Jan 26, 2022
कथामालिका

The Journey Of Soul - Part 3

Read Later
The Journey Of Soul - Part 3

दोन - तीन दिवसांनी..


स्नेहा सकाळी जेवण लवकर आटपून काही कामानिमित्त बाहेर जायला निघते..

शमिकाला ती दुर्वांकसोबत थांबायला सांगते.. 

ती परत आल्यावर हॉलमध्ये फक्त दुर्वांक असतो.. शमिका नसते..

स्नेहा दुर्वांकला शमिकाबद्दल विचारते..

" दी मगाशीच गेली.. मला म्हणाली, लगेच येते.. पण अजून नाही आली.. बहुतेक तिला मॅजिकवाला खाऊ भेटला नाही..  "   :  दुर्वांक

स्नेहा शमिकाला फोन लावून बघते, तर फोन स्वीच ऑफ येतो.. ती विशालला फोन करते..  दुपारी गेलेली आपली मुलगी रात्र होऊन गेली तरी आली नाही, या विचाराने तिचं आईचं काळीज जास्तच घाबरून जातं..

आणि तिकडे शमिका एका व्यक्तीला काहीतरी गाडीबद्दल विचारत असते..

समोरून एक बाईक येते आणि बाईकवरचा माणूस तिची पर्स घेऊन सुसाट वेगात बाईकवरून निघून जातो.. ती पाठलाग करते पण उपयोग शून्य.. शेवटी ती तशीच घरी येते..

स्नेहा आल्या आल्या तिचा चांगलाच समाचार घेते..

" शमिका, काय चाललंय तुझं???  मी दुर्वांकला तुझ्यावर सोपवून गेले होते.. आणि तू त्याला एकट्याला सोडून खुशाल बाहेर सोडून गेलीस.. "   :   स्नेहा

" आई, अगं ते.. "   :  शमिका

" काही बोलू नकोस आणि दुर्वांकला खाऊ आणायला म्हणून बाहेर पडलीस ना.. कुठेय.. काहीही कारणं सांगायची नुसती.. "  :  स्नेहा

" आई, पर्स चोरली माझी.. "   :  शमिका अडखळत बोलली.

तशी स्नेहाने तिच्या एक कानाखाली वाजवली..

" गो टु युअर रूम.. "   :  स्नेहा जोरात ओरडली.

शमिका काही न बोलता तशीच तिच्या रूममध्ये गेली.

रात्री विशाल जेवण घेऊन तिच्या रूम मध्ये आला..

" मगाशी आईने मारलं म्हणून राग आला असेल, वाईट वाटलं असेल तुला पण तू अशी अचानक काही न सांगता निघून गेल्यामुळे काळजी वाटत होती गं.. सावत्र असली, तरी आई आहे ती तुझी.. "  :  विशाल

तेवढ्यात विशालला स्नेहा हाक मारते..

शमिकाला तेव्हा तिच्या खऱ्या आईची खूप आठवण येते आणि तिला रडू कोसळतं..

ती आईच्या आठवणीत रडत असते, तेवढ्यात 

" दी, जेव ना.. जेवण असंच ठेवलं ना तर देवबाप्पा कान कापतो.. " : दुर्वांक

तसं ती दुर्वांकला वर उचलून बेडवर ठेवते आणि दोघेही एका ताटात जेवतात.. 

त्या घरात दुर्वांकच तर असतो, ज्याचा तिच्यावर खूप जीव असतो.. बाकी काय, आई सावत्र आणि वडील आईच्या सांगण्याबाहेर नाही..

जेवताना दुर्वांकची बडबड सुरूच असते.. त्यात ती तिचं सगळं दुःख विसरून जाते..


क्रमश :


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..