 2022
कथामालिका

The Journey Of Soul - Part 4

Read Later
The Journey Of Soul - Part 4

दुसऱ्या दिवशी शमिका कॉलेजला जाते.. लेक्चरमध्ये मॅडम तिला प्रश्न विचारतात पण शमिकाचं लक्ष नसतं.. त्यामुळे तिला सगळ्यांसमोर ओरडा पडतो.. त्यामुळे तिचा मूड काही बरा नसतो..


" ओ मॅडम, लंच ब्रेक झालाय.. चला जेवायला.. "   : ऋतू

" मला भूक नाहीये गं.. तू जा.. "   :  शमिका

" चल लवकर.. नाहीतर मीपण इथेच बसेन.. "   :  ऋतू

ऋतू जबरदस्तीने तिला कॉलेजच्या कँटीनमध्ये घेऊन जाते..


" हाय ऋतू, हाय शमिका.. " :  यश

" अरे यश.. हाय.. बस ना.. तूपण जॉईन हो आम्हाला.. "  :  ऋतू

" नाही.. माझं झालंय खाऊन.. तुम्हाला कंपनी देऊ शकतो पण.. " : यश हसत म्हणाला.


शमिकाचं काही लक्ष नसतं दोघांच्या बोलण्याकडे..


तेवढ्यात ऋतूला तिची एक मैत्रीण बोलावते..


आणि आता टेबलवर यश आणि शमिका समोरासमोर असतात..


" शमिका, आर यु ऑलराइट?? "   :  यश

" मला कुठे काय झालंय.. "  :  शमिका

" तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय.. काहीतरी आहे, जे तुला त्रास देतंय पण सांगता येत नाहीये.. तू मनमोकळेपणाने बोलू शकतेस माझ्याशी.. I mean, काही प्रॉब्लेम असेल तर सोडवू आपण.. "   :  यश

" आहे असं काहीतरी.. जे आता नाही सांगता येत आहे मला.. "   :  शमिका

" बोल शमिका, काय झालंय.. घरी काही?? "   :  यशने अंदाज घेत विचारलं.

" नाही.. "   :  शमिका

" त्यादिवशी एक स्वप्न पडलं मला.. "   :  शमिका

" अरे वाह.. छान.. "   :  यश

" यश, आय एम सिरीयस.. "   :  शमिका

" ओके.. सॉरी.. बोल "   :  यश

" त्या स्वप्नात मला एक चार पाच वर्षांची मुलगी पाठमोरी दिसली.. तिचा मृत्यू एका कार accident मध्ये झाला.. तिच्या अंत्यविधिला मी तिथे होते.. "   :  शमिका


" शमिका ते स्वप्न होतं.. तू डोक्यातून काढून टाक.. तुला आवडणारी गोष्ट कर.. सारखा त्याचा विचार नको करू.. I know it's shocking but you need to be strong.. "   :  यश


" थँक्स यश.. "   :  शमिका


तेवढ्यात ऋतू तिथे आली..


" काय एवढ्या गप्पा चालल्यात दोघांच्या.. "   :  ऋतू

" काही नाही.. General.. "   :  यश

लंच ब्रेक संपल्याची बेल होते आणि सगळे आपापल्या क्लासरूम मध्ये जातात..

शमिकापण तिच्या क्लासरूममध्ये जाते..

सगळे लेक्चर अटेंड करून ती घरी जायला निघते..

तितक्यात लायब्ररीतून आपल्याला पुस्तक घ्यायचंय, हे तिला आठवतं..

तशी ती परत वर जाते..

हवं ते पुस्तक शोधता शोधता उशीर होतो.. शेवटी ती तिथून निघते..


कॉलेजच्या गेटच्या बाहेर पडताच यश समोरून बाईकवरून येतो..


" मी सोडू का तुला घरी??? "   :  यश

ती आधी नको म्हणते पण उशीर झालेला बघून शेवटी त्याच्यासोबत जायला तयार होते..

त्याच्यासोबत तिला सुरक्षित वाटत असतं.. आणि सोबत कसलीतरी हुरहूर..


क्रमश :

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..