Jan 29, 2022
कथामालिका

The Journey Of Soul - Part 2

Read Later
The Journey Of Soul - Part 2

दोन दिवसांनंतर..

" शमूचा ताप काही केल्या उतरत नाहीये हो.. मला तर काही कळतच नाहीये, काय करायचं ते.. "   : स्नेहा ( शमिकाची आई )

" तसंच काही वाटलं तर आपण दुसऱ्या डॉक्टरकडून सेकंड ओपिनियन घेऊ.. तू नको काळजी करुस.. होईल सगळं ठीक.. "   : विशाल ( शमिकाचे बाबा )

त्यांचं बोलणं सुरु असताना दुर्वांक रडत येऊन आईला बिलगला..

" काय झालं बाळा.. का रडतोयस तू?? "  :  स्नेहा 

" आई, माझ्यामुळे दी आजारी पडली.. मी त्यादिवशी तिला घाबरवलं म्हणून.. "   :  दुर्वांक

इतकं बोलून तो परत रडायला लागला.

" असं काही नाही बाळा.. पण कधी कधी मस्करीची कुस्करी होते राजा.. "  :  विशाल

" म्हणजे??? "    :  दुर्वांकने डोळे पुसत विचारलं..

" काही नाही, बाळा.. होईल दी लवकर बरी.. "    :  विशालने दुर्वांकच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हटलं..

" दुर्वांक, तुला साखर दूध आवडतं ना.. मी देते तुला.. आधी दीला देऊन येते मग तुला देते.. तोपर्यंत तू जाऊन झोप.. अजून सकाळ नाही झाली.. "   :  स्नेहा

" आई, मला झोप नाही येत आहे .. मीपण येणार तुझ्यासोबत दीच्या रूम मध्ये.. "  :  दुर्वांक

" बरं.. बस मग इथे.. मी दूध गरम करते.. "     :   स्नेहा

दुर्वांक आईची वाट बघत डायनिंग टेबलवर बसतो..

तेवढ्यात वरून काहीतरी पडल्याचा आवाज येतो..

तसे सगळे धावत वर जातात..

फ्लॉवरपॉट खाली पडलेला असतो..

" शमू, बाळा ठीक आहेस ना तू?? "   :  स्नेहा

" हो आई, मी ठीक आहे.. पाणी हवं होतं.. ते घेताना तो फ्लॉवरपॉट पडला.. "     :  शमिका

स्नेहाने तिच्या अंगाला हात लावून बघितलं तर ताप उतरला होता..

तिने हे सगळ्यांना सांगताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला..

ताप उतरला असला तरी सलग तीन - चार दिवस ताप असल्यामुळे अशक्तपणा होता..

त्यामुळे शेवटचं वर्ष असूनही शमिका कॉलेजला जाऊ शकत नव्हती..

घरात बसून बसून कंटाळली होती..

आज तिला थोडं बरं वाटत होतं.. म्हणून ती आईने बनवलेली मस्त कॉफी पीत पुस्तक वाचत बसली होती..

त्या पुस्तकातल्या कुठल्याशा संदर्भावरून तिला त्यादिवशीचं स्वप्न आठवलं.. आणि ती अस्वस्थ झाली..


क्रमश : ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..